Total Pageviews

Tuesday 25 April 2017

नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 25 जवान हुतात्मा झाले आहेत.


सुकमा येथे नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला ही "निर्दय हत्या' असून नक्षलवाद्यांकडून आदिवासींचा "ढाल' म्हणून वापर केला जात असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (मंगळवार) केली.सिंह यांनी आज या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. आदिवासी भागामध्ये होणाऱ्या विकासकामांस नक्षलवाद्यांचा विरोध आहे. मात्र आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही,'' असे सिंह म्हणाले. सिंह हे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास रायपूर येथे दाखल झाले. यावेळी छत्तीसगड राज्याचे राज्यपाल बलरामजी दास टंडन, मुख्यमंत्री रमण सिंह, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व इतर उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. त्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान जेवण करत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 26 जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली. अधिकाऱयांनी सांगितले की, बस्तर विभागातील कालापत्थर भागात रस्ता तयार करण्याचे काम सुरू होते. रस्ता तयार करणाऱ्या कामगारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जवान पार पाडत होते. जवान जेवण करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंदपणे गोळीबार केला. यामध्ये 26 जवान हुतात्मा झाले आहेत. यावेळी जवानांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. सहा जवान जखमी झाले आहे. जखमींपैकी शेर मोहम्मद यांनी जखमी अवस्थेतही नक्षलवाद्यांवर तुटून पडले. दोन-तीन नक्षलवाद्यांच्या छातीत त्यांनी गोळ्या घातल्या. शिवाय, स्वतः जखमी असतानाही त्यांनी जखमी झालेल्या सहकाऱयांना खांद्यावर घेऊन रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गावकऱयांनी नक्षलवाद्यांना मदत केली. गोळीबार करणाऱयांमध्ये महिलाही होत्या, अशीही माहिती पुढे आली आहे. नक्षलवाद्यांनी हल्ल्यानंतर जवानांकडील 13 एके रायफल, 5 आयएनएसएएस रायफल, 3,420 जिवंत काडतुसे, 22 बुलेटप्रफु जॅकेट्स, 5 वायरलेस सेट, मेटल डिटेक्टरसह अन्य वस्तू घेऊन पसार झाले आहेत. हुतात्मा झालेले सर्व जवान हे "सीआरपीएफ'च्या 74व्या बटालियनचे आहेत. 2010नंतर नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. सुकमा जिल्ह्यात 12 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे 12 जवान हुतात्मा झाले होते. तसेच छत्तीसगडमधील दंतेवाड्यात 2010मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते माओवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात सुरक्षेची कामगिरी बजावणाऱया दलांसाठी 2017 हे गेल्या सात वर्षांतील सर्वात घातक वर्ष ठरले आहे. गेल्या चार महिन्यात सुरक्षा दलाचे तब्बल 72 जवान माओवाद्यांशी लढताना शहीद झाले आहेत. यापूर्वी 2010 मध्ये सुरक्षा दलाचे 153 जवान शहीद झाले होते. इंडिया स्पेन्ड या वेबसाईटने साऊथ एशिया टेररिझम पोर्टल (एसएटीपी) या संस्थेच्या आकडेवारीचा हवाला देऊन यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलावर (सीआरपीएफ) 24 एप्रिलला माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 26 जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफच्या 74 व्या बटालियनवर सुमारे 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. माओवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होणाऱया जवानांची संख्या वर्ष शहीद जवानांची संख्या 2005 48 2006 55 2007 182 2008 67 2009 121 2010 153 2011 67 2012 36 2013 45 2014 55 2015 41 2016 36 2017 72 छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 26 जवान हुतात्मा झाले, तर सहा जवान जखमी झाले. हुतात्मा झालेले सर्व जवान हे "सीआरपीएफ'च्या 74व्या बटालियनचे आहेत. 2010नंतर नक्षलवाद्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला आहे. नक्षलवादी कारवायांचा सर्वाधिक फटका बसलेल्या बस्तर विभागातील कालापत्थर भागात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा हल्ला झाला. "सीआरपीएफ'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की या भागात रस्ता तयार करणाऱ्या कामगारांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी पार पाडत असताना नक्षलवाद्यांनी "सीआरपीएफ'च्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या वेळी नक्षलवादी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या गोळीबारात 26 जवान हुतात्मा झाले असून, सहा जवान जखमी झाले. जखमी झालेल्या काही जवानांची प्रकृती गंभीर असून, त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूर आणि जगदलपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नक्षलवादविरोधी मोहिमेअंतर्गत सुकमा जिल्ह्यातील