Total Pageviews

Saturday 30 September 2023

#कॅनडाला धडा शिकवा,#कॅनडाचा भारत बनवा आणि कॅनडा वरती राज्य करा01 OCT 23

कॅनडाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी खालिस्तानी बोगीचा वापर

कॅनडा हा उत्तर अमेरिकेत असलेला सुमारे ९९.८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने जगात दुसरा मोठा  खंडप्राय देश आहे,पण कॅनडाची लोकसंख्या 3.76 कोटी म्ह्णजे अत्यंत विरळ आहे. नॉर्थ कॅनडा म्हणजे ऊत्तर कॅनडा हा अतिशय बर्फ पडणारा,अती थंड आणि अत्यंत कमी लोकसंख्या असलेला भाग आहे. कॅनडाच्या ऊत्तर भागात छोटी छोटी गावे आहेत, ज्यांची लोकसंख्या अत्यंत विरळ आहे. गेल्या वीस वर्षापासून कॅनडा झिरो पॉप्युलेशन ग्रोवथ मध्ये अडकलेला आहे. म्हणजे कॅनडाचा मृत्युदर मोठा आहे, परंतु जन्मदर अतिशय कमी आहे. म्हणूनच कमी होणाऱ्या लोकसंख्येवरती कंट्रोल करण्याकरता कॅनडाने युरोप प्रमाणेच बाहेरच्या देशातील लोकांना कॅनडात येणे, कॅनडामध्ये सेटल होणे किंवा कॅनडाचे नागरिकत्व मिळवणे अत्यंत सोपे केलेले आहे. कारण दरवर्षी नवीन लाखो परदेशीय नागरिकांची कॅनडाला गरज असते. मात्र हे नागरिक सुशिक्षित असावेत आणि कॅनडाला गरज असणाऱ्या भागामध्ये काम करणारे असावेत. प्रत्येक वर्षी असे ठरवले जाते की पुढच्या वर्षांमध्ये कॅनडाला कुठल्या कुठल्या क्षेत्रात कौशल्यपूर्ण नागरिकांची किंवा तरुणांची गरज आहे. उदाहरणार्थ शिक्षक, नर्सेस, आयटी प्रोफेशनल, स्किल वर्कर्स, ट्रक ड्रायव्हर्स वगैरे  आणि त्याप्रमाणे किती नवीन परदेशीय नागरिकांना कुठल्या क्षेत्रात कॅनडामध्ये प्रवेश करू द्यायचा, हे ठरते.

मात्र पंजाब मधले अनेक  युवक शिक्षण कमी असल्यामुळे किंवा परीक्षा पास व्हायची पात्रता नसल्यामुळे गैर कानुनी पद्धतीचा वापर करतात. आज पंजाब मध्ये अनेक एजंट्स आणि संस्था आहेत ज्या पंजाब मधल्या युवकांना कॅनडामध्ये प्रवेश करण्यामध्ये मदत करतात.मात्र  पुष्कळशी मदत ही कायद्याच्या विरुद्ध असते. उदाहरणार्थ काही आठवड्यापूर्वी बातमी आली होती की,  पंजाब मधून कॅनडामध्ये शिकण्याकरता आलेले चार हजार विद्यार्थी हे गैरकानुनी रित्या आले होते आणि त्यांना कॅनडाचे सरकार परत पाठवत आहे.

अनेक पंजाबी युवक खोटी सर्टिफिकेट घेऊन येतात, दाखवतात की आपले शिक्षण खूप जास्त झालेले आहे. याशिवाय त्यांना सांगितले जाते की तुमच्या एप्लीकेशन मध्ये तुम्ही असे दाखवा की तुम्ही सिख असल्यामुळे तुमच्यावरती पंजाब मध्ये अत्याचार होत आहेत आणि तुमचे मानव अधिकार हनन होत आहे, म्हणून भारतातील जुलमी राजवटी मधून सुटण्याकरता, तुम्ही कॅनडामध्ये आश्रय घेण्याकरता येत आहे. असे दिसते की कॅनडामध्ये आलेल्या अनेक युवकांच्या अर्जामध्ये त्यांच्यावरती खूप अन्याय झाले आहे असे दाखवण्यात आलेले आहे. जर तुमच्यावरती अन्याय  होत असतील, तर कॅनडा एक उदारमतवादी देश म्हणून अशा अश्या नागरिकांना कॅनडामध्ये प्रवेश देतो. पुरेशी शैक्षणिक किंवा इतर क्वालिफिकेशन नसले तर माझे मानव अधिकार भंग होत आहेत हे कॅनडामध्ये नागरिकत्व मिळण्यासाठी एक अतिशय उपयुक्त कारण ठरते .

पंजाब मधील अनेक गुन्हेगार,तस्करी करणारे हे पंजाब पोलीस पासून वाचण्याकरता कॅनडामध्ये येऊन राहतात .नंतर खालीस्तानी उग्रवादी संघटनांमध्ये सामील होऊन, आपले खरे रूप लपवायचा प्रयत्न करतात. असे शेकडो गुन्हेगार आज कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत.कॅनडामधील तीस हुन जास्त नागरिकांना दहशतवादी किंवा गुन्हेगार म्हणून भारताने घोषित केले आहे .त्यांना इंटरपोल द्वारे नोटीस पण देण्यात आलेली आहे. मात्र कॅनडा सरकार त्यावरती मतपेटीच्या राजकारण्याकरता कारवाई करायला तयार नाही. नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी ने आता भारतीय कायद्याच्या अंतर्गत अशा गुन्हेगारांची संपत्ती जप्त केली आहे.

अनेक वर्षापासून भारताच्या पंजाब मध्ये अफू गांजा चरस यांचे प्रमाण फार वाढलेले आहे. 2022 च्या आकडेवारी प्रमाणे पाकिस्तानने 288हून जास्त ड्रोन्स पंजाब मध्ये ड्रग्ज घेउन पाठवली आणि खरा आकडा याहुन खुप जास्त आहे. यामधील केवळ पाच किंवा सहा ड्रोन्स मधील अफ़ु आपल्याला पकडता आली. बाकीची गायब झाली. नशेचे प्रमाण पंजाब मध्ये खूपच वाढलेले आहे. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता ज्याचं नाव होतं "उडता पंजाब". यामध्ये अफ़ुगांजा चरसमुळे, पंजाबी युवकांची अवस्था कशी भयानक झाली आहे याचे चित्रण होते. सरकारी आकड्याप्रमाणे वीस लाखाहून जास्त पंजाबी युवक हे नशेच्या आहारी गेले आहेत आणि त्यामुळे लाखो कुटुंबे नष्ट झालेली आहेत. म्हणून पंजाब मधली अनेक कुटुंबे आपल्या तरुण युवकांना नशेपासून वाचवण्याकरता पंजाब मधून बाहेर पाठवतात.

पंजाब मध्ये श्रीमंती खूप आहे. तिथली जमीन अत्यंत सुपीक आहे, परंतु पंजाबचे युवक शेती करू इच्छित नाहीत. पंजाबची शेती ही बिहारी किंवा बांगलादेशींकडून केली जाते. पंजाब मधिल कुटुंबे आपली महागडी शेती जमीन विकून कॅनडा मध्ये जाण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये एजंट्स किंवा संस्थांना पैसे देतात.

No comments:

Post a Comment