Total Pageviews

Sunday 14 May 2017

येणारा काळच त्यांच्या भवितव्याचा फैसला करेल!- गजानन निमदेव


May 14, 2017024 Share on Facebook Tweet on Twitter कटाक्ष सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत हे खरे असले तरी सगळे दहशतवादी मुसलमानच आहेत, हे दुर्दैवाने खरे आहे. काश्मीर भारतात विलीन झाल्यापासून भारत सरकारने कधीही काश्मीरला सापत्न वागणूक दिली नाही. मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याच्या मार्गातही सरकारने कधी बाधा आणली नाही. त्यांच्या धार्मिक मान्यताही कधी फेटाळून लावल्या नाहीत. एखादे सरकार तुम्हाला जर तुमच्या धर्मातील रीतिरिवाजानुसार वर्तन करण्याची अनुमती देत आहे, तर मग त्या सरकारच्या विरुद्ध आवाज उठविण्याचे कारण काय? जे सरकार तुम्हाला धर्माचरणाचे संपूर्ण स्वातंत्र्य देते त्या सरकारविरुद्ध लढाई लढणे इस्लामला खरे तर मान्य नाही. इस्लाममध्ये ही बाब निषिद्ध मानली जाते. आज काश्मीरमध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, ती त्या प्रदेशाला कुठे घेऊन जाणार, हे येणारा काळच सांगेल. पण, काश्मीरमधल्या लोकांची वृत्ती बदलली नाही तर ते आत्मनाश करून घेणार, यात शंका नाही. काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्यापासून आजपर्यंत तिथे कधीही शांतता नांदली नाही. नांदू दिली गेली नाही. काही बोटावर मोजण्याएवढ्या स्वार्थी लोकांनी तिथल्या शांतताप्रिय नागरिकांना भडकवले आणि आपल्या पोळ्या शेकण्याचा उद्योग केला. आजही तो घाणेरडा उद्योग सुरूच आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या चिथावणीवरून काश्मिरी तरुण भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर दगड फेकत आहेत, त्यांना शिवीगाळ करीत आहेत, त्यांचा अपमान करीत आहेत. अतिरेक्यांशी लढणार्याह आमच्या जवानांच्या मार्गात ते आडवे येत आहेत. तिथले तरुण पाकच्या चिथावणीला बळी पडत असेच वागत राहिले, तर त्यांच्या सत्यानाशाला कारणीभूत तेच ठरणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता असताना भारताच्या जवानांवर दगडफेक होत नाही, असे मानले जाते. बहुतांशी ते खरेही आहे. पण, नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता जाताच तिथे दगडही फेकले जातात, हिंसाचारही वाढतो, भारताविरुद्ध जनमानस पेटून उठते, हे कसे काय? सत्ता गमावलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तर फुटीरवाद्यांना चिथावणी देत नाहीत ना? तेच तर त्यांना आर्थिक रसद पुरवत नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्ने उपस्थित होतात. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले. ते वादग्रस्त तर होतेच, अतिशय बेजबाबदारपणाचेही होते. कुपवाडामध्ये भारतीय लष्करासोबत जी चकमक झाली, तिची चर्चा ही मुसलमानांना बदनाम करण्यासाठीच केली जात आहे, असे ते बेजबाबदार विधान फारूख अब्दुल्ला यांनी केले होते. डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी असे वक्तव्य केल्याने आश्चनर्य वाटण्याचे काही कारण नाही. कारण, तो त्यांचा स्वभावच आहे. त्यांच्यावर जे संस्कार झाले आहेत, त्या संस्कारांचाच तो एक भाग आहे. त्यांचे वडील शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी जे संस्कार दिले, ते लक्षात ठेवूनच फारूख यांची वाटचाल सुरू आहे. चकमकीचा मुसलमानांना बदनाम करण्याशी काय संबंध आहे? काहीच नाही. सीमेपलीकडून पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेकी काश्मिरात घुसतात, आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात, त्यात आमचे शूर जवान शहीद होतात अन् हे अतिरेकीही मरतात. आता चकमक करणारे आणि मरणारे अतिरेकी हे मुसलमान आहेत, हा काय सुरक्षा दलाचा दोष आहे का? त्या चकमकीची चर्चा करणार्यां चा दोष आहे का? अजिबात नाही. मग, फारूख अब्दुल्ला यांनी चकमकीच्या चर्चेचा संबंध मुसलमानांच्या बदनामीशी जोडण्याचे कारण काय? कारण आहे त्यांचे अतिशय संकुचित, घाणेरडे, जातीयवादी राजकारण. डॉ. फारूख अब्दुल्ला यांचे वडील शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम कॉन्फरन्स नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. या पक्षाचे नाव आपण नीट लक्षात घेतले तर शेख अब्दुल्ला यांचा हेतू काय होता, हे स्पष्ट होते. ते धार्मिक कट्टरतावादी होते, हेही त्यावरून स्पष्ट होते. पक्षाच्या स्थापनेमागचा त्यांचा उद्देश काय होता, हेही नावावरून स्पष्ट होते. परंतु, पक्ष स्थापनेनंतर कालांतराने देशातील परिस्थिती बदलायला लागली, ब्रिटिशांविरुद्ध आक्रोश वाढत गेला अन् देश स्वतंत्र होण्याकडे