Total Pageviews

Friday 19 August 2016

PV SINDHUS COACH -P GOPICHAND

पुलेला गोपीचंद ऑलिम्पिकसारख्या अतिभव्य क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी होणे सोपे नाही. आपल्या देशातील खेळाडूंना त्याचा अनुभव गेली अनेक वर्षे आहे. जगातील कोणत्याही खेळाडूपेक्षा कौशल्यात कणभरही कमी नसताना केवळ दडपणामुळे आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये अयशस्वी पडतात, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी, तेथे यशस्वी होण्यासाठी खेळाडू अनेक वर्षे मेहनत घेत असतात. त्यांच्या जडणघडणीत त्यांचा प्रशिक्षक महत्त्वाचा असतो. प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये तर प्रशिक्षकाची जबाबदारी आणखी वाढते. त्याला खेळाडूच्या कौशल्याबरोबर मानसिक स्थिती भक्कम ठेवण्याची काळजी घ्यावी लागते. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची स्थितीही काही वेगळी नाही. स्वत: गोपीचंद नावाजलेले बॅडमिंटनपटू आहेत. 1998च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्य आणि ब्राँझ पदक मिळवले होते. 2001मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप त्यांनी मिळवली. प्रकाश पदुकोण यांनी 1980 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारे गोपीचंद दुसरे भारतीय बॅडमिंटनपटू होते. वास्तविक पाहता खेळाडू म्हणून गोपीचंद यांची कारकीर्द अतिशय चांगली होती. आणखी काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ते चमकू शकले असते; पण त्यांनी खेळ सोडून प्रशिक्षक होणे पसंत केले. गेल्या काही वर्षांतील गोपीचंद हे एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात. सध्या ते पी. व्ही. सिंधूचे प्रशिक्षक आहेत. यापूर्वी सायना नेहवाललाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. सायनाबरोबर के. श्रीकांत, पी. कश्यप हे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूही त्यांचेच चेले आहेत. किंबहुना भारतातील टॉप रँकचे बॅडमिंटनपटू म्हणून जे खेळाडू ओळखले जातात, त्यांचा गोपीचंद यांच्याशी काही ना काही संबंध असतोच. गोपीचंद यांनी जे खेळाडू तयार केले त्यांनी भारतीय बॅडमिंटनचा चेहरामोहराच बदलून टाकला, असेच म्हटले जाते. हे सगळे खेळाडू बिनधास्त आणि आक्रमक आहेत. स्वत: गोपीचंद अतिशय कडवे स्पर्धक होते. आपल्यातील हे कडवेपण, निश्‍चयीपणा त्यांनी आपल्या चेल्यांकडे प्रवाहित केला आहे

No comments:

Post a Comment