Total Pageviews

Thursday, 22 August 2019

पाकिस्तानी बडबड कांद्याला सूचक इशारा दिनांक 20-Aug-2019 19:43:44 TARUN BHARAT- अनय जोगळेकर


संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानच्या आग्रहास्तव काश्मीर प्रश्नावर विशेष बैठक बोलावण्यास नकार दिल्यानंतर चीनने या विषयावर बंद दाराआडअनौपचारिक चर्चा घडवून आणण्याची विनंती केली. त्यानुसार १६ ऑगस्टला अशी चर्चा पार पडली. अनौपचारिक चर्चा असल्यामुळे त्यात ठराव मांडण्याचा किंवा मंजूर करण्याचा प्रश्न नव्हताचर्चेची नोंद ठेवण्यात येणार नसल्यामुळे या चर्चेत काय झाले, हेदेखील अधिकृतरित्या जगाला समजणार नव्हते. पाकिस्तानने, ५० वर्षांनंतर सुरक्षा परिषदेत काश्मीरच्या जनतेचा आवाज घुमणार वगैरे म्हणून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतली. आपला नैतिक विजय झाल्याचे घोषित केले. चीनच्या सुरक्षा परिषदेतील प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल माहिती दिली खरीपण त्यातही स्वतःचे मत हे बैठकीला उपस्थित असलेल्या देशांचे मत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 
चीन वगळता बैठकीस उपस्थित अन्य कोणत्याही देशाच्या प्रतिनिधींनी बैठकीतील कामकाजाचा तपशील उघड केला नाही. हाँगकाँगमध्ये स्वतःच मान्य केलेल्या ‘एक देश, दोन व्यवस्था’ या व्यवस्थेला नख लावून लोकशाहीवादी आंदोलकांविरुद्ध दडपशाही करणारास्वतःच्या मुस्लीमबहुल शिनजियांग प्रांतात मुस्लीम धर्मीयांवर अनेक प्रकारची बंधने टाकून त्यांना स्वतःचा धर्म पाळण्याचेही स्वातंत्र्य न देणारा चीन काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकारांबद्दल बोलतो, हा एक विनोदच होता. भारताचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत सय्यद अकबरुद्दिन यांनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तान आणि चीनचा खरपूस समाचार घेतला.
 
पाकिस्तानने आपल्या छुप्या युद्धाचा भाग म्हणून १५ ऑगस्टला काळा दिवस पाळून ठिकठिकाणी स्थायिक झालेल्या आपल्या नागरिकांना काश्मीरसाठी आंदोलन पुकारण्यास सांगितले होतेयाचा भाग म्हणून लंडनमधील भारतीय दूतावासासमोर सुमारे १५ हजार पाकिस्तानी लोक जमले होते. त्यांच्यासोबत काही खलिस्तानवादीही होते. काही आंदोलकांनी तिथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला जमलेल्या भारतीय वंशाच्या लोकांवर दगड आणि बाटल्या फेकल्या. या प्रकरणी ‘स्कॉटलंड यार्ड’ने चार जणांना अटक केली. आज ब्रिटनमध्ये अनेक छोटे पाकिस्तान तयार झाले असून असल्या कृत्यांनी पाकिस्तानी लोक सामान्य ब्रिटिश नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल असलेल्या रागाला खतपाणी घालतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही. गेले दोन आठवडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आपले मानसिक संतुलन ढासळल्यासारखे बोलत आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणात मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, फाळणीच्या वेळेस भारताने पाकिस्तानची केलेली फसवणूक,मोदी सरकार हिटलर आणि नाझींप्रमाणे भारतीय मुसलमान आणि ते झाल्यावर पाकिस्तानला संपविण्याच्या योजना बनवत आहेत तसेच युद्ध झाले तर त्यात पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल, अशा गर्भित धमक्या देत आहेत. इमरान खानचा पगार किती आणि ते बोलतात कितीहा प्रश्न त्यांची भाषणं ऐकणार्या कोणत्याही सामान्य माणसाला पडावा इतके ते असंबद्ध बोलत आहेतबडबड कांदा इमरानना काही काळ सहन केल्यानंतर भारतानेही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.
 
१६ ऑगस्ट रोजी अटल बिहारी वाजपेयींच्या पहिल्या पुण्यतिथीचे निमित्त साधून रक्षामंत्री राजनाथ सिंह ‘पोखरण २’ परीक्षण झाले, त्या जागी गेले आणि तेथे त्यांनी भारताच्या अण्वस्त्र धोरणाबद्दल सूचक वक्तव्य केले. “भारताने अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याचे धोरण अंगिकारले असून आजवर ते कसोशीने पाळले आहेभविष्यात काय होईल ते सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असेल,” असे ते म्हणाले. हे वक्तव्य जसे भारताच्या धोरणातील संभाव्य बदलाचे सूतोवाच करणारे होते, त्याचप्रमाणे ते पाकिस्तान आणि चीनसाठी इशाराही होते. या वक्तव्याचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावे लागेल. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर अहिंसेचा मोठा प्रभाव आणि पंतप्रधान पंडित नेहरूंचा अलिप्ततावाद यामुळे भारतीय सैन्यदलांची पुनर्रचना करून त्यांचा वापर केवळ देशांच्या सीमांचे परकीय आक्रमणापासून रक्षण करण्याचे धोरण स्वीकारले गेले.
 
१९६२च्या युद्धात चीनकडून झालेल्या मानहानीनंतर आणि १९६४ साली चीनने केलेल्या अण्वस्त्र परीक्षणांनंतर भारताला जाग आली. १९७४ साली जेव्हा आपण पोखरण येथे अणुस्फोट केले, तेव्हाही आपण स्वतःला अण्वस्त्रधारी देश जाहीर न करता केवळ शांततेसाठी आपण हे परिक्षण केल्याची भूमिका घेतली होती१९९८ साली अटलजींच्या सरकारने ‘पोखरण २’ स्फोट घडवून भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून जाहीर केले असता पाकिस्ताननेही अण्वस्त्र चाचण्या केल्याभारताची अर्थव्यवस्था १९९१ च्या आर्थिक संकटातून नुकतीच उभारी घेऊ लागली होतीतिच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून भारताने अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाहीतसेच अण्वस्त्र नसलेल्या देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार नाही, अशा दोन अटी धोरण म्हणून स्वीकारल्या. पाकिस्तानने अशा अटी स्वीकारल्या नाहीत.
याउलट जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करेल,असे चित्र निर्माण केले. कदाचित त्यामुळेच १९९९च्या कारगील युद्धात भारताने शक्य असूनही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नाही. १३ डिसेंबर, २००१ रोजी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केल्यानंतर भारताने सीमेवर सैन्याची जमवाजमव केली. पण, त्यासाठी महिनाभराचा अवधी लागल्याने भारताच्या धोरणाच्या मर्यादा उघड झाल्या. त्यामुळे मग भारताने ‘कोल्ड स्टार्ट’ म्हणजेच अशी घटना घडल्यापासून ४८ तासांच्या आत सैन्याची जमवाजमव करून स्पष्ट उद्दिष्ट असलेले मर्यादित युद्ध लढण्याची रणनीती विकसित केलीत्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने अण्वस्त्रांचा डावपेचात्मक म्हणजे टॅक्टिकल वापर करण्याची तयारी सुरू केलीपूर्वी अण्वस्त्रांचा मुख्य उद्देश शत्रूला आक्रमण करण्यापासून परावृत्त करणे हा होताप्रतिस्पर्धी देशांकडे अण्वस्त्र असल्यास युद्धप्रसंगी दोन्ही देश एकमेकांचा पूर्ण विध्वंस (म्युच्युुअली अशुअर्ड डिस्ट्रक्शन) करण्याची भीती असल्यामुळे युद्धं टाळली जायची. सुरुवातीला अण्वस्त्रधारी देशांनी हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त करणार्‍या बॉम्बच्या अनेक पट क्षमता असणारी अण्वस्त्रे विकसित केली. पण, त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर नंतरच्या काळात कमी क्षमतेचीपण लक्ष्यावर अचूक मारा करणारी अण्वस्त्रे विकसित केली जाऊ लागलीसंपूर्ण शहराचा किंवा सर्व लोकसंख्येचा निःपात न करता केवळ आक्रमण करणारी सैन्याची तुकडी, लष्करी तळ, महत्त्वाची बंदरं किंवा प्रकल्पांनाच लक्ष्य करण्यासाठी बनवली आहेत. पाकिस्तान अशी तयारी करत असताना भारताचे हात मात्र पहिले वापर न करण्याच्या धोरणाने बांधले गेले होते.
 
