Total Pageviews

Tuesday, 16 August 2016

माझ्या प्रिय मित्रांनो,Swatantryaveer Savarkar श्री. भारद्वाज ल. चौधरी (ऍड. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया


माझ्या प्रिय मित्रांनो, आपणास माहित आहे का ...? वीर सावरकर आणि गाँधीजी नी आपल्या जीवनातील किती दिवस जेल मध्ये घालवले ? वीर सावरकर किंवा महात्मा गांधी दोहोंना एकाच भारतीय स्वतन्त्रता लढ्यामध्ये कारावास भोगावा लागला, पण आपणच ज़रा तुलना करून बघा..... वीर सावरकरांना लंडन मध्ये 13 मार्च, 1909 ला बंदी बनवले व 50 वर्षांची सश्रम कारावासाची सजा दिली, 1911 पासून 1921 पर्यंत त्यांना अंदमान च्या काल कोठडी मध्ये बंदि बनवून ठेवले गेले. 6 जानेवारी 1924 ला त्यांना अंदामानातून सोडून रत्नागिरीला स्थानबद्ध केले गेले. 10 मे 1937 ला त्यांची स्थानबद्धता संपली. 1941 ला भागलपुर मध्ये हिन्दू महासभेच्या च्या अधिवेशनासंबंधी त्यांना 8 दिवस बंदी ठेवले गेले.... 1948 मध्ये गांधी वधानिमित्त 13 महीने...... नंतर 1950 मध्ये नेहरु आणि लियाकत यांच्यात झालेल्या समझौत्या नुसार 100 दिवस.... सावरकरांना कारावास भोगावा लागला... 30 जानेवारी 1948 ला गांधीचें वध झाले , पंडित नाथूराम गोडसे यांच्या गोळ्यांद्वारा,...... जवाहरलाल नेहरुंनी द्वेष बुद्धीने वीर सावरकरांचा काहीही संबंध नसताना त्यांना गांधी वधाचा आरोपी बनवले.... परंतु न्यायलयाने त्यांना निर्दोष ठरवून मुक्त केले.... 17 वर्षांनंतर 21 दिवस निराहार राहून वयाच्या 83 व्या वर्षी, 26 फेबुरवारी 1966 ला त्यांनी आत्मार्पण केले, शास्स्त्रांमध्ये अंधश्रद्धा न ठेवणारे वीर सावरकर आपल्या अंतिम समयी स्वतः निराहार राहून वैकुंठी गेले व जीवन भर उपावास तथा सत्याग्रह कराणारे गांधीजी..... .... नथुरामाच्या पिस्तुलाच्या गोळ्यांनी मारले गेले.... काय हा विरोधाभास....???? वीर सावरकर एकूण 5585 दिवस प्रत्यक्ष काराग्रहात, व 4865 दिवस नजरबंदी मधे..... म्हणजे दोन्ही एकत्र करून 10410 दिवस (28 वर्ष 200 दिवस), बरं ...त्यांच्या आत्मार्पण दिवसापर्यंत त्यांच्यावर गुप्तहेरांचा पहरा होता हे वेगळं सांगायला नको..... गांधीजींना एकूण 7 वर्ष आणि 10 महीन्याचा कारावास झाला, ज्यातील 905 दिवसांचा कारावास त्यांना भोगावा लागला आणि 1365 दिवसांची स्थानबद्धता, अर्थात त्यांना एकूण 2270 दिवस (6 वर्ष 80 दिवस) कारावासात घालवावे लागले, बरं ह्यातीलअधिकांश वेळी ते प्रथम श्रेणी चे विशिष्ठ बंदी होते.....हे लक्षात घ्या..... एका इंग्रजी जेलरने तर अपल्या आत्मकथेत लिहलय , की एक कैद्यासाठी पहल्यांदाच ब्रिटिश सरकार कडून असे आदेश प्राप्त होत होते, की काराग्रहाची कड्या (सलाखें) बंद करू नये ..... कारण .......त्यामुळे गांधीजीना वाईट वाटू शकते...... तर दूसरीकडे वीर सावरकरांना त्यांच्या सजे दरम्यान, संपूर्ण दिवस तेलाच्या घाण्याला जुंपून रोज 30 लीटर तेल गाळावे लागे... निरन्तर ... सतत... अथक ... आणि जर कमी तेल गळाले तर चाबकाच्या फटाक्यांची सजा मिळायची. दोघेही विरुद्ध ध्रुव होते , गांधीजी हे आदर्शवादी तर वीर सावरकर हे यथार्थवादी. सावरकरांनी जेव्हढे लेखन केलेय, तेव्हडे कदाचित गांधीजींनी वाचलेही नसेल.... ह्यात कोणास शंका घ्यायचे कारण नाही की सावरकरां पेक्षा गांधीजींची लोकप्रियता व स्वीकार्यता खूप जास्त होती. लक्ष द्या कि गांधीजींचा भारतीय राजकारणात आगमन सन 1920 च्या आसपास झाला तर सावरकरांनी सन 1937 मध्ये हिंदू महासभेचे नेतृत्व केले (सन 1937 पर्यंत वीर सावरकरांवर राजकारणात प्रवेश करण्यास बंदी होती हे विशेष ) जेव्हा गांधीजी भारतीय राजकारणात आले तेव्हा मैदान साफ होते, लोकमान्य टिळक आणि गोखले यांच्या सारखे लोकनेते त्यांच्या अंतिम दिवसात होते..... पण जेव्हा वीर सावरकर भारतीय