या भागात "सीआरपीएफ'ची 74वी बटालियन तैनात करण्यात आली आहे. नक्षलवादी हल्ल्यानंतर घटनास्थळाकडे जवळच्या "सीआरपीएफ'च्या तळाकडून मोठी कुमक पाठविण्यात आली असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. सुकमातील भीषण नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपला दिल्ली दौरा अर्ध्यावर संपवून छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह हे रायपूरमध्ये दाखल झाले. त्यांनी तातडीची बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला. सुकमा जिल्ह्यात 12 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे 12 जवान हुतात्मा झाले होते. तसेच छत्तीसगडमधील दंतेवाड्यात 2010मध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात "सीआरपीएफ'चे तब्बल 76 जवान हुतात्मा झाले होते. "मी तीन नक्षलवाद्यांना गोळ्या घातल्या' ""नक्षलवाद्यांनी सुरवातीला गावकऱ्यांना आमचे ठिकाण शोधण्यासाठी पाठवले आणि त्यानंतर सुमारे 300 नक्षलवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला. आम्हीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. मी स्वतः तीन नक्षलवाद्यांच्या छातीत गोळ्या घातल्या,'' अशी माहिती या हल्ल्यात जखमी झालेले "सीआरपीएफ'चे जवान शेर मोहंमद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हंसराज अहीर उद्या सुकमात "सीआरपीएफ'च्या हुतात्मा जवानांकडे असलेली शस्त्रे, वायरलेस सेट आणि दारूगोळा नक्षलवादी लुटून घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. बस्तरचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि पोलिस उप महानिरीक्षक सुंदरराज हे सुकमाकडे रवाना झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयानेही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली होती. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर हे मंगळवारी (ता. 25) सुकमाला जाणार असून, "सीआरपीएफ'चे महानिरीक्षकही सुकमात दाखल होणार आहेत. नक्षलवादाचा विळखा आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजातील उपेक्षितांना न्याय आणि समानता मिळवून देण्याच्या हेतूने सुरू झालेल्या लढ्याने गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादाचे स्वरूप धारण केले आहे. कर्करोगाप्रमाणे फैलावत चाललेला हा नक्षलवाद एकेक राज्य पोखरत असून, आता 13 राज्ये नक्षलग्रस्त झाली आहेत. - नक्षलवाद ही देशाच्या अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेतील सर्वांत मोठी समस्या - आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिनम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणात कारवाया - नक्षलवाद्यांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रे - दुर्गम डोंगराळ भागामुळे नक्षलवाद्यांना पकडण्यात अडथळे नक्षलवादी संघटना - पीपल्स गुरिल्ला आर्मी - पीपल्स वॉर ग्रुप - भारतीय कम्युनिस्ट पक्ष - नक्षलवादी कम्युनिस्ट केंद्र - जनशक्तीसारखे टोकाच्या डाव्या विचारसरणीचे गट नक्षलवादी म्हणून सक्रिय नक्षलवाद्यांचे मोठे हल्ले - 16 जुलै 2008 - ओरिसातील मलकंगिरी जिल्ह्यात सुरुंगाच्या स्फोटात पोलिस व्हॅन उडविली, 21 पोलिस मृत्युमुखी. - 29 जून 2008 - नक्षलविरोधी पथकाला घेऊन जाणाऱ्या नौकेवर ओरिसातील बालिमेला सरोवरात हल्ला, 28 जवान ठार. - 8 ऑक्टोलबर 2009 - महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील लहेरी पोलिस ठाण्यावर हल्ला, 17 पोलिस ठार. - 30 सप्टेंबर 2009 - महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातील कोरची आणि बेलगाव ग्रामपंचायतीची कार्यालये नक्षलवाद्यांनी पेटवून दिली. - 26 सप्टेंबर 2009 - छत्तीसगडच्या जगदलपूरमधील पैरागुडा गावात नक्षलवाद्यांनी भाजपचे बालाघाट येथील खासदार बळिराम कश्यवप यांच्या मुलाची हत्या केली. - 4 सप्टेंबर 2009 - छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात आदेड गावात चार गावकऱ्यांची हत्या. - 31 जुलै 2009 - छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात विशेष पोलिस अधिकारी आणि आणखी एकाची हत्या. - 27 जुलै 2009 - छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात भूसुरुंगाच्या स्फोटात सहा जण ठार. - 23 जून 2009 - बिहारमधील लखिसराई जिल्ह्यात न्यायालयाच्या आवारात नक्षलवाद्यांनी गोळीबार करून चार साथीदारांची सुटका केली. - 16 जून 2009 - पालामाऊ जिल्ह्यातील बेहेराखंड येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगाच्या स्फोटात 11 पोलिस अधिकारी ठार, दुसऱ्या घटनेत माओवाद्यांच्या हल्ल्यात चार पोलिस ठार. - 13 जून 2009 - बोकारोजवळील गावात घडवून आणलेल्या दोन स्फोटांत दहा पोलिस ठार, अनेक जखमी. - 10 जून 2009 - झारखंडमधील सारंदा जंगलाच्या परिसरात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दहा पोलिस ठार. - 22 मे 2009 - महाराष्ट्रात गडचिरोलीजवळील जंगलात माओवाद्यांच्या हल्ल्यात 16 पोलिस ठार. - 22 एप्रिल 2009 - सुमारे 300 प्रवासी असलेल्या रेल्वेगाडीचे माओवाद्यांकडून अपहरण, नंतर सर्वांची सुटका. - 13 एप्रिल 2009 - ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे 10 जवान ठार. - 15 फेब्रुवारी 2010 - पश्चिजम मिदनापूर जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात इस्टर्न फ्रंटियर रायफल्सचे 24 जवान ठार. - 4 फेब्रुवारी 2010 - ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंगाच्या स्फोटात 11 जवान ठार. 8 मे 2010 - छत्तीसगडमधील बिजापूर येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्यात 8 जण मृत्युमुखी. 