मोदी सरकारने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहेदहशतवाद्यांच्या हल्ल्याची वाट न बघता प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि वेळ पडल्यास आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारत ते उद्ध्वस्त करेल, हे आपण प्रत्यक्ष करून दाखवले. बालाकोट येथील हवाई हल्ल्यापासून इमरान खान सातत्याने अण्वस्त्र युद्धाची आणि परस्परांच्या विध्वंसाची शक्यता वर्तवत आहेतआपण एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे भारताने गेली २० वर्षं जगाला दाखवून दिले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी बदलत्या काळानुसार धोरणात बदल करणेही आवश्यक असते. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली तर भारताच्या पश्चिम सीमेवर दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहेअण्वस्त्रे किंवा त्याबाबतचे तंत्रज्ञान अतिरेकी किंवा पाकिस्तानमधील धर्मांध लष्करी अधिकार्‍यांच्या हातात पडण्याची भीतीदेखील आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि चीनला इशारा देणे भारतासाठी आवश्यक होते. रक्षामंत्री राजनाथ सिंहांनी नाव न घेता तेच केले आहे

काश्मीरप्रवेशाचे नापाक कायदेशीर द्वार... दिनांक 21-Aug-TARUN BHARAT- श्रीकांत पटवर्धन

‘कलम ३७०’ आणि ‘३५ ए’ जम्मू-काश्मीरमधून आता हद्दपार झाले असले तरी, याच कलमांमधील घटनाबाह्य तरतुदींचा कायदेशीर आधार घेत वर्षानुवर्षे काश्मीरचे नागरिकत्व स्वीकारणार्‍या पाकिस्तानींना हुडकून त्यांना परत पाकिस्तानात पाठविण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर असेल.
अलीकडेच संसदेने काश्मीरमधील ‘कलम ३७०’ आणि ‘३५ ए’ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन तेथील फुटीरतावादाच्या मुळावर घाव घातला आहे. केंद्र सरकार, विशेषतः मोदी, शाह यांचे नेतृत्व यासाठी निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. पण, या विजयोत्सवात, जल्लोषात न रमता आणि मुख्य म्हणजे मुळीच वेळ न दवडताज्याकडे सर्वोच्च प्राथमिकतेने लक्ष द्यावे लागेल असा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज सुमारे ६५ वर्षे (१९५४ पासून) या दोन देशविघातक तरतुदींच्या संरक्षणाखाली काश्मीरमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेले (किंवा खरेतर घुसवण्यात आलेले?) पाकिस्तानी नागरिक!
 
विश्वास बसत नाही ना? पण, दुर्दैवाने हे कटू सत्य आहे. आज गेली अनेक वर्षे जेव्हा आमचे सशस्त्रदलांचे जवान दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडून छुप्या मार्गाने देशात घुसणार्‍या घुसखोरांना हुडकून, त्यांना कंठस्नान घालण्यासाठी प्रसंगी प्राणांचे बलिदान देत होते, त्याचवेळी ‘कलम ३५ ए’ आणि ‘३७०’ यांच्या छत्राखाली काश्मिरातील पाकधार्जिण्या अपप्रवृत्ती मात्र पाकिस्तानी नागरिक अगदी अधिकृतपणेराजरोसपणे काश्मीरमध्ये येऊन स्थायिक होऊ शकतीलयासाठी वेगवेगळे कायदेशीरमार्ग काढून ते अंमलात आणत होते. आता खरे आव्हान आहे, ते हे की, एवढ्या वर्षांमध्ये अशा वेगवेगळ्या तर्‍हेने काश्मीरमध्ये अधिकृत (?) प्रवेश मिळवलेल्या पाकिस्तान्यांना हुडकून काढून परत पाठवणेयाचे थोडे सविस्तर स्पष्टीकरण करण्यासाठीच खालील पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
 
एप्रिल १९८२ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेच्या दोन्ही सदनांमध्ये ‘जम्मू-काश्मीर रिसेटल्मेंट बिल’ या नावाचा एक कायदा संमत केला गेला. याचे स्वरूपच इतके उघड पाकधार्जिणे दिसत होते की, तत्कालीन राज्यपाल बी. के. नेहरू यांनी ते पुनर्विचारासाठी विधानसभेकडे परत पाठवले. परंतु, विधानसभेने ते ४ ऑक्टोबर, १९८२ रोजी त्यात काहीही बदल न करता राज्यपालांकडे पुन्हा मंजुरीसाठी पाठवलेयावर वैधानिक मंजुरी देणे राज्यपालांना बंधनकारक असल्याने त्यांनी तशी मंजुरी ६ ऑक्टोबर, १९८२ रोजी दिली. पण, उल्लेखनीय बाब अशी की, ३० सप्टेंबर, १९८२ रोजीच त्यांनी हे विधेयक राष्ट्रपतींकडे खास बाब म्हणून रेफर केलेले होते आणि तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी घटनेच्या ‘अनुच्छेद १४२ (१)’ नुसार ते सर्वोच्च न्यायालयाच्या मत प्रदर्शनासाठी पाठवले होतेसर्वोच्चन्यायालयाचे मत मागताना हे विधेयक किंवा त्यातील एखादा भाग अंमलात आणल्याने राज्यघटनेचाकसा भंग होईल, हे सांगण्याची स्पष्ट विनंती करण्यात आली होती.
 
यानंतर तब्बल १९ वर्षांनी दि. ८ नोव्हेंबर, २००१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या (मुख्य न्यायमूर्ती एस. पी. बरूचा यांच्या अध्यक्षतेखालील) पाच सदस्यीय घटनापीठाने ते विधेयक मत प्रदर्शन न करता (थोडक्यात उत्तर न देता) राष्ट्रपतींकडे परत पाठवले. हे करताना सर्वोच्च न्यायालयाकडून ‘अनुच्छेद १४३’ चा तांत्रिक आधार घेण्यात आला आणि शिवाय असे मत व्यक्त करण्यात आले कीआता हे विधेयक १८ वर्षांपूर्वी मंजूर झालेच आहेतेव्हा आता आम्ही जरी या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर दिलेतरीही आम्ही काही तो कायदा रद्द करू शकत नाहीत्यामुळे या प्रश्नाला उत्तर न देताच तो परत पाठवणे आम्हाला ’प्रशस्त’ वाटते. (!) सर्वोच्चन्यायालयाने दिलेले उत्तर असे : Under the provisions of Article १४३, this court may respectfully decline to express its advisory opinion, if it is satisfied that it is not appropriate to do so, having regard to the nature of the questions forwarded to it and having regard to other relevant facts and circumstances having regard to the facts that the bill became an Act as far back as in १९८२, it appears to us inexpedient to answer the question posed to us in the Reference. Even if we were to answer the question in the affirmative, we would be unable to strike down the Act in this proceeding. We think, therefore, that the reference must be, respectfully, returned un-answered, the bench observed.''
 
