Total Pageviews

Friday 25 July 2014

SPREAD TERROR SOUTH INDIA

विळखा दहशतवादी कारवायांचा evivek | वसंत गद्रे थामिम अन्सारी, तिरुची या लहान गावातील एक व्यापारी. हा अन्सारी बाँबस्फोट घडवून आणण्याकरिता रेकी करताना पकडला गेला. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा मान्य केला. काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला सोडण्यात आले. आता ‘National Investigating Agency’ने त्यावर खटला भरला आहे. हा अन्सारी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा कार्यकर्ता असल्याचे तपासादरम्यान समजले. एक हाजीने त्याला कांदे निर्यात करून श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखविले व त्याला कर्जबाजारी केले. त्याच सुमारास श्रीलंकेतील पाकिस्तानी वकिलातीत काम करणाऱ्या I.S.I.च्या अधिकाऱ्याने या अन्सारीचा उपयोग करून घेतला व त्याला खास कामगिरी दिली, ती म्हणजे प्रमुख ठिकाणांची रेकी प्रथम त्याने चेन्नईपासून सुरुवात केली. पाकिस्तानच्या I.S.I.ने भारतात घातपाती कारवाया करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. आजपर्यंत नेपाळ, बिहारमार्गे आपले लोक भारतात घुसवून बाँबस्फोट, गाडया पाडणे अशा घातपाती कारवाया घडवून आणीत. मुख्यत: मुंबई, दिल्ली, पाटणा, बनारस या शहरात हे स्फोट घडवून आणले जात. आता I.S.I. नवीन चाल खेळत आहे. भारताचे लक्ष दुसरीकडे वेधण्याची त्यांची खेळी आता उघडकीस आली आहे. यानंतर श्रीलंकेतील पाकिस्तानी वकिलातीचा उपयोग करून तामिळनाडूभर त्यांचे जाळे पसरण्याचे उद्योग चालू आहेत. भारताच्या गुप्तहेर विभागाने (Intelligence Bureau)ने याची दखल घेतली आहे. उदा., जून 2003मध्ये चेन्नईमधील अमेरिकन वकिलातीला काही मुस्लीम गटाने घेराव घालून थोडा वेळ कब्जा केला होता. त्याचे कारण म्हणजे एका सिनेमातील आक्षेपार्ह भाग. नंतर पोलिसांनी आपल्या पध्दतीने हा प्रश्न सोडविला. थामिम अन्सारी, तिरुची या लहान गावातील एक व्यापारी. हा अन्सारी बाँबस्फोट घडवून आणण्याकरिता रेकी करताना पकडला गेला. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा मान्य केला. काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला सोडण्यात आले. आता ‘National Investigating Agency’ने त्यावर खटला भरला आहे. हा अन्सारी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचा कार्यकर्ता असल्याचे तपासादरम्यान समजले. एक हाजीने त्याला कांदे निर्यात करून श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखविले व त्याला कर्जबाजारी केले. त्याच सुमारास श्रीलंकेतील पाकिस्तानी वकिलातीत काम करणाऱ्या I.S.I.