Total Pageviews

Monday 15 January 2024

तैवानमध्ये विद्यमान उपाध्यक्ष लाई चिंग-ते चा विजय भारताकरता अत्यंत महत्वाचा

https://youtube.com/shorts/ZX54MrxuYpM?si=BlQCv1U4oxcjCtjU 

तैवानचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डीपीपी) उमेदवार लाई चिंग-ते यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. तैवानमध्ये शनिवारी कायदेमंडळ आणि अध्यक्षपदासाठी या दोन्ही निवडणुकांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये ‘डीपीपी’ला सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळाला.

डीपीपी’च्या त्साई इंग-वेन यांनी अध्यक्षपदाच्या दोन कारकीर्द पूर्ण केल्यानंतर आता त्यांचे सहकारी लाई चिंग-ते अध्यक्ष होणार आहेत. हा पक्ष चीनविरोधात स्वायत्त आणि सार्वभौम तैवानसाठी भूमिका घेण्यासाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये चीन आणि तैवानदरम्यान तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात होते.

लाई यांनी यापूर्वी तैनान शहराचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. राष्ट्रीय संरक्षण, अर्थव्यवस्था आणि लोकशाही मित्र देशांबरोबर सहकार्य बळकट करण्याचे काम पुढेही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच चीनला प्रतिकार कायम ठेवण्यावरही त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भर दिला होता.

आपल्या सरकारमध्ये पक्षीय कल न पाहता क्षमता पाहून लोकांचा समावेश केला जाईल, त्यामुळे आव्हानांना कार्यक्षमपणे प्रतिसाद देता येईल, हे सरकार सर्वसमावेशक असेल आणि तैवानी जनतेला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र आणेल असा विश्वास लाई यांनी व्यक्त केला आहे. मुत्सद्देगिरी, स्थैर्य, संरक्षण स्वयंपूर्णता, अर्थव्यवस्था, ऊर्जा, युवा तसेच शिक्षणाचा दर्जा यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तैवानच्या सेंट्रल इलेक्शन कमिशनने दिलेल्या माहितीप्रमाणे, लाई यांनी ५० लाखांपेक्षा अधिक मते मिळाली. एकूण मतांमध्ये हे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कुओिमतांग पक्षाचे उमेदवार हाऊ यू-इ यांना ३३ टक्के मते मिळून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर तिसऱ्या क्रमांकावरील तैवान पीपल्स पार्टीचे को वेन-जे यांना २६ टक्के मते मिळाली.

597-

चीनचा दबाव, युद्धाच्या धमक्या झुगारून तैवानच्या नागरिकांनी शनिवारी भरभरून मतदान केले आणि आपल्या देशाच्या स्वायत्ततेसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या व्यक्तीला अध्यक्षस्थानी बसवले. तैवानमध्ये निवडणुका सुरू झाल्यापासून प्रथमच जनतेने एका पक्षाला सलग तिसरा कार्यकाळ दिला आहे. यामुळे चीनचे सगळे डाव फसले असून तैवान अधिक मुक्त लोकशाहीच्या दिशेने निघाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अर्थात, भावी अध्यक्ष लाई चिंग-ते (जे विल्यम या ख्रिश्चन नावानेही ओळखले जातात) यांचा मार्ग सुकर असणार नाही. त्यांच्यापुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आव्हाने कोणती आहेत, चीन आता तैवानबाबत अधिक आक्रमक होणार का, अमेरिका चीनच्या नव्या सरकारला किती जवळ करणार, अशा काही प्रश्नांचा वेध…

 

तैवान निवडणुकीचा निकाल काय?

तैवानी मतदारांनी शनिवारी मोठ्या संख्येने मतदान केले. त्या देशात के‌वळ प्रत्यक्ष जाऊनच मतदान करता येते. त्यामुळे मंदिरे, चर्च, शाळा, समाजकेंद्रे अशा सुमारे १८ हजार मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र होते. चीनच्या धमक्यांना अजिबात भीक न घातला तैवानच्या ७२ टक्के मतदारांनी लाई चिंग-ते यांना ४० टक्क्यांपेक्षा जास्त मते देऊन आपले भावी अध्यक्ष म्हणून निवडले. तैवानच्या या विद्यमान उपाध्यक्षांना चीन ‘आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी’ मानतो. तैवानी जनतेने त्यांना निवडून देऊ नये, म्हणून चीनने युद्धाची धमकी देण्यापासून सर्व प्रकारे दबाव टाकला होता. चीनशी जुळवून घेतले पाहिजे असे मानणारे कौमितांग (केएमटी) या प्रमुख विरोधी पक्षाचे उमेदवार हाऊ यू-इ यांना ३३.५ टक्के, तर चीनला सर्वात जवळचे वाटणाऱ्या तैवान पिपल्स पार्टी (टीपीपी) या नवोदित पक्षाचे उमेदवार को वेन-जे यांना २६.५ टक्क्यांच्या आसपास मते पडली आहेत. शनिवारी संध्याकाळी निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर अन्य दोन उमेदवारांनी पराभव मान्य केला असला तरी त्यांनाही कमी मते नाहीत आणि हे चिंग-ते यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.


No comments:

Post a Comment