SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Sunday, 6 November 2016
Saturday, 5 November 2016
पाकची कोंडी करण्याची गरज-भारताने पाकवर कूटनीतिक दबाव आणला पाहिजे. सगळीकडून पाकची कोंडी कशी करता येईल, याचा विचार केला पाहिजे. दहशतवादाला संरक्षण देणार्याी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठा आर्थिक दंड करावा यासाठी भारताने दबाव वाढविला पाहिजे. आम्ही केवळ बोलघेवडे नाही, तर ठोस कृतीही करतो असा एक सज्जड संदेशही जागतिक समुदायाला भारताकडून दिला जाणे आवश्यक आहे. असे झाले तरच पाकिस्तान सुधारेल, अन्यथा सीमेपलीकडून त्याच्या कुरापती सुरूच राहतील.गजानन निमदेव
November 2, 2016
0
उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिल्याच्या घटनेला महिना उलटून गेला आहे. पण, पाकिस्तानकडून होणार्या कारवाया काही थांबलेल्या नाहीत. काल, मंगळवारी पाकने केलेल्या गोळीबारात काश्मिरातील आठ नागरिक ठार झाले आणि अनेक जखमी झाले. सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकची अब्रू गेली असे बोलले जात असताना पाकमध्ये लष्कर, सरकार आणि अतिरेकी संघटना यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ, पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अतिरेक्यांचा म्होरक्या हाफिझ सईद यांच्यातील मतभेद म्हणजे एक ढोंग असल्याचेही स्पष्ट होत आहे.
भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानात भारतविरोधी द्वेष निर्माण करण्यात तिथला मीडिया, सरकार, लष्कर आणि कट्टरवादी संघटना बर्या पैकी यशस्वी झाल्या. भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड झाला. अमेरिकेने फटकारल्यामुळे पाक आणखी भडकला. अतिरेकी संघटनांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वाअसन देऊनही पाकने कोणतीही कारवाई केली नाही. सर्जिकल स्ट्राईकला महिना उलटला आहे. अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करणे सोडाच, पाकिस्तान सीमेपलीकडून दररोज भारतीय सीमेत गोळीबार करीत आहे. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे अनेक सैनिक ठार झाले असले तरी आमचाही एकेक जवान दररोज शहीद होत आहे. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. भारताने ठोस प्रत्युत्तर दिल्यानंतरही पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आलेले नाही, ही त्या देशासाठी चिंतेची बाब असली तरी आमच्यासाठी जास्त चिंतेची बाब आहे. सीमेपलीकडून पाकिस्तानच्या कारवाया सातत्याने सुरूच आहेत. त्या कारवाया लक्षात घेतल्या तर अतिरेक्यांविरुद्ध पाकिस्तान काही कारवाई करेल याचे कुठलेही संकेत अद्याप तरी मिळाले नाहीत. दहशतवादाच्या मदतीने जम्मू-काश्मिरात अशांतता कायम ठेवण्याचाच पाकचा प्रयत्न दिसतो आहे.
अतिरेक्यांविरुद्ध कारवाई तर दूरची गोष्ट, पाकिस्तानचे गृहमंत्री ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात विविध अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांना भेटले. यावरूनही पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होतो. लष्करप्रमुख राहील शरीफ, पंतप्रधान नवाझ शरीफ आणि हाफिझ सईदसारखे अतिरेक्यांचे म्होरके एकमेकांच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहेत. वास्तविक, उरी येथे केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक समुदायात पाकबद्दल संतापाची भावना निर्माण झाली होती. सर्व स्तरातून पाकचा निषेध करण्यात आला होता. परंतु, तरीसुद्धा पाकिस्तानने आपल्या कृत्याची साधी कबुली दिली नाही. अतिरेकी संघटनांना पाठिंबा दिल्यामुळे एकाकी पडल्यानंतरही पाकिस्तान अतिरेक्यांवर कारवाई करायला तयार नाही, यावरून तिथल्या सरकारची अगतिकताही स्पष्ट दिसते. नवाझ शरीफ यांचे सरकार लष्कर आणि अतिरेक्यांच्या किती दबावात आहे, हेही यावरून दिसते.