वाटचाल करू लागला हे पाहून शेख अब्दुल्ला यांनी पक्षाचे नाव बदलले. पक्षात एक प्रस्ताव ठेवला अन् तो पारित करवून घेत नॅशनल कॉन्फरन्स असे नवे नाव ठेवण्यात आले. काळाची पावलं ओळखण्यात चाणाक्ष असलेल्या शेख अब्दुल्ला यांनी काश्मीरच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मात्र काहीच केले नाही, हेही स्पष्ट दिसते आहे. काश्मीर खोर्या त आज जेवढे नेते आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत, ते सगळे या आंदोलनाला इस्लामिक असे संबोधत आहेत. पण, खरे पाहता या आंदोलनाचा इस्लामशी काहीएक संबंध नाही. गनिमी कावा आणि कटकारस्थान करून लढाई लढणेही इस्लामच्या तत्त्वात बसत नाही. असे असतानाही काश्मिरातील नेते गनिमी काव्याने आणि कटकारस्थान करून भारतीय लष्करासोबत लढताना दिसतात. ही बाब इस्लामच्या विरुद्ध आहे, असे इस्लामला मानणारे अनेक विद्वान सांगतात. आज काश्मिरी तरुणांना भारतीय लष्कराविरुद्ध चिथावण्यात आले आहे. हे तरुण दगड फेकून स्वत:चा जीव धोक्यात घालताहेत. मात्र, यांच्या जिवावर काश्मिरी नेते आल्या पोळ्या शेकून मजा मारत आहेत. काश्मिरात अशांतता, अस्थिरता असल्याने मुलं शाळेत जात नाहीत, तरुण कॉलेजात जात नाहीत, त्यांचे शिक्षण अर्धवट होत आहे. दुसरीकडे मात्र चिथावणी देणार्यात फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांची मुले उच्चशिक्षित होऊन तिकडेच राहात आहेत अन् रग्गड कमाईही करीत आहेत. फुटीरतावादी सगळे नेते भारत सरकारकडून विविध सोयीसवलतीही घेत आहेत अन् भारताविरुद्ध लढाईही पुकारत आहेत. या नेत्यांचे ऐकणे सोडले नाही तर तिथल्या तरुणाईचे भविष्य अंध:कारमय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. फुटीरतावादी नेते आपल्याच लोकांचे जीवन बरबाद करीत आहेत, हे तिथल्या लोकांनी ओळखले पाहिजे. चार-पाच दिवसांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी उमर फयाज या २३ वर्षीय लेफ्टनंटचे अपहरण केले अन् नंतर त्याची हत्या केली. त्याच्या हत्येने खोर्याीत एकप्रकारचा तणाव निर्माण झाला. भारतीय लष्करात असलेल्या एका तरुण काश्मिरी अधिकार्याूची अशी निर्घृण हत्या झाल्याने जनमानस संतप्त झाले. विशेषत: राजपुताना रायफल्सने या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे. ही घटना लक्षात घेत काश्मिरी लोकांनी जरा भूतकाळात डोकावून पाहिले तर त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडेल, दुसरे काही नाही. ज्या अंधार्याळ गल्लीला अंतच दिसत नाही अशा गल्लीत फुटीरतावादी नेते काश्मिरी तरुणाईला ढकलत आहेत. फुटीरतावाद्यांमध्येही दोन गट आहेत. एकाला असे वाटते की काश्मीर स्वतंत्र झाले पाहिजे अन् दुसर्याीला असे वाटते की पाकिस्तानात विलीन झाले पाहिजे. आज काश्मीरकडे जो पर्याय शिल्लक आहे तो भारत किंवा पाकिस्तान नव्हे, तर यश व अपयश हाच आहे. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर काश्मिरी जनता अपयशी ठरल्याचेच दिसते आहे. काश्मिरी जनतेच्या कल्याणासाठी भारत सरकारने सर्व प्रकारचे उपाय केलेत, प्रचंड आर्थिक मदत केली, सुरक्षा पुरविली. असे असतानाही तिथली जनता अतिशय दरिद्री, अस्थिर जीवन जगत आहे, हे दुर्दैवीच होय. आज जगात जेवढे मुसलमान आहेत, त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त प्रगती कोणाची झाली असेल तर ती भारतातल्या मुसलमानांची झाली आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या देशात प्रत्येकाला आपल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार आचरण करता येते. तसे स्वातंत्र्य आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी देशांचा विचार केला तर सर्वाधिक श्रीमंत मुसलमान हे भारतात आहेत. ही बाब तमाम मुस्लिमांनी लक्षात घेतली पाहिजे. काश्मिरी जनता जोपर्यंत स्वत:ला भारताचा अविभाज्य घटक मानत नाही तोपर्यंत त्यांची सर्वांगीण प्रगती केवळ अशक्य आहे. भारतीय लष्कर जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमध्ये दाखल झाले होते, तेव्हा ते काश्मिरी जनतेच्या रक्षणासाठीच, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. जर आपण अजूनही दहशतवाद्यांनाच आश्रय देणार असू, तर शांतता अन् स्थैर्य कधी लाभणार नाही अन् आर्थिक प्रगती तर शक्यच होणार नाही, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. कट्टरपंथी विचार कधीच प्रगतीकडे नेत नाहीत, ते विनाशाचेच कारण ठरतात, हे लक्षात घेऊन काश्मिरी जनतेने स्वयंनिर्णय घेतला तरच त्यांचे कल्याण होईल. अन्यथा, येणारा काळच त्यांच्या भवितव्याचा फैसला करेल, हे निश्चिचत. –

No comments:

Post a Comment