Total Pageviews

Tuesday 16 January 2024

इराणचा पाकिस्तान ,बलुचिस्तान मधील दहशतवादी गट जैशे उल अदल वरती क्षेपणास...

इराणचा पाकिस्तान ,बलुचिस्तान मधील दहशतवादी गट जैशे उल अदल वरती क्षेपणास्त्र हल्ला -एक विश्लेषण

इराणचा पाकिस्तान ,बलुचिस्तान मधील  दहशतवादी गट जैशे उल अदल वरती क्षेपणास्त्र हल्ला -एक विश्लेषण

इराणचे पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले, पाकिस्तान म्हणतो, ‘गंभीर परिणाम होऊ शकतात’

इराणनं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. बलुचिस्तानच्या नैऋत्य भागात हे हल्ले झाले आहेत.

 

इराणनं मंगळवारी (16 जानेवारी) केलेल्या या हल्ल्यांत दोन मुलं ठार आणि तीन जण जखमी झाली आहेत, असं पाकिस्ताननं म्हटलं आहे.

 

जैश अल-अदल या दहशतवादी गटाशी संबंधित दोन तळांना लक्ष्य केल्याचं इराणनं सांगितल्याचं देशाच्या सैन्याशी संलग्न असलेल्या एका वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

 

तर, या बेकायदेशीर हल्ल्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

इराक आणि सीरियावर हल्ले केल्यानंतर काही दिवसांतच इराणच्या हल्ल्याचा फटका बसणारा पाकिस्तान हा तिसरा देश ठरला आहे.

 

'या' चार अत्याधुनिक शस्त्रांनी हमास इस्रायलवर अजूनही प्राणघातक हल्ले करतंय

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं कठोर शब्दांत या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

 

पाकिस्ताननं काय म्हटलं?

मंत्रालयानं म्हटलंय की, "इराणनं विनाकारण हवाई हद्दीत केलेल्या उल्लंघनाचा तीव्र निषेध करत आहोत.”

 

"ही घटना संपूर्णपणे अस्वीकार्य असून पाकिस्तान आणि इराणमधील संवादाचे अनेक माध्यम अस्तित्वात असूनही हे बेकायदेशीर कृत्य घडले आहे हे त्याहून अधिक चिंताजनक आहे.

 

"दहशतवाद हा सामायिक शत्रू आहे आणि त्यावर एकतर्फी कारवाई चांगल्या शेजारी संबंधांसाठी पूरक नाहीत," असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

 

पाकिस्ताननं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका संबंधित वरिष्ठ अधिकार्‍याकडे निषेध नोंदवला आहे.

 

"पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे हे उघड उल्लंघन आणि याच्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे इराणवर असेल," असं म्हटलं आहे.

 

इराणनं आपल्या शेजारी पाकिस्तानवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला अभूतपूर्व आहे. मंगळवारच्या हल्ल्यानं दोन देशांच्या सीमेवर असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील एका गावाला फटका बसला.

 

दोन्ही देशांची सामायिक सीमा जवळपास 900 किमी आहे आणि या सीमेची सुरक्षा ही दोन्ही सरकारांसाठी दीर्घकाळापासून चिंतेची बाब आहे.

 

पाकिस्तान आणि इराणने जैश अल-अदलसह सारख्या सशस्त्र फुटीरतावादी गटांशी अनेक दशकांपासून लढा दिला आहे.

 

तेहराननं गेल्या महिन्यात इराणच्या सीमेजवळ झालेल्या हल्ल्यांशी या गटाचा संबंध जोडला आहे. या हल्ल्यात डझनभर इराणी पोलीस अधिकारी मारले गेले होते.

 

त्यावेळी इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी म्हणाले होते की, “या हल्ल्यासाठी जबाबदार दहशतवादी पाकिस्तानातून इराणमध्ये घुसले होते.”

