नवी दिल्ली - भारताने पुलवामा हल्ल्याचा
बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. त्यानंतर, पाकिस्ताननेही
भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, दोन्ही हल्ल्यानंतर
भारत-पाकिस्तान सीमेवर आणि देशातील अनेक राज्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला
आहे. त्यातच, भारतीय वायू दलाचे विंग कमांडर पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत.
त्यानंतर देशभरातून #BringbackAbhinandan असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. मात्र, एक जबाबदार भारतीय
म्हणून आपण काही बाबी लक्षात ठेवायला हव्यात. इंडियन आर्मी मेम्स या फेसबुक
पेजवरुन तसे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर आपण जोक्स व्हायरल करतो, इथपर्यंत सर्वकाही ठीक आहे. पण, सद्यस्थित काळजीपूर्वक
विचार आपण कृत्य केलं पाहिजे. कारण, आज देश हाय अलर्टवर आहे. एकक्षण थांबा आणि
देशाचा, सैन्याचा विचार करा.
तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि
इंस्ट्राग्रामवरुन करत असलेले मेसेज काही क्षणांतच शत्रू राष्ट्रांपर्यंत पोहचत
आहेत. त्यामुळे, जर तुमचा मित्र सैन्यात असेल, तर त्यासंबंधीचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याची
माहिती देणारे कुठलेही मेसेज सोशल मीडियावर टाकू नका.
पुढील काही महिन्यांसाठी आपण हे टाळायलाच
हवं. तुमच्या हुशारीचा फायदा हा शत्रूराष्ट्राला नकळतपणे होतो, हे लक्षात घ्या.
लोकल किंवा राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातील कुठलेही फोटो, व्हिडीओ किंवा माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नका. तसेच सैन्यातील
लोकल किंवा राष्ट्रीय सुरक्षा संदर्भातील कुठलेही फोटो, व्हिडीओ किंवा माहिती सोशल मीडियावर व्हायरल करू नका. तसेच सैन्यातील
जवान किंवा सैन्यातील सामुग्रीसोबतचे
सेल्फीही शेअर करू नका. शत्रूराष्ट्रांकडून भारतीय सोशल मीडियाचे मॉनिटरिंग
करण्यात येत आहे. प्रत्येक शहरातील सोशल मीडियावर शत्रूराष्ट्राची नजर आहे.
कुठल्याही विमानतळ, रेल्वेस्थानक किंवा
सरकारी कार्यालयाचे फोटो शेअर करू नका.
भारतीय जवानांसदर्भातील सेन्सेटीव्ह असा कुठलाही व्हिडीओ ग्रुपवर शेअर करू नका आणि तसं
करणाऱ्यांनाही बजावून ठेवा.

तुम्ही स्वत: सतर्क राहा आणि
काहीही अनुचित प्रकार होत असल्याची कुणकुण लागताच, संबंधित किंवा लोकल सुरक्षा
यंत्रणांशी संपर्क साधा.
तुम्ही प्रवास करत असताना देशातील सुरक्षा
जवानांनी तुमची चेकिंग केल्यास, त्यांच्याशी हुज्जत घालू नका. विमानतळ, रेल्वेस्थानक किंवा बस स्थानकावर CRPF जवानांना सहकार्य करा.
देशाला तुमची गरज आहे, त्यासाठी तुम्ही तयार
राहा. देशहित लक्षात घेऊन आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करा. सुरक्षितता आणि
वाहतुकीचे नियम पाळा.
एक भारतीय म्हणून आपल्या संपर्कातील इतर
नागरिकांनाही याबाबत जागरूक बनवा, लहान मुले, तरुण, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यांमध्ये जनजागृती करा. तसेच या युद्धजन्य परिस्थितीत
प्रत्येकाने आपलं काम चोखपणे आणि देशहित लक्षात घेऊ केलं पाहिजे.
गुगलकडूनही तुमच्या जबाबादारीवर लक्ष
ठेवलं जात आहे, त्यामुळे एक संवेदनशील, सतर्क आणि जबाबदार भारतीय नागरिक बनून
देशासाठी स्वत:चं योगदान द्या
दरम्यान, हा मेसेज भारतीय सैन्यासंदर्भातील बातम्या
देणाऱ्या Indian Military Memes या फेसबुक पेजवरून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment