Total Pageviews

Thursday 22 June 2017

पाकिस्तानच्या बॅटच्या हल्ल्यात २ जवान शहीद- या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सुपुत्र नाईक संदीप जाधव (औरंगाबाद) व शिपाई सावन माने (कोल्हापूर) हे दोघे जण शहीद झाले.


Rajat Pandit,TNN | Updated: Jun 22, 2017, 09:29PM IST पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) ने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करीत भारतीय जवानांवर हल्ला केला असून यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोघेही जवान महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमचा हा यावर्षातील तिसरा भ्याड हल्ला आहे. बीएटी ही पाकिस्तानी सैन्याची क्रूर टीम आहे. या टीमला नियंत्रण रेषेवरील ३ किलोमीटरपर्यंत हल्ला करून पळून जाण्याची ट्रेनिंग दिली जाते. या टीमने आज दुपारी दोनच्या सुमारास भारतीय लष्कराच्या जवानावर सशस्त्र हल्ला केला. यादरम्यान पाकिस्तानी चौक्यांमधूनही गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. एका हल्लेखोराला ठार करण्यात भारतीय लष्कराला यश आले, अशी माहिती लष्करातील एका अधिकाऱ्याने दिली. बीएटीचे हल्लेखोर हे नियंत्रण रेषा ओलांडून ६०० मीटरपर्यंत भारतीय हद्दीत आले होते. भारतीय चौक्यापासून केवळ २०० मीटरवर ते लांब होते. एका हल्लेखोराचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले तर दुसरा हल्लेखोर हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. पाकिस्तान आणि भारतीय लष्करांमध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले असून ते दोघेही महाराष्ट्रातील रहिवाशी असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. १ मे रोजी बीएटीने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत भारतीय लष्करावर हल्ला केला होता तसेच त्यांनी दोन जवानांच्या पार्थिवाची विटंबना केली होती.सिल्लोड(औरंगाबाद), दि. 22 : जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात सिल्लोड तालुक्यातील केळगावचा जवान संदीप सर्जेराव जाधव (३४) शहीद झाला. ही वार्ता कळताच केळगाववर शोककळा पसरली. १५ वर्षांपूर्वी संदीप सैन्य दलात भरती झाला होता. त्याच्या निवृत्तीला अवघे दीड-दोन वर्षच बाकी होते. दोन महिन्यांपूर्वीच नातेवाईकाच्या लग्नासाठी संदीप सुटी घेऊन केळगावला आला होता. त्याची ही भेट अखेरचीच ठरली. केळगावातील गोकूळवाडी वस्तीवर त्याचे घर आहे. संदीप शहीद झाल्याचे कळताच गाव शोकसागरात बुडाले. ही दु:खद वार्ता रात्री उशिरापर्यंत त्याच्या घरी पोहचू दिली नव्हती. ग्रामस्थांनी त्याच्या घरात असलेल्या टीव्हीचे केबलही तोडून टाकले होते. संदीपच्या पश्चात आई, वडील, पत्नी उज्ज्वला, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, बहिण असा परिवार आहे. यापूर्वी केळगावचे दोन जवान शहीद- देशाचे संरक्षण करताना केळगावातील दोन जवानांना यापूर्वी वीरमरण आले आहे. माधव नारायण गावंडे हा जवान ८ जुलै २००३ रोजी, काळूबा भाऊराव बनकर हा २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहीद झाला होता. आज पार्थिव येण्याची शक्यता- शुक्रवारी संदीपचे पार्थिव औरंगाबादेत येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. Pakistan's BAT attack in J&K: 2 Indian soldiers martyred, two attackers killed Rajat Pandit | TNN | Updated: Jun 22, 2017, 08.12 PM IST HIGHLIGHTS This was BAT's third attempt this year in the area BAT intruded 600 metre within Indian side of Line of Control Two soldiers were martyred in this attack NEW DELHI: The Army killed two "armed intruders" to foil yet another Pakistani BAT (border action team) operation in the Poonch district along the volatile Line of Control in Jammu and Kashmir on Thursday afternoon. Two soldiers of the Maratha Light Infantry, Naik Jadhav Sandip Sarjerao and Sepoy Mane Savan Balku, laid down their lives in the operation. An "area domination patrol" of the Army was underway in the Krishna Ghati sector along the LoC when it was attacked by the armed intruders around 600 meters inside Indian territory at around 2 pm. "While the fierce firefight was in progress, in which two of our soldiers were martyred, Pakistan Army posts in the sector also opened heavy fire on our posts," said an officer. "While the body of one armed intruder can still be seen lying in the open, the BAT managed to drag back the body of the other under covering fire. The cross-border exchange of heavy firing is still underway in the sector," he added. The BAT operation, which took place just about 200 metres from the Indian post there on Thursday, is the third such incident in the Poonch region this year. BAT cross-border raids are usually undertaken by a group of around six to seven regular Pakistan Army soldiers with a few terrorists after systematic reconnaissance of vulnerable spots and studying the deployment and patrolling patterns of Indian troops along the LoC. On May 1, two Indian soldiers were beheaded and another injured by a Pakistani BAT after it had sneaked into Indian territory under the cover of heavy shelling in the same Krishna Ghati sector in Poonch district. India had vowed to exact revenge for the "barbaric" mutilation of the bodies during this well-planned BAT raid and ambush over 200 meters deep inside Indian territory. Since then, the Indian Army has been exerting military pressure on the Pakistan Army with "pre-emptive and punitive fire assaults" to "pro-actively dominate" the 778-km long LoC and destroy "locations" across the border that aid infiltration attempts as part of the overall counter-terrorism strategy, as was reported by TOI earlier. Top Comment The Indian director-general of military operations, Lt-General A K Bhatt, has also warned his Pakistani counterpart about the growing number of BAT camps located around 10-12 km from the LoC in Pakistan-occupied-Kashmir. These BAT camps, unlike the largely make-shift terror-training camps and launch pads, consist of around 40-50 Pakistan Army regulars and commandos being specially trained for cross-border raids and ambushes

No comments:

Post a Comment