Total Pageviews

Wednesday 26 October 2011

HINDUS ILLTREATED IN PAKISTAN

पाकिस्तानात पूरग्रस्त हिंदूंना इस्लामची शिकवण
-
Wednesday, October 26, 2011 AT 02:46 PM (IST)
इस्लामाबाद - दक्षिण सिंध प्रांतातील पूरग्रस्तांसाठी जमात-उद-दवा या संघटनेतर्फे उघडण्यात आलेल्या शिबिरामध्ये मुस्लिमांसह शेकडो हिंदू पूरग्रस्तही आश्रयासाठी आले आहेत. परंतु, त्यांच्यावर हेतूपुरस्सर इस्लामी शिकवणीचा मारा करण्यात येत आहे, असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

जमात-उद-दवा या संघटनेची उपशाखा असलेल्या फलाह-ई-इन्सानियत फाउंडेशनतर्फे हे शिबिर सुरू करण्यात आले आहे. त्यांनी पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या तंबूंमध्ये सुमारे २०० हिंदू नागरिकही आश्रयासाठी आले आहेत. पुरातून त्यांची याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुटका केली होती.

द एक्स्प्रेस ट्रिब्यून या दैनिकाने दिलेल्या बातमीत म्हटले आहे, की या लोकांना रोज दोन वेळा जेवण देण्यात येते आणि त्याचबरोबर इस्लामी शिकवणही देण्यात येते. हे नागरिक मलकानी या गावातून येथे आले आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली चांगली सोय केली आहे, मात्र जेवणाबरोबरच ते आपल्याला इस्लामची शिकवणही देतात आणि नमाज पढण्यासाठी आग्रह धरतात, अशी तक्रार बदिन येथील शिबिरात आलेल्या एका हिंदू नागरिकाने सांगितले.

बदिन येथील शिबिरात सुमारे दोन हजार पूरग्रस्त तंबूत राहतात. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून नमाज पढण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत नसली, तरी कुटुंबांना नमाज पढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खास चटया आणि पवित्र कुराणाच्या प्रती दिल्या आहेत. एक हिंदू महिला या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाली, की कार्यकर्ते येतात आणि नमाज पढो, कुराण पढो और सफाई करो, असे सांगत असतात.

गोलार्ची येथील शिबिराचे समन्वयक महंमद अश्रफ यांनी तेथे आश्रयासाठी आलेल्या ६० पूरग्रस्त कुटुंबांसाठी इस्लामी अभ्यासक्रमाचे वर्गही सुरू केले आहेत. त्यात १८ कुटुंबे हिंदूंचीही आहेत. या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना तो म्हणाला, की येथील लोक अशिक्षित असल्यामुळे, त्यांच्यासाठी हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तथापि, या वर्गात हजर राहणे अनिवार्य आहे का, या प्रश्नाला उत्तर देण्याचे त्याने टाळले.

No comments:

Post a Comment