Total Pageviews

Tuesday, 24 March 2020

अमेरिकन डॉक्टरांचे नागरिकांना अनावृत पत्र..TARUN BHARAT-24-Mar-2020 -वसंत गणेश काणे

 

अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होत असून, मृत्युदरही काळजी वाटावी, असा आहे. असे असले तरी जनतेत अनेक चुकीच्या समजुतींनी घर केले असून, समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत असलेली माहिती िंचता वाटावी, अशी आहे. अमेरिकेतील बोस्टनस्थित आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या 40/50 जगविख्यात डॉक्टरांनी जनजागृती करण्याच्या हेतूने अमेरिकन नागरिकांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या अनावृत पत्राचा हा काहीसा स्वैर, पण तरीही नेमका व संपादित भाग आपल्यालाही बोधप्रद ठरेल, असे वाटते. अमेरिका ही आज एक जागतिक महासत्ता आहे. तिथल्या विख्यात वैद्यकीय विशारदांनी स्पष्ट शब्दांत दिलेला हा इशारा अमेरिकन जनतेत जागृती व्हावी, या हेतूने दिलेला असून आपणही नोंद घ्यावी, असा आहे. तसेच याबाबत आपण घेत असलेली खबरदारी अभिमान व समाधान वाटावी, अशीच आहे.





परिस्थिती चिंता वाटावी, अशीच!
कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये असलेले संभ्रम, चुकीची माहिती आणि सोशल मीडियातील या रोगाला क्षुल्लक मानण्याची वृत्ती आमच्या अनुभवाला आल्यामुळे, सोप्या आणि स्पष्ट शब्दांत या रोगाचे गांभीर्य जाणवून देण्यास आम्ही उद्युक्त झालो आहोत. कोरोना हा सर्दीला कारण असलेल्या व्हायरससारखाच आहे, असे वृत्त ऑनलाईनवर आलेले आम्ही बघितले आहे. तसेच कोरोनाची बाधा झाल्यास जोरदार सर्दी झाल्याप्रमाणे त्रास होईल इतकेच, अशा आशयाचा मजकूर आमच्या पाहण्यात आला आहे. याचे स्वरूप यापेक्षा गंभीर असणार नाही. जिवाचे बरेवाईट होण्याचा तर प्रश्नच नाही, असा आशय आमच्या वाचण्यात आला आहे. हे खरे आहे की खोटे, ही बाब तुम्ही कोण आहात (लहान मूल, सुदृढ, अशक्त, तरुण िंकवा प्रौढ), यावर अवलंबून आहे. पण, आपण सर्व समाजाचा साकल्याने विचार केला पाहिजे, नाही का?


निसर्गनिर्मित व नवीन
कोरोना व्हायरस मानवासाठी पूर्णपणे नवीन आहे. हा सर्दीला कारणीभूत असलेल्या व्हायरसच्याच जातकुळीचा असला, तरी आणि याची लक्षणे अनेक प्रकारे सर्दीसारखीच भासत असली, तरी या व्हायरसची मानवाशी पहिल्यांदाच गाठभेट होत असल्यामुळे आपल्यापैकी कुणातही याचा सामना करण्याची क्षमता यापूर्वीच निर्माण झालेली नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.


संसर्गक्षमता दसपट
या व्हायरसची लागण अख्ख्या मानवजातीत वेगाने होत असून, श्वसनमार्गातून बाहेर पडणार्‍या स्रावांतून हा एकापासून दुसर्‍याकडे संक्रमित होत असतो. याची संसर्गक्षमता सर्दीच्या तुलनेत दसपट आहे, हे लक्षात घ्या. लागण झालेले बहुतेक (80 टक्के) बरे होतील. 20 टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया होईल व त्यांना दवाखान्यात दाखल व्हावे लागेल. 2/3 टक्क्यांसाठीच हा घातक ठरेल. पण, आमचे हे भाकीत इटलीत खोटे ठरले आहे. याचे एक कारण असे आहे की, त्या देशाची आरोग्यजपणूक यंत्रणा तोकडी पडली. तिथे 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍यांच्या बाबतीत घातक ठरण्याचे प्रमाण 8 ते 20 टक्के आहे. एखाद्या लहान मुलाला बाहेर खेळता खेळता या व्हायरसची बाधा झाली, तर घरातल्या वडीलधार्‍यांना त्याचा संसर्ग दाराच्या कडीला िंकवा टेबलाला स्पर्श झाल्यास लगेच होऊ शकतो.


साथीच्या रोगांची संपर्क गती
साथीचे रोग पसरण्याची गती मोजण्याची शास्त्रज्ञांची एक खास पद्धत आहे. हा एक अंक असून, आर झिरो िंकवा आर नॉट (नॉट म्हणजेही शून्यच) असे त्याचे नाव आहे. हा अंक काढण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. ती अशी- आजारी व्यक्ती बरे होण्यापूर्वी िंकवा दगावण्यापूर्वी किती लोकांमध्ये रोगसंक्रमण करते, यावरून हा अंक ठरतो. कोरोना व्हायरसचा आर झिरो िंकवा आर नॉट 3 असतो, असे आढळून आले आहे. म्हणजे असे की, कोरोनाचा रोगी बरा होण्यापूर्वी िंकवा दगावण्यापूर्वी सरासरीने 3 लोकांत रोगसंक्रमण करतो. ही गती किती प्रचंड आहे, हे पुढील गणनेवरून लक्षात येईल.


जॉमेट्रिकल प्रोग्रेशनने प्रसार
एका कोरोनाबाधिताने तीन लोकांना पहिल्या फेरीत बाधित केले, तर दुसर्‍या फेरीत हे तिघे प्रत्येकी आणखी तिघांना म्हणजे एकूण 9 लोकांना बाधित करतील. तिसर्‍या फेरीत ही संख्या पुन्हा तिपटीने वाढून 27 होईल. अशाप्रकारे 15 व्या फेरीत बाधितांची संख्या 1,43,48,907 (1 कोटी, 43 लक्ष, 48 हजार, 907) होईल. या 15 फेर्‍या काही आठवड्यांतच पूर्ण होतील. संख्यावाढीच्या या प्रकाराला भूमितीय श्रेढी (श्रेणी नव्हे)- जॉमेट्रिकल प्रोग्रेशन असे नाव आहे.


शाळा/महाविद्यालये, खेळाची मैदाने अशा गर्दीच्या जागी तर एका नरड्यातून संक्रमित होणार्‍या बाधितांसाठी याहीपेक्षा कमी वेळ पुरेल. पहिली व्यक्ती तरुण आणि धडधाकट असेल, तर ती बरी होईल, पण नंतरच्या लाखो लोकांचे काय? त्यात कितीतरी वयोवृद्ध, अशक्त व लहान मुले असतील, त्यांचे काय?


आर झिरो = 3 हा अंक नक्की िंकवा कायम नाही. केवळ संरक्षक व प्रतिबंधात्मक उपायांनीच तो कमी करता येतो. कारण, यावर औषध िंकवा लस उपलब्ध नाही. हा अंक जेव्हा एकपेक्षा कमी होईल, तेव्हाच या रोगाची साथ मावळेल. म्हणून बाधितांना वेगळे ठेवणे (क्वारंटाईन) व सामाजिक विलगीकरण (सोशल डिस्टंन्सिंग) महत्त्वाचे आहे. या कामाची गती आज समाधानकारक नाही. ती वाढविलीच पाहिजे.


एकमेव उपाय
व्हायरसची पसरण्याची गती कमी करणे, हा एकमेव उपाय आज अमेरिकेने आपल्या हाती घेतला आहे. आपल्या देशात हॉस्पिटलांची संख्या कितीही असली, तरी ती अपुरीच पडणार. व्हेंटिलेटर्सची संख्याही भरपूर आहे, पण तीही अपुरीच पडणार. आमच्या इटालियन मित्रांनी आपले अनुभव आम्हाला सांगितले आहेत. त्यांना व्हेंटिलेटर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस, आयसीयू बेडस्‌ कमी पडत आहेत. त्यामुळे कुणाला वाचवायचे आणि कुणाला नाही, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. काहींना तर साधे उपचार देणेही शक्य होत नाही. आजमितीला आपण अमेरिकन, इटालियन लोकांच्या तुलनेत फक्त 11 दिवस मागे आहोत. त्यांच्या व आपल्या वैद्यकीय सोयी-सुविधा जवळपास सारख्याच आहेत. पेशंट्सचा भला मोठा लोंढा लवकरच आमच्यासमोर येऊन ठाकणार आहे. असे झाल्यास काय करणार? मात्र, आपल्या लहानमोठ्या सामाजिक नेत्यांच्या हाती एक प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. ते आम्हा डॉक्टरांना आक्रमक होऊन मदत करू शकतात. वेगळे ठेवणे- क्वारंटाईन/ आयसोलेशन आणि सामाजिक विलगीकरण- सोशल डिस्टंन्सिंग यासाठी समाजघटकांना प्रवृत्त करणे, हे त्यांना सहज शक्य आहे. यातून कोरोना व्हायरसचा चढता आलेख ते सहज सपाट करू शकतील आणि या रोगाचा विळखा सैल होईल व तो मावळेल.


