Total Pageviews

Friday 27 January 2017

जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनात महाराष्ट्राचे तीन जवान हुतात्मा


काही जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. नवी दिल्ली | January 27, 2017 4:08 PM 1.4K SHARES FacebookTwitterGoogle+Email जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनात महाराष्ट्राचे तीन जवान हुतात्मा जम्मू काश्मीरला जोरदार बर्फवृष्टीमुळे सोनमर्गजवळ लष्कराच्या छावणीवर हिमस्खलन झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली होती. जम्मू काश्मीरला जोरदार बर्फवृष्टीमुळे सोनमर्गजवळ लष्कराच्या छावणीवर हिमस्खलन झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली होती. या दुर्घटनेत १४ जवान हुतात्मा झाले असून यात महाराष्ट्राच्या तीन सुपुत्रांचा समावेश आहे. यामध्ये माना (ता. मुर्तिजापूर, जि. अकोला) येथील शिपाई संजू सुरेश खंदारे (वय २६), अकोल्याचे आनंद गवई (वय २६)व गंजपूर (ता. धारूर, जि. बीड) येथील विकास समुंद्रे (वय२६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे पार्थिव लवकर त्यांच्या गावी आणण्यात येणार आहे. भारत – पाकिस्तान सीमारेषेजवळ सोनमर्गमध्ये भारतीय लष्कराची छावणी आहे. या छावणीवर बुधवारी दुपारी हिमस्खलन झाले होते. या घटनेत काही जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील सहा जणांची सुटका करण्यात यश आले होते. तर एका जवानाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित बेपत्ता जवानांचा शोध घेण्यात येत होता. या शोध पथकाला उर्वरित जवानांचे मृतदेह आढळून आले. काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर गुरेझ क्षेत्र एकाच कुटुंबातील चार जण हिमस्खलन होऊन मरण पावले होते. गुरेझ येथील तुलैल भागात पहाटेच्या वेळी हिमस्खलन झाले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मद्रास रेजिमेंटचे १० जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले होते.

No comments:

Post a Comment