Total Pageviews

Wednesday 27 April 2011

विलासराव, सुशीलकुमारांची सुनेत्रा पवार सहकार मंत्री हर्षवर्धन पाटीलांच्या चौकशी

दोन सभासदांचे पत्ते सुनेत्रा पवार यांच्या घराचे- मालकी शोधण्याचा हायकोर्टाचा आदेश विलासराव
सहकार
, सुशीलकुमारांची चौकशी मंत्री हर्षवर्धन पाटीलांच्या संस्थेची चौकशी
SURESH KALMADI VS ANNA HAJARE -INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 96
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
http://brighemantmahajan.blogspot.com/


आदर्श घोटाळ्यात 'मी नाही' असे सांगणारे उपमुख्यमंत्री अजित पवार खोटे ठरणार की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. आदर्श सोसायटीत फ्लॅट मिळवणाऱ्या दोघा सभासदांचा पत्ता हा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या पत्त्याशी जुळत असल्याने हे घर नक्की कोणाच्या मालकीचे आहे, हे तपासण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.
केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी हा कोर्टाने हा आदेश दिला.
आादर्श सोसायटीमध्ये निवृत्ती गणपत भोसले आणि जयश्री अभय भोसले यांना दोघांना फ्लॅट मिळाले आहे. हे फ्लॅट मिळवताना या दोघांनी मुंबईत आपले घर नसून, पुण्यात आपले घर असल्याचे म्हटले आहे. 'प्लॉट नं २१, जिजाई, यशवंत घाडगे नगर, शिवाजीनगर, पुणे ४११००७' असा पत्ता दोघांच्या अर्जात लिहिला आहे. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही आपल्या घराचा पत्ता देताना हाच पत्ता दिला आहे.
यापैकी निवृत्ती भोसले हे पुण्यातील एक बडे बिल्डर अविनाश भोसले यांचे वडील आहेत आणि जयश्री भोसले या अविनाश यांच्या वहिनी आहेत. निवृत्ती भोसले पेन्शनधारक असून, जयश्री या गृहिणी आहेत. अशा स्थितीत त्यांना आदर्शसारख्या महागड्या सोसायटीत फ्लॅट खरेदी करणे, कसे परवडू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे ही प्रॉपटीर् नक्की कुणाची असा प्रश्न तिरोडकर यांनी उपस्थित केला होता. तसेच अजित पवार यांनी आदर्शमध्ये अन्य लोकांच्या नावावर फ्लॅट मिळावला असल्याचा आरोपही केला आहे.

'
मी भाडेकरू!' अजित पवार आणि त्यांचे कुटंबीय जेव्हा पुण्यात असतात तेव्हा ते याच पत्त्यावर राहतात. पण, आपल्यावरील आरोपाचे अजित पवार यांनी खंडन केले आहे. वृत्तवाहिनीकडे दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी, हा फ्लॅट आपल्या मालकीचा नसून आपण तेथे भाडेकरू म्हणून राहत असल्याचे सांगितले आहे.विलासराव, सुशीलकुमारांची चौकशीकायद्यापुढे सर्व समान आहेत', असे बजावत कुलाब्यातील आदर्श सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी केंदीय मंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी करावी, असे आदेश बुधवारी मुंबई हायकोर्टाने सीबीआयला दिले.
कुणाचाही मुलाहिजा ठेवता कुणी कोणत्याही पदावर असला तरी त्याचा घोटाळ्यामध्ये नेमका काय सहभाग आहे, त्याचा तपास करून आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल एका आठवड्यात सादर करावा, असेही कोर्टाने सीबीआयला सांगितले. 'आदर्श'च्या फायलींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया झाली, त्याकाळात मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे होते. याप्रकरणी न्या. रंजना देसाई न्या. आर. जी. केतकर यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत त्यांनी सीबीआयला निष्पक्षपाती तपास करण्याचे निदेर्श दिले.
पुढील आठवड्यात प्रगती अहवाल या संदर्भात सिंप्रीत सिंग यांनी केलेल्या जनहित याचिकेत देशमुख शिंदे यांचे नाव आहे. मात्र सीबीआयने 'आदर्श'बाबत दाखल केलेल्या 'एफआयआर'मध्ये या दोघा नेत्यांचा उल्लेख नाही. सीबीआयने सिंग यांच्याकडून देशमुख शिंदे यांच्याविषयी कागदपत्रे घेतली असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल डेरिस खंबाटा यांनी कोर्टाला दिली. सीबीआय या घोटाळ्याचा तत्परतेने तपास करीत असून पुढच्या बुधवारी आम्ही प्रगती अहवाल देऊ, असेही त्यांनी सांगितले