अमेरिकेने आणलेल्या दबावालाही पाकिस्तान मानायला तयार नाही. ज्या अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानने आतापर्यंत आपली उपजीविका चालविली, त्याच अमेरिकेकडे डोळे वटारून पाहण्याचे धारिष्ट्य पाककडे कसे आले, हेही सगळ्यांना माहिती आहे. दक्षिण आशियात आपले वर्चस्व स्थापित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारताला शह देण्यासाठी चीन कायम कुरापती करीत असतो. चीनच्या या कारवायांमध्ये आता पाकिस्तानही सामील झाला आहे. चीन स्वार्थी आहे. चीनकडून पाकिस्तानचा वापर करून घेतला जात आहे. ही बाब कदाचित पाकच्या लक्षातही आली असेल. पण, भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तान चीनशी हातमिळवणी करीत आहे. वेळ पडल्यास आपण चीन आणि रशियाच्या तंबूत जाऊन बसू, अशी अघोषित धमकीच पाकने अमेरिकेला दिली आहे. स्वत:चे हित कशात आहे हे कळत असतानाही केवळ भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तान चीनशी जवळीक करीत आहे, हेही आता स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानने अजून चीनचा डाव ओळखलेला नाही. ड्रॅगन कधी विषारी फूत्कार सोडेल अन पाकिस्तानला नेस्तनाबूत करेल हे तिथल्या रज्यकर्त्यांना कळणारही नाही. परंतु, पाकिस्तान भारतद्वेषाने एवढा पछाडलेला आहे की, बर्याावाईटातला फरकही त्याला कळेनासा झाला आहे. दहशतवाद ही आता जागतिक समस्या झाली आहे आणि चीनलाही त्याच्या झळा बसणारच आहेत. इस्लामिक दहशतवादाच्या कचाट्यातून कोणीही सुटलेले नाही. असे असतानाही चीन निर्लज्जपणे पाकिस्तानी अतिरेक्यांची बाजू घेत आहे. मसूद अझरवर युनोकडून निर्बंध लादण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यात चीननेच अडथळा आणला. चीनची एकूणच भूमिका संशयास्पद राहिली आहे. तिकडे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करेल याचीही शक्यता आता धूसर झाली आहे.
भारताने सर्जिकल स्ट्राईक केला, गुलाम काश्मिरातील अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवून ४० अतिरेक्यांना यमसदनी धाडले, त्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली, जगभरात भारताची वाहवा झाली. हे सगळे जरी खरे असले तरी सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानवर कूटनीतिक दबाव आणण्यात आपण कमी पडलो की काय, असे आताची परिस्थिती लक्षात घेता वाटते आहे. पाकिस्तानचे कितीही सैनिक तुम्ही मारले आणि अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत तरी पाकिस्तान वठणीवर येईल, अशी आशा करणे भाबडेपणाचे ठरेल. पाकच्या आर्थिक नाड्या जोपर्यंत आवळल्या जात नाहीत, तोवर काही उपयोग नाही. पाकिस्तान ही दहशतवादाची जननी आहे असे पंतप्रधान मोदी जागतिक व्यासपीठावरून बोलले होते. पण, त्याचा पाकिस्तानवर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ असा दर्जा आपण दिला आहे. त्यावर फेरविचार केला जाणार होता. पण, त्यावर विचार झाला की नाही, जनतेला अद्याप कळलेले नाही. सिंधू नदीच्या पाण्याबाबतचा जो करार पाकिस्तानशी आपण केला आहे, त्यावरही फेरविचार केला जाणार होता. पण, त्याचे काय झाले, हेही समोर आलेले नाही.
केंद्र सरकारने पाकिस्तानी कलाकारांना आणि अन्य सगळ्यांनाच भारतात येण्यासाठी व्हिसा न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी असलेले सर्व प्रकारचे संबंध भारताने तोडले पाहिजे, अशी भारतीय जनतेची भावना आहे. या भावनेचा आदर करण्यात सरकारला काय अडचणी आहेत, याची माहिती निदान जनतेला करून देण्यात यावी अशी अपेक्षा आहे. पाकिस्तान तिकडून दररोज गोळीबार करीत आहे आणि आपण त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे, हे किती दिवस चालणार? पाकिस्तानला १९७१ च्या युद्धाची आठवण होईल, अशी धडक कारवाई केली जावी, असे जे जनतेला वाटते आहे, ते विद्यमान स्थितीत चूक ठरविता येईल?
