Total Pageviews

Sunday, 11 August 2013

BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: NAIK KUNDLIK MANE PUNCH

BRIG HEMANT MAHAJAN NATIONAL SECURITY: NAIK KUNDLIK MANE PUNCH: हे व्यर्थ न हो बलिदान काश्‍मीरमध्ये जवान जिवाची बाजी लावून लढताहेत; पण त्यांनी नियंत्रणात आणलेल्या परिस्थितीचा देशहिताच्या दृष्टीने फाय...

NAIK KUNDLIK MANE PUNCH

हे व्यर्थ न हो बलिदान काश्‍मीरमध्ये जवान जिवाची बाजी लावून लढताहेत; पण त्यांनी नियंत्रणात आणलेल्या परिस्थितीचा देशहिताच्या दृष्टीने फायदा करून घेण्याचे राजकीय नेत्यांना जमले नाही; उलट विघातक राजकारणाने परिस्थिती चिघळत आहे. संकुचित सत्ताकारण देशकारणावर कुरघोडी करत आहे.दरवर्षी भारतीय लष्करातील दहा ते पंधरा अधिकारी आणि २50 ते ३00 जवानांना काश्‍मीरसाठी वीरमरण येते. जबर जखमींची संख्या याच्या चौपट आहे.सध्या जम्मू आणि काश्‍मीरमधून २५0 ते ३00 दहशतवादी कारवाया करीत आहेत. याशिवाय १000 ते १500 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पूछ विभागातल्या सरला चौकीजवळ जवळ गस्त घालणाऱ्या सहा जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला केल्या मुळे आपले पाच जवान शहीद झाले.या मध्ये ४ जवान २१ बिहार बटालियनचे होते आणि नायक कुंडलिक माने हे १४ मराठा लाईट इन्फंट्रीचे होते.या हल्यामुळे माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या.याच भागात मी माझी बटालियन ७ मराठा लाईट इन्फंट्री बरोबर पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी थाम्बावयाचे काम १९९५-१९९८ सालामध्ये केले होते. बटालियनला केलेल्या कामगिरी बद्दल १७ शुरता पुरस्कार मिळाले.हे करताना आमचे तिन जवान शहिद झाले. पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झालेले असतानाही, पाकिस्तानी लष्करालाच निर्दोष ठरवणारे संरक्षण मंत्री अँटोनी हे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, आहेत काय? या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. सरहद्द ओलांडून वारंवार भारतीय चौक्यावर आणि जवानांवर हल्ले चढवायला सोकावलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून या घटनेचा सूड घ्यायला हवा, अशा संतप्त प्रतिक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटल्या,अशाच प्रतिक्रिया संतप्त भारतीयांच्या पण होत्या. लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी जवानांनीच हा हल्ला चढवल्याचे नमूद केले . पण या घटनेचा जाब सरकारला विचारणाऱ्या विरोधकांचा ,भारतीय जनतेचा आणि लष्कराचा अवमान संरक्षण मंत्री अँटोनी यांनी या चर्चेला उत्तर देताना केला. अँटोनी यांनी मात्र पाकिस्तानी लष्कराच्या वेशात घुसलेले ते दहशतवादी असल्याचा दावा करून,अवसानघातकी कृत्य केले. संरक्षण मंत्र्याच्या या असल्या आणि पाकिस्तानला वाचवायच्या वक्तव्याने, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला अधिकच चेव येईल, शस्त्रसंधी मोडून भारतीय जवानांवर हल्ले करायला चिथावणी मिळेल याचेही भान अँटोनी यांना राहिलेले नाही. काय अर्थ आहे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाचा? सीमांचे संरक्षण करत असताना भारतीय सैन्य कायमच शीर तळहाती घेऊन वावरत असते आणि आपले कर्तव्य बजावताना कोणत्याही क्षणी प्राणांचे मोल द्यायला तयार असते, हे नायक कुंडलिक माने यांच्या बलिदानाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कुंडलिक तू खरोखरच वीरमरण पत्करलेस. ती लढाई अत्यांत अटीतटीची आणि तीव्र होती. तुझ्या गौरवास्पद बलिदानाचा विचार मी करू लागलो आणि दुःख, अस्वस्थता, निराशा, अभिमान अशा सर्वच भावनांनी मनात गर्दी केली. काय हे अर्थ आहे. तुझ्या बलिदानाचा? तुझ्या त्यागाचा ? एका लहानशा खेड्यातला तुझा जन्म. तू लष्करात भरती झालास. का निवड केलीस तू लष्कराची ? नोकरी मिळवण्यासाठी, तेवढेच एक उत्तर नक्कीच नाही. कुटुंबातील पार्श्‍वभूमी, देशप्रेम या अनेक कारणांमुळे तू लष्करात दाखल होण्यास प्रेरित झालास? आज मात्र तू या जगात नाहीस. राष्ट्रसेवेच्या साऱ्या स्वप्नांनी धगधगणारी तुझी छाती आता कायामची थंडावलीय. एखाद्या राष्ट्रीय स्मारकावर आम्ही तुझे नाव कोरून ठेवणार नाही कारण आम्ही अजून तसे स्मारकच उभारले नाहीये. तुझ्यासारख्याच अनेक वीरपुत्रांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडया गेटवर जळते आहे, पण त्याच इंडिया गेटवर तुझे नाव मात्र आम्ही कोरणार नाही. कारण त्यावर ब्रिटिशांसाठी लढलेल्या तत्कालिन जवानांची नावे आहेत. यापेक्षा विरोधाभास ते कोणता. पण अगदीच काही निराश होऊ नकोस. तुझे लष्करी सहकारी नक्कीच तुझी कदर करतील. काश्‍मीर खोऱ्यातून तुला निरोप देताना सर्वात ज्येष्ठ अधिका्र्यानी तुला अन्य अधिकाऱ्यांसह मानवंदना दिली. तुझ्या युनिटचे प्रतिनिधीनी तुला घरी पोहचवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या तिरंग्यासाठी तू तुझे प्राण वेचलीस त्या छतात लपेटूनच तुझा देह अंतिम संस्कारासाठी नेला गेला.