Total Pageviews

Sunday 25 June 2023

भारताच्या आत आणि बाहेर घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा

 भारताच्या आत आणि बाहेर घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा 


सध्या चीन, भारत आणि जगातील अनेक देशांच्या विरुद्ध मल्टी डोमेन वॉर(एकाच वेळेला भारताशी वेगवेगळ्या स्तरावर चालवलेली युद्ध) लढत आहे,जे अनेक अनेक वर्षे सुरू राहणार आहे. ही लढाई भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनामध्ये घुसलेली आहे. या लेखामध्ये गेल्या आठवड्यात भारताच्या आत आणि बाहेर घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला जाईल, याचा भारताच्या सुरक्षेवरती काय परिणाम होतो.

1.आर्थिक सुरक्षा-UPI च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांच्या बाबतीत भारत संपूर्ण जगात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारतातील डिजिटल व्यवहार 89.5 दशलक्ष झाले आहेत. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत आता या चार देशांचे आकडे एकत्र केले तरी भारत खूप पुढे आहे. 

2.अमरनाथ यात्रेमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील बालटाल आणि पहलगाम या दोन मार्गांनी यात्रेकरू प्रवास करतात. आता सर्व यात्रेकरूंना आरएफआयडी कार्ड दिले जातील, जेणेकरून त्यांचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस केले जाईल आणि सर्वांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या प्रत्येक जनावरासाठी 50,000 रुपयांचे विमा संरक्षण असेल. 

3. एटीएसने गुजरात येथील पोरबंदर येथून एका परदेशी नागरिकासह चार जणांना अटक केली आहे. या लोकांचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आहे.

काश्मीरात ISI कडून महिला, मुलांच्या हातून शस्त्र पुरवठा; दहशतवाद्यांना संदेश देण्यासाठी मुलींचा वापर केला जात आहे जो थांबवला पाहिजे.

4. भारतीय वायुदलाचा लष्करासोबत संयुक्त सराव; पॅरा कमांडोंच्या आकाशातून उड्या, रॉकेट लाँचरसह अपाचे हेलिकॉप्टरचे उड्डाण.

5. INS विक्रमादित्य-विक्रांत पहिल्यांदाच अरबी समुद्रात एकत्र, नौदलाच्या सर्वात मोठ्या सरावात 35 लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या.

6.अमृतसरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घुसले, पाकिस्तानी ड्रोन, सीमेवर फेकले 5 किलो हेरॉईन.

7.भारताला अमेरिका देणार नाटो देशांचे तंत्रज्ञान, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अनेक करार शक्य.

8. खरीप पिकांच्या हमीभावात वाढ-केंद्र सरकारकडून यंदा भरीव वाढीसह हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत.

9. नर्कोटिक्स कंट्रोल बोर्डने अ्फ़ु,गांजा,चरसची चरसची तस्करी करणाऱ्या सिंडीकेटच्या विरोधामध्ये एक प्रचंड यश मिळवले, ज्या वेळेला हजारो कोटी रुपयाचे ड्रग डार्क नेट मधून तंत्रज्ञानाच्या मदतीने पकडण्यात आले.

10. भारताचे सैन्य प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी बंगलादेशची यात्रा केली, ज्यामुळे भारताचे बांगलादेश बरोबरचे संरक्षण आणि सामरिक संबंध अजून मजबूत झाले आहेत.

11.भारताच्या राफेल विमानाने आठ तास उड्डाण करून पॅसिफिक महासागरामध्ये असलेल्या शत्रूच्या टार्गेट वरती हल्ला करण्याची प्रॅक्टिस केली.

12. जगभरातील एआय रेग्युलेशनमध्ये भारताची भूमिका मोठी आणि महत्वाची ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन 


13. कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमनच केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री, विपरित परिणाम टाळण्याचा हेतू

14. एल-निनो’ सक्रिय झाल्यामुळे भारतातील मोसमी पावसावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती ,मात्र देशाच्या जल सुरक्षेवर विषेश लक्ष ठेवावे लागेल. 


इंदिरा गांधींच्या हत्येचा सीन रिक्रिएट केला खलिस्तान समर्थकांनी 

कॅनडाच्या ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तानी समर्थकांनी ५ किमी मोठी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत भारताच्या माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ चालवण्यात आला. 