सर्जिकल स्ट्राईक करून भारताने जगात स्वत:ची प्रतिष्ठा वाढविली यात शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयाचे सगळ्यांनाच अभिनंदन करावे लागले. परंतु, सर्जिकल स्ट्राईकमुळे मिळालेला फायदा वृद्धिंगत करण्यासाठी आता भारताने पाकवर कूटनीतिक दबाव आणला पाहिजे. सगळीकडून पाकची कोंडी कशी करता येईल, याचा विचार केला पाहिजे. दहशतवादाला संरक्षण देणार्याी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाने मोठा आर्थिक दंड करावा यासाठी भारताने दबाव वाढविला पाहिजे. आम्ही केवळ बोलघेवडे नाही, तर ठोस कृतीही करतो असा एक सज्जड संदेशही जागतिक समुदायाला भारताकडून दिला जाणे आवश्यक आहे. असे झाले तरच पाकिस्तान सुधारेल, अन्यथा सीमेपलीकडून त्याच्या कुरापती सुरूच राहतील.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय?एनडी टीव्हीवर एका दिवसाच्या प्रसारणावर बंदी हा अन्याय आहे, असे जर कोणाला वाटत असेल तर केवळ ओरड करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा या लोकांनी सरळ न्यायालयात दाद मागावी.लगाम नसलेल्या मोकळ्या घोड्यासारखे हे अजून किती लोकशाही आणि देशाची सुरक्षा यांना लाथाडत राहाणार?-– बाळ अगस्ती
युद्धही नाही, शांतता नाहीच.. मग?पाकिस्तानशी वागताना कोणती नीती वापरावी-सचिन दिवाण | November 5, 2016 2:52 AM -‘नॉट वॉर, नॉट पीस- मोटिव्हेटिंग पाकिस्तान टु प्रिव्हेंट क्रॉस-बॉर्डर टेररिझम’ लेखक : जॉर्ज पकरेविच, टॉबी डाल्टन
पाकिस्तानशी वागताना कोणती नीती वापरावी, त्या देशाच्या पुंडाईला जरब कशी बसवावी आणि मुख्य म्हणजे, त्या अण्वस्त्रसज्ज देशानं अणुसज्जतेचा वापर कधी करू नये आणि हिंसाचारही कमी करावा यासाठी दबाव आणत राहणं, हा भारतापुढला प्रश्न आहे. तो देशानं कसकसा सोडवला, याचा आढावा इथं आहे..
भारतीय संसदेवर १३ डिसेंबर २००१ साली किंवा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झाला तसा हल्ला जर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतावर पुन्हा केला तर उपखंडात कोणती परिस्थिती उद्भवेल? पाकिस्तानला शिक्षा देण्यासाठी भारत काय पावले उचलेल आणि त्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया काय असेल? गावोगावच्या पारांवरील गप्पांपासून ते थेट आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये चर्चिला जाणारा प्रश्न!
त्याचे उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील माँटेरी येथील ‘यू. एस. नेव्हल पोस्टग्रॅज्युएट स्कूल’च्या ‘सेंटर ऑन कन्टेम्पररी कॉन्फ्लिक्ट’ या संशोधन केंद्राने १९ ते २२ मार्च २०१३ दरम्यान श्रीलंकेतील कोलंबो येथे एक कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात भारतीय आणि पाकिस्तानी सेनादलांचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि संरक्षणतज्ज्ञ यांना समोरासमोर आणले होते. त्यांच्यापुढे एक काल्पनिक प्रसंग उभा केला होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये जयपूर येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी बॉम्बस्फोट घडवतात. त्यात भारतीय संरक्षणमंत्र्यांसह शेकडो नागरिक मारले जातात. आता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना आपापल्या प्रतिक्रिया द्यायच्या होत्या. प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीचा हा आभासी अभ्यास (क्रायसिस सिम्युलेशन एक्झरसाइज) होता. भारतीय प्रतिनिधींनी प्रथम नेहमीप्रमाणे राजनैतिक उपाय योजून पाहिले, पण त्यांचा काही परिणाम होत नाही असे दिसून आल्यावर पाकिस्तानच्या माकरान किनाऱ्यावर ‘सागरी प्रतिबंधित क्षेत्र’ लागू करत जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानी सैन्याच्या तळांवर तोफखाना, कमांडो आणि हवाई दलाच्या साह्य़ाने हल्ले सुरू केले. दहशतवादी हल्ल्याला भारत उत्तर देईल याची पाकिस्तानला कल्पना होती, मात्र भारताने इतक्या मोठय़ा प्रमाणावर हल्ले करणे पाकिस्तानला अवाजवी वाटले. तर जयपूरच्या दहशतवादी हल्ल्याची कल्पना पाकिस्तानी लष्कर आणि सरकारला नव्हती असे होऊ शकत नाही, त्यामुळे पाकिस्तानची ही कृती म्हणजे भारताविरुद्ध युद्धच आहे असा विचार भारताने केला आणि त्याला जशास तसे उत्तर देणे आपला स्वसंरक्षणार्थ हक्क असल्याचे मानून कारवाई सुरू केली. सुरुवातीला मर्यादित हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईने काही वेळातच पूर्ण युद्धाचे स्वरूप धारण केले. अखेर पाकिस्तानी प्रतिनिधींनी भारताच्या हल्ल्याला उत्तर म्हणून अण्वस्त्रे डागण्यासाठी सज्ज करण्याची आज्ञा दिली.. या टप्प्यावर कार्यशाळेतील अभ्यास थांबवण्यात आला. त्याचा अहवाल ब्रिगेडियर जनरल फिरोझ खान आणि रायन फ्रेंच यांनी सादर केला आहे.