दरम्यानकाश्मीर राज्य सरकारने याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ती थांबवण्यासाठी एक जनहित याचिका दखल करण्यात आली, ज्यावर (सुदैवाने) स्थगिती आदेश देण्यात आलाअजूनही ही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता प्रश्न असा की,१९८२ ते २००१ एवढ्या १९ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या कायद्याच्या आधारे काश्मिरात प्रवेश केलेले पाकिस्तानी किती आणि कोण आहेतत्यांना हुडकून काढून परत पाठवणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहेयाचे कारण असे की, या कायद्यांमध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, जे काश्मीरमधील लोक १४ मे, १९५४ किंवा त्याच्या आधी पूर्वीच्या काश्मीर संस्थानची प्रजा (State subject) होते आणि जे १ मार्च, १९४७ नंतर सध्याच्या पाकिस्तानमध्ये पळून गेले आहेत ते किंवा त्यांचे वंशज, पत्नी, विधवा किंवा त्यांचे काश्मीरमधील कायम निवासी नातलग त्यांच्यावतीने इथे परत येऊन स्थायिक होण्यासाठी अर्ज करू शकतात. याचा अर्थ फाळणीच्या वेळी ज्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला आणि जे साधारण सात वर्षे पाकिस्तानात नागरिक म्हणून होते, अशांना (वा त्यांच्या वंशजांना) राजरोसपणे काश्मीरमध्ये परत आणण्याचा हा डाव होता. इथे हेही लक्षात घ्यावे लागेल की, आपल्या देशात दुहेरी नागरिकत्व कायदेशीर नाही, राज्यघटनेला संमत नाही. (राज्यघटना भाग २, अनुच्छेद ५) आणि इथे मात्र, पाकिस्तानी नागरिक त्या देशाचे नागरिकत्व न सोडता काश्मीरचा, पर्यायाने भारताचा नागरिक बनू शकत होता. याचा अर्थ, (सर्वोच्च न्यायालयाने मतप्रदर्शन न केलेला) हा कायदा घटनाबाह्यच आहे. या कायद्याच्या आधारे आलेले सर्व पाकिस्तानी हे दुहेरी नागरिकत्व असल्याने तसेही घटनेनुसार बेकायदेशीरच ठरतात.   
 
जम्मूमधील पँथर्स पार्टीचे नेते (स्वतः वकील असलेले) भीमसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात २००२ पासून हे प्रकरण लावून धरले आहेपूर्वी काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी या विधेयकाच्या विरोधात मत दिल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांनीच या विधेयकाविषयी राज्यपाल बी. के. नेहरुंना सावध केले.पुढे २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मत प्रदर्शन करण्यास नकार दिल्यावर भीमसिंग यांनी २००२ पासून जनहित याचिकेद्वारे आपला कायदेशीर लढा सुरू ठेवला. यासंबंधी भीमसिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास हेही आणून दिले की, पाकिस्तानात कुठलीही नोकरी करण्यापूर्वी तरुणांना किमान दोन महिन्यांचे लष्करी प्रशिक्षण अनिवार्य आहे. त्यामुळे जर हा कायदा अमलात आला, तर आपण पाकिस्तानी जवानांनाच काश्मीरमध्ये आमंत्रित केल्यासारखे आहे. जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी हे दोन्ही पक्ष प्रथमपासूनच या कायद्याच्या बाजूचे राहिले आहेत. कारण, काश्मिरी फुटीरतावादाला उत्तेजन देण्याचे त्यांचे धोरण आहे. विशेष म्हणजे त्यावेळी (१९८२ मध्ये व नंतरहीकेंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसचा मात्र या कायद्याला विरोधच राहिला आहेआता आपण अशाच आणखी एका मुद्द्याकडे वळू.पाकिस्तानी नागरिकांना काश्मीरमध्ये अधिकृतपणे (?) प्रवेश मिळवून
 
देणारी दुसरी युक्ती
वर दिलेल्या रिसेटल्मेंट कायद्याला स्थगिती मिळाल्यावर २००४ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये कायम निवासी अनधिकृत करण्याचे धोरण (Permanent Residents (Disqualification) Bill - also known as the Daughter's Bill.) अशा तर्‍हेचा आणखी एक अन्यायकारक कायदा आणलाया कायद्यानुसार काश्मिरी कायम निवासी असलेल्या तरुणींनी जर कायम निवासी नसलेल्या (राज्याबाहेरच्या) कोणाशी विवाह केला, तर तिचे कायम निवासित्व आणि त्या अनुषंगाने मिळणारे सर्व हक्क संपुष्टात येतीलहा कायदा केवळ महिलांनाच लागू असल्याने(पुरुषांना लागू नसल्याने) उघड उघड लिंगभेद करणारा होता. कायम निवासी नसलेल्या (अन्य राज्यातील) पुरुषाशी लग्न झाल्यास कायम निवासी म्हणून त्या तरुणीला मिळणारे सर्व फायदे - राज्य शासनाच्या नोकर्‍या, नवी मालमत्ता संपादित करण्याचे तसेच मालमत्तेच्या वारसा हक्काचे अधिकार, राज्यात वास्तव्याचे अधिकार काढून घेतले जात होते. या कायद्याने काश्मिरी तरुणींना भारतीय घटनेने दिलेले मूलभूत अधिकार (लिंगभेदाच्या आधारे) नाकारले जात होते. तरीही, हा कायदा संमत न झाल्यास ‘अनुच्छेद ३७०’ नुसार राज्याला मिळणारा विशेष दर्जा, स्वायत्तता संपुष्टात येईल, तसेच राज्याची वांशिक ओळख (मुस्लीम बहुलता?) संपून जाईल, अशी कारणे देण्यात आली. याच वांशिक ओळखीच्या मुद्द्यावर अशी सवलतही देण्यात आली कीजर काश्मिरी तरुणीने पाक नागरिकाशी लग्न केले, तर तिचे कायम निवासित्व अबाधित राहून, शिवाय त्या पाकिस्तानी पुरुषालाही काश्मीरचे (पर्यायाने भारताचे) नागरिकत्व मिळेल. या उघड पाकधार्जिण्या कायद्यालाही नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपी दोन्ही पक्षांचा अर्थातच पाठिंबा होता, पण काँग्रेसचा विरोध होता.
 