आमची या सामाजिक नेतृत्वाला कळकळीची विनवणी (इंप्लोअर) आहे की, आमच्या मदतीला उभे राहा. ई-मेल पाठवून सर्व शिक्षण संस्थांना तातडीने सुटी देण्यास सांगा. लहान मुलांना तर एकलकोंडेपणा तापासारखा छळतो. दोस्तांना भेटू द्या म्हणून ते हट्ट करतील, वाढदिवसांच्या पार्ट्यांची व सामाजिक समारंभांची ते आतुरतेने वाट पाहात असतील. या मुलांना आवरण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील. आठवड्यावर आठवडे एकट्याने काढताना ते बोअर होतील. पण, आपल्या हाती आजतरी प्रतिबंधात्मक उपायच आहेत, हे लक्षात घ्या (कोरोना व्हायरसवर औषध उपलब्ध नाही).


कोणते आहेत, हे उपाय?
सर्व खेळ बंद (दोघांतला म्हणजे जोडीदाराबरोबरचासुद्धा). एकत्र येणे बंद. पार्कातल्या खेळण्यांवरचे खेळ, जिम, हॉटेिंलग, चित्रपटगृहात चित्रपट पाहणे बंद, सभागृहातले कोणतेही कार्यक्रम, या सर्वांना सरळ सुटी.
सर्व दौरे रद्द करा, अगदी आवश्यकच असेल तरच प्रवास करा. ही निवासस्थाने स्वच्छ आहेत, अशा जाहिराती येत आहेत, ती तशी असतीलही, पण तेवढे पुरेसे नाही. घरीच थांबा, घरून काम करा, किराणा व औषधे आणण्यासाठी बाहेर पडावेच लागले, तर तातडीने कामे उरकून तडक घरी परत या!


हात साबणाने धुवा. बोटांच्या बेचकांमध्येही साबण लावून 20 सेकंदभर हात धूत राहा.
परिस्थिती इतकी काही गंभीर नाही, असा उगाच बाऊ करू नका, असे समाजमाध्यमात येत असेल तर तिकडे पूर्ण दुर्लक्ष करा. हा आणिबाणीचा काळ आहे म्हणून कोणतीही अफवा पसरवू नका िंकवा तिला बळी पडू नका, कारण त्यामुळे तुमचे व तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या मित्रांचे कायमचे नुकसान होऊ शकेल.
या व अशा दक्षता घ्या आणि पुढचे काही आठवडे प्रयत्नपूर्वक सुरक्षित आणि निरोगी राहा..


https://www.tarunbharat.net/Encyc/2020/3/24/Announcement-letter-from-US-doctor-to-citizens.html

Sunday, 22 March 2020

आजाराचा विकृत चिनी बाजार- 11-Mar-2020 TARUN BHARAT- विजय कुलकर्णी

सुप्रसिद्ध शोधपत्रकार सी. जे. वर्लमॅन यांनी दावा केला आहे की, कोरोनाग्रस्त पीडितांचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या अवयवाची गरज पडल्यास तो अवयव चीनमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध करून देण्यात आला.


अगदी प्रारंभीपासून चीनच्या चार भिंतींआड नेमके काय चालते, ते जगासमोर येणे हे जवळपास कर्मकठीण. पण, हल्ली सोशल मीडिया आणि शोधपत्रकारितेच्या जमान्यात चिनी गोटातून अशाच काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यातच 'कोरोना'मुळे चीनची गती मंदावली असून हळूहळू का होईना, तो पूर्वपदावर येण्याच्या तयारीत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीही 'कोरोना'चे उगमस्थळ असलेल्या वुहान शहराला नुकतीच भेट देऊन जगालाही सर्व काही आलबेल असल्याचाच जणू संकेत दिला. वरकरणी चीन 'कोरोना' आटोक्यात आहे, हे जगाला दाखविण्याचा कितीही खटाटोप करत असला तरी सुरुवातीपासून चीनने 'कोरोना'मुळे झालेल्या मृतांचा खरा आकडा लपवल्याचाही संशय आहेच. इतकेच नाही तर हा महाभयंकर विषाणू देशात इतरत्र वेगाने पसरू नये म्हणून रहिवाशांना घरातच डांबण्यात आले. काही कोरोनाग्रस्त मृतदेहांना मोठ्या संख्येने शहराबाहेर आणून जाळण्यात आल्याचेही मध्यंतरी समोर आले होतेच. आता या सगळ्यात भर पडली आहे, ती अवयवांच्या काळ्या बाजाराची. त्यातही सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाग्रस्त रुग्णांना चक्क बंदिवासातील उघूर मुसलमानांचे अवयव काढून त्यांचे प्रत्यारोपण केल्याची माहिती 'डेली स्टार' आणि 'बायलाईन टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाली आहे.


सुप्रसिद्ध शोधपत्रकार सी. जे. वर्लमॅन यांनी दावा केला आहे की, कोरोनाग्रस्त पीडितांचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या अवयवाची गरज पडल्यास तो अवयव चीनमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध करून देण्यात आला. एरवी चीनमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च कमी असला तरी प्रत्यारोपणासाठी सहजासहजी अवयव मात्र उपलब्ध होत नाही. पण, कोरोनाच्या बाबतीत चिनी सरकारच्या हालचाली संशयास्पद असून उघूर मुसलमानांचे अवयव बळजबरीने काढून ते कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार वर्लमॅन यांनी उघडकीस आणला आहे. एवढेच नाही, तर काही दिवसांपूर्वीच एक ५९ वर्षीय कोरोनाग्रस्त चिनी नागरिक 'ऑर्गन फेलियर'च्या समस्येने पीडित होता. पण, कोरोनासारख्या घातक आजाराच्या काळात, ज्यावेळी साहजिकच अवयव प्रत्यारोपणासाठी मोठी मागणी असूनही या व्यक्तीला तब्बल दोन अवयव, तेही केवळ पाच दिवसांत उपलब्ध करून देण्यात आले. म्हणूनच या 'डबल ट्रान्सप्लान्ट'साठी इतक्या कमी कालावधीत चीन सरकारकडे अवयव आले तरी कुठून, हाच प्रश्न उपस्थित होतो.


वर्लमॅन यांनी केवळ या एका घटनेवरून चिनी सरकारवर गंभीर आरोप केलेले नाहीत, तर उघूर मुसलमानांच्या गोटातील 'व्हिसलब्लोव्हर' ठरलेल्या अब्दुवेली अयुप यांच्याकडून मिळालेल्या माहितीचीही त्याला पुष्टी जोडली आहे. तसेच, २९ फेब्रुवारी रोजी चीनमध्ये पडद्याआड सुरू असलेल्या या अवयवांच्या बाजारावर एक आंतरराष्ट्रीय अहवालही प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातही चिनी सरकारच्या मनसुब्यांवर कडक ताशेरे ओढण्यात आले. अयुप यांच्या दाव्यानुसार, बंदिवासातील उघूर मुसलमानांवर विविध प्रयोग, शस्त्रक्रिया केल्या जातात. नवीन औषधं, वैद्यकीय चाचण्यांसाठी या उघूरांचा 'गिनीपिग' म्हणून वापर केला जातो. एवढेच नाही तर या उघूर मुसलमानांचे हृदय, किडनी, डोळे, फुप्फुस आणि त्वचादेखील काढून त्याचा काळाबाजार चालतो. त्यामुळे चिनी सरकार जरी हे उघूरांचे कॅम्प दहशतवाद, कट्टरतावादाला नियंत्रित करण्यासाठी असल्याचे कितीही दावे करत असली तरी आजतागायत विविध माध्यमांतून चीनचा उघूरांना संपविण्याचाच सुप्त हेतू वेळोवेळी समोर आला आहे. तरीही चीन मात्र जागतिक स्तरावर या आरोपांचे वेळोवेळी खंडनच करत आला आहे. त्यातच चीनमधील उघूर मुसलमानांच्या अन्याय, अत्याचाराच्या असंख्य हृदयद्रावक कहाण्या समोर आल्यानंतरही मुस्लीम जगताला मात्र अद्याप 'मुस्लीम ब्रदरहूड'चा पान्हा फुटलेला दिसत नाही. चीनचा जीवलग मित्र पाकिस्तान असो अथवा दिल्ली दंगलीवरून भारतात मुसलमानांचा नरसंहार होतोय म्हणून गळा काढणारे इराणचे खामेनी, या सगळ्यांनी मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाकच केल्याचे दिसून येते. कारण, स्वाभाविकच चीनसारख्या व्यापारीदृष्ट्या इतक्या महत्त्वाच्या देशाशी धर्मासाठी पंगे घेणे कोणाला पडवडणार? निर्घृणपणे उघूरांचे अवयव काढून विकणे असो अथवा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाच मिटवण्याची प्रक्रिया, मुस्लीम 'बंधुभाव' मात्र चिनी मालाच्या 'भावाआड' येणार नाही, हेच खरे