च्या अधिकाऱ्याने या अन्सारीचा उपयोग करून घेतला व त्याला खास कामगिरी दिली, ती म्हणजे प्रमुख ठिकाणांची रेकी प्रथम त्याने चेन्नईपासून सुरुवात केली. त्यात वेलिंग्टनमधील मद्रास Regiment Centre, नागिपट्टणमधील तटरक्षक दलाच्या व नौदलाच्या इमारती यांचा समावेश होता. त्यानंतर अंदमानवर स्वारी करून पोर्ट ब्लेअर येथील संवेदनशील सैनिकी ठाण्यांची रेकी केली. अंदमानहून विशाखापट्टणम येथे होऊ घातलेला वर्षा या नावाने विकसित होत असलेल्या High Tech Naval Baseची देखील रेकी केली. आपण ‘भारताचे शक्तिस्थान (Power of India)’ ही फिल्म बनवत असल्याचे अन्सारीने सांगितले व त्यात तो यशस्वी झाला. व्यापारी हे कशाकरिता करत आहे, असा कुणालाही संशय आला नाही. डेव्हिड हेडलीचादेखील कोणाला संशय आला होता? एवढेच नव्हे, तर अन्सारीने विशाखापट्टणम येथील प्रोजेक्ट वर्षा व कोईमतूर येथील सुलूर येथील हवाई दलाच्या केंद्रातील माहिती मिळवण्याकरिता त्या ठिकाणांतील काम करीत असलेल्या लोकांना नोकऱ्या देऊ केल्या. त्यामुळे मात्र तामिळनाडूमधील सुरक्षा विभागातील अधिकारी आणि मध्यवर्ती सरकारचे अधिकारी यांना काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला व त्यांनी 2012मध्ये तिरुची येथे अन्सारीला अटक केली. अन्सारीने आपल्या कबुलीजबाबात सिद्दिकीचे नाव सांगितले आणि तामिळनाडू पोलिसांनी आपल्या आरोपपत्रिकेत पाकिस्तानी वकिलातीतील अधिकाऱ्याचे नाव दाखल केले. अन्सारी कोलंबोला जात असताना त्याला तिरुची विमानतळावर अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्याजवळ भारतीय सैन्य दलाच्या आणि आर्मी सिग्नल कोअरच्या पॅराग्लायडिंग शिक्षणाच्या दोन D.V.D. होत्या. त्याच्यावर राजीव शास्त्री यांच्यातर्फे I.S.I.ला माहिती देण्यासंबंधी पोलिसांनी अटक केली. चेन्नईच्या ‘हिंदू’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अन्सारीने या सर्व घटना खोटया असल्याचे सांगितले. मुलाखतीच्या अगोदर त्याची सुटका करण्यात आली होती. त्याने पुढे खुलासा केला की, आपला पासपोर्ट फाटकातुटका असल्याने तिरुची विमानतळावर अटक करण्यात आली. आपण हाजीला (त्याचे दुसरे सिराज अली) ओळखतो, पण आपण हाजी किंवा सिद्दिकीला ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. शिराज अली माझ्याकडून माल विकत घेत असे. मला सरकारने बळीचा बकरा बनवले आहे. मानवाधिकार समितीच्या अध्यक्षांनी सांगितले ही अटक बेकायदा होती. पण माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या बाबतीत मौन स्वीकारले. याबद्दल तामिळनाडू सरकारच्या Intelligenceच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत. एवढे झाल्यानंतरदेखील पाकिस्तानने कोलंबोहून सिद्दिकीची बदली केली नाही. त्यांच्या अधिकाऱ्याने सिद्दिकीचे नाव तामिळनाडूच्या पोलिसांत असल्याचे आपल्याला माहीत नाही, असे समर्थन केले. एवढेच नव्हे, तर श्रीलंकेच्या परराष्ट्र खात्याचे मंत्री पेरीस यांनी सांगितले की, याबाबतीत तामिळनाडू सरकारकडे ठोस पुरावेच नाहीत. या वर्षीच्या सुरुवातीला हुसेन भारतात येऊन त्याने चेन्नईतील व बंगळुरूमधील अमेरिकन वकिलातींचे अनेक फोटो घेतले. त्याला यासंबंधी अगोदरच सूचना आल्या होत्या. कारण त्या असंख्य छायाचित्रात कुठेतरी एखादा कच्चा दुवा मिळतो का, ते बघायचे होते. यानंतर मार्चमध्ये हुसेनला श्रीलंकेतील मन्नारच्या समुद्रकिनारपट्टीवरून दोन इसमांनी भारतात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. त्याच वेळेस भारतात घातपाती कारवाया करण्याकरिता व्यवस्था करण्याच्या सूचना मिळाल्या. त्याने