Total Pageviews

Thursday 4 May 2017

गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण काश्मिरातील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल चार हजार जवान येथील गावे पिंजून काढत आहेत. याकामी हेलिकॉप्टर्स, ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान, या शोधपथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक नागरिक मृत्युमुखी पडला, तर दोन जवान जखमी झाले.


शोपियानमध्ये ४ हजार सैनिक तैनात; दहशतवादी हल्ल्यात नागरिक ठार गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण काश्मिरातील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून तब्बल चार हजार जवान येथील गावे पिंजून काढत आहेत. याकामी हेलिकॉप्टर्स, ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. दरम्यान, या शोधपथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक नागरिक मृत्युमुखी पडला, तर दोन जवान जखमी झाले. या भागात लपून सुरक्षा दलांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी गुरुवारी सकाळी लष्करासह पोलिस, सीआरपीएफची मोहीम सुरू करण्यात आली. अशांत काश्मीर खोऱ्यात गेल्या दशकभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती एका लष्करी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. १९९०च्या दशकात थांबवलेली घरोघरी जाऊन शोध घेण्याची पद्धतही पुन्हा सुरू करण्यात आली. ग्रामस्थांना घराबाहेर गोळा करून घरांची कसून तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांना कोणतीही हानी होऊ नये, म्हणून या उपाययोजना करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या भागात परदेशी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत कोणताही दहशतवादी हाती लागलेला नाही. तुरकावांगन गावातील दगडफेकीची किरकोळ घटना वगळता मोहीम सुरळीत सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्युत्तराचे संकेत भारतीय लष्कर आपल्या योजना अंमलात आणण्याआधी त्यांची माहिती देत नाही, असे सांगत पाकिस्तानकडून दोन भारतीय सैनिकांच्या मृतदेहाच्या विटंबनेच्या घटनेला चोख प्रत्युत्तर देण्याचे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिले. नवी दिल्लीत पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देताना, याबाबत आणखी काही बोलणे मात्र रावत यांनी टाळले. दोन भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याच्या पाकिस्तानच्या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत विविध पर्यायांची चाचपणी करत आहे. गतवर्षी नियंत्रण रेषेजवळील सर्जिकल स्ट्राइकमध्ये उद्ध्वस्त केलेली दहशतवाद्यांची ठाणी पुन्हा कार्यरत झाल्याबद्दल विचारले असता, दहशतवादविरोधी कारवाई बळकट करण्यात आल्याचे रावत यांनी सांगितले. ‘बँकांची लूट आणि पोलिसांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काश्मिरात शोध मोहीम सुरू आहे. अशा कारवाया नियमित केल्या जातात,’ असे रावत यांनी स्पष्ट केले. सोपोरमध्ये संघर्ष उत्तर काश्मिरातील सोपोरमध्ये आंदोलने करत असलेल्या विद्यार्थ्यांचा सुरक्षा दलांशी संघर्ष उडाला. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रूधुराचा मारा केला. यामध्ये १० जण जखमी झाले. काश्मिरात ४ कॉलेजे जम्मू-काश्मीरमध्ये आर्किटेक्चर आणि नर्सिंग यांची प्रत्येकी दोन कॉलेजे सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयापुढे ठेवले आहे. पाकच्या उलट्या बोंबा भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या विटंबनेमागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचे वक्तव्य भारताने केल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे प्रादेशिक वातावरण अधिक गढूळ होत आहे, अशा उलट्या बोंबा पाकिस्तानने मारल्या आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी पाकची भूमिका मांडली. भारताने संयुक्त