Total Pageviews

Wednesday 23 November 2011

SAMANA ARTICLE ON ISHRAT JAHAN

प्रत्येक चकमक ही एकप्रकारे खूनच असतो. हा खून कोणत्या परिस्थितीत व कोणत्या हेतूसाठी झाला हे महत्त्वाचे ठरते.

इशरत, तोयबा आणि हेडली!
काय चालले आहे आमच्या देशात? तसा सगळाच सावळागोंधळ असला तरी या सावळ्या गोंधळातही धर्मांध मुसलमान, त्यांच्या अतिरेकी संघटना, मुसलमानांची भलतीच फिकीर करणार्‍या स्वयंसेवी संस्थांना मात्र चांगले दिवस आलेले दिसतात. गुजरातमध्ये 2004 सालात घडलेले ‘इशरत जहां’चे एन्काऊंटर हे बनावट असल्याचा अहवाल आता गुजरातच्या उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’ ने दिला आहे. ही चकमक बनावट होती. त्यामुळे या चकमकीत भाग घेणार्‍या सात पोलीस अधिकार्‍यांवर कलम 302 खाली सदोष मनुष्यवधाचा खटला चालवावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रान उठवायला विरोधकांच्या हाती कोलीत सापडले आहे. मोदी हे हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यांत खुपतात व हिंदुत्वविरोधक व त्यांचे कॉंग्रेससारखे ‘पाठीराखे’ मोदी यांना राजकारणातून खतम करण्यासाठी जंग जंग पछाडीत आहेत. मोदी यांनी त्यांच्या राज्यात कामांची व हिंदुत्वाची अशी भक्कम तटबंदी उभारली आहे की भल्याभल्यांना त्यास तडे देता आले नाहीत. मोदी यांना निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवरून खाली खेचता येत नसल्याने विरोधक इतर येनकेन मार्गाने असे प्रयत्न करीत आहेत, पण आतापर्यंत तरी मोदी त्यांना पुरून उरले आहेत. मोदी यांना प्रचंड विरोध असला तरी त्याची पर्वा न करता ते पुढे गेले हे सत्य आहे. हा विरोध जसा बाहेरच्यांचा आहे तसा स्वकीयांचाही. तो विरोधही लपून राहिलेला नाही. मोदी अडचणीत आले व सत्तेवरून गेले तर ते अनेकांना हवेच आहे. पण आम्हाला ते मान्य नाही. मोदी यांची पीछेहाट म्हणजे धर्मांध शक्तींची सरशी असे आम्ही मानतो व इशरत जहांसारख्या प्रकरणांचा फायदा घेऊन मोदी यांच्याविरुद्ध काहूर माजविणार्‍यांना
चोख उत्तर देणे गरजेचे
आहे. इशरत जहां व तिच्या टोळीचे एन्काऊंटर झाले हे खरे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून इशरत गुजरातला गेली. गुजरात पोलिसांना खबर लागल्याने या सर्व लोकांचे एन्काऊंटर झाले. मोदी यांची हत्या घडवून आणण्याच्या इराद्यानेच हे ‘मंडळ’ गुजरातमध्ये शिरले होते. मोदी यांची हत्या करण्यासाठी इशरतचा वापर मानवी बॉम्बसारखा होणार होता व तशी जय्यत तयारी केली गेली होती. पोलिसांकडे यासंदर्भात खडान्खडा माहिती असल्यानेच या लोकांना कंठस्नान घातले गेले. इशरत जहांच्या एन्काऊंटरनंतर जे राजकारण झाले ते देशहिताचे नव्हते. इशरत मुसलमान आहे म्हणून व्होट बँकेचे घृणास्पद राजकारण सुरू केले गेले. काही कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी फक्त नक्राश्रूच ढाळले नाहीत तर इशरतच्या कुटुंबीयांना लाखालाखांचे धनादेश पाठवून मानवतेचे फक्त आपणच पुजारी असल्याचे दाखवून देण्याचा खटाटोप केला. जणूकाही इशरत जहां म्हणजे एक कोमल आणि निर्दोष व्यक्तिमत्त्व होते व तिचा खून गुजरात पोलिसांनी केला. प्रत्येक चकमक ही एकप्रकारे खूनच असतो. हा खून कोणत्या परिस्थितीत व कोणत्या हेतूसाठी झाला हे महत्त्वाचे ठरते. प्रत्यक्ष युद्धभूमीवरही जे रक्ताचे सडे पडतात व दोन्ही बाजूचे सैनिक मारले जातात ते खूनच असतात व त्याबद्दल शौर्यपदके देऊन सैनिकांचा सन्मान केला जातो. देशाच्या शत्रूंना मारावेच लागेल, तरच देशाचे रक्षण