स्वातंत्र्यानंतर चार युद्धे लढलेल्या आणि अण्वस्त्रक्षमता धारण करणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या भांडखोर शेजाऱ्यांमध्ये एका दहशतवादी कारवाईने युद्धाचा भडका उडून तो काय थराला जाऊ शकतो, हेच त्यातून दिसून आले. लुटुपुटुच्या लढाईतील हा प्रसंग प्रत्यक्षात उतरण्याची शक्यताही तितकीच मोठी आहे.
असेच मोकळे सोडायचे?
जॉर्ज पकरेविच आणि टॉबी डाल्टन या लेखकद्वयीने ‘नॉट वॉर, नॉट पीस: मोटिव्हेटिंग पाकिस्तान टू प्रिव्हेंट क्रॉस-बॉर्डर टेररिझम’ या ताज्या पुस्तकात हा प्रसंग वर्णिला आहे. जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कराच्या उरी येथील तळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याला उत्तर म्हणून भारतीय सेनादलांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेले ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ या पाश्र्वभूमीवर या अभ्यासाचे महत्त्व लक्षात यावे. भारतावर प्रत्यक्ष युद्धात विजय मिळवणे अशक्य असल्याचे पाकिस्तानला कळून चुकले आहे. त्यामुळे भारताला सतावण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध सुरू ठेवले आहे. पाकिस्तानने अण्वस्त्रे मिळवल्यापासून दोन्ही देशांतील संरक्षणविषयक समीकरणे बदलली आहेत. पाकिस्तानला शिक्षा करण्याच्या भारताच्या क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. पाकिस्तानच्या किंवा त्यांच्या सेनादलांच्या अस्तित्वाला धोका उत्पन्न झाल्यास पाकिस्तान अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देतो. आणि भारताला त्यापुढे नमते घ्यावे लागते. त्यामुळेच १९९९ साली कारगिल युद्धात आपलाच भूभाग परत मिळवताना भारतीय लष्कराला आणि हवाई दलाला नियंत्रण रेषा न ओलांडण्याचे बंधन घालून घ्यावे लागले. संसदेवरील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन पराक्रम’च्या नावाखाली पाकिस्तान सीमेवर पाच लाखांहून अधिक सैन्य जमवले. पण दहा महिने सैन्य तैनात करूनही काही साध्य झाले नाही. पुढे मुंबई हल्ल्यांनंतरही भारत इच्छा असूनही फारसे काही करू शकला नाही. यातून भारतीय राजकीय नेतृत्व, सेनादले, संरक्षणतज्ज्ञ आणि सामान्य जनतेतही एक प्रकारची हतबलतेची भावना घर करू लागली आहे. त्याबरोबरच ही कोंडी फोडून पाकिस्तानला अद्दल घडवण्याची सुप्त खुमखुमीही आहे. पण र्सवकष युद्धाचा आणि अण्वस्त्र हल्ल्याचा धोका लक्षात घेता भारताला आपल्या भावनांना आवर घालावा लागतो. पण मग पाकिस्तानला दर वेळी काही शिक्षा न देता असेच मोकळे सोडायचे का? अण्वस्त्रांच्या बागुलबुवाच्या आडून पाकिस्तान असाच दहशतवादाला खतपाणी घालत असलेले नुसते हतबल होऊन पाहत राहायचे का? हे आजघडीला सर्व भारतीयांना आणि जगालाही पडलेले प्रश्न आहेत. त्यांचा मागोवा घेणे हाच या पुस्तकाचा विषय आहे. उरी हल्ला आणि भारताचे ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ यांच्या पाश्र्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित होणे याहून चांगली समयोचितता त्यासाठी असूच शकत नाही.