Saturday, 21 March 2020

ही नागरिकांच्या परीक्षेची घडी आहे. ही बाब ओळखून, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध पुकारून, कोरोनाला पिटाळून लावू या...!-TARUN BHARAT

नागरिकांच्या परीक्षेची घडी...
देशातच नव्हे जगात आज कुठेही गेलात, तरी तुमच्या कानी कोरोनाची चर्चा पडल्याशिवाय राहायची नाही. चीनमार्गे जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. दररोज कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वाढत असून, तो आटोक्यात आणण्यासाठी सार्‍या जगाने पुढाकार घेतलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने, या रोगाची व्याप्ती बघता या संकटाला महामारी म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारनेही तातडीने पावले उचलून आपल्या देशाला आणि येथील नागरिकांना या जीवघेण्या रोगाचा फटका बसू नये म्हणून उपाययोजना केल्या आहेत. जगात 2 लाख कोरोनाग्रस्त आढळले असून, भारतात 153 जणांना या विषाणूंची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील लागण झालेल्यांची संख्या 49 वर पोहोचली आहे. जगातील तब्बल 120 देशांना कवेत घेणार्‍या या रोगाची लक्षणे कोणती, पॉझिटिव्ह लक्षणे आढळलेल्यांनी कुठली काळजी घ्यावी, कोरोना संशयितांनी कुठली पथ्ये पाळावी यासह स्वच्छतेबाबत कोणती काळजी घेतली जावी, याच्या सूचना सरकारतर्फे आणि आरोग्य मंत्रालयातर्फे जारी होत आहेत. सर्वाधिक लागण झालेल्या आणि मृत्यू झालेल्या चीनने तर या रोगावर विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आता जबाबदारी भारतीयांचीही आहे.

भारतात लोकशाही आहे आणि त्यामुळेच आपली जबाबदारी जास्त आहे. सरकार कुठलीही बळजबरी करून निर्णय लादू शकत नाही. पण, म्हणून सरकारच्या निर्णयांवर विनाकारण टीका करणे योग्य ठरणार नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार ज्या काही उपाययजोना करीत आहे, त्या आपल्यातील अनेकांना अनावश्यक वाटत असतील किंवा काही जण सरकारने अतिरेक करू नये, अशा टीकेपर्यंतही आले असतील. पण ही कृती बरी नव्हे. आज प्रत्येक भारतीयाने कोरोनाविरुद्धच्या सरकारने पुकारलेल्या युद्धाचे सैनिक म्हणून त्यात सशस्त्र सहभागी झाले पाहिजे. सरकारच्या युद्धात आरोग्यरक्षकांचा सहभाग अनन्यसाधारण आहे. डॉक्टर्स, परिचारिका, अटेंडण्टस्‌ यांची भूमिका अहम्‌ आहे. कोरोनाग्रस्तांकडे हेटाळणीच्या दृष्टीने बघण्याच्या या काळात ही मंडळी रुग्णांची तपासणी करून, त्यांची विचारपूस करून, त्यांना काय हवे, काय नको याची आस्थेने विचारपूस करून, आपले कर्तव्य बजावत आहे. रुग्णांना आणि संशयितांना धीर देत आहेत. हा विषाणू ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांच्या आतील मुलांना लक्ष्य करतो. त्यामुळे अशा वयोगटातील लोकांची विशेष काळजी देशवासीयांनीच घ्यायला हवी. आरोग्ययंत्रणेला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्व सामान्य जनतेची आहे. कारण जोवर प्रजा सहकार्य करणार नाही, तोवर या देशातील कोणताही राजा, कुठल्याही प्रकारच्या युद्धावर जय मिळवू शकणार नाही.




कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने जमावबंदी लागू केली आहे, त्यामध्ये आपण प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आहे. अशा वेळी आपल्या घरचे धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, आपापले व्यवसाय काही दिवस बंद करणे, शिक्षकांनी गरज असेल तरच शाळेत जाणे अशी कृती अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुट्या या मजा मारण्यासाठी नसून, त्याचा सदुपयोग करायला हवा. उगाच सहली काढून पर्यटनस्थळी गर्दी करू नये. प्रवास टाळावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, आपला वेळ अभ्यास, वाचन अथवा छंद जोपासण्यासाठी सत्कारणी लावावा. सरकारने हॉटेल्स, बार, क्लब, रस्त्यांवरील छोटी चहा-नाश्त्याची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशातच होस्टेलवर राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या जेवणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांना डबे पोहोचविण्यासाठी पुण्याच्या काही स्वयंसेवकांनी फेसबूकवरून मोहीम चालविली आहे. अशी मोहीम खरोखरीच राज्यभरही उपयोगी ठरू शकते आणि त्यातून गरजूंना मदतीचा हात दिला जाऊ शकतो. कोरोनाच्या भीतिपोटी अथवा उपाययोजना म्हणून छोटी हॉटेल्स, मिठाईची दुकाने, चहाच्या टपर्‍या, क्लब, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. कामबंदीमुळे आमदनीही बंद पडणार आहे. यामुळे मजूर िंकवा छोटे विक्रेते यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहील. अशांच्या उदरभरणाची काही दिवसांची सोय करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. राष्ट्रीय कर्तव्य काय असते, हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. आपण आपल्या अधिकारांसाठी नेहमी जागरूक असतो. मग अशा संकटकाळी आपण सरकारची, नागरिकांची मदत करून आपली जबाबदारी ओळखायला नको?

गर्दी टाळा, स्वच्छता राखा, वर्क फ्रॉम होम, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, प्रतिकारक्षमता वाढविणारी औषधे घेणे... अशा अनेक उपाययोजना सरकारने सुचविल्या आहेत. पण, सरकारने सांगूनही आपण सूचनांचे पालन करणार नसू तर सरकारला प्रसंगी कठोर पावले उचलावी लागतील. दंडुकेशाहीचा वापर करावा लागेल. वर्क फ्रॉम होमचा शासकीय आदेश असताना व शक्य असतानाही पुण्यातील काही कंपन्या हा आदेश धुडकावून आपल्या कर्मचार्‍यांना कंपन्यांमध्ये कामासाठी बोलवत आहेत. सुशिक्षितच अशा आडमार्गाचा वापर करणार असतील, तर मग अशिक्षितांकडून काय ती अपेक्षा करावी? लोकांनी गर्दी टाळलीच नाही तर सार्वजनिक वाहतूक बंद करण्याचा निर्णयही सरकारला घ्यावा लागेल. मुंबईत लोकल बंद पडल्या तर लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न निर्माण होतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी काही कंपन्यांनी स्वतःची उत्पादन निर्मिती वाढविण्याचे प्रयत्न केल्यास ते गर्दीला आणि प्रसंगी रोगाला आमंत्रण देणारे ठरतील. कोरोनाच्या दुसर्‍या फेजमधून आपण तिसर्‍या फेजमध्ये जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त पसरू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केले तर हा रोग पसरणार नाही. तुमच्या भागात जे कुणी सर्दी, तापानं आजारी असतील त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगायला हवे. आपल्या भागात असे कुणी रुग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याला त्याची कल्पना द्यायला हवी.

नागपुरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आणि उपचारादरम्यान त्याच्या प्रकृतीत सुधारणाही दिवस आहे. मात्र, तो रुग्ण ज्या वस्तीत राहतो, तेथील नागरिकांनी त्याच्या कुटुंबावर जणू बहिष्कारच घातला आहे. त्यांच्या घरी येणे-जाणे, त्यांच्याशी बोलणे आणि त्यांच्याशी व्यवहार करणे थांबविले. ही कुठली माणुसकी म्हणावी? अखेर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी यातून मार्ग काढून या रुग्णाच्या घरी भेट दिली आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत, असा धीरही त्या रुग्णाच्या कुटुंबाला दिला. महापौरांची ही कृती निश्चितच स्वागतार्ह आणि एक नवा पायंडा पाडणारी म्हणावी लागेल. काहीही झाले तरी मी माणुसकी सोडणार नाही, असा प्रणच कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या निमित्ताने उद्भवलेल्या पार्श्वभूमीवर करण्याची गरज आहे. आज जगात महायुद्ध होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण, कोरोनाच्या विषाणूंनी संपूर्ण जगाविरुद्ध युद्ध पुकारून युद्ध झाल्यास काय परिस्थिती उद्भवू शकते, याची प्रचीती आणून दिली आहे. ही नागरिकांच्या परीक्षेची घडी आहे. ही बाब ओळखून, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध पुकारून, कोरोनाला पिटाळून लावू या...!

जनता कर्फ्यूचे पालन करा दिनांक :22-Mar-2020 अभिजित वर्तक-TARUN BHARAT


धोकादायक कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे.
जनता कर्फ्यू म्हणजे काय?
‘जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी सकारात्मक वृत्तीने आणि स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला पाहिजे. कारण जनता कर्फ्यूला वैज्ञानिक आधार आहे. खुद्द इंडियन मेडिकल असोसिएशनने यावर शिक्कामोर्तब केले आहे. रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशवासीयांना जनता कर्फ्यूचे पालन करायचे आहे. जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये. फक्त जे अत्यावश्यक सेवांशी जोडलेले आहेत त्यांनीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मोदींनी केले आहे. हा प्रयोग आपला आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पार पाडण्याच्या संकल्पाचे एक मजबूत प्रतीक असेल, असेही मोदींनी सांगितले आहे.
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेवढा आपण सार्वजनिक संपर्क टाळू तसेच कमीत कमी लोकांशी संपर्कात येऊ तेवढा विषाणूचा फैलाव रोखण्यास मदत होणार आहे. कोरोनामुळे आतापर्यंत संपूर्ण जगात 10 हजारांहून लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णसं‘या 281 पर्यंत पोहोचली आहे तर चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ही सं‘या कमी दिसत असली तरी धोका पत्करण्यात काहीही अर्थ नाही.
कारण भारतातील अपुरी डॉक्टरांची सं‘या, कमी परिचारिका, अपुरे बेड तसेच अपुर्‍या प्रयोगशाळा आणि मर्यादित वैद्यकीय संसाधने यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी भारताला प्रचंड अडचणी येणार आहेत. इटली, स्पेन, इंग्लंड, अमेरिकेसार‘या बलाढ्य देशांना कोरोनाशी लढता लढता नाकी नऊ आले आहे. तेव्हा 130 कोटी लोकसं‘या असलेल्या भारताची स्थिती कशी होऊ शकते याची कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा सध्यातरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे आणि लोकांशी संपर्क टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करणे एवढेच आपल्या हाती आहे. त्यामुळेच रविववारच्या जनता कर्फ्यूचे पालन आपण कटाक्षाने केले पाहिजे.
 कोरोनाचे एकूण एकूण 4 टप्पे
पहिला टप्पा
चीनमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हा विषाणू वेगाने जगभरात पसरत आहे. कोराना विषाणू संक‘मित असलेल्या देशांमध्ये वास्तव्य असल्यास कोरोनाची लागण होण्याची शक्यता ही अधिक असते. तसेच त्याचा संसर्ग झाल्यास इतरांना देखील तो होण्याचा धोका अधिक आहे. भारतात कोरोना विषाणू हा बाहेरून आला आहे. पहिल्या टप्प्यात हा विषाणू एखाद्या ठिकाणी शिरकाव करतो.
दुसरा टप्पा
सध्या भारतात दुसर्‍या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक‘मित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे.
तिसरा टप्पा
तिसर्‍या टप्प्यात कोरोना हा देशात असलेल्या व्यक्तींमुळे पसरतो. म्हणजेच स्थानिक व्यक्तींकडून जेव्हा हा आजार दुसर्‍या व्यक्तींना होण्यास सुरुवात होते. भारतात सध्या दुसर्‍या टप्प्यात आहे. मात्र संसर्ग झालेल्यांचा आकडा सातत्याने वाढत राहिला तर तो तिसर्‍या टप्प्यात जाईल आणि त्यासोबतच नियंत्रण मिळवण कठीण होईल. तिसर्‍या टप्प्यात सरकारला मॉल, दुकाने, शाळा आणि गर्दीची ठिकाणे सक्तीने बंद करावी लागतात. सुदैवाने सरकाने हा निर्णय आधीच घेतला आहे. मात्र, त्यात सरकारला पूर्णपणे यश आलेले नाही. कारण सर्वसामान्य लोकांच्या बेजबाबदारपणा आणि बेफिकीर वृत्तीमुळे लोक हॉटेल, पानटपर्‍या किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीतच आहेत. म्हणूनच जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक आहे.
चौथा टप्पा
सध्या अनेक देशांमध्ये कोरोना हा वेगाने पसरला असून मृतांची सं‘या देखील सातत्याने वाढत आहे. त्या देशात कोरोना चौथ्या टप्प्यात आहे. जेव्हा व्हायरस हा अत्यंत वेगाने देशात भौगोलिकरित्या पसरतो तेव्हा तो चौथ्या टप्प्यात पोहोचतो. चीन, इटली, इराण आणि स्पेनमध्ये कोरोना व्हायरस हा चौथ्या टप्प्यात आहे.
टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद अवश्य करा
टाळ्या, थाळ्या आणि घंटानाद करून कोरोनाविरुद्ध लढणार्‍यांना प्रोत्साहन देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे डॉक्टर्स व परिचारिका, सरकारी कर्मचारी, पोलिस, माध्यमे यांचे मनोधैर्य वाढते. तेव्हा या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांनी रविवारी संध्याकाळी 5 वाजता पाच मिनिटे लोकांनी गॅलरीत, गच्चीत, दरवाजे, खिडक्यात उभे राहून अवश्य टाळ्या, थाळ्या वाजविल्या पाहिजेत आणि घंटानाद केला पाहिजे. सरकारबरोबरच लोकांची इच्छाशक्ती, मनोबल आणि धैर्य या गुणांच्या बळावर आपण भारतीय नक्कीच कोरोनाला परतवून लावू आणि याची खात्री प्रत्येकाने बाळगली पाहिजे

उद्याचे सामरिक तज्ज्ञ घडविण्यासाठी देशाला आज खरी गरज आहे, ती देशासमोरील आव्हानांचा देशहिताच्या दृष्टिकोनातून आणि सामरिक अंगाने विचार करणाऱ्या व्यक्तींची...-DR VIJAY KHAREPRASAD KULKARNI-


