Total Pageviews

Monday 23 March 2015

मुस्लिमांच्या संख्येत २४ टक्के वाढ-MUZAFAR HUSSIAN

मुस्लिमांच्या संख्येत २४ टक्के वाढ नेहमीप्रमाणे यावर्षीही हिंदुस्थानात मातृभाषा दिवस साजरा झाला. या मुहूर्तावर उर्दू वर्तमानपत्रांनी एक गोष्ट समोर आणली की, देशात अन्य धर्मीयांच्या तुलनेत मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशात मुसलमानांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे. या तुलनेत अन्य धर्मीयांची संख्यावृद्धी मात्र केवळ १८ टक्के दराने झाली आहे. म्हणजेच मुस्लिमांच्या वृद्धीदरात ६ टक्के वाढ आहे. पाश्‍चिमात्य जगावर तीन धर्मांचा फास पडत गेला तर आशियाच्या दक्षिण-पूर्व भागात हिंदू आणि बौद्ध विचारधारेने आपली पकड बसवली. त्यांची संस्कृती कृषी आधारित असल्याने त्यांच्यात फार संघर्ष झाला नाही. परंतु मध्यपूर्वेत धर्म हे साम्राज्याच्या स्थापनेचे आधार बनले. सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात तेथेही धर्माचा हस्तक्षेप पुरता सहन केला जात नसला तरी त्यांच्यात पाश्‍चिमात्य पाखंड पुरेपूर नजरेस पडते. हिंदू, बौद्ध आणि जैनांनी आपापली साम्राज्ये स्थापन केली. मात्र सहअस्तित्वाच्या सहिष्णु नीतीला अनुसरणार्‍या या धर्मांनी धर्माला सत्ताप्राप्तीचे साधन बनवले नाही. त्यांनी आपापल्या धर्मांना सांस्कृतिक मूल्यांच्या कोंदणात सजवून मानवतेचा चौमुखी विकास केला. पश्‍चिमी देशांनी आपल्या भाषेला जसा सत्तेचा आधार बनवले त्याप्रमाणे संस्कृत, पाली आणि हिंदी मात्र सत्तेपासून दूर राहिले. आपल्या आर्थिक विकासासाठी जेव्हा राजकीय दबावाची गरज निर्माण झाली तेव्हा पाश्‍चिमात्यांनी भाषेला आपले माध्यम बनवले. हिंदुस्थानात मुस्लिमांची संख्या वेगाने वाढली असून येत्या काळात हे अल्पसंख्याक बहुसंख्याकांची जागा घेतील, तर आश्‍चर्य वाटणार नाही. नेहमीप्रमाणे यावर्षीही हिंदुस्थानात मातृभाषा दिवस साजरा झाला. या मुहूर्तावर हैदराबाद येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सियासत आणि मुन्सिफ या उर्दू वर्तमानपत्रांनी देशात अन्य धर्मीयांच्या तुलनेत मुसलमानांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आणले आहे. दैनिक सियासतने लिहिले की, देशात मुसलमानांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे. या तुलनेत अन्य धर्मियांची संख्यावृद्धी मात्र केवळ १८ टक्के दराने झाली आहे. म्हणजेच मुस्लिमांच्या वृद्धीदरात ६ टक्के वाढ आहे. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या जम्मू-कश्मीरात आहे तर मुस्लिम लोकसंख्येचे राज्य आसाम आहे. पश्‍चिम बंगाल तिसर्‍या क्रमांकावर आहे. तेथे मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण २७ टक्के आहे. १९९१ पासून २००१ पर्यंत मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचे प्रमाण २९ टक्के होते. त्यानंतर त्यात घट होऊन आता ते २४ टक्क्यांवर आले आहे. यात आसामात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झाली आहे. २००१ मध्ये हे प्रमाण ३०.९ वरून वाढून ३४.