तुझ्या अन्तदर्शनाला ऊसळलेला जनसागर या आधी कधिच बघितला नव्हता. तुझ्या वडील,आई, पत्नी मुलाच्या दुःखभरल्या डोळ्यातून अखंड वाहणारी आसवे आणि तुझ्या अकाली जाण्याने प्रचंड धक्का बसलेले आणि दिग्‌मूढ झालेले तुझे कुटुम्ब यांना पाहून पाषाणालाही पाझर फुटला. तुझ्या युनिटचे अधिकारी तुला शौर्यापदक मिळावे यासाठी निश्‍चितच प्रयत्न करतील. कालांतराने तुझी पत्नीला ते शौर्य पदक देऊ केले जाईल आणि अत्यंत गर्वाने तुझ्या घरांत ते मिरवले जाईल. तुझ्यासारखेच अनेक जवान कारगिलच्या भूमीवर धारातीर्थी पडले. परंतु आज त्या अत्यंत पराक्रमी जवानांचा साधा स्मृतिदिनदेखील साजरा करणे या देशवासीयांना जमत नाही. त्या अत्यंत वीरश्रीपूर्ण लढाईची आठवणही दरवर्षी योग्य त्या पद्धतीने केली जात नाही. "शौर्य गाथा भवन" मध्ये तुझे नाव अमर राहील मात्र तुझे युनिट १४ मराठा लाईट इन्फंट्री आणि तुझ्या रेजिमेंटमध्यो तुझे नाव चिरकालासाठी कोरुन ठेवले जाईल. युनिटच्या क्वार्टर गार्डवर देखील तुझे नाव येऊन दरवर्षी तुला आदरांजली वाहिली जाईल. तुझे फॉर्मेशन हेडक्वार्टर आणि रेजिमेंटल सेंटरमध्ये तुझे नाव अभिमानाने झळकत राहील. बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्री रेगिमेन्ट्ल सेन्टर प्रशिक्षण केंद्रावरील "शौर्य गाथा भवन" मध्ये तुझे नाव राहील. सेवेत दाखल होण्याआधी प्रत्येक जवान तुला या भवना मध्ये येऊन वंदन करेल. काही वर्तमानपत्रांमध्ये तुझ्या सहकाऱ्यांकडून तुझ्या नावे शोकसंदेशही छापला जाईल. अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करतील. मात्र लष्करी गणवेश ज्यांनी अनुभवला आहे. ते आणी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिक मात्र हा संदेश अत्यांत तपशीलात वाचतील. त्यांना तुझ्याविषयीच्या अभिमानाने भरुन येईल. आयुष्याच्या संध्याकालाकडे झुकताना तुझ्या शौर्याच्या आणि धाडसाच्या आठवणी ही तुझ्या मातापित्यांकडची सर्वात मोठी ठेव असेल. तुझ्या सहवासातील क्षण त्यांच्याकरता सर्वात अनमोल असतील. तुझी प्रिय आई तुझा विचार जेव्हा जेव्हा करेल, तेव्हा तेव्हा तिचे डोळे भरून येतील. मात्र तिच्या त्या अश्रूभरल्या डोळ्यात तुझ्या विषयी तुझे वडील कदाचित धीर गंभीरपणे तुझ्याविषयी बोलत राहतील. मात्र त्या धीरोदात्त संवादातही त्यांची अभिमानाने फुलून आलेली छाती कुणाचाच नजरेतून सुटणार नाही. तुझे नातेवाईक, भावंडे, तुझा गाव आणि परिसर यांच्यासाठी तू कायामच एक रिअल हिरो बनून राहशील. तुझ्या नावाची शाळा उघडली जाईल. गावातल्या एखाद्या चौकाला किंवा रस्त्याला "शहीद कुंडलिक माने मार्ग" असे नाव दिले जाईल. गावकऱ्यांच्या तोंडी तू एक दंतकथा बनून राहशील अजरामर होशील. तू आमच्यातून निघून गेलास. तू प्राणत्याग केलास कारण तुझे कुटुंबीय, तुझे मित्र, तुझे सहकारी या सर्वांनाच अगदी खात्रीच होती, की वेळ येईल तेव्हा तू मागे हटणार नाहीस. आपले कर्तव्य बजावताना प्राणांचेही मोल देत तू त्या साऱ्यांचा विश्‍वास खरा ठरवलास, कुंडलिक आपल्या कर्तव्यापेक्षा खूपच अधिक मोलाचे काम तू करुन दाखवलेस. तू असे तसे मरण पत्करले नाहीस. तुझे बलिदान व्यर्थ नक्कीच नाही. ईश्‍वर आणि सैन्य सर्वांच्याच आदराचा विषय !! मात्र केवळ संकटकाळीच, एकदा का संकट टळावे मग देवाकडे दुर्लक्ष आणि सैन्याचा तर विसरच. जम्मू-काश्‍मीरमधील काही माध्यमेही पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या बातम्या देतात. अशा पत्रकारांविरोधातही कायदेशीर कारवाई करायला हवी. विविध भागांत फुटीरतावादी व दहशतवादी काश्‍मीरमधील जनतेशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून विद्वेषाचे जाळे पसरवत आहेत. सध्या काश्‍मीरमध्ये खोट्या बातम्यांचे पेव फुटले आहे. देशविरोधी खोटे आरोप करून काश्‍मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होते, असे दाखवण्याचा प्रयत्न दहशतवादी करतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन विविध आघाड्यांवर समावेशक धोरण आखायला हवे. अहिंसेच्या अतिरेकी कल्पना, सत्तेचा स्वार्थी जुगार, दहशतवाद्यांना अभय, फुटीरवादाला प्रोत्साहन, सत्तेची हाव, घराणेशाहीची घातक परंपरा आणि त्यातून आलेली हुजरेगिरीची वृत्ती, देशहितापेक्षा सत्तेला आणि स्वार्थाला महत्त्व देण्याची परंपरा अशा दुर्गुणांमुळे देशाची अधोगती होते आहे