कुआलालंपूरमधील श्रीलंकेच्या एका माणसाशी – ज्याचे नाव महम्मद हुस्नी होते, त्याच्याशी – संगनमत केले. त्याचबरोबर हुसेनला दोन पाकिस्तानी माणसांसाठी श्रीलंकेचे खोटे पासपोर्ट बनविण्यास सांगितले गेले. हे पाकिस्तानी खोटया पासपोर्टने मालदीवला पाठवून तेथून बंगळुरूला इस्राइलच्या वकिलातीवर घातपात करणार होते. दुसऱ्या महायुध्दात जर्मनीने इंग्लंडची अर्थव्यवस्था कोलमडण्यासाठी पौंडाच्या बनावट नोटा छापून सर्व देशभर खपवून इंग्रजांना धक्का दिला व इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झालाच. पाकिस्तान आपल्या हस्तकांकरवी गेली कित्येक वर्षे भारतात खोटे चलन पाठवत आहे व या खोटया नोटा भारतीय नोटांची हुबेहूब प्रतिकृती आहे, असे तज्ज्ञांचेदेखील मत आहे. या नोटा मालदीव व श्रीलंकेहून भारतात पाठवल्या जातात. त्यांना ‘Fake Indian Currency Notes (F.I.C.N.)’ असे नाव असून घातपात करण्याकरिता त्या उपयोगात आणल्या जातात. यांच्यातला खोटेपणा शोधून काढण्याचे काम अतिसक्षम अधिकारीच करू जाणे. चेन्नईमधील मन्नाडी भाग हा या दृष्टीने सुरक्षित आहे. या ठिकाणी ही पार्सले आणली जातात आणि पुढे त्यांचा प्रवास चालू होतो. काही वर्षांपूर्वी यात त्रुटी होत्या, पण आता हा व्यवसाय काटेकोरपणे केला जातो. बांगला देशमध्ये याचा उगम झाला. या बनावट नोटा चितगावमध्ये बंद पेटयातून पाठवल्या जात व तेथून घुसखोरांमार्फत पाठवल्या जात. R.A.W.च्या म्हणण्यानुसार कराचीजवळ मल्लीर (Malir) येथे पाकिस्तानचा या खोटया नोटांचा कारखाना असून तो आधुनिक मशीनरीने सज्ज आहे. हेरखात्याने 2013मध्ये लष्करे तोयबाच्या बाँब बनवणाऱ्या अब्दुल करीम तुंडा या अतिरेक्यास पकडले असता त्यानेही त्यास दुजोरा दिला. ही सर्व पार्सले नेपाळहून प. बंगाल, पूर्वांचलमध्ये येतात व तेथून पुढील प्रवास चालू होतो. तो अतिशय काळजीपूर्वक, कुरिअरद्वारे. हे षङ्यंत्र शोधून काढण्याकरिता अधिकाऱ्यांचे पथक जवळजवळ चार महिने रात्रंदिवस काम करीत होते. या नोटा मलेशियापर्यंत पोहोचल्या होत्या व भारताचे अधिकारी तेथील शोधपथकाच्या संपर्कात होते. गेल्या एप्रिलमध्ये हुसेनला चेन्नई येथे अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्याबरोबर बनावट नोटांचे दोन तज्ज्ञ – सिब्बवालन श्रीलंकेतील तामिळी, महम्मद सलीम भारतीय नागरिक – यांनासुध्दा अटक करण्यात आली. त्यांच्याजवळ जवळजवळ अडीच लाखांचे चलन मिळाले. मलेशियाने त्याच सुमारास महम्मद हुस्न याला 14 मे रोजी अटक केली. भारतीय अधिकारी त्याचा ताबा घेणार आहेत. मे 16ला मलेशियाच्या पोलिसांनी भारतात एका प्रमुख ठिकाणी घातपाती कारवाया होणार असल्याचे समजल्यावरून त्या निष्प्रभ केल्याची बातमी भारतीय अधिकाऱ्यांना कळविली. कुठलीही नावे देण्यात आली नाहीत, पण तो दक्षिण आशियाचा रहिवासी एवढेच कळविले. त्या अगोदर सरकारी सूत्रानुसार घातपात घडवून आणण्याच्या संशयावरून तीन इसमांना अटक करण्यात आली होती. हे अचानक घडून आले नाही. चार देशांच्या सहकार्याने व मलेशियन व भारतीय शोधपथकांच्या प्रयत्नातून हे सर्व साध्य झाले. त्यामुळे घातपाताचा एक मोठा धोका टळला. हुसेनने सांगितले