Total Pageviews

Friday 20 July 2018

घरात पाण्याचे नियोजन-SAMNA-MUST READ & FORWARD



 घरातील ७५ टक्के पाणी न्हाणीघरातच वाया जाते. याकरिता नळाच्या लिकेजमुळे महिन्याला २५० लिटर पाणी वापराविना गळून जाते. मिनिटाला ४५ थेंब पाणी नळातून ठिबकत असते. म्हणजे तीन तासांत साधारण १ लिटर पाणी वाया जाते. यासाठी नळाचे लिकेज थांबवण्याचा प्रयत्न करा.
ब्रश करताना वॉश बेसिनचा नळ सुरू असेल तर एकावेळी ४ ते५ लिटर पाणी अनावश्यक वाहून जाते. म्हणजे महिन्याला १५० लिटर. चार जणांचे कुटुंब असेल तर ६०० ते ७०० लिटर पाणी वापराविना नष्ट होते.
घरात आरओ मशीन असेल तर त्याचे पाणी काढताना दररोज ३ ते ४ लिटर पाणी वाया जाते. म्हणजे वर्षाला १४ लिटर पाणी अनावश्यक नष्ट होते. यासाठी हे पाणी झाडं, गाडी, बाथरुम धुण्यासाठी वापरू शकता.
टॉयलेट टँक बऱ्याचदा लिक होण्याची समस्या असते. हे थांबवले तर दर महिन्याला ५ हजार लिटर पाणी वाचवणे शक्य होईल. यासाठी फ्लश करण्याऐवजी बादलीने पाणी ओतावे. यामुळे रोज कमीतकमी १२५  लिटर पाणी वाचू शकते.
कपडय़ांचे २ किंवा १० कितीही जोड धुतले तरी सारखेच पाणी लागते. यासाठी वॉशिंग मशीन तेव्हाच वापरा जेव्हा जास्त कपडे धुवायचे असतील. यामुळे दर महिन्याला कमीतकमी साडेचार हजार लिटर पाण्याचा अपव्यय टळेल.
अंघोळ करताना शॉवरऐवजी बादलीचा वापर करा. यामुळे ८० टक्के पाणी वाचेल.
भांडी धुताना रोज २० टक्के पाणी वाचवू शकता. यासाठी नळाखाली भांडी धुण्याऐवजी बादली किंवा टबचा वापर करा.  ही सवय लावल्यास २० ते २५ लिटर पाण्याची बचत होईल.
शेव्हिंग करताना नळ बंद करा. नळाऐवजी मगाचा वापर करा. यामुळे महिन्याला साधारण २०० लिटर पाणी सुरक्षित राहील. जेणेकरून या पाण्याचा वापर इतर कामांसाठी होऊ शकेल.
कार धुण्यासाठी पाइपाचा वापर केला तर एकावेळी १५० लिटर पाणी अनावश्यक खर्च होते. याऐवजी बादलीत पाणी घेऊन गाडी धुतल्यास २०लिटरच पाणी वापरले जाते. यामुळे दरवेळी १३० लिटर पाणी शिल्लक राहील.


No comments:

Post a Comment