Saturday, 10 August 2013

SEPARATIST TARGET HINDUS IN KASHMIR

Black Friday in Kishtwar Jammu, August 10: Friday’s riots in Kishtwar were part of the new strategy known as “agitational terrorism” being adopted by the Hurriyat Conference and other anti-national forces to accomplish their unfinished nefarious agenda of “ethnic cleansing” of minorities from Muslim dominated areas of Jammu and Kashmir. Friday’s riots- in which one Dalit youth was killed by the rioters and more than 200 shops and business establishments belong to the minority Hindu community were especially targeted looted and torched, were well planned and stage managed under the patronage of Minister of State for Home, Sajjad Ahmed Kitchloo whose supporters executed the plan at ground level. Even as the State Government was trying to project that Friday violence at Kishtwar was clashes between two communities but those who were reporting from ground zero giving different pictures as it was not clash but an attack on the minority community to force their migration. The members of the majority community also entered the houses of minority community and torched shops selectively. The looting and arson continued right from Kuleed Chowk to Bus Stand, covering Main Market towards Shaheedi Chowk, Aman Market, Baniya Market and Purana Bazar. Surprisingly, no top police officers and the officials from the administration could be seen anywhere despite the presence of Minister of State for Home and MLA Kishtwar Sajjad Ahmed Kichloo in the town during the clashes. Even when the police personnel fired in air to disperse the mob, given their inadequate strength they failed to control the situation.”, a local news paper “The Kashmir Times”, which is known for its pro-separatist stand, reported while quoting eye-witnesses. According to eye-witnesses trouble started when a group of youth, who were heading towards Eidgah Maidan, were resorted to shouting anti-India and pro-Pakistan slogans near Char Chinar Chowk. Within no time these youth, who were also carrying Pakistani flags with them, resorted to attacking members of minority community. “As everything was already planned, a number of groups spread in the Kishtwar town and resorted to attacking Hindu, their business establishments and houses”, eye witnesses said and added that some the youth were carrying fire arms with them and they started firing on members of the minority community. Stunned by the attack on majority community, members of Hindu minority community rushed towards safer places because forces deployed in the town were watching entire scene as mute spectators. Fear psychosis prevailed among the minorities, which could be well gauged from the fact that the injured civilians of the community were not admitted in the District Hospital, which was located in the area dominated by majority community and were instead taken to Army camps. Four of them were sent to Military Hospital, Udhampur in critical condition. Army staged a flag march in all disturbed areas including Kishtwar town at 7.40 pm resulting into restoration of normalcy but tension prevailed among the minorities, who were frightened following large scale violence unleashed against them by the majority community in the morning leading to massive damage to their property including shops and vehicles. Surprisingly, the free for all situation in Kishtwar continued even when Minister of State for Home Sajjad Ahmad Kitchloo, who happened to be local MLA of Kishtwar, was present in the town. Locals said the miscreants armed with guns, lathis and patrol bottles moved freely in the town and outskirts torching shops, vehicles and looting property without any check by the police, which acted as mute spectators as they reportedly had been directed not to fire at the mob, sources said. Though the Army had moved in at around 12 noon in the day, they eventually took charge of the situation around 7.40 after Chief Minister Omar Abdullah spoke to Defence Minister A K Antony at about 5 pm. The urchins fired at the houses of minorities or those rushing for safety killing one of them on spot, who has been identified as Arvind Kumar Bhagat, 28, son of Des Raj Bhagat R/o Sangram Bhatta and injuring several others, four of them with deep bullet wounds. The injured with gun shots were identified as Sunil Kumar, 27, Rinku, 18, both residents of Cheerji, Anju Singh, 30 R/o Kuleed and Sandeep Kumar, 15, R/o Dachan. They were airlifted from Kishtwar to Batote and then shifted in Army Hospital, Udhampur as authorities feared that their admission in the Government Medical College, Jammu would flare up communal trouble. Background of the attack Actually for the last couple of months, some Over Ground Workers (OGWs) of terrorists have launched a campaign to terrorize minority to force their migration. Even at the time when terrorism was on its peak, terrorists failed to force migration of minorities due to valiant role played by the Village Defence Committees (VDCs) so these OGWs started vicious campaign to get VDCs disband so to accomplish their evil designs. During the last one month, houses of minority community were especially targeted during nights by unidentified masked men in the entire erstwhile Doda district. Implication of daring police officer Shiv Kumar Sharma alias Sonu in fabricated cases was also part of the conspiracy to terrorize minority because Sonu is symbol of anti-terrorist forces in erstwhile Doda district. During the holy month of Ramzan, some members of the Muslim community intensified the campaign to terrorize Hindus. Posters of Parliament attacker Afzal Guru and other terrorists were repeatedly appearing at vital locations but authorities deliberately ignored all such things due to directions from higher level. Even two days before Eid, a delegation of BJP leader from Kishtwar and Doda called on Inspector General of Police (IGP) Jammu zone Rajesh Kumar and briefed him of situation arising out due to activities of some pro-terrorist elements but IGP failed to take any prevent step. Role of MoS Home Sajjad Ahmed Kitchloo As elections of the Jammu and Kashmir Legislative Assembly are scheduled to be held in the year 2014, Minister of State for Home Sajjad Ahmed Kitchloo wants to communalize the situation, rather terrorize the minority, to reap political benefit because he, through his muscle power, has ability to execute rigging in minority dominated areas, as the same was done in the 2008 assembly elections. For the last three days, Mr Kitchloo was camping at Kishtwar and riots took place in his presence. “Surprisingly, despite large scale violence in Kishtwar for almost the full day leading to two fatal casualties, injuries to several others and huge loss of private property, the State Government, Police Department or even the district administration of Kishtwar didn’t issue even a single line press note on the situation despite the fact that senior officers of civil and police administration apart from the Minister of State for Home were camping there”, a reputed news paper of Jammu and Kashmir “Daily Excelsior” reported. Sources said that Kitchloo had given strict directions to the forces not to use force against rioters. “The complete inaction on part of police administration forced minorities living in majority community dominated areas to flee from their houses and take shelter in some safer areas as rampaging mob moved freely carrying weapons and lathis in their hands and targeting shops and business establishments.”, the news paper reported

Thursday, 8 August 2013

FRIENDS OF PAKISTAN

पाकिस्तानचे दलाल? -vasudeo kulkarni पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झालेले असतानाही, पाकिस्तानी लष्करालाच निर्दोष ठरवणारे संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी हे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, दलाल आहेत काय? असा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत केलेला रोखठोक सवाल म्हणजे संतप्त भारतीयांचीच प्रतिक्रिया होय! दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या भागातील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून वीस पाकिस्तानी जवानांनी, गस्त घालणाऱ्या सहा भारतीय जवानांवर अचानक केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संसदेत उमटले. सरहद्द ओलांडून वारंवार भारतीय चौक्यावर आणि जवानांवर हल्ले चढवायला सोकावलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला हवे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून या घटनेचा सूड घ्यायला हवा, अशा संतप्त प्रतिक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटल्या, त्या पाकिस्तानी लष्कर वारंवार चिथावणीखोर कारवाया करीत असल्यानेच. पाकिस्तानने केलेला हा हल्ला अत्यंत भ्याड आणि आंतरराष्ट्रीय नियमांनाही चूड लावणारा असल्याची प्रतिक्रिया लष्कराकडून व्यक्त झाली होती. पाकिस्तानच्या लष्करी जवानांनीच हा हल्ला चढवल्याचे लष्कराने नमूद केले होते. पण या घटनेचा जाब सरकारला विचारणाऱ्या विरोधकांचाच नव्हे, तर भारतीय जनतेचा आणि लष्कराचाही अवमान संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी या चर्चेला उत्तर देताना केला, ही दुर्दैवी बाब होय! पूृँछ विभागातल्या सरल चौकीजवळच्या चकादाबाद जवळ गस्त घालणाऱ्या पाच जवानांवर पाकिस्तानी लष्कराच्या तुकडीने अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला चढवल्याचे लष्कराचे म्हणणे होते. पण अँटोनी यांनी मात्र पाकिस्तानी लष्कराच्या वेशात घुसलेले ते दहशतवादी असल्याचा दावा करून, त्या जवानांच्या हौतात्म्यालाच डांबर फासायचे अवसानघातकी आणि निंद्य कृत्य केल्यानेच विरोधकांनी सरकारच्या या नेभळट-पाकिस्तान धार्जिण्या, बोटचेप्या धोरणाचा दाहक शब्दात निषेध केला, ते योग्यच झाले. अँटोनी हे भारताचे की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आहेत? चौकशी न करताच, त्यांनी हे आगलावे वक्तव्य कसे केले, लष्करावर ते दडपण आणत आहेत, अशा आरोपांची सरबत्ती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी अँटोनी यांच्यावर केली, ती मुळीच वावगी नाही. दिल्लीत बसून, तो हल्ला पाकिस्तानी लष्कराने नव्हे, तर दहशतवाद्यांनी केल्याचे अँटोनी यांना कसे समजले? असा जळजळीत सवालही सिन्हा यांनी विचारला आहे. संरक्षण मंत्र्याच्या या असल्या पडखाऊ आणि पाकिस्तानला वाचवायच्या वक्तव्याने, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराला अधिकच चेव येईल, शस्त्रसंधी मोडून भारतीय जवानांवर हल्ले करायला चिथावणी मिळेल याचेही भान अँटोनी यांना राहिलेले नाही. अँटोनी यांनी केलेल्या वक्तव्यानंतरच लष्कराने या हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले. ते अँटोनी यांना जाणून बुजून मागे घ्यायला लावले असावे, या संशयाला त्यांच्या भंपक वक्तव्याने बळकटी येते. संरक्षण मंत्रीच देशाच्या आणि आपल्या लष्कराच्या हिताला चूड लावून, शत्रुराष्ट्राची तळी उचलत असेल तर, या असल्या नादान-नालायक संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला कसले संरक्षण मिळणार? देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहणार? आपले प्राण तळहातावर घेऊन सीमेवर चोवीस तास गस्त घालणाऱ्या जवानांच्या