राष्ट्रांचे आदेश पाळलेले नाहीत किंवा लष्करी निरीक्षकांना सहकार्य केलेले नाही, त्यामुळे संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागण्याचा हक्क भारताने गमावला आहे, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. पाकिस्तानी लष्कराने शहीद भारतीय जवानांच्या देहाची विटंबना केल्याच्या कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर अनेक पर्यायांवर विचार करून व्यापक धोरण आखत आहे. भारतीय लष्कराने भारत-पाक सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी सतर्कतेत वाढ केली असून दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना हुडकून काढण्याची मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. लष्कराने ७७८ किमी लांबीच्या नियंत्रण रेषेवर मोर्टार हल्ले आणि इतर कारवाया करत पाकिस्तानी सेनेवर दबाव वाढवला असल्याचेही वृत्त आहे. पाक अधिकृत काश्मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याने अशा प्रकारचे अमानुष कृत्य तिसऱ्यांदा केले आहे हे विशेष. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या लष्कराच्या धोरणाबाबत बोलताना लष्कर प्रमुख जनरल बिपिन राऊत म्हणाले की, अशा प्रकारे समोरून जेव्हा अमानुष घटना घडतात तेव्हा आपण प्रत्युत्तर देत असतो. यापूर्वी देखील आम्ही असे केले आहे. परंतु लष्कर भविष्यातील योजनांबाबत उघडपणे काही सांगत नाही. आम्ही कोणतीही माहिती ही काम फत्ते झाल्यानंतरच देत असतो असेही जनरल रावत म्हणाले. लष्कराच्या अंदाजानुसार, नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचे सुमारे ५० तळ आहेत. या व्यतिरिक्त, पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमध्ये १५ मोठे प्रशिक्षण शिबिरे देखील आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी '5-6 BAT' शिबिरांची माहिती देखील दिलेली आहे. ही शिबिरे पाक अधिकृत काश्मीरमध्ये १० ते १२ किमी आत आहेत. BAT मध्ये पाक लष्कराचे स्पेशल कंमांडो देखील सहभागी आहेत. पर्वतांवरील बर्फ वितळल्यानंतर पुन्हा घुसखोरीच्या घटनांमध्ये जलद वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 'घुसखोरीच्या या घटना पाक लष्कर आणि 'आयएसआय'च्या मदतीने होत असतात. अशा घटनांना रोखण्यासाठी आपण अनेक उपाययोजना करत आहोत', अशी माहितीही जनरल रावत यांनी दिली आहे. शोपियान जिल्ह्यात मोठी शोध मोहीम सुरू असल्याचेही जनरल रावत म्हणाले. राष्ट्रीय रायफल्सचे सुमारे १५०० जवान, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांचा या अभियानात सक्रिय सहभाग आहे अशी माहितीही त्यांनी दिली. काश्मीरमधील परिस्थितीची माहिती देताना लष्करातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, 'शापियान भागात दहशतवाद्यांना समर्थन मिळत आहे. दगडफेक करणारे देखील त्यांना मदत करत आहेत. दगडफेक करणारे नागरिक दहशतवादविरोधी अभियान निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करत आहेत.' जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील घराघरांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्याना शोधून बाहेर काढण्याची मोठे अभियान लष्कराने आजपासून छेडले आहे. ही शोधमोहीम सुरू असताना लष्करी जवानांच्या एका पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात लष्कराचे चार जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. याबरोबरच, कुलगाम जिल्ह्यात देखील सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचेही वृत्त आहे. भारतीय लष्कराने प्रदीर्घ काळानंतर इतके मोठे अभियान हाती घेतल्याचे बोलले जात आहे. या अभियानाअंतर्गत तब्बल ४ हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. शिवाय हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे आकाशात फेऱ्या मारत गस्तही घातली जात आहे. या अभियानाबाबत, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलावर हल्ले करणाऱ्या आणि घरांमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर निशाणा साधण्यासाठी भल्या पहाटे हे अभियान सुरू करण्यात आले. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी शोपियान जिल्ह्यातील १२ पेक्षा अधिक गावांच्या दिशेने भल्या पहाटेच कूच केले. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्यासाठी अटीवर सांगितले की, शोपिया जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले हे अभियान संकटग्रस्त काश्मीर खोऱ्यात एक दशकाहून अधिक कालावधीनंतर हाती घेण्यात आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे अभियान आहे. घराघरात जाऊन शोध घेण्याचे हे अभियान आज पुन्हा सुरू करण्यात आले. या अभियानात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अभियानाबाबत अधिक माहिती देताना सांगितले, 'कोणत्याही नागरिकाचे नुकसान होऊ नये असे आम्हाला वाटते. याचसाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज होती.' सीमा सुरक्षा दलाच्या तुकड्यांना सहाय्य करण्याच्या उद्देशाने गुप्त दहशतवादविरोधी पथकेही तैनात करण्यात आली असल्याची माहितीही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या अभियानादरम्यान तुर्कागावात दगडफेकीची घटना घडल्याचेही वृत्त आहे. मात्र ही छोटीशी घटना सोडली तर हे अभियान व्यवस्थित सुरू असल्याची माहितीही या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. असे अभियान नवे नाही! दरम्यान, सीमा सुरक्षा दलाने जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षेत वाढ केली असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. लष्कराने छेडलेले हे अभियान नवीन नाही. अशा प्रकारचे अभियान यापूर्वी देखील राबवण्यात येत होते असेही जनरल रावत म्हणाले. मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली भारत-पाक सीमेवर घडलेल्या शहीद भारतीय जवानांच्या विटंबनेच्या घटनेवर योगगुरू बाबा रामदेव यांनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या या क्रूर कृत्याचा निषेध करत बाबा रामदेव यांनी, 'एका शिराच्या बदल्यात भारताने पाकिस्तानी सैनिकांची १०० शिरे कापली पाहिजेत', अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबा रामदेव पतंजलीच्या वार्षिक पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना बाबा रामदेव म्हणाले की, भारताने इस्त्रायल देशाच्या नीतीचा अवलंब केला पाहिजे. जर पाकिस्तानने भारतीय जवानाचे एक शिर कापले, तर आपण त्यांची १०० शिरे कापली पाहिजेत. बाबा रामदेव पुढे म्हणाले की, आपण शहीद जवानांच्या कटुंबीयांना आक्रोश करताना पाहिले आहे. आपल्या मुलाचे शरीर छिन्नविछिन्न का केले गेले असा प्रश्न शहीद जवानांचे कुटुंबीय विचारत आहेत असे म्हणत त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भारत-पाक सीमेवर कृष्णा खोऱ्यात पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावेळी दोन भारतीय जवान शहीद झाले होते. त्यावेळी शहीद जवानांचे शरीर छिन्नविछिन्न करण्यात आली होती. या स्थितीला पाकिस्तान जबाबदार असल्याचे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या या अमानुष कृत्याचे भारतही जशास तसे उत्तर देईल अशी भूमिका लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नियंत्रण रेषेजनिक पाकिस्तानच्या सीमा कृती दलाच्या हल्ल्याच भारतीय लष्कराचे नायब सुभेदार आणि बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल शहीद झाले होते. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या शव छिन्नविछिन्न करण्याचे अमानुष कृत्य केले होते. काश्मीर खोऱ्यात जवानांवर दगडफेक आणि हिंसेसाठी काश्मीरी जनतेला भडकवण्यात सौदी आणि पाकिस्तानी वाहिन्यांचा मोठा हात आहे. सौदी मौलवी आणि पाकिस्तानचे न्यूज अँकर्स या वाहिन्यांद्वारे काश्मीरच्या घराघरात पोहोचले आहेत. खासगी केबल नेटवर्कद्वारे सौदी आणि पाकिस्तानच्या ५० हून अधिक वाहिन्या चालवल्या जातात. यात झाकीर नाईकच्या 'पीस टिव्ही' या बंदी असलेल्या वाहिनीचाही समावेश आहे. हे सर्व पीडीपी-भाजप सरकारच्या नाकावर टिच्चून राजरोस सुरू आहे. अनेक ठिकाणी या केबल नेटवर्कची कार्यालये सरकारी इमारतीत आहेत. काश्मीरमध्ये सॅटेलाइट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. तरीही बहुतांश लोक केबल टीव्हीलाच प्राधान्य देतात. एका केबल ऑपरेटरने सांगितले की एकट्या श्रीनगरमध्ये ५० हजारांहून अधिक केबल कनेक्शन्स आहेत. या केबल नेटवर्कवर या पाकिस्तानी वाहिन्या दाखवल्या जातात. झाकीर नाईकच्या पीस टीव्हीव्यतिरिक्त सौदी सुन्नाह, सौदी कुरान, अल अरेबिया, पैगाम, हिदायत, नूर, मदानी, सहर, कर्बला, अहलीबात, फलक, जियो न्यूज, डॉन न्यूज आदी पाकिस्तानी आणि सौदी वाहिन्या हे खासगी ऑपरेटर्स प्रसारित करतात. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने या वाहिन्यांवर बंदी घातली आहे. • This fruit will help you lose 30kg in 2 month Ad: Healthreport24 • Invest like Warren Buffet Ad: Scripbox Recommended By Colombia ताजी प्रतिक्रिया आजुन क.Cंग्रेस मुक्ता बारा करा आणि हाय पिदा हनीचा स्वकाशटाने घेतलाय आहेत.... आता कोणाला नाव ठेवणार.... ना केंडरात कॉंग्ररीसस आहे ना हाय जमीमधे डोनिकडे तुम्हीचा आहाहट........... नकोरे बाबा अस लिहिलाला राग येतो....... Shailesh Zare सर्व प्रतिक्रिया पाहा प्रतिक्रिया लिहा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले, 'जम्मू-काश्मीरसह देशातल्या कोणत्याही भागात सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोणतीही वाहिनी दाखवली जाऊ शकत नाही. मंत्रालयाच्या वेबसाइटवर मान्यताप्राप्त वाहिन्यांच्या यादीत या वाहिन्यांचा समावेश नाही. लेखी तक्रार आल्यास मंत्रालय यावर कारवाई करेल.' एका स्थानिक रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, 'काही सौदी वाहिन्या कट्टर विचारधारांचा प्रसार करतात. इस्लाम आणि शरियाचा अपप्रचार करून लोकांना भडकवतात. वहाबी मौलवी या वाहिन्यांवर सांगतात की महिलांनी आपल्या पतीला शरण जावे, त्याचेच ऐकावे. सौदी सुन्नाह चॅनेलवर सांगितलं होतं की कोणत्याही महिलेने आपल्या पतीच्या परवानगीशिवाय घराबाहेर पाऊलही ठेवू नये.' बहुतांश पाकिस्तानी चॅनेल्स हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य दहशतवादी गटांच्या ठार होणाऱ्या अतिरेक्यांना 'शहीद' म्हणतात. काश्मीरमध्ये होणाऱ्या सैन्याच्या ऑपरेशन्सना या वाहिन्या मानवाधिकारांचे उल्लंघन म्हणतात. श्रीनगरच्या एका व्यापाऱ्याने सांगितले की पाकिस्तानच्या वृत्त वाहिन्या आणि मालिका काश्मीरी लोकांना आवडतात पण सौदी वाहिन्या पाहण्याचे प्रमाण ९० च्या दशकापासून वाढले. अनंतनागचा इस्लामिक तज्ज्ञ शाहीद म्हणाला, 'सौदी वाहिन्या सर्वात जास्त इस्लामचे सलाफी व्हर्जन पसरवण्याचे काम करतात. त्या युवकांना कट्टर बनवून त्यांच्या हिंसेची बीजे रोवतात. वहाबी इस्लाममुळे कट्टरवाद आणि दहशदवाद वाढतोय.' साइट एन्टरटेन्मेंट नेटवर्क चालवणारे अमजद नूर यांचे केबल नेटवर्स श्रीनगरमधलं सर्वात जुनं आहे. मागील २० वर्षांपासून ते केबल नेटवर्क चालवतात आणि काही सरकारी कार्यालयांनीदेखील त्यांचे केबल नेटवर्क सबस्क्राइब केले आहे. ते म्हणाले, 'हे सर्व पाकिस्तानी आणि सौदी चॅनेल्स 'फ्री टू एअर' आणि अधिकृत आहेत कारण जम्मू-काश्मीरमध्ये घटनेच्या ३७० कलमानुसार स्वतंत्र घटना आहे आणि स्वतंत्र पीनल कोड आहे.' मागील वर्षी खोऱ्यातल्या फोफावलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा, १९९५ नुसार पाच भारतीय वाहिन्यांवरही बंदी घातली होती. केबीसी, गुलिस्तान, मुनसिफ, जेके चॅनेल आणि इन्साफ या वाहिन्यांवर युवकांना हिंसेसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत बंदी आणली होती.

No comments:

Post a Comment