| Updated:Mar 22, 2020, 04:00AM IST

विद्यापीठामध्ये ‘मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग चेअर ऑफ एक्सलेन्स’ स्थापन करण...
देशाला आज खरी गरज आहे, ती देशासमोरील आव्हानांचा देशहिताच्या दृष्टिकोनातून आणि सामरिक अंगाने विचार करणाऱ्या व्यक्तींची. अशा व्यक्तींची जडणघडण आपोआप होत नसते. त्यासाठी जनता आणि सरकारच्या पातळीवर प्रयत्न होण्याची गरज असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 'मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग चेअर ऑफ एक्सलेन्स'ची झालेली स्थापना हा अशाच एका प्रयत्नाचा भाग आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मोठे बदल झाले. विन्स्टन चर्चिल यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 'आयर्न कर्टन' अर्थात आभासी अशा लोखंडी पडद्याने जगाचे दोन भाग केले. एका बाजूला साम्यवाद आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाही. महायुद्धानंतर लगेचच दीर्घ अशा शीतयुद्धाच्या काळाला सुरुवात झाली. सामरिक शास्त्राच्या विकासाला बहर आला, तो याच काळात. वास्तविक पूर्वीदेखील अनेक सामरिक तज्ज्ञांनी रणनीती, सामरिक नीतीवर ग्रंथ लिहून ठेवले आहेत. भारताचा विचार केला, तर कौटिल्याचे अर्थशास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे अशा ग्रंथांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. इतरांमध्ये सून त्झू, क्लॉजवित्झ, आल्फ्रेड महान या आणि इतर अनेक विचारवंताचा उल्लेख करावा लागेल. आधुनिक काळात केवळ युद्धकेंद्रित किंवा लष्कराशी निगडित दृष्टिकोन वगळून इतर निरनिराळ्या पैलूंचा विचार करण्यास आणि सामरिक शास्त्राचा सर्वांगाने विकास होण्यास दुसऱ्या महायुद्धानंतर सुरुवात झाली.
शीतयुद्धाच्या काळात जग दोन विचारप्रणालींमध्ये विभागल्यानंतर आणि प्रत्यक्ष युद्धातील संहाराची वास्तविकता लक्षात आल्यानंतरही सत्तावर्चस्वासाठी चढाओढ थांबली नाही. सत्तावर्चस्व राखण्यासाठी त्या अनुषंगाने धोरणे आखली जाऊ लागली. सुरक्षेचा संदर्भ अधिक व्यापक झाला. शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्यातील डावपेचांना, सामरिक धोरणे आखण्याच्या कृतींना विद्यापीठाच्या स्तरावरून मोठी मदत मिळाली. वेगवेगळे 'थिंक टँक्स' तयार झाले. देशाची धोरणे कशी असावीत, देशाच्या धोरणांतील त्रुटी यांवर मंथने होऊ लागली. आंतरराष्ट्रीय संबंध, सामरिक अभ्यासावर विविध विद्यापीठांतून भर देण्यात आला. बळाचा वापर आणि बळाचे महत्त्व याच्याशी संबंधित साहित्य पाश्चिमात्य देशांत विकसित होत गेले. आण्विक युद्धनीतीच्या बाबतीतही अनेक संकल्पना या काळात तयार झाल्या.
ऐंशीच्या शतकात परिस्थिती पुन्हा बदलली. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस आणि नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शीतयुद्ध संपून पूर्ण जगात उलथापालथ झाली. अमेरिका एकध्रुवीय महासत्ता बनली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या घडामोडींबरोबरच संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयाच्या अभ्यासातही फरक पडला. संरक्षणशास्त्र म्हणजे केवळ बळाचा वापर; या अर्थापुरते ते मर्यादित न राहता या विषयाचा आंतरविद्याशाखीय अभ्यास सुरू झाला. संरक्षणशास्त्रामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य अशा तिन्ही पातळ्यांवरील विषयांचा अभ्यास केला जातो. युद्धकला, संरक्षण अर्थनीती, राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान, पीस अँड कॉन्फ्लिट स्टडीज, दहशतवाद, नॉन स्टेट अक्टर्स अशा विविध विषयांचा सर्वंकष अभ्यास केला जाऊ लागला. या विषयाच्या अभ्यासातील हा महत्त्वपूर्ण बदल होता. अमेरिकेवरील 'वर्ल्ड टॉवर सेंटर'च्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती पुन्हा बदलली. कितीही अण्वस्त्रे असली, तरी एखाद्या देशाला शत्रू लक्ष्य करू शकतो, हे अधोरेखित झाले आणि संरक्षणशास्त्र हा विषय त्या अनुषंगाने आणखी विकसित झाला. वर्तमानस्थितीमध्ये संरक्षण व सामरिकशास्त्र हा आंतरविद्याशाखीय आणि विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्ञानाची कवाडे खुली करून देणारा कदाचित एकमेव अभ्यासक्रम असावा!
भारतामध्ये या अभ्यासाकडे १९६२च्या चीनबरोबरील युद्धानंतर गांभीर्याने पाहू जाऊ लागले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९६३मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. लष्करी अभ्यासक्रमामध्ये पदवी देण्यात येऊ लागली. १९७४मध्ये पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिकशास्त्राचा विकास होत गेला, तसे त्याचे परिणाम विद्यापीठ पातळीवरही दिसले. 'मिलिटरी स्टडीज' या अभ्यासक्रमाचे नाव नंतर 'डिफेन्स स्टडीज' आणि आता 'डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज' असे झाले आहे. नागरी पातळीवर देशामध्ये चेन्नई, अलाहाबाद, पंजाबमधील चंडीगड विद्यापीठ, गोरखपूर आदी विद्यापीठांत सामरिकशास्त्रात विद्यार्थ्यांना पारंगत केले जात आहे. राज्यात नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेज, पुण्यातील मॉडर्न कॉलेज, धुळे, जळगाव, बारामती, नगर, मराठवाड्यातील विद्यापीठांमध्ये आणि संलग्न महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. या विषयाची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता असून, प्रत्येक महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जाणे गरजेचे आहे.
विद्यापीठातील संरक्षण विभागाचा भारतीय संरक्षण दलांशी खूप जुना संबंध आहे. भारतीय लष्कराने 'पॉलिसी स्टडीज'साठी छत्रपती शिवाजी अध्यासनाची स्थापना केली आहे. लष्करातील विविध हुद्द्यांचे अधिकारी 'रेसिडेंट स्कॉलर' म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. प्रत्यक्ष रणांगणावरील, धोरणनिर्मितीच्या अनुभवांचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. भारतीय लष्कराबरोबर संयुक्त विद्यमाने दर वर्षी जनरल बी. सी. जोशी व्याख्यानाचे आयोजन केले जाते. तिन्ही दलांचे प्रमुख आलटूनपालटून दर वर्षी व्याख्यानासाठी या ठिकाणी येतात आणि त्यांचे अनुभव सांगतात. याखेरीज हवाई दलाचे आणि संपूर्ण भारताचे एक आदर्श असणारे आणि विविध युद्धांत मोलाची कामगिरी बजावलेले 'मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जनसिंग' यांच्याही नावाने विद्यापीठामध्ये नुकतेच अध्यासन सुरू झाले आहे. हवाई दलाकडून एक कोटी रुपयांचा निधी त्यासाठी विद्यापीठाला मिळाला आहे. लष्कराबरोबरच हवाई दलाचे अधिकारीदेखील 'रेसिडेंट स्कॉलर' म्हणून विद्यापीठात आता येणार आहेत. याखेरीज गेल्या दोन ते तीन वर्षांत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन कोटी रुपये आणि 'डॉ. आंबेडकर स्टडीज'साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून (बीएआरटीआय) २.८० कोटी रुपयांचा निधी विभागाला प्राप्त झाला आहे. कुलगुरूंच्या मार्फत नौदलाशीही समन्वय सुरू असून, त्यांचेही एक अध्यासन स्थापन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामरिकशास्त्राच्या विकासास त्यामुळे मोठा हातभार लागणार आहे.
विद्यापीठातील विभागामध्ये संरक्षण विश्लेषक, दहशतवादविरोधी अभ्यास, संकटव्यवस्थापन यांचे डिप्लोमा सुरू केले आहेत. तसेच, येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतर पाच वर्षांचे बीए/एमए, बीएस्सी/एमएस्सी हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. जागतिक शांतता आणि सुरक्षेचा अभ्यासही सुरू केला जाणार आहे. विभागामध्ये सध्या भूराजनीती, लष्करी इतिहास, लष्करी भूगोल, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय संघटना आदी विषयांवर शिक्षण आणि संशोधन सुरू आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षेच्या संदर्भाचे मापदंड बदलत असताना या विषयाचे महत्त्व आगामी काळात वाढणार, हे निर्विवाद आहे. सुरक्षा आणि सामरिक दृष्टिकोनातून अनेक नवी आव्हाने देश म्हणून आपल्यासमोर उभी ठाकली आहेत. देशामध्ये सिव्हिल-मिलिटरी रिलेशन्स (नागरी-लष्करी संबंध) सुधारण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी देशामध्ये नागरी पातळीवर अनेक रणनीतीकार, युद्धशास्त्र अभ्यासक, सामरिक तज्ज्ञ तयार होण्याची नितांत गरज आहे. या विषयाला जागतिक पातळीवर आणायचे असेल, तर त्या अनुषंगाने जागतिक स्तरावर आवश्यक असे संशोधन होणे गरजेचे आहे. देशामध्ये संशोधकांची अशी मोठी फळी आजच्या घडीला तयार होण्याची गरज आहे. खासगी स्तरावर वेगवेगळे थिंक-टँक तयार होण्याचीदेखील आवश्यकता आहे. हा विषय प्रामुख्याने विद्यापीठ स्तरापुरताच मर्यादित राहिल्याने त्याची चर्चा आतापर्यंत फारशी झाली नाही. सामरिक तज्ज्ञ मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी प्रत्येक कॉलेजांमधून हा विषय शिकविला जाणे अत्यंत आवश्यक आहे.

