Total Pageviews

Friday 21 April 2017

ऑपरेशन मुंब्रा’च हवे! मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला हे चांगले असले तरी मुंब्य्रातील देशविरोधी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार हा प्रश्न उरतोच.

मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला हे चांगले असले तरी मुंब्य्रातील देशविरोधी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार हा प्रश्न उरतोच. खबरी मिळाल्यावर तर धरपकडी होणारच, पण त्याहीपेक्षा आता ‘ऑपरेशन मुंब्रा’ हाच जालीम उपाय आहे. तो केला तरच मुंब्रा हे इसिसचे आश्रयस्थान बनू शकणार नाही आणि महाराष्ट्रासह देशाचा ‘सीरिया’ होणार नाही. इस्लामी दहशतवाद आणि मुंब्रा हे कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे. अर्थात, त्यात तसे नवीन काही नाही. मात्र ‘इसिस’ या खतरनाक संघटनेच्या दहशतवाद्यांना तेथून पुन्हा ताब्यात घेण्यात आल्याने हे कनेक्शन अत्यंत धोकादायक वळणावर आले आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात मुंब्रा आणि मराठवाडय़ातील वैजापूर येथून इसिसच्या काही हस्तकांना अटक करण्यात आली होती. त्यात इसिससाठी भरती करणाऱया मुद्दबीर शेख या ‘कमांडर’ला ताब्यात घेण्यात आले होते. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएस यांनी संयुक्त कारवाई करून नजीम ऊर्फ उमर शमशाद अहमद शेख या इसिसच्या प्रमुख हस्तकाला अटक केली आहे. इसिससाठी तरुणांची भरती करणे, त्यांचे ब्रेन वॉश करून दहशतवादी कारवायांसाठी त्यांना तयार करणे अशी कामे नजीम करीत होता. मुंब्रा आणि इस्लामी दहशतवाद हे कनेक्शन खूप जुने आहे. १९९३च्या मुंबईतल्या भीषण बॉम्बस्फोटांसाठी वापरलेले आरडीएक्स येथीलच खाडीत उतरविण्यात आले होते. लश्कर-ए-तोयबाची फिदायीन इशरत जहाँदेखील मुंब्रा येथीलच होती. ती तोयबाची मानवीबॉम्ब होती अशी कबुली खुद्द हेडली याने शिकागो कोर्टात दिली आहे. तोयबा आणि अल कायदाचे अतिरेकी मुंब्रा येथून याआधी पकडले गेले आहेत. आता इसिसचे कमांडर, हस्तक ताब्यात घेतले जात आहेत. मुंब्रा येथून जवळच असलेल्या कल्याण येथील चार तरुण इसिसमध्ये सामील झाल्याचे गेल्या वर्षी उघड झाले होते. शिवाय मुंब्रा येथील तरबेज नूर मोहम्मद तांबे हा तरुणही इसिसमध्ये सामील होण्यासाठी घरातून पळून गेल्याची तक्रार त्याच्या भावानेच केली होती. मुंब्य्राचे सर्वच मुस्लिम बांधव देशविरोधी कारवायांत सहभागी आहेत असे नाही, पण तरीही मुंब्रा हे ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून बदनाम झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. आता इसिसच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी या दिशेने मुंब्य्राची वाटचाल सुरू आहे. इसिसच्या दहशतवाद्यांना तेथून अटक केल्याने दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला हे चांगले असले तरी मुंब्य्रातील देशविरोधी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार आणि दहशतवादी सापांची वळवळ कधी कायमची ठेचली जाणार हा प्रश्न उरतोच. खबरी वगैरे मिळाल्यावर तर धरपकडी होणारच, पण त्याहीपेक्षा आता ‘ऑपरेशन मुंब्रा’ हाच जालीम उपाय आहे. तरच मुंब्रा हे इसिसचे आश्रयस्थान बनू शकणार नाही आणि महाराष्ट्रासह देशाचा ‘सीरिया’ होणार नाही. व्हिसाबंदीची कोंडी अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि आता न्यूझीलंडनेदेखील व्हिसा नियम कठोर केले आहेत. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अमेरिका फर्स्ट’ हा प्रचाराचा मुद्दाच बनवला होता. त्यानुसार त्यांनी आता ‘एच १ बी’ व्हिसावर निर्बंध आणले आहेत. विदेशी व्यक्तींना अमेरिकेतर्फे हा व्हिसा मिळतो. अमेरिकेच्या संगणक क्षेत्रातील ८० टक्के जागा हिंदुस्थानी तंत्रज्ञ आणि आयटी तज्ञांनी व्यापली आहे ती याच व्हिसाच्या जोरावर. ट्रम्प यांनी लादलेल्या ताज्या निर्बंधामुळे हा ‘टक्का’ खाली घसरणार आहे. थोडक्यात, अनेक हिंदुस्थानी आयटी ‘इच्छुकां’ना अमेरिकेत जाण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार आहे. पुन्हा अमेरिकी आस्थापनांना सेवा पुरविण्याचे कंत्राट घेतलेल्या हिंदुस्थानी कंपन्यांनाही या निर्बंधाचा फटका बसणार आहे. अमेरिकेप्रमाणे ऑस्ट्रेलियानेही ‘४५७ व्हिसा’ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टर्नबुल हे गेल्याच आठवडय़ात हिंदुस्थानभेटीवर होते. पंतप्रधान मोदींसमवेत दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करून त्यांनी ‘सेल्फी’ही काढला. मात्र ऑस्ट्रेलियात परतताच ‘४५७ व्हिसा’ रद्द करून त्या देशात काम करणाऱया काही हजार हिंदुस्थानी कामगारांना धक्का दिला. शिवाय हा व्हिसाच रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियात जाऊ इच्छिणाऱयांसाठीही दरवाजे बंद झाले आहेत. तशीच स्थिती न्यूझीलंडमध्येही होणार आहे. व्हिसाचे नियम किती शिथिल आणि कठोर करायचे, व्यावसायिक, नोकरदारांच्या स्थलांतराची मर्यादा, भूमिका किती सौम्य किंवा कडक ठेवायची हा शेवटी त्या त्या देशाचा अधिकार असतो. तो मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तिन्ही देशांनी केलेल्या व्हिसाबंदीच्या कोंडीने हजारो हिंदुस्थानी इच्छुकांचा श्वास कोंडणार हे निश्चित आहे. मात्र तूर्त तरी ही कोंडी सहन करण्याशिवाय पर्याय नाही.

No comments:

Post a Comment