Total Pageviews

Friday 21 April 2017

आधी इशरत, आता नजीम-ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे गाव पुन्हा एकदा प्रसिद्धीस आले आहे. यापूर्वीही ते चांगलेच गाजले होते. उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा येथील अक्रम मंजिल इमारतीत पहाटे छापा घालून नजीम ऊर्फ उमर शमशाद अहमद शेख या २६ वर्षीय इसिसच्या दहशतवाद्याला अटक केली. यामुळे एका फार मोठ्या संकटातून देश वाचला आहे.-TARUN BHARAT


April 22, 2017011 बाकी समाजाच्या तरुणांवर बेरोजगारीचे संकट असते, त्यांच्याही भावनांना कधीकधी ठेच लागते, धर्मासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांचेही बाहू फुरफुरत असतात; पण म्हणून कुणी दहशतवादी संघटनेत प्रवेश घेऊन घातपात घडवून आणत नाहीत. मग या एका विशिष्ट धर्माच्या तरुणांनाच या दिशेने का जावेसे वाटते, या प्रश्नातचे निष्पक्ष उत्तर, भारतातील दहशतवाद नष्ट करण्यास फार मोठे दिग्दर्शन करू शकते. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे गाव पुन्हा एकदा प्रसिद्धीस आले आहे. यापूर्वीही ते चांगलेच गाजले होते. उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंब्रा येथील अक्रम मंजिल इमारतीत पहाटे छापा घालून नजीम ऊर्फ उमर शमशाद अहमद शेख या २६ वर्षीय इसिसच्या दहशतवाद्याला अटक केली. यामुळे एका फार मोठ्या संकटातून देश वाचला आहे. एटीएसला या बाबतीत सर्वांनीच धन्यवाद दिले पाहिजे. दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला याचे समाधान असतानाच, इसिससारख्या संघटनेला, भारतातून कार्यकर्ते मिळतात, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मुंब्रा येथील इशरत जहॉं ही लष्करे तोयबाची दहशतवादी मुलगी, गुजरातमधील एका चकमकीत ठार झाली, तर कितीतरी सेक्युलर लोकांना हुंदके आवरत नव्हते, हे आपण बघितलेच आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती वसंतराव डावखरे व जितेंद्र आव्हाड तर मदतीचा चेकदेखील इशरतच्या कुटुंबीयांना देऊन आले. असे हे कुख्यात मुंब्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काल अटक करण्यात आलेल्या नजीमबाबतची बाहेर आलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. तो आईस कॅण्डी विक्रीचा व्यवसाय करतो. पण ज्या इमारतीत तो राहतो, तिथे एखादा आईस कॅण्डी विकणारा राहू शकतो, यावर विश्वाबस बसत नाही. इसिसकडून त्याला भक्कम पैसा मिळत असणार, हे उघड आहे. त्याच्याच भरोशावर तो या इमारतीत राहू शकला. नजीम सतत व्हिडीओ बघायचा. ते सर्व इसिसशी संबंधित असायचे. त्याच्या मित्रांनी त्याला या बाबत हटकलेही होते. इसिसचा नाद सोड. एखादे वेळी तू गोत्यात येशील, असा इशाराही त्यांनी नजीमला दिला असल्याचे सांगितले जाते. पण, तरीही नजीमने इसिसला सोडले नाही. तो त्यात अधिकच गुंतत गेला. नजीम मुसलमानांमधील तरुण मुलांचे ब्रेनवॉश करीत असे आणि त्यांना इसिसच्या टोळीत सहभागी होण्यास प्रेरित करीत असे. उत्तरप्रदेशातील बिजनौरचा एक तरुण मुंबईत येतो. निवासासाठी नेमकी मुंब्रा गावाचीच निवड करतो आणि तिथून इसिसला शक्य तेवढी मदत करणे सुरू करतो, या सर्व बाबी अंगावर शहारे येतील अशा शेवटाकडे बोट दाखवीत आहेत. नजीमला अटक झाल्यावर, आपल्याकडील राष्ट्रीय (म्हणजे हिंदुद्वेष्टी) मीडिया (म्हणजे इंग्रजी), नजीम किती निरागस होता, त्याचा तसा स्वभाव नव्हता, इत्यादी माहितींच्या बातम्या प्रसारित करण्यात गुंग आहे. आपल्या देशाचे हेच दुर्दैव आहे. का म्हणून या तरुणांना इसिससारख्या दहशतवादी संघटनेत काम करावेसे वाटते? अशी कुठली ‘मजबुरी’ त्यांना आहे? दहशतवाद कुठल्याच धर्माला मान्य नाही, अशी समजूत आपण करून घेत असतो. मग दहशतीची कृत्ये करणारी मंडळी नेमकी एकाच धर्माशी जुळलेली का असतात? हा प्रश्न विचारला तर मीडिया तुमच्यावर तुटून पडलाच समजा! बाकी समाजाच्या तरुणांवर बेरोजगारीचे संकट असते, त्यांच्याही भावनांना कधीकधी ठेच