Total Pageviews

Sunday 14 May 2017

काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला २७-२८ वर्षांपूर्वी आणि उमर फयाजचे वय होते केवळ २३ वर्षे! म्हणजे दहशतवादाच्या वातावरणात त्याचा जन्म झाला, त्यातच तो वाढला आणि तरीही त्याच्या देशभक्तीवर विपरीत परिणाम झाला नाही. काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण तापविले जात असताना त्याने लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. काश्मीर खोर्यायत राष्ट्रवादी शक्ती अद्यापही बळकट होऊ शकतात, याचे हे एक उदाहरण आहे.


‘ए सोल्जर इज नेव्हर ऑफ डयुटी!’ May 15, 2017 ••काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला २७-२८ वर्षांपूर्वी आणि उमर फयाजचे वय होते केवळ २३ वर्षे! म्हणजे दहशतवादाच्या वातावरणात त्याचा जन्म झाला, त्यातच तो वाढला आणि तरीही त्याच्या देशभक्तीवर विपरीत परिणाम झाला नाही. काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण तापविले जात असताना त्याने लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. काश्मीर खोर्यायत राष्ट्रवादी शक्ती अद्यापही बळकट होऊ शकतात, याचे हे एक उदाहरण आहे. ‘ए सोल्जर इज नेव्हर ऑफ डयुटी!’ या एका हिंदी चित्रपटात, सुटीवर असलेला एक लष्करी अधिकारी, बॉम्बस्फोट घडविणार्याह अतिरेक्यांना कसे पकडतो आणि शेवटी त्यांना ठार करतो, याचे कथानक सांगण्यात आले आहे. मात्र, चित्रपट आणि वास्तव वेगळे असते. काश्मीर सोफिया भागात सुटीवर असलेल्या एका लष्करी अधिकार्याेचे अपहरण करण्यात आले आणि नंतर त्याची हत्या करण्यात आली. लष्करी अधिकार्या,चे अपहरण करून त्याला ठार करण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना असल्याचे मानले जाते. काश्मीर खोर्यायतील स्थिती कोणत्या दिशेने जात आहे, याचा हा संकेत मानला जातो. भारतीय लष्कर असो की केंद्रीय सुरक्षा दळे, यांच्यावर दररोज होणारे हल्ले हा गंभीर विषय ठरत आहे. यात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. पूर्वी फक्त पाकिस्तानातून आलेेले अतिरेकी असे हल्ले करीत होते, तर आता काश्मीरमधील स्थानिक अतिरेकी यात पुढाकार घेत आहेत. काश्मीरमध्ये जे काही होत आहे, ते पाकमधून येणारे अतिरेकी करीत आहेत, असे सांगितले जात होते. ते खरेही होते. आता ती स्थिती राहिलेली नाही. स्थानिक अतिरेकी व त्यांना पाठीशी घालणारी स्थानिक जनता यात सहभागी झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एका अतिरेक्याच्या अंत्यविधीसाठी काही प्रमुख अतिरेकी येतात आणि त्यांना स्थानिक जनता मदत करते, हेही दृश्य काश्मीर खोर्याकत दिसले. काश्मीरमधील स्थिती किती गंभीर होत आहे, याचा हा पुरावा मानला जात आहे. उमर फयाज हा एक युवा अधिकारी होता. पुणे येथील राष्ट्रीय सरंक्षण अकादमीतून उत्तीर्ण झाल्यावर त्याची लष्करात नियुक्ती झाली होती. काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाला २७-२८ वर्षांपूर्वी आणि उमर फयाजचे वय होते केवळ २३ वर्षे! म्हणजे दहशतवादाच्या वातावरणात त्याचा जन्म झाला, त्यातच तो वाढला आणि तरीही त्याच्या देशभक्तीवर विपरीत परिणाम झाला नाही. काश्मीरमध्ये भारतविरोधी वातावरण तापविले जात असताना त्याने लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. काश्मीर खोर्याहत राष्ट्रवादी शक्ती अद्यापही बळकट होऊ शकतात, याचे हे एक उदाहरण आहे. नेतृत्व नाही जम्मू-काश्मीरमध्ये सरकार तर आहे पण नेतृत्व नाही, ही स्थिती दिवसेंदिवस जाणवू लागली आहे. भाजपाचा सारा प्रभाव जम्मू भागात आहे. भाजपाकडून काश्मीरच्या जनमताला प्रभावित करण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. हे काम मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीकडून अपेक्षित होते. पण, जनतेपासून पीडीपी दुरावली असल्याचे दिसत आहे. काश्मीर खोर्याचत त्यातही दक्षिण काश्मीरमध्ये लोकप्रतिनिधींना काम करणे अशक्य झाले आहे. बहुतेक आमदार जम्मू भागात वास्तव्यास आहेत. त्यांना आपापल्या मतदारसंघात जाणे अवघड होत आहे. मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा प्रशासनावर फार वचक राहिला नसल्याचे म्हटले जाते. याने खोर्याहतील स्थिती गंभीर होत आहे. आगामी दोन-तीन महिन्यांचा काळ महत्त्वाचा असेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे ते यासाठी. उन्हाळा सुरू झाला की बर्फ वितळू लागतो, दुर्गम भागातील रस्ते मोकळे होतात व त्याचा परिणाम अतिरेक्यांच्या कारवाया वाढण्यात होतो, हा अनुभव आहे. काश्मीरमधील वाढता हिंसाचार त्याचा एक परिणाम असला, तरी खोर्याढतील स्थिती खालावत आहे, हेही लक्षात येत आहे.

No comments:

Post a Comment