29 जून 2010 - छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 26 जवान मृत्युमुखी. 18 ऑक्टो0बर 2012 - गया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 6 सीआरपीएफचे जवान मृत्युमुखी. 25 मे 2013 - छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्यात महेंद्र कर्मा या कॉंग्रेसच्या नेत्यासह पक्षाचे 25 जण ठार. 11 मार्च 2014 - छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 15 सुरक्षारक्षक ठार. 12 मार्च 2017 - छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान मृत्युमुखी. 24 एप्रिल 2017 - छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 24 जवान मृत्युमुखी. छत्तीसगडमध्ये "सीआरपीएफ'च्या जवानांवर झालेला हल्ला हे भ्याड आणि निषेधार्ह कृत्य आहे. सुकमातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. जवानांचे हौतात्म्य वाया जाऊ देणार नाही. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान सुरक्षा दलांच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळत असल्यामुळे नैराश्याातून केलेला हा हल्ला आहे. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. - राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री सुकमातील हल्ला ही दुर्दैवी घटना असून, सुरक्षा दलांवर झालेला हा मोठा आघात आहे. या हल्ल्याच्या मागील कारणांचा विस्तृत अभ्यास करण्यात येईल. - किरण रिज्जू, केंद्रीय गृह राज्यमंत्री सुकमातील नक्षलवादी हल्ल्यामुळे मी पूर्णपणे व्यथीत झालो आहे. - रमणसिंह, छत्तिसगडचे मुख्यमंत्री छत्तीसगडमधील सुकमा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भयंकर नक्षलवादी हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांमध्ये काहीच फरक नाही. यांना दयामाया दाखवू नये, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून दिग्गजांनी नक्षलवाद्यांबद्दलच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नक्षलवाद्यांची तुलना 'इस्लामिक स्टेट'च्या दहशतवाद्यांशी केली आहे. छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात २५ जवान शहीद झाल्याच्या घटनेनंतर नक्षली हल्ल्यांचे भीषण वास्तव मांडणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात नक्षली हल्ल्याच्या ५, ९६० घटना झाल्या असून या हल्ल्यात ४५५ जवान शहीद झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. सुकमा येथे नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. या हल्ल्यात २५ जवान शहीद झाल्याने नक्षलवादाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार देशभरात गेल्या पाच वर्षात नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या ५,९६० घटना घडल्या आहेत. यामध्ये १,२२१ नागरिक आणि ४५५ जवानांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत मृत्यू होणाऱ्या नक्षलवाद्यांचे प्रमाण कमी आहे. गेल्या पाच वर्षात ५८१ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. गृहमंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात नक्षलवाद्यांनी ९१ टेलिफोन एक्सचेंजना लक्ष्य केले. याशिवाय २३ शाळांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले होते. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर नक्षलवादी कारवायांवर वचक बसेल असा दावा पोलिसांकडून केला जात होता. या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अपयश हे या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. नक्षलींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांच्या विशेष शाखेतील मोठी टीम या भागात सक्रीय असते. पण या विभागातील अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली झाल्याने पोलिसांना पुरेशी माहिती मिळण्यात अपयश येत असल्याचे सूत्रांकडून समजते. छत्तीसगडमधील आयजी एस.आर.पी कल्लूर यांची नक्षलवाद्यांमध्ये दहशत होती. बस्तर रेंजमध्ये त्यांनी दोन वर्षात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहीमेला यश आले आणि अनेक नक्षलवाद्यांनी समर्पणही केले होते. कल्लूरी हे स्वतः नक्षलवादग्रस्त भागात चालत गस्त घालत होते. पण कल्लूरी यांची बदली झाल्याने नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाल्याचा दावा केला जात आहे.

No comments:

Post a Comment