मनोधैर्यावरच आघात करणारे अँटोनी यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय हिताची होळी करणारेच असल्याने, त्याचा निषेधच करायला हवा. त्यांनी पाकिस्तानला निष्कलंक ठरवून पाच शहिदांच्या बलिदानाचाही घोर अपमान केला आहे. या आगलाव्या वक्तव्याबद्दल त्यांनी संसदेची आणि देशाची-लष्कराचीही माफी मागायला तर हवीच, पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या असल्या पळपुट्या संरक्षण मंत्र्याला घरी पाठवायला हवे. अन्यथा आगामी काळात उत्तर सीमेवर चीनकडून आणि पूर्व सीमेकडून पाकिस्तानकडून घुसखोरीच्या, हल्ल्यांच्या घटनात नक्कीच वाढ होईल, याचाही गंभीर विचार डॉ. सिंग यांनी करायला हवा. लष्कराचाही विश्वासघात गेल्या तीन वर्षात पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय सीमेवर 300 पेक्षा अधिक हल्ले चढवून शस्त्रसंधी मोडल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही अनेक जवानांना पाकिस्तानच्या लष्कराने अचानक केलेल्या गोळीबारात शहीद व्हावे लागले. अशा घटना घडल्यावर अँटोनी हे नेहमीच पाकिस्तानचा निषेध करतात. कधी या निषेधाचे शब्द तीव्र असतात, हे असले हल्ले मोडून काढायला भारतीय लष्कर समर्थ असल्याच्या वल्गना करतात. प्रत्यक्षात मात्र त्यांचे वर्तन हे पडखाऊ आणि लष्कराचाही विश्वासघात करणारेच आहे. लडाखच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर चीनी सैनिकांच्याकडून वारंवार घुसखोरी होत असतानाही, ती थोपवायसाठी अँटोनी लष्कराला मोकळीक देत नाहीत. तीन वर्षांपूर्वी लडाखच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी लष्कराकडे असताना ती केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्याकडे घेतली. चीनी लष्कराच्या घुसखोरीत वाढ झाली. दौलत बेग ओल्डी भागात चीनी लष्कराने भारतीय हद्दीत वीस किलोमीटर घुसखोरी करून तंबू ठोकले. त्या घटनेचा प्रचंड गाजावाजा झाल्यावर याच अँटोनी यांनी चुमूर भागातले भारतीय लष्कराने बांधलेले बंकर पाडून टाकायच्या अटीवर चीनने माघार घेतली. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी भारतीय जवानांच्या गस्ती पथकाला चीनी लष्कराने अडवून मागे जायला भाग पाडल्याची घटना घडली. अँटोनी यांना भारतीय लष्कराच्या आणि सीमेच्या, देशाच्या हितापेक्षा शांतता महत्त्वाची वाटते. त्या अघोरी शांततेच्या बदल्यात त्यांनी जवानांच्या शौर्यावरही निखारे ठेवायचा अधमपणा केला आहे. प्रेमनाथ सिंह, शंभू सरन राय, विजय कुमार राय, रघुनंदन प्रसाद आणि पुंडलिक माने या पाच जवानांचे पूृँछ सीमेत पाकिस्तानी जवानांनी बळी घेतले. या शहीदांच्या हौतात्म्याचा अवमान करणाऱ्या अँटोनी यांना, विरोधकांच्या, जनतेच्या संतापाचीही पर्वा नाही. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाही अँटोनी मात्र शांततेची जपमाळ ओढत संसदेच्या साक्षीनेच पाकिस्तानची तळी उचलत आहेत, हे महाभयानक होय! लष्करप्रमुख विक्रम सिंह यांनी पूँछ भागाचा तातडीने दौरा करायची घोषणा केली. जवानांचे मनोधैर्य कायम राखायसाठी ते या भागातल्या जवानांना भेटतील, शहिदांच्या कुटुंबीयांचेही सांत्वन करतील, पण हल्ला करणाऱ्या शत्रूवर शस्त्रच उगारायचे नाही, गप्प बसायचे, हे असले देशविघातक धोरण अँटोनी यांनी स्वीकारलेले असल्याने, सिंह आणि लष्कराचे हातही बांधले गेले आहेत. त्यांच्या शौर्याला सरकारच्या लेखी काही किंमत राहिलेली नाही. अँटोनी यांनी पाकिस्तानला या घटनेबद्दल निर्दोष ठरवताच, पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांना या हल्ल्याचा तातडीने इन्कार करायची संधी मिळाली. अँटोनी यांच्या लष्करावरच बंधने आणायच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये धर्मांध दहशतवाद्यांना घुसवायची पाकिस्तानची कट-कारस्थाने यशस्वी होतील, हे नक्की