Friday, 20 March 2020

पाकवर चिनी मैत्रीचा ‘कोरोना इफेक्ट’- 18-Mar-2020 संतोष कुमार वर्मा-अनुवाद : विजय कुलकर्णी-TARUN BHARAT

चीनचा घनिष्ट मित्र पाकिस्तानही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हैराण आहे. त्यातच अपुरे वैद्यकीय मनुष्यबळ, सोयीसुविधांचा अभाव आणि त्यातच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तान या संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ नाही. इमरान खान यांनीही विकसित देशांकडे मदत मागितली आहे. तेव्हा, पाकिस्तानातील कोरोनाच्या समस्येची कारणमीमांसा करणारा हा लेख...



जगभरात ‘कोरोना’ विषाणूचा धोका दिवसागणिक वाढताना दिसतो. विशेष म्हणजे, कोरोनाची ही महामारी येत्या काही दिवसांत पाकिस्तानात अधिक भीषण स्वरुप धारण करण्याचीच चिन्हे आहेत. कारण, १६ मार्च या एकाच दिवशी, पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमित तब्बल १८४ रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यातच इराणमधून पाकिस्तानमध्ये प्रवेश केलेल्या १३४ कोरोना संक्रमित रुग्णांना सीमेवरील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.



दि. २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात कोरोनाग्रस्त रुग्णाची पहिली घटना समोर आल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते. पाकिस्तानातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा प्रादेशिक विचार करता, एकट्या सिंध प्रांतांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ताफ्तान सीमेवर होणार्‍या या प्रसारामुळे सिंध आता पाकिस्तानातील ‘डेंजर झोन’ म्हणून समोर आला आहे. पाकिस्तान तसेच सिंध सरकारचे म्हणणे आहे की, लगतच्या ताफ्तान सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्‍या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा सिंधमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. खरंतर ताफ्तान सीमेवरून पाकिस्तानात दाखल होणार्‍या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. काही काळ त्यांना सीमेवरील विलगीकरण शिबिरात थांबवून नंतर त्यांच्या त्यांच्या प्रांतात सोडण्यातही आले, तर काही जणांना पाकिस्तानातच कोरोनाच्या निदान आणि उपचारासाठी स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, याच विलगीकरण कक्षात असलेल्या काही जणांनी पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या कक्षात संशयितांची योग्यप्रकारे कोरोना चाचणीही करण्यात आली नाही आणि त्यावर उपचारांचाही अभाव दिसून आला. तसेच, या कोरोना संशयितांनी विलगीकरण कक्षातील आरोग्य सुविधा आणि राहण्याच्या व्यवस्थेबद्दलही तक्रारी नोंदवल्या असून पाकिस्तान सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत.



वर्तमान प्रक्रियेंतर्गत पाकिस्तानच्या सीमेवरील विलगीकरण कक्षातून सोडलेल्या नागरिकांना पुढे त्यांच्या प्रांतांत १४ दिवसांसाठी तेथील विलगीकरण कक्षात ठेवले जात असून ते वैद्यकीय निगराणीखाली आहेत. परंतु, सध्या पाकिस्तानची वर्तमान स्थिती इतकी बिकट आहे की, या रुग्णांसाठी विलगीकरणाच्या, कोरोना चाचणीच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानातील विलगीकरण कक्षातील काही व्हिडिओही व्हायरल झाले व त्यातून अतिशय धक्कादायक वास्तवही समोर आले. या रुग्णांना चक्क तंबूत ठेवले जात असून तिथे स्वच्छतागृह, शौचालयाच्या मूलभूत सुविधेचाही अभाव आहे. एवढेच नाही, तर काही संशयितांना चक्क सरकारी इमारतींच्या फरशीवर झोपण्याची वेळ ओढवल्याचे वास्तवही व्हिडिओमधून समोर आले.



पाकिस्तान सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरात एकूण ४,६०० पेक्षा अधिक नागरिकांना विलगीकरण शिबिरात थांबविण्यात आले होते, त्यापैकी १,८२२ नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात स्थापित विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. परंतु, या विलगीकरण कक्षांमध्ये एकूणच वैद्यकीय सेवांची वानवा असल्याचेच समजते. एखाद्या संशयितामध्ये कोरोनाचे लक्षण किंवा संक्रमण असल्यास तातडीने उपचार करण्यासाठी या कक्षात कोणताही प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्ग नाही की अन्य सुविधाही उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे, सोमवार, दि. १६ मार्च रोजीच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या बाबतीत राष्ट्रीय समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. परंतु, या बैठकीनंतर कोणतीही मोठी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली नाही. मागील आठवड्यात उच्च स्तरीय राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत मात्र ३ एप्रिलपर्यंत पाकिस्तानातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचबरोबर इराण आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सर्व आंतरराष्ट्रीय सीमाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानातही आता सार्वजनिक समारंभांवरही प्रतिबंध सरकारने जाहीर केले आहेत.



खरंतर पाकिस्तानमध्ये कोरोनाचा विषाणू इतक्या जलदगतीने संक्रमित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या देशाच्या पश्चिमेकडील खुल्या सीमा. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार फेब्रुवारीनंतर पाकिस्तानात ९ लाख, ७५ हजार, ६३४ हून अधिक नागरिकांनी देशात प्रवेश केला. असंरक्षित पश्चिमी सीमा, मरणासन्न अवस्थेत असलेली रुग्णालये आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या अशिक्षित लोकसंख्येने कोरोनाच्या महामारीत अधिकच भर घातली आहे. त्याशिवाय पाकिस्तानचे इतर दोन शेजारी देश इराण आणि अफगाणिस्तानलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, पाकिस्ताननेही आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या असल्या तरी चीनच्या देशांतर्गत हालचाली हा चिंतेचा विषय आहेच. कारण, पाकिस्तानचे चीनशी मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध आहेतच, पण यानिमित्ताने खूप मोठी चिनी लोकसंख्याही पाकिस्तानात स्थायिक झालेली दिसून येते. त्यापैकी काही जणांचे पाकिस्तानातच वास्तव्य असून त्यांच्या चीनमधील प्रवासामुळेही कोरोनाचा धोका आणखीन वाढू शकतो. त्यामुळे चीननंतर कोरोनाने सर्वाधिक त्रस्त देशांमध्ये पाकिस्तानचा दुसरा क्रमांक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानात या कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्याचे निष्फळ प्रयत्न बघता, विशेषज्ञांनीही हजारो पाकिस्तानींचा कोरोनामुळे बळी जाण्याची भीती व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात शरणार्थींची ये-जा, हिंसाचाराच्या घटना, शिया तीर्थयात्रींचा इराणमधील प्रवास, वाढती तस्करी आणि कामाच्या शोधार्थ पाकिस्तानात इतर देशांमधून दाखल होणारे नागरिक यांसारख्या कारणांमुळे कोरोनाचा प्रकोप पाकिस्तानमध्ये कैकपटीने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.



कोरोनाची ही वैश्विक आपदा जगभरात आर्थिक संकटाला सर्वस्वी आमंत्रण देणारी ठरली आहे. अमेरिकेमध्ये तर बेरोजगारीचा दर २० टक्क्यांहून अधिकने वाढण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे आधीच कंबरडे मोडलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था या महामारीनंतर सावरणे दुरापास्त ठरू शकते. आधीच गगनाला भिडलेली महागाई आणि त्यात कोरोनाच्या भीतीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींमुळे पाकिस्तानी जनतेसमोर जगण्याचे संकटच उभे ठाकले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या भीषण महामारीनंतर चीनमध्येही उद्भवणार्‍या मंदीच्या लाटेचा तडाखा पाकिस्तानलाही बसण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे ढासळणारी अर्थव्यवस्था सावरण्याबरोबरच पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी समर्थ ठरेल का, हे आगामी काळात स्पष्ट होईलच.






जैविक युद्ध आणि व्यवस्थेचं भवितव्य दिनांक 20-Mar-2020-TARUN BHARAT- मल्हार कृष्ण गोखले

वैज्ञानिक संशोधनाचा फायदा उठवत, जैविक नि रासायनिक अस्त्रं विकसित करून कमी खर्चात, कमी वेळात शत्रूपक्षाची समूळ कत्तल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कुणीच मागे नाही. नाझीवादी, साम्यवादी, समाजवादी, जपानी, चिनी, ख्रिश्चन, मुसलमान अशा सर्व प्रकारच्या हुकूमशहांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि आहे.


