Total Pageviews

Thursday 26 October 2017

महाराष्ट्रातील मच्छिमारीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कामगार नेपाळी व बांगलादेशी असून त्यांची ओळखपत्रे तपासण्याची यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे-ब्रिगेडिअर हेमंत महाजन

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/50-percent-of-fishermen-from-nepali-bangladeshi/articleshow/61233145.cms
महाराष्ट्रातील मच्छिमारीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कामगार नेपाळी व बांगलादेशी असून त्यांची ओळखपत्रे तपासण्याची यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. अन्यथा या माध्यमातून सुरक्षेला धोका संभवतो, असा इशारा निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सागरी सुरक्षा या विषयावरील चर्चासत्रात दिला.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर व राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच, महाराष्ट्र यांच्यातर्फे ‘सागरी सुरक्षा’ विषयावर दादरमध्ये सावरकर स्मारक सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ब्रिगेडिअर महाजन यांनी वरील इशारा दिला. सागरी सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यात अनेक यंत्रणा आहेत व २६ नोव्हेंबरचा हल्ला होईपर्यंत या समन्वयाचा अभाव होता. आपल्याभोवतीचे सागरी हितसंबंधांचे क्षेत्र देशाच्या भूभागापेक्षाही मोठे आहे. चीन हा तीन बाजूंनी भूभागाने बंदिस्त आहे, तर भारताला मात्र तीन बाजूंनी समुद्री सीमा आहेत. त्यामुळेच समुद्रातूनच चीनची नाकेबंदी शक्य आहे. परंतु समुद्रातील धोके आपण ओळखले पाहिजेत. ब्रह्मपुत्रा, गंगा व यमुनेच्या संगमाने बनलेल्या त्रिभूज प्रदेशात सुंदरबनात दोन कोटी बांगलादेशी राहतात व ही बेटे सन २०२०पर्यंत जागतिक तापमान बदलामुळे पाण्याखाली जातील. त्यावेळी हे बांगलादेशी भारतातच आसरा शोधतील, हा मोठा धोका भारतापुढे उभा आहे. सागरी सुरक्षा ही केवळ नौदल, तटरक्षक दलाची जबाबदारी नसून सर्वच नागरिकांची आहे. खासकरून युवाशक्तीने त्यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे उद्गार गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काढले, तर एअर कमोडोर राहुल मसलेकर यांनी सागरी सुरक्षेसाठी कोणत्या नव्या सामग्रीची आवश्यकता आहे, याचे विवेचन केले. व्यापारी जलवाहतुकीतील कॅप्टन संजय पराशर यांनी व्यापारी मालवाहतूक जहाज आणि मच्छिमारी नौका यांच्यातील मनुष्यबळाची ताकद सागरी सुरक्षेसाठी कशी उपयुक्त ठरू शकते, त्याचे दाखलेही त्यांनी दिले.

रोहिंग्ये हे घुसखोरच!

म्यानमारमधून आलेले रोहिंग्ये घुसखोरच असून त्यांनी १९९२ मध्येच प्रथम काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. ते दहशतवादाशीही निगडित आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत आम्ही कोणतीही तडजोड करू शकत नाही. वाटल्यास मुस्लिम देशांनी थोडे थोडे वाटून त्यांना आपल्यात सामावून घ्यावे, असे आव्हान राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी दिले. भारतामध्ये सर्वाधिक २३ देशांचे शरणार्थी राहतात. त्यामुळे इतर देशांनी आम्हाला मानवता शिकवू नये. रोहिंग्ये हे शरणार्थी नव्हेत, तर घुसखोर आहेत व ते सैतानांची साथ देतात. मग आम्ही तडजोड कशी करणार, असा सवाल उपस्थित केला.

No comments:

Post a Comment