 सहकार मंत्री हर्षवर्धन पाटीलांच्या संस्थेची चौकशी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित एका शिक्षणसंस्थेला एकाच दिवशी एकाच रकमेच्या तीन हजार देणग्या मिळाल्याच्या प्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने चौकशी सुरू केली आहे. त्याबाबत संबंधित संस्थेला नोटीस बजाविण्यात आली असून, गरुवारी या प्रकरणी संस्था आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे.
पाटील यांच्या नियंत्रणाखालील शहाजी प्रतिष्ठानच्या शिक्षण संस्थेला एकाच दिवशी प्रत्येकी अठरा हजार रुपयांच्या तीन हजार देणग्या एकाच बँकेच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. इंदापूर अर्बन बँकेच्या एकाच शाखेतून या रकमेचे डिमांड ड्राफ्ट देण्यात आले असल्याचे इन्कम टॅक्स विभागाच्या लक्षात आले. एकाच वेळेस एकाच बँकेतून एकाच रकमेचे तीन हजार डिमांड ड्राफ्ट कसे देण्यात आले, या शंकेतून इन्कमटॅक्स विभागाने सोमवारी बँकेवर छापा घातला. त्या वेळेस तेथून काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणाची छाननी करण्यात आल्यानंतर तीन हजार देणगीदार हे हर्षवर्धन पाटील यांच्याच नियंत्रणाखाली चालणाऱ्या नीरा भीमा साखर कारखान्याचे सभासद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या सभासदांनी स्वखुषीने ही देणगी दिली का? त्याबद्दल त्यांच्या सभेमध्ये ठराव कधी करण्यात आला? आदी प्रश्नांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. पाटील हे सहकारमंत्रीही असल्याने त्या विभागाकडून बँकेवरील छाप्याच्या बाबत कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली जात नव्हती. बँकेवर इन्कम टॅक्स विभागाने छापा टाकला का याबाबतही सहकार खात्यातील अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दाखवित होते.
इन्कम टॅक्सच्या सूत्रांनी मात्र चौकशी सुरू असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. पाटील विश्वस्त असलेल्या संस्थेला नोटीस पाठविण्यात आली असून, उद्या सकाळी अकरा वाजता साधू वासवानी चौकातील इन्कम टॅक्सच्या मुख्य इमारतीतील इन्व्हेस्टिगेशन विभागाच्या उपसंचालकांसमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
...................

'
इन्कम टॅक्स विभागाने रुटीन चौकशीसाठी ट्रस्टला नोटीस दिली आहे. ट्रस्टला एकाच दिवशी एकाच रकमेच्या देणग्या मिळाल्याच्या आरोपात तथ्य नाही. मला वैयक्तिक कोणतीही नोटीस आलेली नसून ट्रस्टच्या वतीने आमचे सीए इन्कमटॅक्स विभागाला आवश्यक असलेली माहिती देणार आहेत. त्यात योग्य तो खुलासा होईल

जयराज फाटकांचे पाच फ्लॅट, २७ बँक खाती 
कुलाब्यातील 'आदर्श सोसायटी' प्रकरणात मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त जयराज फाटक यांच्याभोवतीही सीबीआयचा फास आवळला गेला असून तीन शहरांतील फाटक यांच्या विविध घरांवर सीबीआयने मंगळवारी छापे टाकले. फाटक यांचे एकूण पाच फ्लॅट असून फाटक कुटुंबियांच्या नावे २७ बँक अकाऊंट असल्याचे छाप्यात उघड झाले आहे.
जयराज फाटक सध्या प्रतिनियुक्तीवर केंदात ऊर्जा मंत्रालयात सहसचिवपदावर आहेत. ते सध्या राहात असलेल्या दिल्लीतील घरासह मुंबईतील चार आणि पुण्यातील एका घरावर सीबीआयने भल्या सकाळी छापे टाकले. फाटक कुटुंबियांच्या नावे एकूण पाच फ्लॅट असल्याचे उघड झाले असून त्यातील एक फ्लॅट आदर्श सोसायटीत फाटक यांचा मुलगा कनिष्कच्या नावावर आहे.
आदर्श प्रकरणी फाटक यांच्याविरोधत २९ जानेवारीलाच गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र ते केंदात सहसचिवपदावरील अधिकारी असल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी सीबीआयला केंदाकडून परवानगी घेणे आवश्यक होते. ती मिळताच तात्काळ फाटक यांच्या घरांची तपासणी करण्यात आली.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी फाटक कुटुंबियांच्या नावावर मुंबईत आणि दिल्लीतील अशा चार लॉकर्सच्या चाव्या तसेच, ५० लाखांच्या फिस्क्ड डिपॉडिस्टची कागदपत्रे, २७ बँक अकांऊंट्सबाबतची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. शिवाय, हार्डडिस्क आणि लॅपटॉपही तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फाटक यांनी एक सप्टेंबर २००९ रोजी आदर्श बिल्डिंगची उंची ९७ मीटरवरून १०७ मीटरपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली होती

No comments:

Post a Comment