‘एम आय ६’ या ब्रिटिश गुप्तचर खात्यातला यशस्वी अधिकारी कमांडर जेम्स बाँड याला त्याचा बॉस अ‍ॅडमिरल ‘एम’ सूचना देतो की, त्याने स्वित्झर्लंडला जायचं आहे. स्वित्झर्लंडच्या पिझ ग्लोरिया नामक अत्यंत निसर्गरम्य पर्यटनस्थळी काउंट बाल्थाझार डि ब्ल्यूव्हिल हा उमराव कसले तरी शास्त्रीय प्रयोग करतो आहे. त्याच्या गोटात शिरायचं आणि त्याचं नेमक उद्दिष्ट शोधून काढायचं. काउंट बाल्थाझारच्या ऐतिहासिक वंशावळीचा संशोधक म्हणून बाँड त्याच्या प्रयोगशाळेत शिरतो. तिथे त्याला कळतं की, पाळीव गुरंढोरं आणि शेतमाल यांच्यामुळे होणार्‍या अ‍ॅलर्जीवर तो संशोधन करीत आहे. प्रत्यक्षात ते संशोधन, शेतमाल आणि अन्नधान्य विषारी बनवून ब्रिटनचं मनुष्यबळ संपवून टाकण्याच्या उद्देशाने चालू असतं आणि ‘काउंट बाल्थाझार’ हे नाव धारण केलेला इसम दुसरा तिसरा कोणी नसून अर्न्स्ट ब्लोफेल्ड असतो. डॉ. अर्न्स्ट स्टाव्हरो ब्लोफेल्ड! महायुद्धातल्या जर्मनीच्या पराभवामुळे संतापलेला आणि ब्रिटनचा सूड घेण्यासाठी टपलेला जर्मन वैज्ञानिक डॉ. ब्लोफेल्ड!



ब्लोफेल्ड बाँडला ओळखतो, पण कोणत्याही क्षणी ठार होण्याची शक्यता असलेला बाँड अखेर ब्लोफेल्डवर मात करून यशस्वी होतो. ब्रिटन आणि अन्य लोकशाही देशांविरोधात जैविक युद्ध पुकारण्यास सज्ज झालेल्या ब्लोफेल्डची प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली जाते. तो स्वतः मात्र निसटतो. इयान फ्लेमिंग या जेम्स बाँड कथामालेच्या लेखकाच्या ‘ऑन हर मॅजेस्टीज सीक्रेट सर्व्हिस’ या १९६३ साली लिहिल्या गेलेल्या कांदबरीचं हे कथानक आहे. इयान फ्लेमिंगचं वैशिष्ट्य असे आहे की, तो स्वतःच एकेकाळी गुप्तहेर होता. ब्रिटिश रॉयल नेव्हीचं स्वतःचं असं ‘नेव्ही इंटेलिजन्स डिपार्टमेंट’ ऊर्फ ‘निड’ हे गुप्तवार्ता खातं होतं. त्यात स्वत: फ्लेमिंगनेच अनेक गुप्त कामगिर्‍या पार पाडलेल्या होत्या. शिवाय त्याच्या अन्य सहकार्‍यांनी पार पाडलेल्या कामगिर्‍याही त्याला माहीत होत्या. निवृत्तीनंतर फ्लेमिंग ब्रिटन सोडून वेस्ट इंडिजमध्ये जमैका इथे स्थायिक झाला. तिथेच त्याने ‘जेम्स बाँड’ ही गुप्तहेर कथामाला लिहायला सुरुवात केली. पाहिलेल्या, ऐकलेल्या असंख्य जुन्या-नव्या गुप्त कामगिर्‍यांचा मसाला वापरून त्याने आपली कथानकं सजवली. त्यामुळे त्याच्या कथानकांमध्ये पूर्णपणे काल्पनिक असं काही नसतं. घडलेल्या घटनाच भरपूर रंगवून, फुलवून तो मांडतो. मग वरील कथानकात काही सत्य होतं का? ब्रिटनविरुद्ध खरोखरच कुणी एखादा सूडाने पेटलेला वैज्ञानिक किंवा एखादी गुप्त संघटना असं जैविक युद्ध खेळायला सिद्ध झाली होती का? या प्रश्नाला मात्र कुणीही, कसलंही अधिकृत उत्तर देत नाही.



‘वूहान कोरोना’ मुळे संपूर्ण मानवजात भयभीत झालेली असताना जैविक आणि रासायनिक युद्धांच्या अशा अनेक गोष्टी पुढे येतात. विशेष म्हणजे कोरोनासाठी संपूर्ण पाश्चिमात्त्य जग जरी चीनला जबाबदार धरत असलं तरी असले घातक प्रयोग करण्यात कुणीही मागे नाही. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जगभरात, हिरोशिमा आणि नागासाकी मध्ये अणुहल्ल्यात ठार झालेल्या जपानी नागरिकांचे स्मरण केले जाते. ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या वरील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकून लाखो लोकांना अवघ्या काही मिनिटांमध्ये ठार केलं होतं. जपानने त्यामुळे ताबडतोब शरणागती पत्करली आणि त्यामुळे सहा वर्षं सुरू असलेलं आणि संहारक असं महायुद्ध संपलं, हे आपल्याला माहीतच आहे. दर ऑगस्ट महिन्यात हिरोशिमा-नागासाकीच्या मृतांना आदरांजली वाहतानाच अमेरिकेच्या नावानेही बोटं मोडण्यात येतात. का? तर त्यांनी निरपराध नागरिकांवर अणुबॉम्ब टाकला. हे असं घडणं अपरिहार्यच आहे. पण, हे करताना एक महत्त्वाची गोष्ट विसरली जाते. किंबहुना, ती मुळातच कुणाला माहीत नसते. ती म्हणजे जपानने अमेरिकेविरुद्ध जैविक युद्ध पुकारण्याची सुरू केलेली जय्यत तयारी.

‘इंपीरियल जॅपनीज आर्मी युनिट ७३१’ हे जपानी लष्कराचं वैज्ञानिक अस्त्र शोधपथक अत्यंत गुप्तपणे अनेक प्रकारच्या रोगजंतूंवर प्रयोग करीत होतं. लेफ्टनंट जनरल डॉ. शिरो अशीई हा नामवंत जपानी वैज्ञानिक या पथकाचा प्रमुख होता. जपानने १९३१ साली चीनवर स्वारी करून चीनचा मांचुरिया हा प्रांत हडपला होता. या मांचुरियात डॉ. शिरो अशीई आणि त्याचे लोक चिनी युद्धकैद्यांवर नाना प्रकारच्या जंतूंचे नि विषाणूंचे प्रयोग करीत. जपानने १९४१ साली अमेरिकेच्या पर्ल हार्बर नाविक तळावर हल्ला करून तिची दाणादाण उडवली. पण, अमेरिकेची सामरिक शक्ती अवाढव्य आहे. पूर्ण क्षमतेने युद्धात उतरलेल्या अमेरिकेसमोर आपण किरकोळ आहोत, ही जाणीव जपानला होती. त्यामुळे जपानने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी, पण तितकाच क्रूर आणि गलिच्छ बेत आखला होता. २२ सप्टेंबर, १९४५च्या रात्री जपानी विमानं अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील कॅलिफोर्निया प्रांतातील सानदिलॉगो शहरावर बॉम्बफेक करणार होती. या बॉम्बमध्ये स्फोटकं नव्हती, तर ‘प्लेग’ या अत्यंत सांसर्गिक आणि प्राणघातक रोगाचे जंतू होते. ‘प्लेग’ किंवा ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘ब्युबॉनिक प्लेग’ असं म्हटलं जातं, त्या रोगाने एकेकाळी युरोप खंडात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ‘ब्लॅक डेथ’ या नावानेही ओळखल्या जाणार्‍या प्लेगने अक्षरशः लाखो माणसं किड्यामुंग्यांप्रमाणे मेली होती. त्याच प्लेगचे रोगजंतू अमेरिकेतसोडून द्यायचे नि हाहाकार माजवून द्यायचा, असा जपानचा बेत होता. या मोहिमेचं सांकेतिक लष्करी नाव होतं, ‘ऑपरेशन चेरी ब्लॉसम अ‍ॅट नाईट.’ पण, ती मोहीम झालीच नाही. ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५ ला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकीवर अमेरिकन अणुबॉम्ब पडले नि हादरलेल्या जपानने १५ ऑगस्ट १९४५ ला संपूर्ण शरणागती पत्करली.