राजकारणात प्रवेश करते झाले तोपर्यंत गांधीजी एक महान नेते महणून उदयास आले होते.... भारताच्या ग्रामीण क्षेत्रात लोक महात्मा गांधीना चमत्कारी पुरुष मानायचे, त्यांच्याबद्दल खूप आख्यायिका पण सांगितल्या जायच्या, कि ते एकाच वेळी जेलमध्ये पण असायचे आणि मुंबईत कांग्रेसच्या सभेत पण उपस्थित असायचे... (आता हे माहीत नाही की असल्या अफवा पसरवण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा किती हातभार असायचा) जर वीर सावरकर सुद्धा सन 1920 च्या आसपास राजकारणात आले असते तर तेव्हाचा जनमानस कोणाबरोबर असता हे कोणीही सांगू शकत नाही. वीर सावरकर त्या काळातील एकमात्र राजनीतिज्ञ होते, ज्यांनी गांधीजींनच्या विरोधात स्पष्ट पावले उचलली होती. कांग्रेसमध्ये किंवा बाहेर, असे भरपूर लोक होते जे गांधीजीशी सहमत नव्हते पण कोणीही त्यांच्याशी टक्कर घेऊ शकला नाही. पण सावरकरांनी स्पष्ट शब्दात आपली असहमति नोंदवली. त्यांनी खिलाफत आंदोलनाचा पूर्ण शक्तिने विरोध केला व त्याच्या घातक परिणामांची कल्पना दिली. आणि आज ही वास्तुस्थूती कोण नाकारेल कि खिलाफत आंदोलनानेच पाकिस्तान नावाचा विष वृक्षाचा पाया रचला गेला..? अश्याच प्रकारे त्यांनी सन 1946 च्या मध्यावधी निवाडणुकां दरम्यान हिंदू समाजाला कल्पना दिली की कांग्रेस ला मत म्हणजे, ‘भारताचे विभाजन’. वीर सावरकरांचे भाकीत खरे ठरले. वीर सावरकरांचे विचार संपूर्ण वैज्ञानिक होते पण तेव्हाचा भारत त्यांच्या वैज्ञानिक विचारांसाठी तयार नव्हता. हे मात्र खरे कि वीर सावरकर आपल्या उद्देश्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत, पण यश हे एकमेव मापदंड असेल तर मग ........ रानी लक्ष्मीबाई, सरदार भगत सिंह, नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या कितीतरी महान विभूतिना इतिहासातून काढून टाकावे लागेल ...... स्वतंत्रता लढ्यानंतर पण बघा,..... राम मनोहर लोहिया आणि आचार्य कृपलानी यांच्यासारख्या लोकांना काहीच महत्व दिले गेले नाही.......का...? मग खरा यशस्वी कोण ठरला.....? ज्यांच्या पार्थिवा पाश्च्यात देश्याचे विभाजन व्हायचे त्यांच्या डोळ्यासमोर ते झालेच कि........? यशस्वीताच जर पूज्य आहे तर मग जिन्ना ला का नाही पुजत ....? त्याला तर फक्त पाकिस्तानच हवा होता आणि तो त्याने मिळवलाच...... भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी नेहमी सांगत कि, एखाद्या व्यक्तिची महानता त्याच्या जीवनकाला मध्ये त्याने प्राप्त केलेल्या यश अथवा प्रसिद्धीने ठरत नाही तर भविष्यावर त्याच्या विचारांचा प्रभावा वरून ठरते. वीर सावरकरांचे विचार आजही प्रासंगिक आहेत, आणि त्यांचा प्रभाव कुठपर्यंत राहील हे येणार काळच ठरवील... इतिहास सावरकारांवर न्याय करेल अथवा अन्याय , हे इतिहास कोण लिहील त्यावर अवलंबून असेल.... आता एक प्रसंग सांगतो : गांधीजीनी एक प्रसंगी वीर सावरकरांना सांगीतले : "हे नक्की कि आपले मतभेद आहेत पण माझ्या प्रयोगांच्या विषयावर आपणास आपत्ती नसावी....??" वीर सावरकर उत्तरले : "तुम्ही ह्या देश्याच्या किमतीवर (मूल्यावर) प्रयोग करत आहात " गांधीजी च्या प्रयोगाचे फळ .... म्हणजे अखंड भारताचे खंडन ........ कायमचा कर्करोग ...... म्हणजे पाकिस्थानची निर्मिती..... आया बहिनींची अब्रू ची लक्तरे..... लाखो करोडो लोकांचे बळी.... खरंच ह्या राष्ट्राने महात्म्याच्या चरख्या ऐवजी वीर सावरकरांचा शस्त्र जवळ केलं असत ......... तर...... तर........ आज स्थिती वेगळी असती..... अजूनही आपल्या चेतना जिवंत असतील तर आपण सगळे मिळून ह्या राष्ट्राला वाचवू शकतो........ विचार करा...... आवडले तर पुढे पाठवा..... श्री. भारद्वाज ल. चौधरी (ऍड. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया

No comments:

Post a comment