Total Pageviews

Monday 28 May 2018

विकास आणि केवळ विकास... महा एमटीबी 28-May-2018


 
दिल्लीला प्रदूषणापासून कायम मुक्ती मिळावी यासाठी पहिला टप्पा म्हणून दिल्लीच्या बाहेरून मेरठपर्यंत 14 पदरी एक्सप्रेस वे आणि 135 किलोमीटर लांबीचा ईस्टर्न पेरिफेरियल एक्सप्रेस हायवे या दोन महामार्गांचा लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दिमाखात पार पडला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्लीतील हजारो नागरिक उपस्थित होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, महामार्गावरील रोड शोच्या वेळी दुतर्फा उभे राहून मोदींना प्रतिसाद देऊन आभार मानत होते. ही किमया घडवून आणली ती देशाचे सर्वाधिक धडाकेबाज, देशाच्या महामार्ग विकासाचे व्हिजन असलेले, कमीत कमी वेळात प्रकल्प मार्गी लावणारे नितीन गडकरी यांनी! ते मोदींसोबतच दुसर्‍या उघड्या कारमध्ये होते. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे, अशा शब्दांत गडकरींनी या रस्तेबांधणीचा आनंद साजरा केला. ईस्टर्न पेरिफेरियल हायवे हा अवघा 500 दिवसांत बांधून पूर्ण झाला. तर दिल्ली-मेरठ हा मार्गही वेळेच्या आत उभा झाला. लक्षणीय म्हणजे जेवढा खर्च या कामांवर आला नाही, त्यापेक्षा अधिक खर्च जमीन संपादनापोटी देण्यात आला. पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाची साथ असली, तर काय किमया घडून येऊ शकते, हे गडकरींनी दाखवून दिले.
 
 
सार्‍या दिल्लीकरांचे डोळे, या दोन योजना केव्हा सुरू होतात याकडे लागले होते व याची चातकासारखी वाट पाहात होते, तो दिवस रविवारी उगवला. सुमारे 55 हजार ट्रक आणि अवजड वाहनांसह सर्व लहानमोठी वाहने आता दिल्ली शहरात प्रवेश करणार नाहीत. ती थेट बाहेरच्या बाहेरच मेरठ एक्सप्रेस वे किंवा ईस्टर्न पेरिफेरियल हायवेने मार्गस्थ होतील. 55 हजार हा अंदाजे आकडा आहे. हा आकडा वाढला तरी काहीही हरकत नाही, इतके हे दोन्ही रस्ते मजबुतीने बांधण्यात आले आहेत. आज खुले झालेले हे दोन्ही मार्ग पाहून गडकरी उद्गारले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. हे खरेच आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी हा दिवस सतत अविस्मरणीय राहील. कारण, रविवारीच नितीन गडकरी यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या मतदारसंघातील सर्वधर्मीय जनता त्यांच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहात उभी होती. त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी झाली आहे, हे दृश्यही नागपूरकरांनी अनुभवले. खरंच, गडकरी हे खर्‍या अर्थाने जननेते आहेत.
 
 
समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय असणारा दुसरा नेता महाराष्ट्रात सापडणार नाही! त्यांच्या खुल्या स्वभावामुळे आणि कामाच्या बाबतीत कोणताही भेदभाव न केल्याने विरोधकही गडकरींची मुक्तकंठाने प्रशंसा करताना दिसतात, ते यामुळेच. नागपूरकर तर गडकरींवर जीव ओतून प्रेम करतात. ईस्टर्न पेरिफेरियल हायवे आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेच्या उद्घाटनाचा सोहळा गडकरींच्या जन्मदिनीच यावा, हा दुग्धशर्करा योग नियतीनेच जुळवून आणला असावा. म्हणूनच हा दिवस संपूर्ण दिल्लीवासीयांच्या आणि नागपूरकरांच्या स्मरणात ठसलेला राहील, यात शंका नाही. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, पुणे-एक्सप्रेस हा सुपर हायवे असाच त्यांनी अतिशय कमी खर्चात वेळेच्या आत बनवून पूर्ण केला होता. नंतर अटलजींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे काम त्यांच्याकडे दिले. केंद्रात बहुमताने भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तेव्हाही रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी व जलवाहतूक ही खाती त्यांच्याकडे आली. नंतर त्यांच्याकडे गंगा जलशुद्धीकरणाचा मोठा प्रकल्प देण्यात आला. या तिन्ही खात्यांचे त्यांनी सोने करण्याचा संकल्प केला आहे. येत्या एक वर्षात गंगा 70 ते 80 टक्के शुद्ध झालेली असेल, असे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. गडकरी यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते जे बोलतात ते करूनच दाखवितात! आधी सर्व बाबींचा अभ्यास करून, त्यात येणारे अडथळे, त्यावर मात करण्याचे उपाय हे दृष्टिपथात आल्यानंतरच ते कोणतेही काम हाती घेतात आणि पूर्णत्वास नेतात. चार वर्षांपूर्वी रस्तेबांधणीचा दर, दर दिवसाला केवळ 12 किलोमीटर होता. तो आज 27 कि. मी. प्रतिदिवस या वेगाने कार्यान्वित होत आहे.
 
 
दिल्लीबाहेरील या दोन महामार्गांमुळे दिल्लीतील प्रदूषण पातळी सुमारे 40 टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. दिल्ली हे भारताची राजधानी असलेले शहर आहे. आज दिल्लीतील लोकसंख्या तीन कोटींच्या वर गेली आहे. वाहनांची संख्या अफाट वाढली आहे. त्यामानाने रस्ते फारच कमी पडत आहेत आणि सतत लागणार्‍या जाममुळे दिल्लीकर हैराण झाले आहेत. अनेकदा उच्च, सर्वोच्च न्यायालय, हरित लवाद यांनी निर्णय दिले. पण, केजरीवाल सरकारने काहीच केले नाही. केंद्र सरकारने मात्र दिल्लीकरांना मोठा दिलासा देणार्‍या योजना आखल्या आणि त्याचे दृश्य परिणाम आज संपूर्ण देश पाहात आहे. राजकीय इच्छाशक्ती असली तर काय होऊ शकते, याचा हे दोन महामार्ग म्हणजे उत्तम नमुना

No comments:

Post a Comment