Total Pageviews

Saturday 6 July 2024

दयनीय अवस्था , एवढी मोठी महिलांची ,माता भगिनींची १५००/- रूपयांकरता रांग पाहुन मनाला एक प्रकारे खिन्नता निर्माण झाली

 दयनीय अवस्था , एवढी मोठी महिलांची ,माता भगिनींची १५००/- रूपयांकरता रांग पाहुन मनाला एक प्रकारे खिन्नता निर्माण झाली . गावोगावी हिच परिस्थिती आहे . काय शाळा काय ग्रामपंचायत, काय काॅम्पुटर सेंटर , काय तलाठी कार्यालय सगळी ठिकाणे महिलांची अलोट गर्दी फक्त १५००/- रू मिळविण्यासाठी . दोन दोन तास रांगेत उभे रहातात पण जेव्हा देशाची , राज्यातील निवडणूक असते तेव्हा जवळपास फक्त ६०% सदर महिला मतदान करतात . निवडणूकीदिवशी घरातून बाहेर निघत नाहीत, त्या दिवशी त्यांना ऊन लागते , कामे असतात अशावेळी देशाच्या, राज्याच्या मतदानाची गरज नसते . आज सर्वच स्वार्थी झालेले आहेत. यामुळे भविष्यात अराजकता निर्माण होईल . हे अनुदान ते अनुदान , साडी फुकट ,धान्य फुकट , असंख्य योजना फुकट यामुळे सर्वसामान्य जनता आळशी होत चाललेली आहे. मुळात हे राजकीय पक्ष , सरकार स्वतःच्या खिशातून कुठलीच रक्कम टाकत नाहीत तर ते सर्व जनतेच्या पैशातुन कर वाढवून वसुल केला जातो कधी गॅस सिलिंडर किंमत वाढवतील तर कधी पेट्रोल किंमत वाढवतील कधी विविध वस्तु वर GST वाढवतील व तेच आलेले पैसे आपणास वाटप करतील . ह्या महिलांची तेवढीच रांग जर देशाच्या , राज्याच्या निवडणुकीत मतदानास दिसली असती तर  १५ ऑगस्ट ,२६ जानेवारी , व इतर शासकीय दिनी सदर गर्दी का दिसत नाही ?  कारण आज आम जनतेला देशाशी , मिळालेल्या स्वातंत्र्याशी काही देणेघेणे नाही . यांना फक्त मोफत योजना द्या एवढीच यांची अपेक्षा . अशा या मोफत योजनेमुळे देशात भविष्यात नक्कीच अराजकता सुरू होईल.


No comments:

Post a Comment