 

इराणनं मंगळवारी इराकच्या उत्तरेकडील शहर इरबिलमधील लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकेनं या हल्ल्याचा निषेध केला आहे.

 

इराणचा दावा काय?

इराणच्या लष्कराशी संबंधित एका वृत्तसंस्थेनं मंगळवारी सांगितलं की, इराणनं जैश अल-अदल या दहशतवादी गटाशी संबंधित दोन स्थळांवर हल्ला केला आहे.

 

इराणच्या सरकारी एजन्सी IRNA च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधील हल्ल्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यात आला आणि हे हल्ले दहशतवाद्यांच्या दोन अड्ड्यांवर करण्यात आले.

 

या हल्ल्यात दहशतवादी गटाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा सरकारी माध्यमांमध्ये करण्यात आला आहे.

 

इराणचं म्हणणं आहे की, गेल्या महिन्यात सीमेजवळील रस्क शहरात एका पोलिस चौकीवर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये डझनहून अधिक इराणी पोलिस अधिकारी मारले गेले होते.

 

डॉन वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जैश अल-अदलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

यूएस डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या कार्यालयानुसार, “जैश अल-अदल हा सिस्तान-बलुचिस्तानमध्ये कार्यरत असलेला सर्वांत सक्रिय आणि प्रभावशाली सुन्नी दहशतवादी गट आहे.”

 

आधी या गटाचं नाव जुनदल्लाह असं होतं. पण, 2012 मध्ये या गटाचं नाव बदललं. नॅशनल इंटेलिजन्सच्या वेबसाइटनुसार, या गटाला 'पीपल्स रेझिस्टन्स ऑफ इराण' असंही म्हटलं जातंय

 

अब्दुल मलिक रेगी यांनी 2002-2003 मध्ये हा गट स्थापन केला आणि अनेक वर्षे ते त्याचे नेते राहिले.

 

2003 मध्ये इराणमधील सरकारी कार्यालयांवर हल्ले केल्यानंतर आणि माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा गट चर्चेत आला होता.

 

18 ऑक्टोबर 2009 रोजी या गटानं इराणच्या पिशिन शहरात हल्ला केला होता. पाकिस्तानातून सीमा ओलांडून आलेल्या आत्मघातकी बॉम्बरनं इराणी बलुच आदिवासी नेत्यांच्या बैठकीत बॉम्बस्फोट केला, असं इराणनं म्हटलं होतं. या बैठकीत इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे वरिष्ठ कमांडरही सहभागी झाले होते.

 

या हल्ल्यात देशाचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनेई यांच्या जवळचे मानले जाणारे रिव्होल्युशनरी गार्ड्सचे उप-कमांडर नूर अली शुश्तारी मारले गेले होते.

 

या हल्ल्याने दोन्ही देशांमधील संबंधांची दिशाच बदलली होती.

 

अब्दुल मलिक रेगी यांना इराणनं अटक करून 2010 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर हा गट अनेक भागात विभागला गेला. यापैकी जैश अल-अदल सर्वांत प्रभावी गट म्हणून पुढे आला.

 

हा गट मुख्यतः इराणी सुरक्षा दलांना लक्ष्य करतो. तसंच सरकारी अधिकारी आणि सामान्य शिया मुस्लिमांवर देखील हल्ले करतो. या गटाच्या हल्ल्याच्या पद्धतींमध्ये गोळीबार, अपहरण, खून आणि आत्मघाती स्फोट यांचा समावेश आहे.

 

या गटानं सीमेवरील चेक पॉईंट आणि तेथून जाणाऱ्या वाहनांवरही लहान शस्त्रे आणि रॉकेटने हल्ले केले आहेत.

 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं, 4 नोव्हेंबर 2010 रोजी जुनदल्लाह गटाला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केलं. नंतर यात सुधारणा करण्यात आली आणि 2019 मध्ये जैश अल-अदलचे नाव त्यात समाविष्ट करण्यात आलं.

No comments:

Post a Comment