या कायद्याच्या आधारे २००४ पासून आजवर काश्मिरी तरुणींशी विवाह करूनकिती पाकिस्तानी व्यक्ती अधिकृतपणे काश्मीरमध्ये प्रवेश करून काश्मिरी व भारतीय बनल्याहे पाहावे लागेल. अर्थात यातही पुन्हा प्रश्न दुहेरी नागरिकत्वाचा (जे आपल्या राज्यघटनेस मंजूर नाही) येत असल्यानेअशा पाकिस्तानी नागरिकांना बेकायदेशीर म्हणून परत पाठवावेच लागेल. आसामच्या धर्तीवर देशभर NRC (National Register of Citizenship) लागू करू, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेले आहेच. पण वरील गोष्टी विचारात घेतल्यास जम्मू-काश्मीरमध्ये‘एनाआरसी’ लागू करण्यास सर्वोच्च प्राथमिकता द्यावी लागेल. कारणतिथे पाकिस्तानी नागरिकांना भारतात कोणत्याही मार्गाने घुसवण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले गेल्याचे दिसून येते. त्यामुळे‘अनुच्छेद ३७०’ व ‘३५ ए’ रद्द केल्याच्या जल्लोषात फार वेळ न घालवता काश्मिरात तातडीने‘एनाआरसी’ लागू करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागेल. कारण, तिथे यापुढे जो काही तथाकथित असंतोषाचा उद्रेक वगैरे झाल्याचे दिसेल (किंवा दाखवले जाईल) त्यात या अधिकृत पाकिस्तान्यांचाच हात असेल, हे निश्चित. या पाकिस्तानी नागरिकांना हुडकून काढून परत पाठवणे, हे केंद्रीय नेतृत्वापुढील मोठे आव्हान आहे. पण, अर्थात आशा आहेच की, ‘मोदी हैं तो मुमकिन हैं!
 


-

निराधारांची माय -कल्याणी पाटील- दिनांक 22-Aug-2019 22:28:31 BY-- कविता भोसले-TARUN BHARAT

 आपल्या पुण्याच्या वृद्धाश्रमात निराधार वृद्धांचा आधार बनलेल्या कल्याणी पाटीलचा प्रवास सेवाभाव आणि समर्पणवृत्तीचा एक आदर्शच म्हणावा लागेलतिच्या या प्रवासाविषयी थोडक्यात...


पिकलेल्या पानांची
कुणाला असते गरज,
आज आहे तर उद्या नाही
असे त्यांचे जीवन
 
या ओळी सर्व पिकलेल्या पानांसाठी अर्थात आपल्या उतारवयात आयुष्याच्या काही अखेरच्या घटका मोजणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी... रस्त्यावर, बस-रेल्वेस्थानकात हमखास आपल्याला असे काही निराधार आजी-आजोबा दिसतात. तेव्हा आपल्या मनात एक क्षणभर तरी नक्कीच विचार येतो की, कुणीच कसं नसेल यांना, कोणीतरी असेलच ना... आणि त्यांची ही निराधारता आपल्याला निःशब्द करुन जाते. अशाच या निराधार आजी-आजोबांना घराचा, मायेचा हात देण्याचे काम करत आहेत कल्याणी पाटील. बसस्थानकात रोज दिसणाऱ्या एका आजीला बघून कल्याणी खूप अस्वस्थ होत असेतिने त्या आजीला आपल्या घरी आणण्याविषयी वडिलांना विचारले असता त्यांनी तिला यावर नीट विचार करण्यास सांगितला. तिला मुंबई-पुण्यातले जवळजवळ २०० वृद्धाश्रम दाखविले.कल्याणीने वयाच्या १८व्या वर्षी बसस्थानकातील आजीला घरी आणलेत्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. अनेक वृद्ध लोक तिच्याकडे येत होते. २०१० मध्ये तिने 'द्वारका सेवासदन' वृद्धाश्रम पुण्यातील राजगुरुनगरच्या आपल्या घराजवळच सुरू केला. एका आजीपासून सुरू झालेल्या या आश्रमात आज शंभरपेक्षा जास्त वृद्ध आजी-आजोबा वास्तव्यास आहेत. या आश्रमाच्या वाटचालीत कल्याणीला तिचे वडील दिनकर पाटील आणि आई कांता पाटील यांची खंबीर साथ लाभली.
 
कल्याणीचे दहावीपर्यंतचे शिक्षण नेरळमध्ये झालेत्यानंतरचे शिक्षण पुण्यातल्या राजगुरूनगरमधील पूर-कान्हेसर या गावात झाले. वृद्धाश्रमासाठी काम करतानाही तिला खूप अडचणी आल्या. अनेक स्थानिक लोकांनी 'कशाला नसत्या लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या?' असे बोलून तिची हेटाळणी केली. मात्र, कल्याणी थांबली नाही. या वृद्घाश्रमासाठी मदत मागताना अनेक संस्थांनी, “आम्ही वृद्धांना मदत करत नाही, फक्त निराधार मुलांना मदत करतो, कारण, त्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे. वृद्ध लोकांवर पैसे कशाला खर्च करायचे?” अशीही उत्तर दिली. घराच्या मागील बाजूलाच कल्याणीने आश्रम बांधला आहे. जेवण मात्र घरातले आणि सगळे आजीआजोबा एकत्रच करतात. कल्याणीची आई सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. काही आज्या त्यांना मदत करतात. सगळ्यांना एकच प्रकारचे अन्न. कुठलाही भेदभाव नाही. कल्याणी या ज्येष्ठांच्या मानसिक अवस्थेबद्दल अनेक गोष्टी सांगतेकोणी आपल्या मुलांची आठवण काढून रडतं, तर कोणी निपचित बसून राहतात.आपल्या आयुष्याची फरफट त्यांच्या डोळ्यातून दिसतेत्यांना बळ आणि आपला कुणी आहे, असा विश्वास देण्यासाठी कल्याणी सदैव तत्पर असतात. आजपर्यंत या वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतलेल्या सर्व ज्येष्ठांचे अंत्यसंस्कार कल्याणीनेच केले आहेत.
 
अनेक ज्येष्ठांचे अनुभव अंगावर काटा आणणारे असून फक्त मुलांना जड झाल्याने रस्त्यावर सोडलेल्या वृद्धांविषयी सांगताना प्रचंड धक्का बसल्याचे कल्याणी सांगते. एका आजोबांना त्यांच्याच मुलांनी रात्री दोन वाजता घरातून बाहेर काढले. त्यांना राजगुरूनगर पोलिसांनी कल्याणीच्या आश्रमात भरती केले. तब्बल चार वर्षांनी ते आजोबा जेव्हा वारले, तेव्हा त्यांचा मुलगा अचानक प्रकट होऊन त्याने आपल्या वडिलांचे अंतिम संस्कारही न करता फक्त वडिलांच्या विम्याचे पैसे मिळावे म्हणून कागदपत्रे नेलीत्याने आपल्या वडिलांचे तोंडही बघितले नाहीआईवडिलांना ओझं समजून झुरळासारखी झटकून टाकणारी निर्दयी आणि पाषाणहृदयी पिढी आपण इतक्या कमी वयातच बघितल्याचे कल्याणी सांगते. कल्याणीला २०१८ मध्ये 'महाराष्ट्र ग्राम विकास प्रतिष्ठान'चा सामाजिक कार्यातील पुरस्कार मिळाला आहेशहरापेक्षा ग्रामीण भागात मदतीची खूप गरज असून आर्थिक स्वरूपात या आश्रमात कोणतीही मदत स्वीकारली जात नाही. धान्य, कपडे अशी साहित्यरुपी मदत येथे स्वीकारली जाते. या आश्रमात सर्व आजी-आजोबांचे एकत्र वाढदिवस साजरे केले जातात. सर्व सण-सोहळे आनंदात संपन्न होतात. सकाळी ९ वाजता चहा, मग नाश्ता, थोडे बागकाम किंवा वाचन, त्यानंतर दुपारचे जेवण, झोप, मग सायंकाळचा चहा, परत थोडे फिरणे, मग रात्रीचे जेवण असा या वृद्धाश्रमातील दिनक्रम. आज्या स्वयंपाक किंवा भजन करीत असतात तर आजोबा बागकाम, फिरणे, वाचनात आपला वेळ व्यतीत करतात. या आश्रमात बहुतांश सत्तरी ओलांडलेले ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना अनेक शारीरिक-मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते. इथे दर दोन दिवसांनी डॉक्टरांकडून सगळ्यांची तपासणीही केली जाते. खरं म्हणजे, कल्याणीचा हा वृद्धाश्रम म्हणजे निराधारांसाठी शेवटच्या दिवसातील सोनेरी दिवसचआयुष्यभर मुलांसाठी जगलेल्या या पिकलेल्या पानांना कल्याणीने जे सुखाचे दिवस दिलेत्याचे मोल नाही. तिला हा आश्रम चालविताना अनेक अडचणी येतात, मात्र त्या सगळ्यांकडे तिने दुर्लक्षच केले. कल्याणीच्या या कामाला आणि निःस्वार्थ सेवेला अनेक प्रणाम...!

