Total Pageviews

Saturday 26 July 2014

आव्हान चीनी ड्रॅगनचे : चीनचे भारताशी मानसिक यु्ध्द

आव्हान चीनी ड्रॅगनचे : चीनचे भारताशी मानसिक यु्ध्द ब्राझीलमध्ये झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणातच, नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ‘ब्रिक्स’ परिषद हा केवळ उपचार होऊन जाता कामा नये. यातून जनताजनार्दनाच्या समस्यांना हात घातला गेला पाहिजे. ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने त्यांची प्रथमच ख्यातीप्राप्त देशांच्या नेत्यांशी भेट होणार होती. म्हणूनच त्यांच्या या दौर्यानबाबत बरीच उत्सुकता होती. भारताकडे 'ब्रिक्स विकास बँके'चं अध्यक्षपद १०० अब्ज डॉलर्सचं भागभांडवल असलेल्या 'ब्रिक्स विकास बँके'चं अध्यक्षपद भारताकडे देण्यावर मोदींना यश मिळालं आहे. हे अध्यक्षपद मिळाल्यानं देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकेल.या बँकेचं मुख्यालय मात्र चीनमधील शांघायमध्ये असेल. डर्बन परिषदेमध्ये नव्या बँकेची कल्पना जेव्हा पुढे आली होती, तेव्हा भारत चीनमागे फरफटत जाणार का अशी भीती व्यक्त होत होती. कारण अर्थव्यवस्थेच्या क्षमतेनुसार या नव्या बँकेची भांडवल विभागणी व्हावी असा आग्रह धरून जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला चीन या नव्या बँकेमध्ये स्वतःचे स्थान बळकट करू पाहात होता. त्याचे ते प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले आहे. भारताने हा समान भांडवलाचा आग्रह धरला होता. तो अखेर मान्य झाला. त्याचप्रमाणे, या पाचही सदस्यदेशांना प्रत्येकी केवळ एक मत असेल. कोणत्याही बहुराष्ट्रीय वित्तसंस्थेत असे 'एक देश-एक मत' नाही. झी जिनपिंग यांच्याशी भेट याच वेळी चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीची फलश्रुती काय होते, याकडे भारताचे लक्ष होते. कुठले मुद्दे चर्चिले जातात, कुठल्या मुद्यांवर एकवाक्यता होते आणि कुठल्या मुद्यांवर मतभेद होतात, यावरही देशांची नजर होती. मोदींनी चीनच्या घुसखोरीचा, सीमांचा मुद्दा उपस्थित केला. तसेच द्विपक्षीय व्यापार व आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा केली. प्रारंभी ४० मिनिटांची ही भेट ८० मिनिटांपर्यंत वाढवावी लागली. उभयतांनी एकमेकांवर विश्वाीस व्यक्त करून, परस्परविश्वा स वृद्धिंगत करून, सीमेवर शांतता कायम ठेवण्यावर जोर दिला. मात्र ब्राझीलमध्ये हिंदी - चिनी भाई भाईचा नवा अध्याय चालु असताना चीन सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला.भारतीय सैन्याने त्यांना रोखून ठेवले. अखेरीस अर्धा तासानंतर चीन सैन्याला माघार घ्यावी लागली. गेल्या तीन दिवसांत जम्मू काश्मीरमधील लडाख सेक्टरमधील देमचोक आणि चूमार या भागांमध्ये चीन सैन्याच्या पीपल्स लिबेलरेशन आर्मी या तुकडीच्या जवानांनी भारतीय हद्दीत घसुखोरीचा प्रयत्न केला. देमचोकमधील चार्डिंग नीलू नाला जंक्शन येथे चीन सैन्याच्या जवानांनी वाहनासह प्रवेश केला.त्यांना नंतर हाकलुन दिले. कैलास मानसरोवर यात्रेकरूंसाठी आणखी एका मार्गाचा प्रस्ताव मोदींनी चीनपुढे ठेवला. चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना आशिया प्रशांत सहकार्य शिखर परिषदेचे (ऍपेक) निमंत्रण देऊन, आमच्यासाठी भारताचा सहभाग महत्त्वाचा आहे, हे जगाला दाखवून दिले. उपराष्ट्रपती आणि जनरल विक्रमसिंगांचा चीन दौरा लष्कर प्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी ०३-०५जुलैपर्यंत चीनचा दौरा केला.