Wednesday, 7 August 2013

Tuesday, 6 August 2013

Saturday, 3 August 2013

MYANMAR MUSLIMS

<म्यानमारमधील मुस्लिम समाजावर विविध बंधनं-प्रा. अविनाश कोल्हे-नवशक्ती-०३/०८/२०१३ म्यानमार हा देश बुद्धीस्ट बहुसंख्य असलेला देश आहे. तेथे सत्तेची सर्व महत्वाची स्थानं बुद्धिस्टांच्या हाती आहे. असे असले तरी तेथे मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. म्यानमारमधिल पश्चिम राखिन या प्रांतात तर मुस्लिम समाज बराच आहे. यामुळे तेथिल बुद्धिस्ट सत्ताधारी वर्गाला चिंता वाटायला लागली. यावर त्यांनी एक आगळाच उपाय काढला आहे.आपल्या देशातील अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या हा एक ज्वलंत विषय असतो. हिंदुत्ववादी अभ्यासक मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा नेहमी उपस्थित करत असतात. भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे व लवकरच या देशात दुसरा पाकिस्तान निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात असते. या प्रचाराला मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती खतपाणी घालत असतात. `उनके पाच तो हमारे पच्चीस’ वगैरे घोषणा मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती सतत करत असतात. यामुळे हिंदुत्ववादी शक्तींच्या प्रचाराला धार चढते. अशा विषारी प्रचारामुळे आपल्या देशातील सामाजिक शांतता धोक्यात येत असते याचा कोणी विचार होत नाही. यामुळे इतर देशांत अल्पसंख्याक समाजाच्या लोकसंख्येची समस्या कशी हाताळतात हे जाणून घेणे उद्बोधक ठरू शकते. म्हणून आपला शेजारी देश म्यानमार हे कसे करतो हे समजून घेणे गरजेचे ठरते. म्यानमार हा देश बुद्धीस्ट बहुसंख्य असलेला देश आहे. तेथे सत्तेची सर्व महत्वाची स्थानं बुद्धिस्टांच्या हाती आहे. असे असले तरी तेथे मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. म्यानमारमधिल पश्चिम राखिन या प्रांतात तर मुस्लिम समाज बराच आहे. यामुळे तेथिल बुद्धिस्ट सत्ताधारी वर्गाला चिंता वाटायला लागली. यावर त्यांनी एक आगळाच उपाय काढला आहे. मे 2013 मध्ये पश्चिम राखिन प्रांतातील सरकारी अधिकारी वर्गाने असा नियम काढला की यापुढे त्या भागातील मुस्लिम समाजाने प्रत्येक कुटूंबात दोनपेक्षा जास्त मुलं होऊ द्यायची नाहीत. याद्वारे तेथील अधिकारी वर्गाची अशी अपेक्षा आहे की ते मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येला पायबंद घालू शकतील. अशाच प्रकारचा नियम मुस्लिम समाजातील बहुपत्नी प्रथेला आळा घालण्यासाठीही करण्याचा सरकार विचार करत आहे. सध्या दर कुटुंबामागे फक्त दोनच मुलं हा नियम पश्चिम राखिन प्रातांतील काही गावांनाच लागू करण्यात येत आहेत. जी गावं बांगलादेशच्या सीमेच्या जवळ आहेत त्या गावांना हा नियम लागू होईल. उदाहरणार्थ, बुथिडांग व मौंडाव या गावांत मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 95 टक्के आहे. जगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. म्यानमार सरकारला असे नियम करावे लागत आहेत यामागे काही गंभीर कारणं आहेत. गेले काही महिने तेथे मुस्लिम व बुद्धिस्ट यांच्यात दंगली सुरू आहेत. काही ठिकाणी खास करून जेथे मुस्लिम समाज बहुसंख्य आहे तेथे तर दंग्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. हे दंगे का वाढले आहेत याची चौकशी करण्यासाठी म्यानमार सरकारने एक आयोग नेमला होता. या आयोगाने दिलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, ज्या भागात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे तेथे दंगे होण्याची शक्यता जास्त असते. आपल्याकडेही ढोबळ मानाने हीच स्थिती आहे. भिवंडी, मालेगाव वगैरे महाराष्ट्रातील शहरांत मुसलमान समाज मोठय़ा प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील या गावांत हमखास दंगली होत असतात. आता