जॉर्ज पकरेविच हे अमेरिकेतील ‘कार्नेगी एन्डोवमेंट ऑफ फॉर इंटरनॅशनल पीस’ या संशोधन संस्थेत उपाध्यक्ष असून त्यांचा दक्षिण आशियातील संरक्षणविषयक प्रश्न आणि अणुधोरणांचा तीन दशकांचा व्यासंग आहे. यापूर्वीचे त्यांचे ‘इंडियाज न्युक्लिअर बॉम्ब’ हे पुस्तक बरेच गाजले होते. पुस्तकाचे सहलेखक टॉबी डाल्टन ‘कार्नेगी एन्डोवमेंट ऑफ फॉर इंटरनॅशनल पीस’ या संस्थेतील अण्वस्त्र धोरणविषयक कार्यक्रमाचे सहसंचालक आहेत. दक्षिण आणि पूर्व आशियातील अण्वस्त्र प्रश्नांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. डाल्टन यांनी २००२ ते २०१० या काळात अमेरिकी ऊर्जा विभागात विविध पदे सांभाळली आहेत. भारतावर पुन्हा मुंबईसारखा दहशतवादी हल्ला झाला तर भारत काय करेल याचे आडाखे त्यांनी या पुस्तकात बांधले आहेत. भारत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मर्यादित हवाई हल्ले करेल, पाकिस्तानच्या बलुचिस्तानसारख्या प्रदेशातील असंतुष्ट घटकांना मदत वाढवेल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करण्याचा प्रयत्न करेल, असे भाकीत या लेखकांनी प्रस्तुत पुस्तकात केले आहे. उरी हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया पाहता ते भाकीत सत्याच्या किती जवळ जाणारे होते हे लक्षात येते, तसेच लेखकांच्या आणि पुस्तकाच्या क्षमतेबद्दलही खात्री पटते.
चार प्रमुख उद्दिष्टे
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून भारताच्या कारवाईची चार प्रमुख उद्दिष्टे असली पाहिजेत असे लेखकांनी म्हटले आहे – १. हल्ल्यामुळे भारतीय जनमानसात तयार झालेली बदल्याची भावना शमवणे आणि त्यायोगे जनतेचा सरकारवरील विश्वास उडणार नाही याची खात्री करणे, २. पाकिस्तानला दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यास भाग पाडणे आणि पुन्हा अशी आगळीक घडणार नाही याचे अभिवचन मिळवणे, ३. दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सेनादलांनी सुरू केलेली कारवाई युद्धात परिवर्तित होणार नाही यासाठी पाकिस्तानवर जरब बसवणे, ४. ही कारवाई अशा वेळी बंद करणे की ज्यातून कारवाई केली नसती तर बरे झाले असते असा विचार करण्याची वेळ भारतावर येणार नाही किंवा कारवाईपूर्वी भारताची जी स्थिती होती त्याहून वाईट परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता बाळगणे.
या ठिकाणी लेखकांनी पुस्तकाला दिलेल्या उपशीर्षकातील ‘मोटिव्हेटिंग’ हा शब्द महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. त्यात पाकिस्तानच्या वर्तनात भारताला अपेक्षित असलेला बदल घडवण्यासाठी बळाचा तसेच अन्य मार्गाचा वापर करणे अध्याहृत आहे. ही ध्येये साध्य करण्यासाठी भारताकडे कोणते पर्याय आहेत त्यांचा सविस्तर ऊहापोह पुस्तकातील पुढील प्रकरणांत आहे.
त्यात भारताची बहुचर्चित ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ किंवा ‘प्रोअॅणक्टिव्ह स्ट्रॅटेजी’, मर्यादित हवाई हल्ले, पाकिस्तानमध्ये गुप्त प्रतिकारवाया (कॉव्हर्ट ऑपरेशन्स), अण्वस्त्रांचा वापर आणि अन्य शांततामय आणि राजनैतिक पर्याय यांचा समावेश केला आहे. मात्र हे मार्ग अवलंबण्यासाठी प्रथम भारतीय राजकीय आणि लष्करी निर्णयप्रक्रियेत आणि यंत्रणेत कोणत्या त्रुटी आहेत आणि त्या काढून टाकण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे हे सुरुवातीच्या प्रकरणात सांगितले आहे. वरील सर्व पर्यायांच्या काही जमेच्या व तोटय़ाच्या बाजू आहेत. तसेच त्यातील कोणताही पर्याय अवलंबला तरीही र्सवकष आणि अणुयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे, याकडे लेखकांनी लक्ष्य वेधले आहे. याशिवाय हे पाचही उपाय करण्यासाठी भारताकडे सध्या पुरेशी राजकीय, आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी क्षमता नाही हेही दाखवून दिले आहे. तसेच भारतातील धिम्या गतीने चालणारी निर्णयप्रक्रिया आणि निश्चित ध्येयधोरणे न आखता केलेली शस्त्रास्त्रखरेदी आणि त्यातीलही दिरंगाई पाहता नजीकच्या भविष्यकाळात अपेक्षित क्षमता प्राप्त करणेही कठीण असल्याचे सूचित केले आहे.
संसदेवरील हल्ल्यानंतर २००४ साली भारतीय लष्कराने ‘कोल्ड स्टार्ट डॉक्ट्रिन’ किंवा ‘प्रोअॅहक्टिव्ह स्ट्रॅटेजी’ नावाने ओळखली गेलेली नवी युद्धनीती अवलंबली. पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक घडल्यास अणुयुद्धाचा धोका उद्भवू न देता (म्हणजेच ‘न्युक्लिअर थ्रेशोल्ड’ पार न करता) पाकिस्तानच्या भूमीत विद्युतवेगाने मर्यादित हल्ले करणे, १० ते १५ किलोमीटर मुसंडी मारून थोडा भूप्रदेश काबीज करणे आणि त्याच्या आधारे पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास भाग पाडणे असा त्याचा उद्देश होता. त्यासाठी भारतीय सेनादलांनी फेररचना करून ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स’ आणि ‘स्ट्राइक कोअर्स’ स्थापन करण्यावर भर दिला गेला. भारताच्या या संभाव्य कारवाईला रोखण्यासाठी पाकिस्तानने कमी क्षमतेची लहान अण्वस्त्रे (टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन्स) असलेली ‘नस्र’ नावाची लघु पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित केली. युद्धप्रसंगी ती वापरण्याची जाहीर धमकीही दिली. या ठिकाणी पुस्तकातील एक लष्करी संज्ञा समजून घेणे उद्बोधक ठरेल – ‘एस्कलेशन कंट्रोल’. म्हणजेच युद्धाची तीव्रता आपल्याला हवी तशी वाढवण्याची आणि त्याच्या प्रत्येक टप्प्यावर युद्धावर नियंत्रण ठेवण्याची आणि हव्या त्या वेळी युद्ध थांबवण्याची क्षमता. ती सध्या भारताकडे नाही याकडे लेखकांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.
भारतीयांचा भ्रम
भारतात सध्या एक सर्वसाधारण गैरसमज आहे की, मनात आणल्यास आपण पाकिस्तानला केव्हाही बदडून काढू शकतो. तो कसा भ्रम आहे हे पुस्तकातील विवेचनावरून कळते. १९८० च्या दशकातील बोफोर्स तोफा खरेदीत कथित दलालीच्या प्रकरणानंतर भारतीय लष्करात नव्या तोफा दाखल झालेल्या नाहीत, रणगाडय़ांचा दारूगोळा मोठय़ा युद्धात जेमतेम ४ ते ५ दिवस पुरेल इतकाच आहे, सर्व रणगाडे आणि सैनिकांसाठी रात्री पाहण्याची सोय असलेली उपकरणे (नाइट व्हिजन डिव्हायसेस) नाहीत, हवाई दलात लढाऊ विमानांची कमतरता आहे, नौदलाकडे पाणबुडय़ा आणि अन्य युद्धनौकांचा तुटवडा आहे, मिग-२५ विमाने सेवेतून कमी केल्यानंतर हवाई दलाकडे हवाई टेहळणीची यंत्रणा अपुरी आहे, सध्याचे चार टेहळणी उपग्रह पुरेसे नाहीत, पाकिस्तानच्या तुलनेत भारताची अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र सज्जता मागे पडत आहे, शत्रुप्रदेशात गुप्त कारवाया करायच्या तर त्यासाठी लागणारी अचूक गुप्त माहिती संकलित करण्याची मानवी आणि तांत्रिक साधने पुरशी नाहीत, शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची यंत्रणा (एअर डिफेन्सेस) कमकुवत आहेत, त्यामुळे शत्रूच्या हवाई किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यापासून भारतीय शहरे आणि लष्करी केंद्रे वाचतीलच याची खात्री देता येत नाही, भारतीय भूदल- नौदल आणि वायुदलात समन्वय नाही; अशा त्रुटींची जंत्रीच लेखक देतात. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आजवर कशी एकही शस्त्रास्त्रप्रणाली देशाच्या सेनादलांना खात्रीशीरपणे आणि वेळेवर देऊ शकलेली नाही आणि ‘डीआरडीओ’च्या शास्त्रज्ञांना एखादी शस्त्रप्रणाली पूर्ण विकसित होऊन तिची उपयोगिता सिद्ध होण्यापूर्वीच प्रसिद्धी करण्याची कशी सवय जडली आहे, हेही पुस्तकात अधोरेखित केले आहे.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तानने भारताविरुद्ध कमी तीव्रतेच्या (सब-कन्व्हेन्शनल), पारंपरिक (कन्व्हेन्शनल) आणि अण्वस्त्रसज्ज (न्युक्लिअर) अशा तिन्ही युद्धांच्या पातळीवर साधारण बरोबरी साधली आहे. त्यामुळे अणुयुद्धाचा भडका उडून सर्वनाश ओढवून न घेता पाकिस्तानला युद्धात नमवणे भारतासाठी अशक्य बनत चालले आहे. त्यामुळे भारतासाठी कारवाईची खूप मर्यादित चौकट (विंडो किंवा मॅनुव्हरेबल स्पेस) उपलब्ध आहे हे लक्षात घेतले पाहिज, असे लेखकद्वयाचे सांगणे आहे. अलीकडल्या उरी हल्ल्यानंतरच्या ‘सर्जिकल स्ट्राइक्स’कडेही त्याच मर्यादित दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. अशा वेळी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक कोंडी करणे, सिंध-बलुचिस्तानमधील असंतुष्ट घटकांना मदत करणे, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानवर आर्थिक र्निबध आणणे असेच पर्याय भारताकडे उरतात. अमेरिका आणि चीनला पाकिस्तान अद्याप उपयोगी वाटत असल्याने त्यांच्या वापरावरही मर्यादा आहेत. या परिस्थितीत भारताने आपल्या आर्थिक, लष्करी आणि अन्य क्षमता वृद्धिंगत करत राहणे आणि एकंदर विकासाच्या मार्गावर लक्ष केंद्रित करणे हेच श्रेयस्कर ठरते. दहशतवादाचा भस्मासुर आपल्यावरच उलटून आत्मनाशास कारणीभूत ठरू शकतो हे तोवर पाकिस्तानला कळू शकेल अशी अपेक्षा बाळगणे, हेच सध्या हातात आहे, असे पुस्तक सूचित करते.
अशा वेळी देशभक्त भारतीय वाचकांना हताशा येण्याची शक्यता आहे. सध्या आपणा सर्वानाच भेडसावणाऱ्या प्रश्नांची थेट उत्तरे या पुस्तकात नाहीत. पण ती शोधण्यासाठी अभ्यासाची पद्धतशीर चौकट पुरवण्याचे काम पुस्तक चोखपणे करते, तेही अगदी योग्य वेळी!
‘नॉट वॉर, नॉट पीस- मोटिव्हेटिंग पाकिस्तान टु प्रिव्हेंट क्रॉस-बॉर्डर टेररिझम’
लेखक : जॉर्ज पकरेविच, टॉबी डाल्टन
प्रकाशक : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस,
माजी मुख्यमंत्र्याचे काळ्या पैशाचे इमले! मध्य मुंबईतील प्रकल्पात कोटय़वधींची गुंतवणूक; विकासकाविरोधात गुन्हा दाखल
<
विशेष प्रतिनिधी, मुंबई | November 6, 2016 1:08 AM
माजी मुख्यमंत्र्याचे काळ्या पैशाचे इमले!
