Total Pageviews

Sunday, 2 October 2016

MUST READ-सर्जिकल स्ट्राईकने ‘यांची’ वाढली पोटदुखी!


सर्जिकल स्ट्राईकने ‘यांची’ वाढली पोटदुखी! October 2, उरी येथील लष्करी तळावर पाक प्रायोजित दहशतवाद्यांनी अचानक भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये भारताचे काही शूर सैनिक शहीद झाले. सर्वांना वाटले होेते की, गेली अनेक वर्षे जे घडले ते आताही घडणार. निषेधाचे खलिते, पाकिस्तानला इशारे, फारतर अमेरिकेकडून दोन्ही देशांना संयम पाळण्याचे फुकटचे सल्ले… आणि नेहमीप्रमाणे त्यानंतर शांत शांत…! त्यामुळे मोदी यांचा आणि भारतीय जनता पक्ष सरकारचा द्वेष करणारे अगदी सरसावले होते ५६ इंची छातीचे माप घ्यायला! कुठे आहे दाखवा आता ५६ इंची छाती? असा खवचट सवाल त्यांच्या अगदी ओठांवर होता. ‘मोदीभक्त’ असे हिंदुत्ववाद्यांना हिणवत, त्यांना खिंडीत गाठून, आता कुठे आहे तुमची आक्रमकता, असे विचारण्याची त्यांची तयारी पूर्ण झाली होती. पण हा हन्त! भारतात जे कधीच घडले नव्हते ते घडले. कागदी घोडे आणि इशारे न करता, नरेंद्र मोदी यांनी थेट पाकव्याप्त गुलाम काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांची नेमकी ठाणी उडवून लावण्याचे आदेश सैन्याला दिले. राजकीय इच्छाशक्ती पाठीशी असेल, तर भारतीय सैन्याला फक्त इशाराच जणू पुरेसा होता. त्यांनी निष्णात सर्जन करतो त्या शस्त्रक्रियेच्या नजाकतीने इकडच्या कानाची खबर तिकडे न लागू देता मध्यरात्र ते पहाट या काळात चार तासांत सर्जिकल ऍटॅक केला. दहशतवाद्यांचे सात लॉन्चिंग पॅडस् उद्ध्वस्त केले. ३८ दहशतवादी आणि दोन पाकिस्तानी सैनिक यांना आडवे केले. ही बातमी चोरून, लपून नव्हे, तर अगदी अभिमानाने भारतीय लष्कराच्या महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली-‘‘आमच्या देशातील निरपराध नागरिकांवर हल्ले करण्यासाठी आमच्या देशात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅडस् भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. आमची मोहीम फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात होती, अन्य कशाच्याही विरोधात नाही.’’ असे डीजीएमओ म्हणाले. सगळा देश आनंदाने मोहरून गेला. इतिहासात पहिल्यांदा देशावरच्या दहशतवादी राक्षसी हल्ल्याला सरकारने, लष्कराने मुँहतोड जबाब दिला! पुन्हा वाकडा डोळा करण्याची हिंमत होणार नाही, अशी अद्दल घडविली. जगातील सर्व प्रमुख देश यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले. पाकिस्तानला ‘लागलं नाही, लागलं नाही’ असं लटकंच करण्याची वेळ आली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत ‘असे सर्जिकल ऑपरेशन झालेच नाही,’ असे सांगत लाज राखण्याची वेळ आली. मात्र, भारतात काही लोक असे आहेत की, ज्यांना भारताचे भले झाले की पोटात मुरडा येतो. विशेषतः मोदी सरकारच्या काळात भारताचा विजय झाला, तर यांचा अगदी जळफळाट होतो. जगात भारतीय जनता कामाच्या निमित्ताने जाते, त्यांना आपण अनिवासी भारतीय किंवा एनआरआय म्हणतो. मात्र, भारतात राहणारे काही लोक आरएनआय म्हणजे रेसिडेन्शिअल नॉन इंडियन्स म्हणजे निवासी अभारतीय आहेत. हे भारतात राहतात, भारताचे अन्नपाणी खाऊन माजतात, मस्तवाल होतात. मात्र, भारताचे काही भले झाले की, यांचा तिळपापड होतो. चांगल्या वातावरणात हे ‘पादरे पावटे’ दुर्गंधी करू लागतात. नवरा-बायकोची भांडणे एकदा विकोपाला गेली. नवरा आत्महत्या करण्याला निघाला आणि बायकोला म्हणाला, ‘‘मी मरेन, पण तुला रंडकी करेन.’’ भारतात राहणार्‍या निवासी अभारतीय लोकांचा आविर्भाव असाच असतो. भारताचे नुकसान झाले तरी चालेल, पण मोदींसारख्यांना शिव्याशाप देण्याचा छंद करता आला पाहिजे, अशी या लोकांची तीव्र इच्छा असते. त्यांची ही संधी लष्कराने केलेल्या सर्जिकल ऍटॅकने हिरावून घेतली. त्यामुळे हे ‘पावटे’ दुर्गंधी अभियानाच्या नादाला लगेच लागले. एक मराठी वृत्तवाहिनी आहे. आपले वेठबिगार लोक बोलावून आपल्याला हवे ते त्यांच्या तोंडून वदवून घेण्याचे काम इमाने इतबारे या वाहिनीवरून चालत असते. त्यांनी सगळा देश आनंद व्यक्त करत असताना, या सर्जिकल ऑपरेशनवर प्रश्‍नचिन्ह लावण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रयत्न केलाच! या चर्चेत भाग घेणारे गुजरातमधील एक मोदीविरोधक पत्रकार जतिन देसाई यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, या सर्जिकल ऑपरेशननंतर त्यांचा नियमित कॉलम वर्तमानपत्रांनी म्हणे छापला नाही. दुसर्‍या एका वर्तमानपत्राने त्यांना म्हणे एक स्तंभ लिहायला सांगितला, पण नंतर ते छापण्याची ही वेळ नाही म्हणून छापला नाही. तिसर्‍या एका वर्तमानपत्राने यांची प्रतिक्रिया विचारली. त्यांनी म्हणे सर्जिकल स्ट्राईकवर टीका करणारी प्रतिक्रिया दिली, तर ती प्रतिक्रिया छापली नाही. त्या वर्तमानपत्राने सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत करणार्‍याच प्रतिक्रिया फक्त प्रसिद्ध केल्या, अशी जतीनभाई यांची तक्रार आहे. लोकशाहीत दुसर्‍या बाजूचे मत, टीका करणारे मत कसे काय सामावून घेतले जात नाही? असा जतीनभाई यांचा प्रतिप्रश्‍न आहे. व्वा रे जतीनभाई! नरेंद्र मोदी आवडत नाहीत म्हणून देशाचे भले झाले, तरी तुमच्या तोंडून जर देशविरोधी घाणच बाहेर पडणार असेल, तर ते कोण स्वीकारेल? तीन-तीन वर्तमानपत्रे आपली प्रतिक्रिया नाकारतात याचा अर्थ काय, याचा जरा शोध घ्यायला हवा होता. लोकशाही म्हणजे देशाच्या हिताविरोधात कुणीही उठून काही बडबड करावी आणि देशाने त्यांना डोक्यावर घेऊन नाचावे, असे नसते. याला लोकशाही नव्हे, तर याला नमकहरामी म्हणतात. उरीतील हल्ल्याच्या वेळी या जतीनभाईंना काही दुःख झाले की नाही ते माहीत नाही. त्यांच्या फेसबुकवर तसा काही उल्लेख नाही. मराठी दूरदर्शन वृत्तवाहिनीवरील चर्चेत एक युवा प्रतिनिधी बोलावला होता. या वृत्तवाहिनीचे नेहमीचे समाजवादी आणि हिंदुत्वविरोधक अँकर प्रश्‍नच असा विचारत होते की, उत्तर अपेक्षितच आले पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकनंतर देशभर जी आनंदाची लाट उसळली त्याला यांनी ‘उन्माद’ असे नाव दिले. हा ‘उन्माद’ योग्य आहे काय? असा प्रश्‍न विचारला. ठरवून चर्चेत आणून बसविलेल्या डाव्या विचाराच्या त्या भाग घेणार्‍या तरुणाने ठरलेली कम्युनिस्टांची पोथी उचकटली. सीमापार अतिरेकी मारले हे ठीक आहे, पण त्याचा उन्माद करण्यापेक्षा म्हणे देशात बालकामगार आहेत, अनेक लोक उपाशीपोटी असतात त्यांच्याकडे लक्ष दिले तर बरे होईल. जणू हा या चर्चेसाठी येईपर्यंत या बालकामगार आणि उपाशीपोटी लोकांच्याच सेवेत होता! देशभक्तीची भावना अगदी योग्य त्या कारणाने जरी समाजात जाहीरपणे प्रकट झाली की, या निवासी अभारतीयांचे पोट दुखू लागते. त्यांना भाकरीचा, बेरोजगारीचा प्रश्‍न फक्त देशभक्ती प्रकट करण्याच्या वेळीच आठवतो. हा शुद्ध बदमाशीचा आणि वैचारिक द्वेषाचा भाग आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात महाराष्ट्रातून आघाडीवरचे एक कार्यकर्ते आहेत. टीव्हीवरच्या अनेक चर्चांमध्ये ते अगदी संभावितपणाचा आव आणून आपण कसे तटस्थ आणि समतोल विचार करणारे आहोत, अशा पद्धतीने बोलत असतात. प्रत्यक्षात हे अत्यंत तीव्र हिंदुत्वविरोधक आणि विशेषतः मोदी यांचा द्वेष करणारे आहेत. फेसबुकवर मोदी यांना ‘बनिया’ म्हणण्यापर्यंत यांची अक्कल यापूर्वीच पोहोचलेली आहे. आता सर्जिकल ऑपरेशन लष्कराने केले आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यानंतर हे महाशय फेसबुकवर पोस्ट टाकतात की, ‘‘झालं बुवा चेक करून… केलंय, सगळ्यांनी केलंय अभिनंदन. सगळ्या पुरोगामी मित्रांची टाईमलाईन तपासून पाहिली. सगळ्यांनी केलंय अभिनंदन. नाही कुणाला पाकिस्तानला जावं लागणार कायम रहायला… फिलिंग रिलीव्हड…!’ लगेच त्यांनी दुसरी पोस्ट पाहा काय टाकली आहे ते. ते म्हणतात- ‘‘मेसेजेस की सगळ्यांना उत्तरं लिहिणं केवळ अशक्य! एकानं काल लिहिलंय की मी, वागळे सर, केतकर सर, प्रकाश बाळ सर, सप्तर्षी सर, हेमंत देसाई साहेब, जतीन देसाई साहेब सगळे कुठं आहात? शोधतोय तुम्हाला केव्हाचा…मी म्हणालो, इतके सगळे कशाला पाहिजेत? ११ ब्राह्मणांचा अभिषेक घालायचाय का काय?’’ या पोस्टच इतक्या कुजकट विचारांची दुर्गंधी फेकणार्‍या आहेत की, यावर काही भाष्य करण्याची गरजच नाही. सगळा देश पाकिस्तानी दहशतवाद्यांवर इतिहासात पहिल्यांदा भारताने उघडपणे हल्ला करून चोख उत्तर दिल्याचा आनंद व्यक्त करत होता. अगदी एरवी मोदी यांचे ठाम विरोधकसुद्धा लष्कराचे का होईना अभिनंदन करत होते, मात्र हे कुजकट लोक ‘अभिनंदन केलं बुवा एकदाचे नाहीतर पाकिस्तानात जायची वेळ यायची’ असा भाव मनात बाळगत होते. एरवी मोदी यांच्यावर तोंडसुख घेणार्‍यांबद्दल विचारले तर यांना जाती आठवतात. हे इतरांना जातीयवादी म्हणणार! भारतीय जनतेने या असल्या संकुचित, कुजकट लोकांना जनसमर्थन दिलेले नाही, त्यामुळे ही मंडळी अधिकच बावचळली आहेत. राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात किसान यात्रा करताना, या सर्जिकल ऑपरेशनबद्दल मोदी यांचे आणि लष्कराचे अभिनंदन केले. दुसर्‍याच दिवशी राजकारणावर उतरत त्यांचे विधान आले की, ‘‘आता तरी मोदी यांनी सैनिकांचे काही भले करावे.’’ ‘आता तरी’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय? भारतीय सैनिक आता नव्हे, तर केव्हाही त्यांना ‘सरआँखोपर’ ठेवावे, अशीच कामगिरी करण्याची क्षमता ठेवतात. त्यांच्या मागे फक्त राजकीय इच्छाशक्ती लावावी लागते. भारतीय सैनिकांचे सीमेवर पाकिस्तान्यांनी शिरकाण केले तेव्हाही युपीए सरकारचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी सरकारला सैन्याच्या मागे राजकीय इच्छाशक्ती जर उभी करायला लावली असती, तर तेव्हाही भारतीय सैन्याने असाच पराक्रम केला असता. सैन्याचे प्रश्‍न सोडविण्याची संधी तेव्हाही युपीए सरकारला होतीच, मात्र तेव्हा काहीही न करता आता शहाजोगपणे सैन्याच्या पराक्रमाशी त्यांच्या सवलतीचा संंबंध जोडणे याच्याइतका खुजेपणा दुसरा नाही. मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे- ‘यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही… (देशभक्तीच्या) कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात, एरंडल प्यावं तसं आयुष्य पीत असतात! एरंडल प्याल्यावर, आणखी वेगळं काय होणार? एकच क्षेत्र ठरलेलं! दुसरीकडे कुठे जाणार? कारण आणि परिणाम, यांचं नातं टळत नाही! यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही…’ देशाच्या इतिहासात पहिल्यांदा देशावर दहशतवादी आक्रमण झाल्यानंतर सरकारने निषेधाचे खलिते न पाठवता किंवा शांततेची चोपडी न वाचता, थेट कारवाई करून दहशतवाद्यांना आणि शत्रूला धडकी भरवणारी कृती केली. सफाईदारपणे केली. सगळ्या जगाचा पाठिंबा मिळवत केली. शत्रूला तोंड दाबून सहन करण्याची वेळ आणून केली. अतिशय सावधपणे केली. संपूर्ण भारत देशाला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटला, पण या अभिमानास्पद कामगिरीनंतर कुणी आनंद व्यक्त केला, कुणी अभिनंदन केले, तर ज्यांची पोटे दुखतात त्यांनी आपली डोकी तपासून घेतली पाहिजेत. भारतीय देशभक्त जनतेने या लोकांचे सल्ले, यांचे विचार, यांचा युक्तिवाद याकडे जरा सावधपणेच पाहिले पाहिजे. त्यातच देशाचे भले होईल

No comments:

Post a comment