व्हिडीओमध्ये इंदिरा गांधींचा पुतळा दिसतोय. पुतळ्या रक्तालाने माखलेली साडी नेसवलेली आहे. तसेच या पुतळ्यासमोर बंदूक रोखून उभे असलेले शिख हल्लेखोर (जे इंदिरा गांधींचे सुरक्षारक्षक होते) दिसत आहे. या चित्ररथाद्वारे इंदिरा गांधींच्या हत्येचा सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न खलिस्तान समर्थकांनी केला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना हा मुद्दा कॅनेडियन सरकारसमोर उपस्थित केली आहे.


केंद्रातर्फे मणिपूरसाठी शांतता समितीची स्थापना

मणिपूरमधील विविध वांशिक गटांमध्ये शांतता प्रक्रियेचे सुलभीकरण करणे आणि परस्परविरोधी पक्षांमध्ये संवादाची सुरुवात करणे, यासाठी केंद्र सरकारने राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या शांतता समितीत मुख्यमंत्री, काही मंत्री, खासदार, निरनिराळय़ा राजकीय पक्षांचे नेते आणि नागरी समाज गट यांचा समावेश आहे.

ही समिती सामाजिक सुसंगतता व परस्परांबाबतची समजूत बळकट करेल आणि विविध वांशिक गटांमध्ये सौहार्दपूर्ण संवाद सुलभ करेल. या समितीत माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध वांशिक गटांचे प्रतिनिधी यांचाही समावेश आहे.  

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची भेट घेतली. 

सुरक्षा दलांची लुटलेली शस्त्रास्त्रे परत करण्यासाठी आमदार सुसिंद्रो मैतेई यांनी आपल्या निवासस्थानी एक पेटी (‘ड्रॉप बॉक्स) ठेवण्यात आला आहे. येथे शस्त्रे परत करणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.


पंचेन लामा राजकीय कैदी म्हणून अटक

दलाई लामा यांच्यानंतर तिबेटचे दुसरे सर्वोच्च धर्मगुरू ११ वे पंचेन लामा यांची चीनने तत्काळ सुटका करावी आणि मानसरोवर यात्रेवरील शुल्क व बंदी हटवावी, अशी मागणी भारत-तिबेट मैत्री असोसिएशनने केली आहे.  दलाई लामा यांनी १४ मे १९ रोजी तिबेटचे अकरावे पंचेन लामा घोषित केल्यानंतर अवघ्या  तीन दिवसांनी १७ मे रोजी चीनने त्यांच्या कुटुंबाला राजकीय कैदी म्हणून अटक केली.  

हायटेक पाणबुड्या घेण्यासाठी जर्मनीची निवड 

भारत आणि जर्मनीमध्ये 6 पाणबुड्यांसाठी सुमारे 43,000 कोटी रुपयांचा करार होणार आहे. भारत दीर्घकाळापासून आपल्या नौदलासाठी पाणबुड्या घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या भारतीय नौदलाकडे 16 पाणबुड्या आहेत. मात्र यातील 11 खूप जुन्या आहेत. भारताकडे असलेल्या दोन पाणबुड्या अणुशक्तीवर चालणाऱ्या आहेत. पाणबुड्या बांधण्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या करारानुसार 6 आधुनिक डिझेल पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत.

यासाठी जर्मनीची सागरी शस्त्रास्त्र कंपनी आपले तंत्रज्ञान भारताला देणार आहे. या सर्व 6 पाणबुड्या (एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन) AIP तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. या तंत्रज्ञानाने बनवलेल्या पाणबुड्या पारंपरिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपेक्षा सुरक्षित असतात. कारण त्या बराच काळ समुद्राच्या आत राहू शकतात.

भारताने यापूर्वी 1986 ते 1994 या कालावधीत जर्मनीकडून चार शिशुमार श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी केल्या होत्या. जर्मन तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्या भूतकाळातही भारतासाठी भरवशाच्या राहिल्या आहेत, म्हणूनच भारताला नवीन पाणबुड्यांसाठी जर्मनीशी करार करणं गरजेचं आहे.


No comments:

Post a Comment