पाकिस्तानात लष्करीसत्तेची चाहूल- tarun bharat- दिनांक 21-Aug- संतोष कुमार वर्मा(अनुवाद : महेश पुराणिक)

इमरान खान यांच्यावर विरोधक सातत्याने हल्ले करत आहेतआंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटा पडण्याचा गहन नकारात्मक प्रभाव इमरान खान यांच्या स्थायित्व आणि पंतप्रधानपदावर पडला आहेअशा स्थितीत लष्कराच्या आश्रयाला जाणे, हेच त्यांच्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरु शकते, यात शंका नाही.

पाकिस्तान सरकार सध्या जगभरात भारतविरोधी कडव्या दुष्प्रचारात गुंग असल्याचे दिसते.जगातील बलाढ्य आणि महत्त्वपूर्ण देशांसमोर पाकिस्तानी दूत सातत्याने आपली बाजू मांडत आहेत. अर्थातच, पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या या सर्वच उद्योगांचा उद्देश स्वतःच्या समर्थनात आणि भारताच्या विरोधात देशांना उभे करणेहाच असला तरी याचा कोणताही फायदा त्या देशाला होताना दिसत नाही. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशियाने तर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले असून पाकिस्तानच्या पोलादी मित्राने-चीनने हा विषय संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदत नेला. मात्र, तिथेही तो देश तोंडावर आपटला. जगात एकटा पडल्याचा प्रभाव आता पाकिस्ताच्या अंतर्गत राजकारणातही स्पष्टपणे पाहायला मिळत आहेपाकिस्तानातील अनेक राजकीय पक्ष आता इमरान खान यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत असून काश्मीरबाबतची त्यांची कार्यप्रणाली व ती हाताळण्याच्या वैयक्तिक पात्रतेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.
 
अंतर्गत राजकीय संघर्ष
 
पाकिस्तानातील संयुक्त विरोधकांच्या बहुपक्षीय परिषदेने (एमपीसी) सरकारवर आंतरराष्ट्रीय षड्यंत्रांतर्गत काश्मीरला विकण्याचा आरोप केला आहेतसेच सरकारने उचललेल्या पावलाच्या विरोधात नजीकच्या भविष्यात केंद्रीय राजधानीला पूर्णपणे बंद करण्याचेही नियोजन आहे.उल्लेखनीय म्हणजेविरोधकांच्या या संयुक्त आंदोलनाची मार्गदर्शक समिती एका आठवड्यानंतर मागण्यांचे चार्टर (सीओडी) तयार करणार असून त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजधानी इस्लामाबादला घेराव घातला जाईल. सदर संयुक्त विरोधकांत पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज आणि जमियत उल उलेमा इस्लाम-एफ यांची महत्त्वाची भूमिका आहे. या आंदोलनाशी जुळलेल्या सर्वच पक्षांचे घोषित उद्दिष्ट इमरान खान यांना सत्तेतून खाली खेचणे, हेच आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला देशात अतिशय गंभीर पातळीवर पोहोचला आहे. सरकारच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून त्यांच्या सुशासनाच्या दाव्यालाही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे विरोधकांनी आखले आहेतपाकिस्तान पीपल्स पार्टीच्या पंजाब भागाच्या माहितीप्रमुख असलेल्या हसन मुर्तजा यांनी आरोप केला कीएका वर्षापूर्वी पंतप्रधान इमरान खान यांनी पंतप्रधान निवासातून वाहने व म्हशी विकून चालू केलेला खोटारडेपणाचा आणि चलाखीचा प्रवास आता काश्मीरच्या विक्रीपर्यंत गेला आहेसोबतच मूर्तजा यांनी भारतीय संरक्षणमंत्र्यांनी अण्वस्त्रयुद्धाच्या धमक्या देण्यावरून नाराजीही व्यक्त केली. कारण, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मुझफ्फराबादमध्ये भारताविरोधातील युद्ध आत्मघाती सिद्ध होईल, असे म्हटले होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीने सरकारच्या आणि त्यातल्या त्यात पंजाबमधील सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीवरकठोर ताशेरे ओढत म्हटले की, "या कालावधीत एकाही रुग्णालयाचे वा विद्यापीठाचे वा एका किलोमीटर रस्त्याचेही बांधकाम करण्यात आले नाहीदुसरीकडे महागाईचा दर मात्र १६ टक्क्यांपर्यंत वाढलाज्यामुळे सामान्य जनजीवनावर वाईट प्रभाव पडला," तर खैबर पख्तुनख्वामध्ये प्रभाव असलेल्या अवामी नॅशनल पार्टीचे प्रांतीय अध्यक्ष ऐमल वली खान यांनी असा आरोप केला की, "पंतप्रधान इमरान खान यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिकेच्या बदल्यात भारतव्याप्त काश्मीरवर एक सौदा केलातसेच पंतप्रधानांनी आपल्या नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्याचा उद्देश स्पष्ट करायला हवा," असेही ते म्हणाले. शिवाय सौदी अरेबियाच्या 'अरामको' या तेलकंपनीने काश्मीर प्रश्नावर महत्त्वाची भूमिका निभावलीअसा आरोपही त्यांनी केलापंतप्रधान इमरान खान यांच्या धोरणांमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायात एकटा पडल्याचेही ते म्हणाले.त्यांनी पंजाबच्या राजनेते आणि सत्ताधारी पक्षातील खासदारांच्या काश्मीर मुद्द्याला अफगाणिस्तानच्या स्थितीशी जोडण्यावरही टीका केली. ते म्हणाले की, "अशा प्रकारच्या बालिश वक्तव्यांमुळे प्रदेशात पाकिस्तानच्याच हितांचे नुकसान होईल."
 