म्यानमारमध्ये हाच अनुभव येत आहे. परिणामी चौकशी आयोगाने शिफारस केली की जर मुस्लिम समाजाची लोकसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर प्रत्येक कुटुंबात फक्त दोन मुलं असा नियम केला पाहिजे. त्यानुसार आता तेथे सरकारने नियम केला आहे. आयोगाच्या असेही लक्षात आले की काही भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या दहा पट वाढलेली आहे. याला लगाम घालण्यासाठी दुसरा संभाव्य उपाय म्हणजे मुस्लिम समाजात असलेली बहुपत्नीची रूढी. याला आळा घालण्यासाठीसुद्धा नियम करावा अशी आयोगाची शिफारस होती. येथे आपल्याला मुस्लिम समाजातील दुटप्पी वागण्याची चर्चा करावी लागते. बहुपत्नीचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. मुस्लिम पुरूषाला एकापेक्षा जास्त पत्नी करता येतात पण अपवादात्मक स्थितीत. हा प्रत्येक मुस्लिम पुरूषाचा अधिकार नाही. शिवाय ज्या स्थितीत ही चाल इस्लाममध्ये आली त्याचे संदर्भसुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. महंमद पैगंबर यांना इस्लामची स्थापना करतांना अनेक प्रसंगी लढाया कराव्या लागल्या. यात त्यांचे अनुयायी मारले जात. त्यांच्या विधवा बायकांना आधार मिळावा या हेतूने पैगंबरसाहेबांनी बहुपत्नी हा चाल सुरू केली. पण यासाठी अनेक कडक अटी घातल्या होत्या. जो पुरूष एकापेक्षा जास्त लग्न करेल त्याची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असली पाहिजे. त्याला एकापेक्षा जास्त बायका पोसता आल्या पाहिजेत. पुरूषप्रधान संस्कृतीचा प्रभाव असलेल्या इस्लाममध्ये यथावकाश गैरप्रवृत्ती शिरल्या व प्रत्येक मुस्लिम पुरूष चार पत्नी करण्याचा आपला हक्क आहे, असे समजायला लागला. दुसरे म्हणजे अनेक मुस्लिम देशांनी या प्रथेला बंदी घातली आहे. जेथे मुस्लिम समाज अल्पसंख्याक असतो तेथे हा समाज कोणत्याही प्रकारच्या धार्मिक सुधारणा मान्य करत नाही. जर एखाद्या देशाने असा प्रयत्न केला तर लगेच `इस्लाम खतरेमें है’ अशी हाक देतात व त्या सरकारवर दबाव आणतात. भारतात स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली पण अजूनही समान नागरी कायद्याच्या दिशेने एकही पाऊल पडलेले नाही. म्यानमारमध्ये लष्करशाही असल्यामुळे तेथे दोन मुलं किंवा बहुपत्नीची चाल बंद करणे असे नियम सहज होऊ शकतात. भारतात लोकशाही असल्यामुळे येथे असे निर्णय सहसा होत नाहीत. यालाच काही अभ्यासक लोकशाहीच्या मर्यादा मानतात. या संदर्भातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम समाजाची मानसिकता. जगात दोन प्रकारचे मुस्लिम देश आहेत. एक म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्या दणदणीत असते असे देश. या वर्गात सौदी अरेबिया, इराक, इराण वगैरे देश मोडतात. अशा देशांची अधिकृत ओळख म्हणजे ते इस्लामिक देश असतात. उदाहरणार्थ पाकिस्तानचे कायदेशीर नाव आहे `इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’. अशा देशांचा बराचसा कारभार कुराणप्रमाणे चालतो. दुसरा प्रकार म्हणजे जेथे मुस्लिम समाज अल्पसंख्याक आहेत. श्रीलंका, भारत वगैरे देश या प्रकारात मोडतात. याखेरीज तिसरा प्रकार आहे ज्यात फक्त एकच देश आहे. हा प्रकार म्हणजे असा देश जेथे मुस्लिम समाज बहुसंख्य आहे पण इतर धार्मिक गटही लक्षणीय संख्येने आहेत. याचे एकमेव उदाहरण म्हणजे मलेशिया. तेथे मुस्लिम समाज सुमारे 55 टक्के आहेत तर चीनी समाज 30 टक्के आहे व इतर भारतीय आहेत. यामुळे सत्तेच्या जागी जरी मुस्लिम व्यक्ती दिसत असली तरी इतरांना सामावून घ्यावे लागते. असा प्रकार म्यानमारमध्ये नाही. तेथिल मुसलमान समाज अल्पसंख्याक आहे. पण जेथे या समाजाची लोकसंख्या एकवटली आहे तेथे दंगे व्हायला लागले आहेत. यावर उपाय म्हणून म्यानमारने आपल्या परीने उपाय सुरू केले आहेत. सध्या समोर आलेले उपाय याच प्रकारातील आहेत. याचा परिणाम काय होतो हे लवकरच कळेल

