Total Pageviews

Thursday 28 April 2011

FOOD SECURITY ८३ लाख टन धान्य सडले

लाख टन धान्य सडले
FOOD SECURITY

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 100

WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
८३
CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 100
 
२०११ यावर्षात विविध शहरात असलेल्या सरकारी गोदामात पडून असलेले ८३ लाख टनाहून अधिक अन्नधान्य, खाद्यान्न महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांचा हलगर्जीपणामुळे सडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानांत धान्यांची टंचाई असल्याचे आढळून येत असताना कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो टन अन्नधान्य सडत असल्याचे चित्र आहे. याचा सामान्य जनतेला तर फटका बसलाच शिवाय सरकारच्या तिजोरीला २९२ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला लेखी उतर देताना खाद्य सार्वजनिक वितरण राज्यमंत्री यांनी ही माहिती दिली. देशात अन्नधान्य सुरक्षित साठवून ठेवण्यासाठी सरकारी गोदामांच्या असलेल्या कमतरतेमुळेच वरील परिस्थिती उद्भवल्याची कबूली त्यांनी दिली. सरकारने गोदामातील अपर्याप्त व्यवस्थेमुळे अन्नधान्याचे होत असलेले नुकसान बघता देशात अतिरिक्त साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यात ११ व्या योजनावधीमध्ये अर्थात २००७-१२ दरम्यान १लाख ३८ हजार ७७० टन साठवणूक असलेले विविध ठिकाणी गोदाम तयार केले जाणार असून यासाठी १३३ कोटींचा खर्च येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.६० वर्षा पासुन असे नुकसान होते आहे तरी पण सरकार काहीच करत नाही.

No comments:

Post a Comment