की, तो पाकिस्तानी वकिलातील सिद्दिकी याला कधी हॉटेलमध्ये किंवा कधी पाकिस्तानी वकिलातीतच भेटत असे. त्याने पुढे सांगितले की, याचा सर्व खर्च सिद्दिकीच करत होता. बांगला देशमधील भारतविरोधी कारवाया उघडकीस आल्यानंतर आता मालदीवमध्ये व श्रीलंकेत नवी केंद्रस्थाने स्थापन करण्यात आली आहेत. भारतात अस्थिरता निर्माण करण्याकरिता श्रीलंकेतील पाकिस्तानी वकिलातीतून हे सर्व होत आहे. बांगला देशमधून बनावट नोटांचे प्रसारण अजून चालूच आहे. तेसुध्दा चेन्नईत किंवा दक्षिण भारतात या नोटा मोठया प्रमाणावर कशा येतात हे कोडे आहे. कारण आतापर्यंत तामिळनाडूमधील क्राईम ब्रँचने बऱ्याच प्रमाणात या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 4 जूनला राहुल हमीद आणि रफीक यांच्याकडून जवळजवळ 9 लाख रु.च्या नोटा जप्त करण्यात आल्या. या कुटिल कारस्थानाचा प्रमुख सूत्रधार फखरूल इस्माईल याला 10 जूनला बंगालमधून अटक करण्यात आली आहे. आता तर मालदीव व श्रीलंका येथून याचा उगम असल्याचे सिध्द झाले आहे. मालदीवमधून होणारी बनावट नोटांची तस्करी भारताला आव्हान देणारी आहे. केवळ बनावट नोटाच नव्हे, तर काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या क्राईम ब्रँचने शस्त्रास्त्रे व दारूगोळाही जप्त केला आहे. भारतात आता तर शस्त्रास्त्रे व दारूगोळा येत असेल, तर ते अतिशय गंभीर आहे. तामिळनाडूच्या क्राईम बँ्रच इंटेलिजन्स ब्युरोसमोर दर वर्षी नवीन आव्हाने येत आहेत. एखादे प्रकरण उघडकीस आले, तर दुसरे नंतर वाट पाहत असते. मे 1 ला चेन्नई स्टेशनवर रेल्वेच्या S4 d S5 या डब्यांमध्ये बाँबस्फोट झाले. त्या अगोदर एप्रिल 2013मध्ये बंगळुरूच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर स्फोट झाले. त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले, कारण त्यांनी स्फोट झालेल्या ठिकाणची माती व इतर पदार्थ विश्लेषणाकरिता ताबडतोब पाठविले. चेन्नईच्या बाँबस्फोटात तशी काळजी घेण्यात आली नाही. मार्च 2000मध्ये तामिळनाडूच्या लिबरेशन आर्मीने कडालूर या स्टेशनजवळील रेल्वे मार्गावर बाँबस्फोट घडवून आणला. ते कुठेतरी बाँबस्फोट घडवून आणणार होते हे माहीत होते, पण कुठे करणार होते याबद्दल माहिती मिळाली नाही. आता मात्र चेन्नईतील व तामिळनाडूमधील अधिकारी सावध झाले आहेत. एक गोष्ट निश्चित – पाकिस्तानात कुठलेही सरकार आले तरी तेथे I.S.I. व सैनेतील अधिकारी भारताविरुध्द कारवाया चालूच ठेवणार आहेत, कारण राजकारणी त्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. 7 जुलैच्या टाइम्समध्ये बातमी आहे की, काश्मीरमध्ये लष्करे तोयबाचा हस्तक महम्मद नवीद जट्ट उर्फ अबू हन्झा याला 6 ऑक्टोबर 2012रोजी काश्मीरमध्ये तेथील जंगलातून आला व दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत होता व त्याने अनेक काश्मिरी पोलिसांना ठार मारले. काँग्रेस आघाडी सरकारच्या गाफीलपणाने बाँबस्फोटात, रेल्वे घातपातात असंख्य लोक मरण पावले. लाखो बनावट नोटा भारतात आल्या व अजून येत आहेत. मोदी सरकार या बाबतीत लक्ष घालून याला वेसण घालेल, अशी आशा करू या

No comments:

Post a Comment