Total Pageviews

Monday 14 November 2011

KASHMIR COMMITTEE WANTS OPEN BORDER IN KASHMIR

साडेसात हजार पाकिस्तानींचा भारतात अवैध मुक्काम



स्रोत: तरुण भारत      तारीख: 11/14/2011 7:11:50 PM



वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर
व्हिसाची मुदत संपल्यानंतर ७,६९१ पाकिस्तानी तसेच ३२,६४४ बांगलादेशी नागरिक भारतात बेकायदेशीररित्या राहात असल्याचे आढळून आले आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत सुभाषचंद्र अग्रवाल नावाच्या कार्यकर्त्याने यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विदेश विभागाने माहिती दिली की, २००९ सालापर्यंत आमच्याजवळ जी माहिती उपलब्ध आहे त्याच्या आधारे आम्ही ही आकडेवारी दिली आहे. २०१० व २०११ ची आकडेवारी सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही.
देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून असलेल्या वा राहात असलेल्या पाकिस्तानी वा बांगलादेशींची नेमकी संख्या सांगणे फार कठीण आहे. जे पाकिस्तानी वा बांगलादेशी भारतात अधिकृत प्रवास परवान्याशिवाय म्हणजेच गुपचूपणे तसेच खोटेनाटे सांगून रहात आहेत त्यांचीही संख्या आम्हाला माहीत नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
३२,६४४ बांगलादेशी लोक त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीरपणे रहात आहेत. या पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांशिवाय देशात इतर देशांचेही जवळपास ३३,१०६ नागरिक त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य करून आहेत. यापैकी १३,५६९ अफगाणिस्तानी, २,४९० श्रीलंकन, १,५३५ अमेरिकन तर ११२१ नायजेरियन नागरिक बेकायदेशीरपणे राहात आहेत. २००९ या काळात पाच पाकिस्तानी, १०,६०२ बांगलादेशी नागरिकांसह १२,१४७ विदेशी नागरिकांना भारतातून हाकलण्यात आले होते, अशीही माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे

No comments:

Post a Comment