या मधुन काय निष्पन्न झाले? आपल्या पाच दिवसांच्या चीन दौर्यागसाठी भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी बीजिंगमध्ये २८ जुन-०३ जुलैपर्यंत होते. दौर्या त त्यांनी चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचाओ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केलीआणि पंचशील कराराला(ज्याचे चीनने कधी पालन केले नाही) ६० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल आयोजित केल्या जाणार्या् विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवे केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर भारताच्या मोठ्या नेत्याची आणि ही लष्कर प्रमुखांची पहिलीच चीन भेट होती. हमीद अन्सारी या दौर्याात चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांना भेटले आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही चर्चा केली.भारत आणि चीन या दोन्ही देशांनी नेहमीच उच्चस्तरीय संवाद कायम ठेवला आहे.पण अश्या चर्चेतून काहीतरी ठोस आणि सकारात्मक निष्पन्न झालेले नाही. चीनची पहिली कुरघोडी सीमावादाच्या प्रश्नावर चीनने पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. चीनने नवीन नकाशाच्या माध्यमातून अरूणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागावर दावा केला.उपराष्ट्रपती हमीद अन्सारी चीनच्या दौर्याकवर असताना हा प्रकार घडला आहे.चीनने याआधीही अनेकदा अरूणाचल प्रदेशावर दावा केला आहे. मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर चीनने प्रथमच अशा प्रकारची कुरापत केली आहे. चीनला भारताबरोबर मैत्री का हवी ? मोदींचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अधिकृत पातळीवर चर्चा करण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी भारत भेटीवर आले. विशेष म्हणजे भारतात सत्ताबदल झाल्यानंतर चीन हा पहिला देश होता, की ज्याने आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना तातडीने भारत भेटीवर पाठविले. चीनला भारताबरोबर भविष्यात शांततापूर्ण आणि मित्रत्वाचे संबंध हवे आहेत, असा अध्यक्ष जिनपिंग यांचा संदेश वॅंग यांनी मोदींना दिला. या सगळ्या भेटीमागच्या चीनच्या उद्दिष्टांचे विश्लेंषण करणे आवश्यनक आहे. चिनी माध्यमांनी आर्थिक विकासाला, व्यापारवाढीला प्राधान्य देणारे सरकार म्हणून मोदी सरकारचे स्वागत केले. चीनला आता भारताबरोबर मैत्री हवी आहे, यामागे काही कारणे आहेत. पहिले कारण पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रात वाढलेला तणाव. याचे कारण आहे चीनची तेथील वाढती आक्रमकता आणि विस्तारवादी धोरणे. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या अनेक बेटांच्या मालकीवरून पूर्व चीन समुद्रात चीनचा जपानबरोबर, तर दक्षिण चीन समुद्रात फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि इंडोनेशियाबरोबर वाद निर्माण झाला आहे. चीनच्या पूर्व सीमेवरील या संघर्षामुळे आपल्या दक्षिण सीमेवर म्हणजे भारताबरोबर चीनला शांतता हवी आहे. एकाच वेळी जपान आणि भारताबरोबर संघर्ष वाढवून चीनला चालणार नाही. चीनच्या विरोधात समदुःखी देशांची युती चीनच्या विरोधात आशिया - प्रशांत महासागर क्षेत्रात समदुःखी देशांची युती आकाराला येते आहे. चीनचा वाढता संरक्षण खर्च, लष्करी आधुनिकीकरणाचे प्रयत्न, वाढता नाविक हस्तक्षेप, अनेक बेटांवर चीनने सांगितलेला हक्क यामुळे जपान, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि ऑस्ट्रेलियासारखे देश असुरक्षित बनले आहेत. जपानने पुढाकार घेऊन या देशांची युती करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या युतीला अमेरिकेचेही पाठबळ आहे.भारत या युतीचा भाग बनू नये, अशी चीनची इच्छा आहे.