होईल. राष्ट्राने जिवंत राहायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करावे लागेल. हे मरण जसे राष्ट्रभक्त शहीदांचे असते तसेच देशाच्या दुष्मनांचेही असावे लागते. इशरत जहां खरोखरच निर्दोष असेल तर तिच्या खुन्यांना फासावरच लटकवायला हवे. असा खून कुणालाही माफ नाही. अशा निर्दोष खुनाचे शिंतोडे खाकी वर्दीवर पडणार असतील तर तो त्या वर्दीचा आणि विश्‍वासाचा अपमान आहे. पण गुजरातमध्ये घडलेली सोहराबुद्दीन व इशरत जहांसारखी प्रकरणे त्यातली नव्हती. इशरत जहां ज्यांना आजही निर्दोष वाटते त्यांनी शिकागो कोर्टापुढे डेव्हीड हेडलीने दिलेला कबुलीजबाब पुन: पुन्हा ऐकावा आणि वाचावा. हेडलीने अगदी स्पष्टपणे या इशरत जहांचे नाव घेऊन ती लष्करे तोयबासाठी काम करीत असल्याचे सांगितले आहे. जर अमेरिकेतला डेव्हीड हेडली या इशरत जहांचे नाव घेतो व तिचे घाणेरडे उद्योग जाहीर करतो याचा काय अर्थ घ्यायचा? इशरत जहांचा वापर
मानवी बॉम्ब म्हणूनच
होणार होता व त्याच इराद्याने ती गुजरातमध्ये शिरली होती. तेव्हा गुजरातच्या पोलिसांनी या सर्व लोकांचे काय करायला हवे होते? त्यांच्यासाठी पायघड्या घालून स्वागत करायला हवे होते, की ते ज्या इराद्यासाठी गुजरातमध्ये शिरले होते त्यासाठी सर्व पोलिसांनीच त्यांना मदत करायला हवी होती? हेडली हा मुंबईतील ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार. तो मूळचा पाकिस्तानी. हिंदुस्थानचा पुरता विध्वंस करण्याची योजना त्याने आखली होती. त्याने अमेरिकेच्या कोर्टात इशरत जहांचे नाव घेऊन ती ‘तोयबा’वादी असल्याचे जाहीर केले व तरीही इशरतला कंठस्नान घातल्याबद्दल पोलिसांना दोषी ठरविण्यात आले. सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला जातो. अर्थात सोहराबुद्दीन, इशरत जहां हे सदोष मनुष्यवधाचे बळी असतील तर मग अतिरेक्यांशी लढून बळी पडलेले तुकाराम ओंबळेंसारखे पोलीस व असंख्य निरपराधी हे मनुष्यवधास पात्र होते असे समजावे काय? इशरत जहां प्रकरणाने सावळ्या गोंधळात भर पडली आहे. उद्या देशावर हल्ला झाला तर सैनिक दुश्मनांना मारणार नाहीत व पोलीसही बंदुका उशाला घेऊन झोपतील. काय सांगावे, चुकून एखादा अतिरेकी पोलिसी गोळीबारात जखमी व्हायचा किंवा मृत व्हायचा व अतिरेकी मरण पावला म्हणून त्या पोलिसांना न्यायालयानेच फासावर लटकवून ‘सत्यमेव जयते’चा नारा द्यायचा. मालेगावात सुटलेल्या आरोपींसाठी विजयी मेळावा घेणारे अशा निकालाने बेधुंद होतील व त्याच मालेगावात ‘हिंदू राष्ट्र होणार नाही. झालेच तर देशाचे तुकडे होतील’ अशी धमकी देणारे मौलवी अत्यानंदाने नाचू लागतील. हिंदूंनी मात्र मान खाली घालून असे निर्णय शिरसावंद्य मानावेत. न्यायालयाचा अनादर होईल ना! यासाठी ‘तोयबा’च्या अतिरेक्यांना शहीदांचा दर्जा दिला तरी तो सहिष्णू हिंदूंनी सहन करावा

1 comment:

  1. Dear Sir,
    we are waiting for an article from you on this issue, which would throw light on the malicious activities of this Ishrat Jaha. The news papers like Maharashtra Times are glorifying Ishrat Jahan and her colleagues and criticizing very adversly the honest Police men and our army personnel.
    This is very dangerous for the moral of our dedicated servicemen as well as national character! Today also there is an article by a reporter of Maharashtra Times, Ashish Kamat, in which there is glorification of Ishrat Jahan.
    Jai Hind

    ReplyDelete