लष्कराच्या आश्रयात
 
अशातच इमरान खान यांनी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाल वाढवण्याची घोषणा केली-जो की आता २०२२ पर्यंत असेल. विशेष म्हणजे, जवळपास त्यावेळेपर्यंत इमरान खान यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल निहित आहेबाजवांचा कार्यकालवृद्धीचा प्रकार इमरान खान यांना पंतप्रधान करण्यासाठी लष्कराने दिलेल्या योगदानाच्या बदल्यातील उपहारही असू शकतो. तथापि,बाजवा ज्याप्रकारे लष्करी प्रशासनासह राजकीय निर्णयप्रक्रियांतही हस्तक्षेप करत आहेत, त्या स्थितीत त्यांचा कार्यकाल वाढवण्याची शक्यता होतीच. तसेच त्यांच्या इच्छापूर्तीच्या मार्गात अडथळे उभे करणे सरकारला शक्यही नव्हते. भारताने 'कलम ३७०' हटवल्यानंतर पाकिस्तान जशा प्रतिक्रिया आणि सशस्त्र संघर्षाची धमकी देताना दिसतोतो लष्कराच्या पडद्यामागून पुढे येत मुख्य भूमिकेत स्थानापन्न होण्याचा संकेतही असू शकतो. कारण, आपल्या वादग्रस्त निवडीनंतर पुन्हा एकदा इमरान खान यांची सत्ता अस्थिर झाली आहेविरोधक त्यांच्यावर सातत्याने हल्ले करत आहेत,आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटा पडण्याचा गहन नकारात्मक प्रभाव इमरान खान यांच्या स्थायित्व आणि पंतप्रधानपदावर पडला आहे. अशा स्थितीत लष्कराच्या आश्रयाला जाणे, हेच त्यांच्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरु शकते, यात शंका नाही. परंतु, वर्तमान राजकीय परिदृश्यात एक गोष्ट स्पष्टपणे ठळकपणे समोर येत आहेती म्हणजे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा लोकशाही-जी आभासी असली तरी धोक्यात आली आहे. काश्मीर मुद्द्यावरून इमरान खान यांच्या सरकारच्या भूमिकेवरून लष्कर असंतुष्ट असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, कॅबिनेटमध्ये लष्करी लॉबीचे वर्चस्व आहे आणि त्यांनी इमरान व लष्करादरम्यान मध्यस्थाचे कामही सुरू केले आहेदुसऱ्या बाजूला पाकिस्तानातील विरोधी पक्षही इमरान खान यांना सत्ताच्युत करण्यासाठी लष्कराकडून सहकार्य घेऊ इच्छितातबाजवा यांच्या कार्यकाल वाढवण्यावरून विरोधकांनी त्याला एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया म्हटलेतसेच कोणत्याही प्रकारे लष्करप्रमुखांच्या सन्मानाला इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेतली. इमरान खान यांना हटविण्याच्या बदल्यात लष्कराला कसल्याही प्रकारचे समर्थन देण्यासाठी आम्ही तयार, तत्पर आहोत, हाच संकेत यातून विरोधी पक्ष देत आहेअशा नाजूक परिस्थितीत पाकिस्तानात सर्वाधिक फायदेशीर स्थितीमध्ये तिथले लष्कर असल्याचेच यातून स्पष्ट होते. 'कलम ३७०' सारख्या भारताच्या अंतर्गत मुद्द्याचा वापर करून आणि पाकिस्तानची बिकट परिस्थितीतसेच इमरान खान यांच्याविषयीच्या असंतोषाचा फायदा घेऊन लष्कर आपल्या सर्वशक्तिमान स्थितीला अधिक दृढतेने स्थापित करू इच्छितेसध्या पाकिस्तान विनाशाच्या गर्तेत कोसळण्याच्या पायरीवर उभा असून हा तणाव सशस्त्र संघर्षाकडे गेला तर हा प्रदेशाच्या सुरक्षा व शांततेसाठी मोठा धोका असेलच, पण पाकिस्तानसाठी विनाशकारीच सिद्ध होईल. पाकिस्तानमधील हा सत्तासंघर्ष त्या देशाच्या अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका झाल्याचेच यातून दिसते.
 

Monday, 19 August 2019

पोलिसांचे ‘गुगल’!By लोकमत न्यूज नेटवर्क |मनीषा म्हात्रे Follow | Published: August 11, 2019 06:01 AM | Updated: August 11, 2019



पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांवरून त्यांची ओळख पटवली जायची. मात्र हे तंत्र आता कालबाह्य झाले आहे. हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधला चेहरा  एवढंच काय, नुसत्या छायाचित्रावरूनही आता गुन्हेगारांची ओळख पटवता येईल. पोलिसांनी आतापर्यंत साडेसहा लाख गुन्हेगार संगणकावर आणले आहेत. अँम्बीसप्रणालीनं त्यांची ओळखएक कळ आणि एका बोटावर आणली आहे!
06:05 AM
पोलिसांचे गुगल’!
ठळक मुद्देमुंबईतील 85 गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांच्या हाती लागलेल्या ठशांवरून या प्रणालीने 118 आरोपींची ओळख एका झटक्यात पटवून दिली होती. 
https://wtf2.forkcdn.com/www/delivery/lg.php?bannerid=0&campaignid=0&zoneid=6010&loc=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmanthan%2Fambis-technology-now-very-useful-catch-criminals%2F&referer=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fmanthan%2Fpage%2F3%2F&cb=d104b7bec6
- मनीषा म्हात्रे
फक्त बोटांच्या ठशांवरून गुन्हेगारांचा काढला जाणारा माग आता कालबाह्य ठरला आहे. बोटांच्या ठशांसोबत बुबुळांचे प्रतिबिंब, हाताच्या तळव्यांचे ठसे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेला चेहरा किंवा छायाचित्रांद्वारे संशयितांची, आरोपींची, गुन्हेगारांची ओळख आता चुटकीसरशी पटवता येईल आणि त्यांना गजाआड टाकणेही त्यामुळे फारच सोपे होईल. त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, ते म्हणजे पोलिसांचे गुगल!
काय आहे हे पोलिसांचे गुगल?
या प्रणालीचे नाव आहे अँम्बीस’(ऑटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेण्टिफिकेशन सिस्टीम). ही प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यात, सीसीटीव्ही, सीसीटीएनएस (क्राइम अण्ड क्रीमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँण्ड सिस्टीम) एकत्रिकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याने, देशभरातील गुन्हेगारांचा तपशील आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
2008
मध्ये शहरावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पुढच्याच वर्षी सीसीटीएनएस (क्राइम अँण्ड क्रीमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँण्ड सिस्टीम) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या अंतर्गत देशातील सर्व गुन्हेगारांचा तपशील, गुन्ह्यांची माहिती सीएएसच्या (कोर अँप्लिकेशन सॉफ्टवेअर) मदतीने एकत्रित करण्यात आली. बंगलोरच्या आयटी फर्म कंपनीद्वारे ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे एफआयआर, आरोपपत्र, गुन्हेगाराचा फोटो, त्याचा इतिहास, त्याची शारीरिक माहिती. या सार्‍याला डिजिटल स्वरूप आले.
राज्यातील सीसीटीएनएसचे मुख्यालय पुण्यात आहे.  2010 मध्ये त्यात, प्रगती होत बोटांच्या ठशांवरून गुन्हेगारांचा माग सुरू झाला. त्यासाठी स्वतंत्र अशा फिंगर प्रिंट ब्युरोची (अंगुली मुद्रा केंद्र) स्थापना झाली. राज्यात मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी याची केंद्रे आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे कागदावर उमटवण्यास सुरुवात झाली. याचा एकत्रित तपशील या ब्युरोकडे पाठविण्यात येत होता.  
पोलीस दलाने आधुनिकीकरणाची कास धरताना केवळ बोटांचे ठसेच नाही तर हाताचे तळवे, चेहरा व डोळे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी प्रय} सुरू झाले.
याबाबतचा प्रस्ताव सायबर पोलिसांकडे आल्यावर महाराष्ट्र सायबरचे प्रमुख ब्रिजेश सिंह, सायबर अधीक्षक बालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक अविनाश सरवीर, रूपाली गायकवाड, सुरेश मगदून, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, उल्हास भाटले, संदीप जाधव यांनी काम सुरू केले. अवघ्या 20 दिवसात याबाबतचा अहवाल त्यांनी शासनाकडे पाठवला. 2017 मध्ये पथकाने काम सुरू केले. एकाचवेळी साडेसहा लाख गुन्हेगारांचे तपशील या यंत्रणेत उपलब्ध आहेत.
2018
मध्ये इन्स्टॉलेशनचे काम झाले. राज्यातील 1160 पोलीस ठाणी, 10 जिल्हे, 10 मध्यवर्ती कारागृहे, 7 प्रादेशिक कार्यालयांत या प्रणालीचे हार्डवेअर पोहोचविण्यात आले.  फिंगर प्रिंट आणि डोळ्याचे स्कॅन करणारी मशिन्स देण्यात आली. सुरुवातीला 50 जणांचे पथक या प्रणालीच्या कामात गुंतले होते. सीसीटीएनएससारखेच अँम्बीस प्रणालीच्या यंत्रणेचे इंट्रानेटचे जाळे पुण्यातून मुंबईसह राज्यभरात पसरले.
या नव्या प्रणालीने पोलिसांचे काम बरेच सोपे केले आहे. छायाचित्रावरून किंवा सीसीटीव्हीत कैद केलेल्या चित्रणावरूनही गुन्हेगारांची ओळख पटू शकेल, त्यांची इत्थंभूत माहिती पोलिसांना मिळू शकेल. महाराष्ट्र सायबरने पुढाकार घेत ही अद्ययावत प्रणाली विकसित केली. शहरातील 94 पोलीस ठाण्यांमध्ये या प्रणालीचा प्रयोग केल्यानंतर राज्यातील 1160 पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल. ही देशातील पहिली प्रणाली असून, गुन्हेगारांची संपूर्ण माहिती याद्वारे मिळणार आहे.
मुंबईतील 94 पोलीस ठाण्यांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. सुमारे 200हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांना या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लवकरच आणखी 2600 पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये संगणक आणि हाताचे तळवे, चेहरा व डोळ्यांचे स्कॅन करण्यासाठीची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती यंत्रणा थेट मुख्य डेटाबेसशी जोडलेली असणार आहे.
या प्रणालीमुळे तपास अधिकार्‍यांच्या हाती सीसीटीव्हीचे अंधुक, अस्पष्ट चित्रण असले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. दहा मिनिटांच्या सीसीटीव्ही चित्रणातून ही प्रणाली आरोपीची असंख्य छायाचित्रे, चित्रणाचे छोटे भाग तयार करते. चेहर्‍याचा 26 टक्के भाग दिसल्यासही प्रणाली आरोपीची ओळख  पटवू शकते.
गुन्ह्यांची झटपट उकल करून दोषसिद्ध दर वाढवू शकेल अशी ही अद्ययावत प्रणाली पोलिसांसाठी गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करेल. त्यामुळे गुन्हेगारांना वचक बसेल, गुन्हे कमी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केला आहे.
राज्यात सीसीटीव्ही, सीसीटीएनएस आणि अँम्बीस प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होताच देशभरातील गुन्हेगारांचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. गुन्हे शोधासाठी ही प्रणाली पोलिसांना अतिशय उपयुक्त तर ठरेलच, गुन्हेगारांनाही यामुळे वचक बसेल.
मिनिटात पटणार गुन्हेगाराची ओळख!
एखाद्या गुन्ह्यांत पहिल्यांदाच अटक होणार्‍या आरोपीच्या बोटांच्या ठशांपासून सर्व गोष्टी या प्रणालीत जतन करण्यात येतील. जेणेकरून दुसर्‍यांदा त्याने कुठला गुन्हा केल्यास त्याला पकडणे सोपे होईल.
मुंबईसह राज्यातील दहा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचेही तपशील अँम्बीसमध्ये घेण्यात येत आहेत. जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीने पुन्हा गुन्हा करणार्‍यांना सहज पकडणे शक्य होणार आहे.
एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यास त्याठिकाणचे फिंगर प्रिंट अँम्बीसमध्ये सर्च केल्यास, त्याचा तपशील उपलब्ध असल्यास तात्काळ त्याविषयची माहिती मिळणे आता सहज शक्य आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या ठिकाणीच अवघ्या काही मिनिटातच चोर कोण, हे समजणे शक्य होईल.
राज्यात मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नागपूर याठिकाणी फिंगर प्रिंट ब्युरो आहेत. तेथील तज्ज्ञाच्या मदतीने या प्रणालीचे कामकाज चालणार आहे.
पहिल्याच प्रयत्नात 85 गुन्ह्यांची उकल!
गुन्ह्यांच्या ठिकाणी मिळालेले हाताचे ठसे, विविध खुणा अथवा अन्य पुराव्यांना चान्सप्रिंट म्हणतात. गुन्ह्यांत मिळालेल्या चान्सप्रिंट या प्रणालीअंतर्गत सर्च करण्यात येतात. मुंबईतील 85 गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांच्या हाती लागलेल्या ठशांवरून या प्रणालीने 118 आरोपींची ओळख एका झटक्यात पटवून दिली होती. यापूर्वी एखादी चान्सप्रिंट मिळाल्यास स्वत: त्याचे कामकाज करावे लागत असे. साडेसहा लाख आरोपींच्या तपशिलातून त्याचा माग घेणे शक्य नव्हते. या प्रणालीमुळे ते सहज शक्य झाले.
10 मिनिटांच्या फुटेजचा खेळ!
या प्रणालीमुळे तपास अधिकार्‍यांच्या हाती सीसीटीव्हीचे अंधुक, अस्पष्ट चित्रण असले तरी त्याचा फायदा होऊ शकतो. दहा मिनिटांच्या सीसीटीव्ही चित्रणातून ही प्रणाली आरोपीची असंख्य छायाचित्रे, चित्रणाचे छोटे भाग तयार करते. चेहेर्‍याचा 26 टक्के भाग दिसल्यासही प्रणाली आरोपीची ओळख  पटवू शकते. यात, एकावेळी दहा एमबीपर्यंतचे फुटेज सर्च केले जाऊ शकते. 
फिंगर प्रिंटसाठी मोबाइल स्कॅनरचा वापर
फिंगर प्रिंट गोळा करण्यासाठी मोबाइल स्कॅनरचा वापर करण्यात येत आहे. त्यात, या प्रणालीसाठी 41 युनिटमधील, 1160 पोलीस ठाण्यात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. 2600 पोलीस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अँम्बीस प्रणालीसह विविध प्रणालींसाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र तंत्रज्ञान कक्ष उभारण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक संदीप सावंत त्यावर देखरेख ठेवतात.  
35 वर्षांपूर्वीच्या ठशांमुळे 
अडकला होता छोटा राजन!
कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजेंद्र निकाळजे याला इंडोनेशियाकडून भारताच्या ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 35 वर्षांपूर्वी घेतलेले त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे ओळख पटविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले होते. एका वॉचमनची हत्या व पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी छोटा राजनला टिळकनगर पोलिसांनी 1980 मध्ये अटक केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी याच पोलिसांनी अजून एका हत्येप्रकरणी पुन्हा त्याला अटक केली होती. त्या वेळी हाताचे ठसे घेतले होते. त्यानंतर तब्बल 33 वर्षांनंतर तो इंडोनेशियात सापडला. मात्र आपण मोहनकुमार असल्याचे तो सांगत असल्याने त्याची ओळख पटविण्यासाठी फिंगर प्रिंट्सची मूळ कॉपी शोधण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आले. त्यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मनीषा शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे पथक तब्बल आठवडाभर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्ड रूममधील हजारो कागदपत्रे तपासत होते. अखेर राजनच्या हातांच्या ठशांचे कागद तुकड्यांमध्ये आढळले. अतिवृष्टीवेळी त्या फिंगर प्रिंट भिजल्या होत्या. त्यात या कागदांचे तीन तुकडे झाले होते. मात्र पोलिसांनी ते जुळवून स्कॅन करून पाठविले. इंडोनेशिया दूतावासाने या पुराव्याच्या आधारावर राजनचा ताबा भारताकडे दिल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. मात्र आता सर्व डिजिटल झाल्यामुळे पोलिसांची ही कसरत थांबणार आहे.
manishamhatre05@gmail.com
(
लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहेत.