भारत हा जपानच्या आणि अमेरिकेच्या जवळ जाऊ नये, अशीही चीनची इच्छा आहे. एक कारण आर्थिक आहे. युरोपमधील सध्याच्या मंदीचा परिणाम चीनच्या युरोपीय देशांबरोबरच्या व्यापारावर झाला आहे. या मंदीमुळे पोहोचलेली झळ भारताबरोबर व्यापार वाढवून चीनला दूर करायची आहे. भारतात आर्थिक गुंतवणूक व निर्यातीला चीनला मोठा वाव आहे. चीनची आक्रमकता कमी होत नाही केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून चीन वेगवेगळ्या मार्गांनी नव्या सरकारची भूमिका कशी आहे याची चाचपणी करत आहे. विशेषतः, अरुणाचल प्रदेशामध्ये गेल्या काही वर्षांपासून चीनच्या सैनिकांकडून होणार्या त्रासामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता तर या नागरिकांचे हा सिमेवरील गावे सोडून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे अरुणाचलच्या राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. मागच्या महिन्यात चीनची दोन हॅलिकॉप्टर भारताच्या उत्तराखंडाच्या भागात आली होती. या हॅलीकॉप्टरद्वारे चीनी लोक सिगारेटची पाकीटे, खाण्याच्या वस्तू, पत्रक आपल्या भागात टाकत असतात. अरुणाचल प्रदेशातील मंत्री किरेन रिज्जु, जे आता गृहमंत्रालयात राज्यमंत्री आहेत, त्यांनी याबाबत काळजी व्यक्त केली आहे. चुकून कुठलेही हॅलिकॉप्टर किंवा सैनिक सीमेच्या आत येऊ शकत नाहीत. नव्या सरकारची मानसिक ताकद किती आहे हे जाणून घेण्यासाठी चीन अशी कृती करत आहे. उच्च अधिकारी, तज्ज्ञांच्या मनात घुस्खोरी चीनद्वारे भारतीयांचे मनोधैर्य खचविण्यासाठी आणखी एक प्रयत्न केला जात आहे. आपल्या देशातील उच्च पदावरील अधिकार्यांच्या मनावर हे बिंबवले जात आहे की, भारत चीनशी दोन हात करण्यास तयार नाही. अर्थातच हे पूर्णपणे चुकीचे आहे.चीनने आपल्या अनेक तज्ज्ञांच्या मनात घुसखोरी करून एक प्रकारे चीनबाबत दहशतीचे वातावरण तयार केले आहे. अशा तज्ज्ञांच्या सल्ल्यावर मागचे सरकार अवलंबून होते आणि चीनला घाबरत होते. चीनच्या या मानसिकता चाचपणीच्या लढाईमध्ये आपली भूमिका ही बचावत्मक किंवा कुचकामी असेल तर एक घाबरट देश असे आपल्याला चीन समजेल आणि येणार्या काळात आपल्याला अजून त्रास देईल. आत्ताच्या स्थितीत चीनद्वारे सीमेकडून होणार्या कुठल्याही घुसखोरीला उत्तर देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. तसेच भविष्यात लढाई झाली तर त्यासाठीही आपण तयार राहिले पाहिजे. वेगवेगळ्या पातळ्यावर आपल्याला चीन विरुद्ध लढण्यासाठी तयारी केली पाहिजे. या सर्व गोष्टींकडे सध्याचे सरकार लक्ष ठेवत आहे का? व पद्धतशीरपणे या सर्व पातळ्यांवर आपण तयारी करत आहो का?. सध्या भारतासाठी धोकादायक देश म्हणून चीनकडेच पाहिले जाते. भारताच्या बाजारपेठेतही चीनने, मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. चीनी घुसखोरी ,आर्थिक घुसखोरी जर आपल्याला थांबवता आली आणी सीमा विवाद सोडवता आला तरच भारत चीन संबध्द खरोखर सुधारतील. चीनला रोखायचे तर शत्रूवर आक्रमण करून त्याला हैराण करण्याची चीनची प्राचिन काळापासून युद्धनिती राहिली आहे. चीनच्या सैन्याने भारतीय क्षेत्रात केलेली घुसखोरी हा युध्दनितीचाच एक भाग आहे . चीन वारंवार का घुसखोरी करतो? शेजारी देशाने गंभीर आक्षेप घेतल्यावर आपले लष्कर मागे का घेतो? त्याचा कठोरपणे मुकाबला करायला हवा. त्यामुळे केवळ चर्चेचे गुर्हाळ न करता ठोस प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. संपूर्ण देशात चीनच्या विरोधात वातावरण निर्माण व्हायला हवे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकायला हवा. एवढेच नव्हे तर, अशा वस्तू विकणार्यांना देशद्रोही मानायला हवे. व्यापार ही चीनची सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या देशात चिनी वस्तुंच्या व्यापारावर निर्बंध आले तर ते त्या देशाला परवडण्यासारखे नाही. ही चीनसाठी एक प्रकारची नाकेबंदी ठरणार आहे.तरच भविष्यात या देशाकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. 2.आव्हान चिनी ड्रॅगनचे - ब्रिगेडिअर हेमंत महाजन BOOK CAN BE ORDERED FROM :- NACHIKET PRAKASHAN ,24 YOGSHEM,LAY OUT,SNEH NAGAR WARDHA ROAD NAGPUR -PIN 440015,TELE-0712-2285473,9225210130 , email-nachiketprakashan @gmail.com, www.nachiketprakashan.wordpress.com

No comments:

Post a Comment