मध्य मुंबईतील प्रकल्पात कोटय़वधींची गुंतवणूक; विकासकाविरोधात गुन्हा दाखल
मध्य मुंबईतील करी रोड येथे उभ्या राहत असलेल्या आलिशान प्रकल्पात एका स्वाभिमानी माजी मुख्यमंत्र्याच्या कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या विविध कंपन्यांचा काळा पैसा वापरण्यात आला असावा, असा दाट संशय आल्याने सक्तवसुली महासंचालनालयाने चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता संबंधित माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीयही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
करी रोड येथील हा आलिशान प्रकल्प खोटी कागदपत्रे सादर करून चार इतके चटईक्षेत्रफळ मिळविल्यामुळे याआधीच अडचणीत आला आहे. आता या प्रकल्पात माजी मुख्यमंत्री आणि त्याच्या कुटुंबीयांचा बेनामी पैसा (सुमारे ३०० कोटी रुपये) वापरला गेल्याची चौकशी सुरू झाल्यामुळे अडचणीत अधिक भर पडली आहे. सक्तवसुली महासंचालनालयाकडून या प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असता परदेशातील पैसा भारतीय कंपन्यांमध्ये वळवून तो या प्रकल्पासाठी वापरला गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यावरूनच तूर्तास विकासकाविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता विकासकाला चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. विकासकाचे जबाब नोंदविल्यानंतर संबंधित माजी मुख्यमंत्री तसेच त्याच्या कुटुंबीयांनाही पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या गुन्ह्य़ाचा तपास सध्या सुरू असून या गुन्ह्य़ात प्रकल्पाला अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक कंपन्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कंपन्या संबंधित माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपन्यांचे दहा रुपयांचे समभाग हजार रुपयांना विकण्यात आले आहेत आणि पुन्हा ते समभाग ९० पैशांना विकत घेण्यात आले आहेत. या कंपनीचा प्रत्यक्षात कुठल्याही स्वरुपाचा व्यवहार नसताना वा कुठलाही महसूल उपलब्ध नसतानाही या कंपन्यांमधील पैसा अन्य उपकंपन्यांमध्ये वळविण्यात आला आहे. त्यानंतर तो या प्रकल्पासाठी वळविण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे या प्रकरणी संबंधितांचा जबाब नोंदविला जाणार आहे. त्यानंतरच संबंधितांवर गुन्हा दाखल करावयाचा किंवा नाही, याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत सक्तवसुली महासंचालनालयाचे मुंबईतील संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र महासंचालनालयाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी चौकशी सुरू असल्याचे मान्य केले. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे सध्या काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये तुरुंगात आहेत. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री आणि त्याच्या कुटुंबीयांचा सहभाग उघड झाल्यास भुजबळ यांच्या पाठोपाठ बडी राजकीय व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या चौकशीत परदेशातील पैसा भारतीय कंपन्यांमध्ये वळवून तो या प्रकल्पासाठी वापरला गेल्याचे स्पष्ट
तूर्तास विकासकाविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
भ्रष्टाचाराचा मार्ग..
प्रकल्पाला अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपन्या या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांशी संबंधित.
या कंपन्यांचे दहा रुपयांचे समभाग हजार रुपयांना विकण्यात आले.
नंतर पुन्हा ते समभाग ९० पैशांना विकत घेण्यात आले.
या कंपनीचा प्रत्यक्षात कुठल्याही स्वरूपाचा व्यवहार नसताना वा कुठलाही महसूल उपलब्ध नसतानाही या कंपन्यांमधील पैसा अन्य उपकंपन्यांमध्ये वळविण्यात आला.
त्यानंतर तो या प्रकल्पासाठी वळविण्यात आला
कारण अख्ख्या जगाला माहिती आहे... शिवाजी काय होते. पण भारतातील लोकांनाच माहित नाही. असो .
CHINAS ECONOMIC WAR WITH INDIA-China’s secret weapons in trade battle with India are NON TRADE BARRIERS A small-time exporter from Mumbai wanted to ship out engineering goods to China. He was told that a Chinese team was required to visit his factory and he would have to pay for it.
टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी-Arnab had little time for dissidents, contrarians and post-nationals. He resolutely and unambiguously upheld a simple, uncluttered nationalism that liberals saw as crude, jingoistic and lacking nuance.-Regardless of how Arnab re-enters the TV screens in his new avatar, his contribution to reshaping the media discourse has been seminal-SWAPAN DASGUPTA
IIndian ARMY ने 13 वर्षांत प्रथमच LoC वर वापरल्या तोफा, पाकिस्तानचे 40 सैनिक ठार काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यात गेल्या महिन्यात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 4 चौक्या उडवण्यासाठी तोफा (आर्टिलरी गन्स) चा वापर केला होता. या कारवाईत 40 पाकिस्तानी सैनिकही मारले गेले होते.ndian Army wiped out Pakistan’s company headquarters; killed 20 Pakistani soldiers to avenge beheading: Report The Indian Army destroyed four Pakistan Army posts in its October 29 strike, inflicting immense damage and killing at least 20 Pakistani soldiers.
Friday, 4 November 2016
टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आणि सोशल मीडियाला जणू भूकंपाचा झटकाच बसला- मुंबई तरुण भारत 02-Nov-
Subscribe to:
Posts (Atom)