पाकी माध्यमे 'खामोश' दिनांक 16-Aug-2019 19:47:26-t bharat mumbai- विजय कुलकर्णी

सध्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये भीतीचेसंभ्रमाचे वातावरण असून आगामी काळात हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि माध्यमांची कथित स्वायत्तता कुणीकडे वळण घेते, ते बघायचे.
न्यालयाने भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवलेल्या पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत सुरू होताचअवघ्या काही सेकंदात जाहिरातीने स्क्रीन व्याप्त केलीत्यानंतर काही मिनिटांनी मुलाखतीऐवजी दुसरेच वृत्तनिवेदन सादर करण्यात आलेमाजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरियम शरीफवरही भ्रष्टाचाराचे आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.सत्ताधार्‍यांविरोधात मरियमने एकही शब्द बोलू नये म्हणून तिच्या मुलाखतींनाही माध्यमांतून पद्धतशीरपणे हटवले गेलेतिच्या मुलाखती घेणार्‍या तीन वृत्तवाहिन्यांना काही दिवसांसाठी थेट'ब्लॅक आऊट' करण्यात आले.
 
अशी एकदोन नव्हे, गेल्या काही दिवसांतली पाकिस्तानमधील माध्यमांना 'खामोश' करणारी शेकडो उदाहरणे सांगता येतील. दोनदा कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या हमीद मीरसारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली असलीतरी पाकिस्तानी सरकारकडून माध्यमांवरील या अघोषित आणीबाणीविरोधात पंतप्रधान इमरान खान यांनी साधा 'ब्र' ही काढलेला नाही. त्यातही धक्कादायक म्हणजेपडद्यामागून माध्यमांवर नेमकी ही बंदी लादणारे पाकिस्तानी सरकार आहे,आयएसआय की पाकी लष्कर याचीही पत्रकारांना सुतराम कल्पना नाही. कारण, त्यांना प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश थेट 'वरून' येतात म्हणे. आता पाकिस्तानला असे किती जण 'वरून' नियंत्रित करतात, ते वेगळे सांगायची गरज नाहीच मुळी!
 
पाकिस्तानमध्ये इमरान खान यांनी सत्तेत आल्यापासून आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्याचा सपाटाचा लावलाशरीफ आणि झरदारी या दोन्ही परिवाराने पाकिस्तानला आकंठ लुटून स्वत:चे खिसे भरले, असे वारंवार लोकांच्या मनात बिंबवत इमरान खानच्या सरकारने विरोधकांचा आवाजच दाबून टाकला. झरदारींचा मुलगा आणि शरीफांची मुलगी इमरानला 'इलेक्टेड' ऐवजी 'सिलेक्टेड वजीर-ए-आझम' म्हणून हिणवत असले तरी राजकीय सूडाने इमरानलष्कर आणि त्यांचा पीटीआय हा पक्ष पेटून उठलेला दिसतोइमरानने जेव्हा पाकी संसदेत मोदींनी आपल्या भारतातील विरोधकांना 'दीवार केले' असे म्हटल्यानंतर, शरीफांचे बंधू शाबाज शरीफ म्हणाले होते, “अहो, त्यांनी 'दीवार केले' असेलही, पण तुम्ही मात्र आम्हाला 'दीवार'मध्येच गाडण्याच्या तयारीत आहात.” यावरून पाकिस्तानातील एकूणच विरोधकांची होणारी गळचेपी आता माध्यमांच्याही मानगुटीवर येऊन बसलेली दिसते.
 
पाकिस्तानी पत्रकारांनी या सेन्सॉरशिपचा विरोध केला असून यापूर्वी मुशर्रफ किंवा इतर लष्करप्रमुखांच्या काळातही माध्यमांवर इतकी बंधने कधीही लादली गेली नसल्याचे कबूल केले आहे.वृत्तवाहिनीला थेट 'ब्लॅक आऊट' करणे, प्रक्षेपणाच्या आधीच निवेदक आणि मालकांना धमकावणे,केबल वाहिन्यांवरून संबंधित वृत्तवाहिनीचा क्रमांक बदलणेप्रसारण ठप्प करणे आदी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहेइतकेच नाही तर प्रत्येक वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रांच्या मजकुरावर अगदी बारीक लक्ष ठेवले जातेसरकार विरोधतला एकही शब्द माध्यमांमधून जनतेपर्यंत पोहोचणार नाही, याचा जणू सरकारने विडाच उचललेला दिसतो. या सगळ्या प्रकारावर मग पांघरुण घालण्यासाठी इमरान खान माध्यमांच्या संपादकांच्या भेटीगाठीही घेतात आणि त्यांच्यासमोर आपले रडगाणेही गातातइतकेच नव्हे तर, १४ ऑगस्टला काय प्रसारित करावे, १५ ऑगस्ट हा कसा 'काळा दिन' पाळावा, याबाबतच्या सूचना आणि नियमावलीही सरकारतर्फे यंदा प्रथमच जारी केली गेली.
 
लष्करासंबंधी अधिकृत माहितीही 'गफूर' या नेमलेल्या अधिकार्‍याव्यतिरिक्त अजून कुणाकडूनही माध्यमांना मिळणार नाहीयाची चोख व्यवस्था सरकार आणि लष्कराने केली असून त्यामुळे पाकिस्तानी माध्यमे पुरती हतबल झाली आहेत. सरकारविरोधात निवेदने, आंदोलने, मोर्चा काढूनही पाकी माध्यमांची मुस्कटदाबी दिवसेंदिवस वाढतानाच दिसते. पण, इमरान खान, त्यांचे मंत्री मात्र याबद्दल अगदी मूग गिळून गप्प आहेतपाकिस्तानसारख्या देशात 'लोकशाही' ही नामधारी आहेच आणि माध्यमांवरील या हल्ल्यांतून ही बाब आता जगासमोरही उघडी पडली. पण, या देशाकडून सुधारणेची तशी अपेक्षा नाहीच. परंतु, ज्या माध्यमांनी इमरान खानची पंतप्रधानपदापर्यंत ताजपोशी केली, आज तोच पंतप्रधान या माध्यमांच्या, संपादकांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये भीतीचे, संभ्रमाचे वातावरण असून आगामी काळात हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि माध्यमांची कथित स्वायत्तता कुणीकडे वळण घेते, ते बघायचे.