Total Pageviews

Saturday, 26 October 2024

पाकिस्तान, देशके दुश्मनोंसे भारत खिलाफ दहशतवादका नया स्वरूप, एयरपोर्ट ए...

बॉम्बच्या खोट्या धमक्यांचा भारतातील विमान प्रवासावर मोठा परिणाम

भारत हा जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणाऱ्या हवाई वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या धमक्यांद्वारे भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे विमान उड्डाणांना आणि व्यवसायाला प्रचंड फटका बसला आहे.

 

या अफवांमुळे विमानांच्या उड्डाणाचे मार्ग बदलावे लागत आहेत आणि त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्राचे प्रचंड नुकसान होत आहे.

 

गेल्या आठवड्यात कॅनडातील इकॉलुएट या एअर इंडियाचे विमान उतरले होते.

211 प्रवाशांना घेऊन मुंबईहून शिकागोला जाणाऱ्या बोईंग 777 विमानाला 15 ऑक्टोबरला बॉम्ब असण्याची धमकी मिळाल्यामुळे मार्ग बदलावा लागला होता.

कित्येक तासांनंतर, कॅनडाच्या हवाई दलाच्या विमानानं या खोळंबलेल्या प्रवाशांना शिकागोला नेलं आणि त्यांचा प्र वास संपला.मात्र ही धमकी खोटी होती. भारतातील विमान कंपन्यांना लक्ष्य करत या म हि न्यात आतापर्यंत अनेक खोट्या धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या एका आठवड्यातच अशा किमान 90 धमक्या देण्यात आल्या होत्या.

 

बॉम्ब अफवांच्या संख्येत गंभीर वाढ

जून महिन्यात एकाच दिवशी 41 विमानतळांना ईमेलद्वारे विमानात किंवा विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या खोट्या धमक्या देण्यात आल्या . यामुळे विमानतळांवरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली.निम्म्या धमक्या दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन सर्वात मोठ्या विमानतळांच्या बाबतीत होत्या.

 

सप्टेंबर महिन्यात फ्रॅंकफुर्टला जाणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाला बॉम्ब असल्याच्या धमकीमुळे तुर्कीकडे वळवावं लागलं होतं ."अलीकडच्या काळात भारतीय विमान कंपन्यांना लक्ष्य करून देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये व्यत्यय निर्माण करणाऱ्या या घटनांमुळे प्रचंड आर्थिक नु क सान होत आहे."अशा प्रकारची खोडसाळ आणि बेकायदेशीर कृत्ये घडणं ही अतिशय गंभीर चिंतेची बाब आहे.

 

नेमकं काय होतं आहे?

विमान कंपन्यांना लक्ष्य करण्यासाठी देण्यात येणाऱ्या बॉम्बच्या खोट्या धमक्यांचा संबंध अनेकदा वाईट हेतू, लक्ष वेधून घेणं, मानसिक आरोग्याच्या समस्या, व्यवसायात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न किंवा खोडसाळपणा करणे इत्यादी बाबींशी आहे.गेल्या वर्षी बिहारमधील एका विमानतळावर चेक-इनची प्रक्रिया चुकल्यानंतर निराश झालेल्या एका प्रवाशानं असाच खोडसाळपणा केला आणी स्पाईस जेटच्या विमानाला उड्डाणाला विलंब करण्यासाठी बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली होती.

 

मागील काही वर्षांपासून भारतातील हवाईसेवा क्षेत्रात प्रचंड विस्तार होतो आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे.

 

मात्र अशा प्रकारच्या खोट्या बॉम्ब माहितीमुळे किंवा अफवांमुळे या क्षेत्राला फटका बसतो आहे. या क्षेत्रावर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो आहे.

 

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी भारतात देशांतर्गंत विमान उड्डाणांमधून 15 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.

 

विमान कंपन्यांना आलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होते.

देशातील 33 आंतरराष्ट्रीय विमानतळांसह 150 हून अधिक कार्यरत विमानतळांवर भारतात दररोज 3,000 हून अधिक विमानं येतात आणि जातात.

 

गेल्या आठवड्यात बॉम्बसंदर्भातील अफवा शिगेला पोहोचल्या असताना 14 ऑक्टोबरला भारतातील विमान कंपन्यांनी 4,84,263 प्रवाशांची वाहतूक केली. देशात एकाच दिवसात इतक्या प्रवाशांची वाहतूक करण्याचा हा एक विक्रम आहे.

 

No comments:

Post a Comment