Total Pageviews

Sunday 25 June 2017

या देशद्रोह्यांना अटक करा!विघटनवादाच्या नावावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्‍या काश्मिरातील सर्व नेत्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा आणि कसाबसारखा खटला त्यांच्यावर चालवायला हवा.-TARUN BHARAT


June 26, 2017021 Share on Facebook Tweet on Twitter अग्रलेख तोपर्यंत काश्मिरात लष्कर आणि पोलिसांवरील हल्ले थांबणार नाहीत आणि तेथे शांतता नांदणार नाही. कारण आता पाणी नाकातोंडापर्यंत आले आहे. अलीकडे दहशतवाद्यांकडून लष्कर आणि पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. ताज्या घटनेत पोलिस अधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांची मशिदीबाहेरील जमावाने हत्या केली. एवढेच नव्हे, तर त्यांचा मृतदेह विद्रूप केला. नमाज सुरू असताना, मीरवैज उमर शरीफ हे मशिदीत भाषण देत होते. हे सर्व लोक मीरवैज उमर फारूख यांचेच समर्थक होते आणि त्यांनीच डीएसपी मोहम्मद पंडित यांची हत्या घडवून आणली, हे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याचा अर्थ, फारूखसारखे लोक आता मशिदीतून लष्कर व पोलिसांविरोधात चिथावणी देत आहेत. डीएसपी मोहम्मद पंडित यांच्या अन्त्ययात्रेला हजारो लोक उपस्थित होते आणि ते पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होते. यावरून यामागे कोण आहे, हेही काश्मिरी नागरिकांना कळून चुकले आहे. डीएसपी पंडित यांची हत्या करण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर काश्मिरात ३८ लष्करी जवान वा पोलिसांची अतिरेक्यांनी हत्या केली आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर लष्कर आणि पोलिसांचे मनोबल उंचावले होते. पण, नंतरच्या काळात मात्र सरकारच्या संयमी भूमिकेमुळे अतिरेक्यांना अधिकच माज चढल्याचे दिसत आहे. आता संयम राखण्याची वेळ निघून गेली आहे. एकतर काश्मिरात राष्ट्रपती राजवट लावावी, अथवा संपूर्ण काश्मीर पिंजून काढण्याची मोठी मोहीम हाती घेऊन दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा खात्मा करावा, हाच उपाय तेवढा बाकी आहे. या कारवाईसाठी आपण इस्रायलचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे. तेथे एक सैनिक मारला गेला, तर बदला म्हणून शत्रूचे दहा सैनिक ठार मारले जातात. ती वेळ आता आली आहे. सध्या मुस्लिम धर्मीयांचा सर्वाधिक पवित्र सण रमजान सुरू आहे. आज त्याची सांगता होईल. रमजानचा पवित्र महिना हा मानवतेचा संदेश देणारा, बंधुभाव वृद्धिंगत करणारा सण असतो. मग अशा पवित्र महिन्यात रक्तपाताला कोणते स्थान आहे? सर्वच मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्याला पवित्र समजतात, असा सार्वत्रिक समज आहे. पण, स्वत:ला मुस्लिम म्हणविणार्‍या काही लोकांना रमजानची कदर नाही, हे संपूर्ण जग पाहतच आहे. यात इसिस आघाडीवर आहे. रमजान असो की आणखी कोणता सण, पवित्र वास्तू असो की सामान्य माणसाचे घर, त्यांना उद्ध्वस्त करून निष्पापांचा रक्तपात करण्याला ते इतके चटावले आहेत की, आता रमजानचा महिनाही मुस्लिमांसाठी सुरक्षित राहिलेला नाही. याच रक्त पिणार्‍यांच्या यादीत पाकिस्तान हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची अनौरस औलाद म्हणून काश्मिरातील काही नेते विघटनवादाच्या नावावर उघडपणे दहशतवाद माजवीत आहेत. ते स्वत: बगदादीसारखे म्होरके नाहीत, पण पाकिस्तानचे पोसलेले गुलाम आहेत. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तिथले नेते भिकार्‍यासारखे हात पसरूनच आपले पालनपोषण करीत आले आहेत. आधी अमेरिका आणि आता चीनकडून त्यांना भीक येत आहे. या भिकेतून चघळून झालेली काही हाडे ते यासीन मलिक, सय्यद अली शाह गिलानी, मीरवैज उमर फारुख यांच्यासारख्या नेत्यांपुढे फेकतात आणि हे नेते मालकाने दिलेल्या हुकुमानुसार वागतात. पाकिस्तान हा कसा दहशतवादपोषित देश आहे, याचा पाढा जगभरातील अनेक देशांनी वाचला आहे. सोबतच अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघानेही चिंता व्यक्त केली आहे. पण, पाकिस्तानने लाज कधीच सोडून दिली आहे. जोपर्यंत पाकिस्तानमधून नवाज शरीफ, आयएसआय आणि लष्करी राजवटीचा अंत होत नाही, तोपर्यंत काश्मिरी नागरिक मोकळा श्‍वास घेऊ शकणार नाहीत. दहशतवाद्यांच्या कारवाया सतत वाढतच चालल्या आहेत. त्या वेळीच थोपविण्याची गरज आहे. त्यासाठी यासीन मलिक, सय्यद अली शाह गिलानी, मिरवैज उमर फारुख यांच्या मुसक्या आवळण्याची आज प्राधान्याने गरज आहे. या सर्व लोकांना पाकिस्तानमधून रस्तेमार्गाने हवालाच्या माध्यमातून मोठमोठ्या रकमा येत आहेत. त्यांची ही रसद तोडण्याची गरज आहे. काही प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) यशही आले आहे. पण, संपूर्ण तपासानंतर अटक करण्याचा नाद सोडून या लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक व नंतर उर्वरित तपास पूर्ण केला पाहिजे. या दहशतवाद्यांच्या हस्तकांना पोसण्याचा उपद्व्याप कॉंग्रेसच्या काळापासून सुरू झाला. त्यांना कोट्यवधी रुपयांचा मलिदा, सुरक्षा प्रदान करून कॉंग्रेसने कधीही भरून निघणार नाही, एवढे देशाचे आणि काश्मीरचे नुकसान केले आहे. अफजल गुरू, मकबूल बट्‌ट व अजमल कसाबला फाशी झाल्याच्या विरोधात यासीन मलिक हा पाकिस्तानात गेला होता आणि तेथे कुख्यात दहशतवादी हाफीज सईद याच्यासोबत तो व्यासपीठावर बसला होता. यावेळी केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. भारताच्या शत्रूसोबत यासीन मलिकचे कसे सलोख्याचे संबंध आहेत, याचा आणखी पुरावा केंद्र सरकारला हवा आहे का? यावरून यासीन मलिक याचे मनसुबे किती घातक आहेत, हे सहज लक्षात येते. या लोकांना व्हिसा मिळतोच कसा, हेही एक कोडेच आहे! या सर्व तथाकथित विघटनवाद्यांना पाकिस्तान अथवा कोणत्याही देशाचा व्हिसा देता कामा नये. या लोकांना नजरबंद करण्याचे नाटकही करू नये. काश्मीर खोर्‍यातील केवळ चार जिल्ह्यांत या विघटनवाद्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. लष्करी जवानांवर हल्ले करणार्‍यांना, दगडफेक करणार्‍यांना प्रोत्साहित करण्यात या विघटनवाद्यांचाच सहभाग आहे, हेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. एनआयएने सय्यद अली शाह गिलानी याच्या पाकिस्तानमधील बँक खात्याची चौकशी सुरू करताच, पाकिस्तानमधील बँकांनी गिलानी याच्यासह सर्वच विघटनवाद्यांच्या खात्यांची माहिती देऊ नये, असे आदेश नवाज शरीफ सरकारने काढले होते. असे असले तरी एनआयएजवळ भरपूर पुरावे जमा झाले आहेत. तेव्हा आता वेळ दवडण्यात हशील नाही. विघटनवादाच्या नावावर दहशतवाद्यांना मदत करणार्‍या या नापाक लोकांना तत्काळ अटक करून त्यांना जेलची हवा खाण्यास पाठविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्थिती आणखी बिघडेल, असा काहींचा कयास आहे. मग आता स्थिती बिघडलेली नाही का? आज सारा देश मोदी सरकारकडे आस लावून बसला आहे. शहीद कुटुंबीय बदल्याची भाषा बोलत आहेत. तेव्हा आता प्रत्यक्ष कारवाई करण्याची वेळ आली आहे. अन्यथा, स्थिती आणखीच बिघडत जाण्याचा धोका आहे आणि तो समोर दिसत आहे

No comments:

Post a Comment