३ टक्क्यांपर्यंत वाढले. इतक्या झपाट्याने मुस्लिम संख्यावाढीचे प्रमुख कारण बांगलादेशी घुसखोरी मानले जाते. मात्र मणिपूरमध्ये प्रमाण घटले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये २००१ मध्ये मुसलमानांची जनसंख्या २५.२ टक्के होती. ती २००१ मध्ये २७ टक्क्यांवर पोहोचली आहे. या आकड्यांमध्ये पाहताना लक्षात येते की, आसामात मुसलमान दुपटीने वाढले आहेत. उत्तराखंडात हे प्रमाण ११.९ वरून १३.९ टक्क्यांवर पोहोचले आहे. दिल्लीतून प्रसिद्ध होणार्‍या नई दुनिया साप्ताहिकाच्या २ फेब्रुवारीच्या अंकात या तथ्याला मान्यता देण्यात आली आहे. आपल्या गरिबीमुळे मुसलमान कुटुंब नियोजन मान्य करत नाही. एक मूल होणे म्हणजे कमावणारा एक हात वाढणे, असा समज आजही आहे. ज्या घरात अधिक मुले असतील ते घर अधिक दबंगाई करू शकते, असे मुसलमानांना वाटते. असे सांगताना नई दुनिया म्हणते की, सरकार मुसलमानांचे कुटुंब नियोजन इच्छित असेल तर त्याच्या शिक्षण आणि रोजगाराची व्यवस्था अगोदर करावी लागेल. श्रीमंत आणि सुशिक्षित मुसलमान कुटुंब नियोजनाची सुरुवात करतील, असे या साप्ताहिकाने म्हटले आहे. हिंदूंमधील दलित व मागासवर्गीयांना मोठ्या संख्येने आर्थिक साह्य मिळते. त्यामुळे त्यांची प्रगती आणि जीवनमान उंचावते. पण जोवर मुसलमानांसाठी असे प्रयत्न होत नाहीत तोवर मुसलमानांवरील लोकसंख्या वाढीचे आणि घुसखोरीचे आरोप कमी होणार नाहीत. आसाम आणि पश्‍चिम बंगाल कायमच घुसखोरांचे आश्रयस्थान राहिले आहे. तेथील सरकारने घुसखोरी रोखण्यासाठी आणि मुसलमानांच्या शिक्षणासाठी वेगाने भरीव पावले उचलायला हवीत, असे या नियतकालिकाचे म्हणणे आहे. मुसलमानांची लोकसंख्या अशाच प्रमाणात वाढत राहिली तर हिंदू झपाट्याने कमी होतील, अशी भीती हिंदू संघटना व्यक्त करतात. अशा आरोपांमुळे मुस्लिम वारंवार अपमानित होतात. जमात-ए-इस्लामीचे मुखपत्र ‘दावत’ म्हणते की, मुस्लिम लोकसंख्यावाढीच्या बातम्या मुसलमानांविरुद्धच्या षड्यंत्राचा भाग आहेत. हिंदुस्थानातील बहुसंख्याक आणि त्यांची वृत्तपत्रे यांच्यातील जाणूनबुजून करण्यात आलेला हा कट असल्याचा आरोप ‘दावत’ने केला आहे. या लेखात देण्यात आलेली उदाहरणे आपापल्या स्थानी प्रासंगिक असली तरी कुटुंब नियोजनाचे अंतस्थ कारण शरियतशी संबंधित आहे हे विसरून कसे चालेल? मौलाना आणि इस्लामी विद्वानांच्या मते मुसलमान समाजात कुटुंब नियोजन हे धर्माच्या आधारावर अनुचित कृत्य मानले गेले आहे. एखादा जीव जन्माला येण्यापासून रोखणे धर्मबाह्य कृत्य असल्याचे ते मानतात. सामान्य मुसलमानांची अशा प्रकारे कुराण-हदीसच्या नावावर धूळफेक करणे सोपे आहे. त्याचबरोबर या विषयावर आजवर ना मुसलमानांचे जनमत घेतले गेले ना त्यांच्या कुटुंब नियोजनासाठी फतवे निघाले. सामान्य मुसलमान कुटुंबे आनंदाने नियोजन मान्य करतील पण असा प्रयोग आजवर एकाही मुस्लिम राष्ट्रांत झालेला नाही. जिथे पोलिओ डोसविषयी प्रबोधन करण्यात सरकारला यश आले नाही तिथे कुटुंब नियोजनाचा विचारही केला जाऊ शकत नाही. असे प्रबोधन करून कोण आपल्या मतपेट्या धोक्यात घालील? त्यामुळे यावर एकच उपाय आहे तो म्हणजे प्रजोत्पादनाविषयीच्या धारणांचा आणि धर्माचा संबंध समाप्त करणे

No comments:

Post a Comment