लागते, धर्मासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांचेही बाहू फुरफुरत असतात; पण म्हणून कुणी दहशतवादी संघटनेत प्रवेश घेऊन घातपात घडवून आणत नाहीत. मग या एका विशिष्ट धर्माच्या तरुणांनाच या दिशेने का जावेसे वाटते, या प्रश्ना्चे निष्पक्ष उत्तर, भारतातील दहशतवाद नष्ट करण्यास फार मोठे दिग्दर्शन करू शकते. पण आम्ही ते घडू देत नाही. तसे केले, तर आमच्या संविधानाला, देशाच्या कथित सेक्युलर विणीला धक्का पोचला म्हणून गदारोळ होईल. त्यामुळे दहशतवाद अजूनही आमच्या मानगुटीवर बसून आहे. कारण आम्हाला देश, समाज, राष्ट्र यांच्यापेक्षा एखाद्याची धार्मिक भावना (मग ती देशासाठी कितीही घातक का असे ना) जास्त महत्त्वाची वाटत असते. आम्ही मुळातच, ‘मला काय त्याचे?’ या प्रवृत्तीचे झालो आहोत. समाजाच्या या असल्या मनोवृत्तीमुळेच, या तरुणांमध्ये दहशतवादाचे बीज पेरले जाते. पुढे त्याचा महाकाय विषवृक्ष होतो. त्याची फळे मग सार्याा समाजालाच चाखावी लागतात. प्रत्येक वेळी एकाच विशिष्ट समाजाचा तरुण या कृत्यात सापडतो आणि आम्ही लगेच हिंदूंना सहिष्णुतेचे, समान आदराचे पाठ शिकवू लागतो. हिंदूंही शहाण्यासारखे, समजले, समजले म्हणून मान डोलावतात. सामाजिक जीवन इतके रसातळाला गेले आहे. त्यातून मार्ग काढत, अशा तरुणांना घातपात होण्याआधी पकडणे किती कठीण असेल, याची कल्पनाच केलेली बरी. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या एटीएसचे खूपच अभिनंदन केले पाहिजे. घातपाताची घटना घडून गेल्यावर आरोपींना पकडणे, हे कितीही महत्त्वाचे काम असले, तरी ती घटनाच घडू नये म्हणून आधीच आरोपींना अटक करणे, हे जास्त महत्त्वाचे आहे. आता येत्या काही दिवसात नजीम व त्याच्या साथीदारांच्या मूळ गावी, आपला राष्ट्रीय मीडिया पोचेल. त्यांची कुटुंबे किती गरिबीत दिवस काढत आहेत, वगैरे कहाण्या वृत्तपत्रांतून तसेच वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणे सुरू होतील. हे सर्व शांत मनाने, मनातल्या मनात चडफडत बघत बसणे, हीच भारतीयांची नियती आहे की काय, न कळे! आज केंद्रात, राज्यात भाजपाच्या तडफदार नेत्यांच्या हाती सत्ता आहे आणि ही मंडळी राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत तसूभरही तडजोड करणारी नाहीत, याची हमी आहे. हाच एक आशेचा दिलासा भारतीयांना आहे. त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, गेली पन्नास-साठ वर्षे हे विषारी वेल इतके खोलवर रुजले आहेत, की त्यांना समूळ नष्ट करायला काही काळ जाऊ द्यावाच लागेल. हेही खरे आहे की, सरकारच्या अत्यंत कडक धोरणामुळे दहशतवादी वृत्तींची गळचेपी होत आहे. ‘मरता क्या नहीं करता’ या न्यायाने त्यांची ही कदाचित जीवनमरणाची धडपडही असू शकते. पण, केवळ याच समाधानाने आम्ही बेसावध होता कामा नये. एक नागरिक म्हणूनही आमचे काही कर्तव्य आहे. फूल ना फुलाची पाकळी, आमचे योगदान असायला हवे. आम्ही शस्त्रे हाती घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी नाही जाऊ शकत, पण समाजात या मंडळींना वैचारिक अधिष्ठान पुरविणार्यांघचे तर पितळ उघडे पाडू शकतो ना! तेवढे तरी केले पाहिजे. समाजात वेगवेगळे मुखवटे, बुरखे पांघरून अनेक जण वावरत आहेत. वैचारिक क्षेत्रात त्यांचा धुडगूस चालू आहे. कुठे प्रगतिशील म्हणून, कुठे सम्यक् म्हणून, कुठे मानवतावादी म्हणून, कुठे अन्य तत्सम नावांनी. ते आपण ओळखले पाहिजे. त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खतपाणी देणे आपल्या हातून होत आहे का, हे तपासून बघितले पाहिजे. त्यांचे मुखवटे, बुरखे फाडून फेकले पाहिजे. नागरी समाजातून या असल्या मंडळींना मिळणार्याे संसाधनांचे झरे आम्हीच तिथल्या तिथे चिणून बंद करायला हवे. फक्त त्यासाठी उच्चभ्रूपणाची झूल अंगावरून उतरवून ठेवावी लागेल. असे झाले, तर दहशतवाद्यांविरुद्ध संघर्षरत असलेल्या यच्चयावत सुरक्षादलांना कितीतरी मदत होईल. मग इसिसच काय, इसिसचा बाप आला तरी या देशाचे काहीही बिघडवू शकणार नाही…

No comments:

Post a Comment