Friday, 2 August 2013

BRIG HEMANT IN MEDIA

DURGASHKTI HONEST IAS OFFICER

प्रामाणिकपणाची शिक्षा vasudeo kulkarni Tuesday, July 30, वाळू माफियांना लगाम लावणाऱ्या लोकप्रिय आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना अखेर उत्तर प्रदेश सरकारने तडकाफडकी निलंबित करून, लोकहितदक्ष, प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी घेतला आहे. नागपाल यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. भ्रष्टाचार, लाचलुचपत असाही आरोप करायचे धाडस कुणीही केलेले नाही. जनतेची निष्ठेने सेवा करणाऱ्या या महिला अधिकाऱ्याला सरकारनेच अशी शिक्षा केल्यामुळे, गुंड, मवाली आणि माफिया टोळ्या आणखी मोकाट सुटतील, याचे भान अखिलेश यादव यांना नाही. अवघ्या दीडच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सेवेत आलेल्या नागपाल या 2009 मधल्या आयएएस तुकडीच्या अधिकारी आहेत. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच गौतमबुध्द नगर-ग्रेटर नोएडाच्या त्या विभागीय दंडाधिकारी झाल्या. राजधानी दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा शहर आणि परिसरात वाळू माफिया, बिल्डर लॉबीचे निर्माण झालेले बेकायदेशीर कारवायांचे जाळे त्यांनी धाडसीपणाने उद्‌ध्वस्त करायचा चंग बांधला. यमुना आणि हिंडन नदीच्या पात्रातून हजारो ट्रक वाळूचा बेकायदेशीर उपसा करून आपले उखळ पांढरे करायला सोकावलेल्या वाळू माफियांच्या टोळ्यांवर त्यांनी कडक कारवाई सुरू केली. वाळू माफियांच्या धमक्यांना भीक न घालता, न घाबरता त्यांनी धडाक्याने ही कारवाई व्यापक केली. यमुना नदीच्या पात्रातून दिवसाढवळ्या बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करायला सोकावलेल्या वाळू माफियांच्या 300 ट्रॉलीस आणि यांत्रिक नौका त्यांनी जप्त केल्या. 18 वाळू माफियांवर गुन्हे नोंदवून 15 जणांना तुरुंगाची हवा खायला पाठवले. 22 जणांवर अटक वॉरंट बजावले. वाळूचे बेकायदा साठे जप्त करून, वाळू माफियांच्याकडून 84 लाख रुपयांचा दंडही वसूल केला. या जिल्ह्यातल्या आणि ग्रेटर नोएडातल्या वाळू माफियांवर त्यांनी आपल्या कडक कारवाईने दरारा निर्माण केला होता. या जिल्ह्यातला बेकायदेशीर वाळूचा उपसा बंद पाडायसाठी यापूर्वी अनेकदा झालेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण नागपाल यांनी मात्र बेकायदेशीर वाळूचा उपसा पूर्णपणे बंद तर पाडलाच, पण पुन्हा जिल्ह्यातल्या कुठल्याही भागात वाळूचा बेकायदशीर उपसा होऊ नये यासाठी, सरकारी अधिक़ारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथकेही नेमली. परिणामी त्यांच्या विरोधात बेकायदा वाळूच्या विक्रीतून शेकडो कोटी रुपये कमावून श्रीमंत झालेल्या वाळू माफियांच्या टोळीने सरकारवर दबावही आणला होता. नागपाल यांनी ज्येष्ठ सरकारी अधिकारी आणि सरकारचाही दबाव जुमानला नाही. त्यांच्या या कारवाईनेच ग्रेटर नोएडातली बेकायदेशीर बांधकामेही रोखली गेली. सर्व सामान्यांना या जिल्ह्यातल्या प्रशासनाचा चांगला अनुभव यायला लागला. सामान्य जनतेच्या समस्यांची सोडवणूक नागपाल यांच्यामुळे जलद गतीने व्हायला लागली. प्रशासनातल्या लाचखोरांवरही त्यांचा वचक निर्माण झाला. त्यांची लोकप्रियता आणि वाळू माफिया विरुध्दची मोहीम सरकारलाही डोकेदुखी झाली होती. त्यांचा काटा काढायसाठी टपलेल्या सरकारला चार दिवसांपूर्वी ती संधी मिळाली आणि सरकारच्या आदेशावरून उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव राजीव कुमार यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केल्याचा आदेशही काढल्यामुळे, ग्रेटर नोएडासह पश्चिम उत्तर प्रदेशात सामान्य जनतेत असंतोषाची उसळलेली लाट म्हणजे, माफियांच्या तालावर नाचणाऱ्या सरकारला चपराकच होय! सरकार कुणाचे? ग्रेटर नोएडातल्या सरकारी मालकीच्या जमिनीवर काही उचापतखोरांनी सुरू केलेल्या बेकायदेशीर मशिदीच्या बांधकामांची भिंत पाडून टाकायचे आदेश नागपाल यांनी दिले होते. त्यांच्या या आदेशामुळे, मुस्लिम धर्मियांच्या पवित्र "रमझान' महिन्यात समस्या निर्माण करणारा आदेश दिल्यामुळे, धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. तो रोखायसाठी सरकारला नागपाल यांच्या निलंबनाचा निर्णय घ्यावा लागला, असे मुख्यमंत्री यादव यांनी या एकतर्फी कारवाईचे केलेले समर्थन मुळीच पटणारे नाही. हा आदेश तूर्त स्थगित करावा, असा आदेश प्रशासनातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना देता आला असता किंवा नागपाल यांच्या आदेशाला स्थगितीही देता आली असती. पण तसे काहीही न करता, नागपाल यांच्याकडून कोणताही खुलासा न मागवताच, सरकारने त्यांना धडा शिकवायसाठीच ही कारवाई वाळू माफियांच्या टोळ्यांच्या दबावानेच केल्याची लोकभावना आहे. भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष या विरोधी पक्षानेही सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करीत, या आदेशामुळे उत्तर प्रदेशातल्या वाळू माफिया आणि गुंडांच्या टोळ्यांना बेकायदेशीर कारवाया करायसाठी अधिकच बळ मिळेल आणि त्यांच्यावर सरकारचा वचक राहणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेनेही सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करून, याबाबत मुख्य सचिवांना लेखी पत्र द्यायचे ठरवले आहे. नागपाल या जिल्हा दंडाधिकारी आणि प्रशासनातल्या वरिष्ठांना विश्वासात घेत नव्हत्या, बेकायदेशीर वाळू उपशाच्या विरुध्द कारवाई करताना वरिष्ठांना आधी माहिती देत नव्हत्या. मशिदीची भिंत पाडायची नोटीस देतानाही त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतलेली नव्हती, हे मुख्य सचिव राजीव कुमार यांनी नागपाल यांच्या निलंबनासाठी दिलेले कारणही कायदेशीर ठरत नाही. "आधी फाशी आणि मग चौकशी', या खाक्याने सरकारने नागपाल यांच्यावर केलेल्या कारवाईचे दूरगामी परिणाम प्रशासन आणि सरकारवरही होणार आहेत. पण त्याची पर्वा गुंडांच्या टोळ्यांना संरक्षण देणाऱ्या यादव सरकारला नाही. नागपाल यांच्या निलंबनामुळे ग्रेटर नोएडासह राज्यातल्या बिल्डर आणि वाळू माफियांच्या टोळ्यांवर कडक कारवाईचे धाडस प्रशासनातले ज्येष्ठ अधिकारी करणार नाहीत. पोलीसही सावधतेनेच गुंडांच्या विरोधात कारवाई करतील. अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी मेरठ जिल्ह्यातल्या शामली भागात वाळू माफियांच्या टोळ्यांनी ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला चढवून दंगली घडवल्या होत्या. सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या पथकावर हल्लाही केला होता. आमच्या विरोधात कोणतीही कारवाई केल्यास आम्ही ती मोडून काढू, अशा धमक्या तेव्हा वाळू माफियांच्या गुंडांनी दिल्या होत्या. गोंडा जिल्ह्यातली पशूंची तस्करी रोखणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचीही याच सरकारने तडकाफडकी बदली करून, या तस्करीचे आरोप असलेल्या नेत्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. हे सरकार नेमके कुणाचे आहे? गुंड आणि माफियांच्या टोळ्यांचे कर्दनकाळ ठरणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर अशी शिक्षेची कारवाई सरकार करायला लागल्यावर, जनतेला न्याय मिळणार तरी कसा? तो कोण देणार? या प्रश्नांचे उत्तर मुख्यमंत्री यादव द्यायला तयार नाहीत