पण, या सगळ्या तर पाऊणशे वर्षांपूर्वीच्या गोष्टी झाल्या. १९९१ सालचं आखाती युद्ध आठवतं का? इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैन याने शेजारच्या कुवेत या चिमुकल्या देशावर हल्ला करून तो हडप केला. तेव्हा सौदी अरेबिया आणि अमेरिका यांनी इराकवर हल्ला करून सद्दामचा पराभव करून कुवेत मुक्त केला. या युद्धाच्या वेळी इराकने संयुक्त राष्ट्रसंघाकडे अशी अधिकृत कबुली दिली की, “आम्ही ‘बोटुलिनम’ नावाचं अतिजहाल विषारी रसायन १९ हजार किलो एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवून त्यापैकी १० हजार किलो बाँब्समध्ये भरलंदेखील होतं. पण, त्याचा उपयोग आम्ही केला नाही.” हे रसायन इतकं घातक आहे की, १० हजार किलोमध्ये पृथ्वीवरील सर्व सजीव तीनवेळा संपूर्ण नष्ट झाले असते. १९८७-८८ मध्ये सद्दामने इराकच्या उत्तरेकडच्या डोंगराळ भागात राहणार्‍या कुर्द जमातीच्या बंडखोरांना चिरडून टाकण्यासाठी खुशाल विषारी वायू आणि विषारी रसायनं वापरली होती. ४५०० गावांमधल्या किमान १ लाख, ८२ हजार कुर्द लोकांना मस्टर्ड गॅस, नर्व्ह एजंट जीबी, सरीन इत्यादी अतिविषारी वायू किंवा रसायनांचा वापर करून सरळ ठार मारण्यात आलं. त्यापूर्वी सद्दामने आपल्या सैनिकांना आदेश दिला होता म्हणे की, कुर्दांची घरंदारं, गुरंढोरं, पैसाअडका, मुलंबाळं, बायकामुली या तुमच्याच आहेत. तेव्हा पहिल्यांदा हवं ते उचला नि मग कुर्दांना संपवा. सद्दामच्या सैनिकांनी आनंदाने आज्ञापालन केलं. सद्दाम स्वतःला ‘समाजवादी’ म्हणवत असे. कसला सॉलिड समाजवाद आहे ना!



असो. तर मुद्दा काय की, वैज्ञानिक संशोधनाचा फायदा उठवत, जैविक नि रासायनिक अस्त्रं विकसित करून कमी खर्चात, कमी वेळात शत्रूपक्षाची समूळ कत्तल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्यात कुणीच मागे नाही. नाझीवादी, साम्यवादी, समाजवादी, जपानी, चिनी, ख्रिश्चन, मुसलमान अशा सर्व प्रकारच्या हुकूमशहांना संपूर्ण जगावर सत्ता गाजवण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि आहे. लोकशाहीवादी अमेरिकेला अशी महत्त्वाकांक्षा नाही, असं बिलकुल नव्हे, पण आता प्रत्यक्ष एखादा देश, भूभाग हा हातात ठेवून, त्याचं शोषण करत राहाणं हे खर्चिक आहे, हे ओळखून अमेरिकेने जगावर राज्य करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेला एक मायावी सोेफिस्टिकेटेड रूप दिलं. ते म्हणजे ‘ग्लोबलायझेशन.’ एकीकडे तिचे नवनवीन शस्त्र आणि जैविक वा अन्य वैज्ञानिक अस्त्र बनवण्याचे प्रयोग चालू आहेतच. ते थांबलेले नाहीत, पण दुसरीकडे जागतिकीकरणामुळे अमेरिकेकडे जगातील अफाट संपत्ती आपोआप येतेच आहे.



‘वूहान कोरोना’च्या जागतिक संकटामुळे मनुष्यहानी होईल, न होईल, कमीत कमी होईल, अशी आपण परमेश्वराला प्रार्थना करूया. पण, ही साथ आटोक्यात आल्यानंतरचा काळ हा जास्तच कसोटी पाहणारा असेल. जगातल्या प्रत्येक देशाची नुसती अर्थव्यवस्थाच नव्हे, तर संपूर्ण समाजरचना, समाजव्यवस्थाच ढवळून निघणार आहे. पुरवठा आणि मागणीची जागतिक साखळी व्यवस्था मागे पडून पुन्हा स्थानिक मागणी, पुरवठा प्रक्रिया निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कारणांसाठी मोठमोठ्या कार्यालयांमधून एकत्र येणं, प्रवास, परिषदा, बैठका, सेमिनार्सऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे कामं होण्याची शक्यता आहे. कॉर्पोरेट रुग्णालयांऐवजी स्थानिक छोटी रुग्णालयं प्रभावी नि उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. अतिरिक्त केंद्रीकरण म्हणजेच ‘ग्लोबलायझेशन’ संपून विकेंद्रीकरण सुरू होण्याची चिन्हे आहेत. बघू या काय नि कसं घडतं?


Tuesday, 17 March 2020

थिएटर कमांड काळाची गरज

WHAT INDIA HAS DONE TO FIGHT COVID-19-RAVI MAHAJAN


With far greater Tenacity and Firmness than MOST Countries: LONG LIST BUT MAKE YOU PROUD OF YOUR COUNTRY
1. Despite sharing a border of 3,488 kilo metres with China, India has only reported 114 cases and 1 death as of date - compare that with 596 cases and 8 deaths in the UK.
2. India is the only country in the world to have evacuated its citizens 6 times (and counting) and evacuated the most number of foreign nationals too. The Indian Air Force evacuated a total of 723 Indians, 37 foreign nationals from Wuhan 119 Indians and 5 foreign nationals from Japan. IAF also evacuated 58 Indian pilgrims from Iran on the 10th of March. Total: 900 Indians and 48 foreign nationals.
3. India is leading the fight against COVID-19 in the South Asian Region, offering diplomatic, humanitarian and medical assistance to its neighbours.
4. A total of 56 Virus Research Diagnostic Laboratories (VRDLs) have been set up in India to test its citizens as well as foreign citizens in a record time, with a plan to build 56 more VRDLs in the next month. As usual, this splendid level of efficiency hasn't caught the eye of the media.
5. India currently has one of the world’s most efficient and reliable testing systems, reducing the time taken to get test results from 12-14 hours to mere FOUR HOURS. US health officials have admitted that their system is failing and testing has been very sluggish.
6. As a result, from Iran, Afghanistan and many countries in Asia have been requesting India to help set up testing facilities in their countries.
7. India has sent 6 top scientists to set up a make-shift lab and testing facility in Iran to test 6000 of its citizens because Iranian officials refused to test Indians due to their high load. India plans to send 3 more airplanes to Iran in the next week to airlift its citizens.
8. India has provided 15 tonnes of MEDICAL ASSISTANCE comprising masks, gloves and other emergency medical equipment to China.
9. India has sent Maldives a 14 member medical team comprising of pulmonologists, anesthetists, physicians & lab technicians and also a large composite of COVID-19 medical relief to assist Maldives health authorities.
10. India has screened 1,057,506 people from 30 airports and 77 seaports.
11. India has suspended all visas to India as well as visa-free travel facility. It has closed its border with Myanmar. The Indian nationals coming from COVID-19 hit nations after 15 February are being quarantined for 14 days. This in contrast with the UK with far more cases but no matching quick action.
12. India has the world’s biggest State-sponsored health assurance scheme, covering over 500 million
beneficiaries (approximately 8 times the size of the UK).
13. Indian drug prices are among the lowest in the world. Medbelle ranks India as one of the five countries with the lowest median prices for drugs around the world due to an elaborate price control mechanism for drugs and the Government’s 'Jan Aushadi' project to provide affordably priced medicines to the poor.
14. China gagged the doctor who identified COVID-19 and he died 6 weeks later. China let this virus affliction blow. On the other hand, when Nipah virus was found in India in 2018, 3 doctors identified it and authorities immediately reported it to WHO. 2000 were quarantined and 17 died in total. India
did not allow it to become a pandemic.
The Indian civilization, being one of the most ancient and wise in the world, has been way ahead of its time gifting the world the NAMASTE- which is now propagated by every world leader. Ancient India idealised VEGETARIANISM and founded Ayurveda, and as a result survived and thrived for millenniums
of existence