Total Pageviews

Monday 30 January 2017

शौर्याचा गौरव…!यंदा अशोक चक्राचा सन्मान ३५ राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर बहाल करण्यात आला. तो त्यांच्या वीरपत्नी चासेन लोवांग यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला तेव्हा उपस्थितांचे आणि संपूर्ण देशाचे डोळे पाणावले होते


January 30, 2017037 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुरस्कारांमध्ये यंदा, पाकिस्तानात घुसून यशस्वीपणे पार पाडलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये भाग घेतलेल्या जवानांचा, राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरव करण्याच्या घटनेने, पुरावे द्या म्हणणार्‍यांच्या तोेंडावर चांगलीच चपराक बसली असणार! प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणाच्या प्रारंभीच, आपल्या देशाच्या रक्षणासाठी धरातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. गतवर्ष व सध्या सुरू असलेले वर्ष हे अनेक कारणांनी आमच्या सुरक्षा दलांच्या कर्तृृत्वाने जसे गाजले तसेच त्यांच्या हौताम्याने देशाला वेदना देऊन गेले. दिल्लीत राजपथावर जेव्हा गणतंत्र दिनाचा सोहळा सुरू होता आणि संपूर्ण देश हा सोहळा डोळ्यांत साठवत होता, त्याच वेळी आपले जवान हिमवादळाशी मुकाबला करीत होते. अखेर निसर्ग जिंकला आणि आपले १५ जवान हिमवादळाने आपल्या कवेत घेतले. गणतंत्र दिनाच्या सोहळ्याचा आनंद सारा देश साजरा करीत असताना, ही बातमी कळताच, संपूर्ण देश हळहळला. ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालेच नाही असे म्हणणारे आता, ही घटना घडलीच नाही, असे म्हणणार नाही. कारण, अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान आमचे होते ना! ते भारताचे शूरवीर शिपाई होते. त्यांच्या बलिदानामुळे त्यांना हळहळ वाटली की नाही माहीत नाही; पण भारतीय जवानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे घुसून पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याच्या घटनेने या नतद्रष्ट लोकांना मात्र अतीव दु:ख झाले होते. भारतीय जवानांचे अमूल्य प्राण घेणार्‍या पाकिस्तान्यांचा यांना आलेला कळवळा आपण पाहिलाच आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ बोगस होते, असे म्हणण्यापर्यंत ज्यांची मजल गेली, ज्यांनी पुरावे द्या, असे नीच उद्गार काढले, त्यांनी माफी मागण्याचे वृत्त अजूनपर्यंत आलेले नाही. कारण, यांची औकादच नाही! बाटला हाऊस चकमक ही बोगस होती, असे म्हणणार्‍या केजरीवालांकडून आणि कॉंग्रेसवाल्यांकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कदाचित ते आपले तोंड लपवून बसले असावेत. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू होण्याआधी, देशाच्या संरक्षणासाठी अतुलनीय कामगिरी बजावणार्‍या शूरवीर जवानांना विविध चक्र पुरस्कारांनी सन्मानित करण्याची परिपाठी कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. यंदा अशोक चक्राचा सन्मान ३५ राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर बहाल करण्यात आला. तो त्यांच्या वीरपत्नी चासेन लोवांग यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला तेव्हा उपस्थितांचे आणि संपूर्ण देशाचे डोळे पाणावले होते. अरुणाचलच्या तिराप जिल्ह्यातला एक सामान्य युवक. बालवयातच त्याला लष्करात जाण्याची ओढ होती. त्यासाठी तो कित्येक किलोमीटर धावायचा. त्याला २६ मे २०१६ रोजी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून आदेश आला की, नौगांव भागातील शामशबरी पर्वतांमधून येणार्‍या घुसखोरांना रोखा. हे ठिकाण १२,५०० फुटांवर होते. ३७ वर्षांचा दादा आपल्या चमूसह तत्काळ त्या भागात पोहोचला आणि दोहोबाजूंनी अंधाधुंद गोळीबार सुरू झाला. त्याने आधी दोन घुसखोरांना गोळ्या झाडून यमसदनी पाठविले. अन्य दोन पळून गेले आणि ते एका मोठ्या खडकामागे लपून बसले. त्यांचा पाठलाग करून दादाने बेछूट गोळीबार केला व एकाला लोळविलेच. पण, चवथ्याने संधी साधून दादावर गोळ्यांचा वर्षाव केला. पण, दादा एवढा धाडसी होता की, शरीरावर कित्येक ठिकाणी गोळ्या लागूनही त्याने चवथ्याला ठार मारूनच अखेरचा श्‍वास घेतला! हवालदार हंगपन दादा देशासाठी शहीद झाला. दादाच्या या शौर्याची कहाणी पुरस्कार देतेवेळी जेव्हा सांगितली जात होती, तेव्हा सोहळ्याच्या ठिकाणी नीरव शांतता पसरली होती. त्याला १० वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा सेवांग दादा हा मुलगा आहे. या सोहळ्याच्या समाप्तीनंतर दादाची वीरपत्नी चासेन म्हणाल्या, ‘‘माझ्या पतीच्या बलिदानाचा मला गौरव आहे. पण, आज ते या जगात नाहीत, याचे दु:खही बोचत आहे. मला माझ्या पतीसारखेच माझ्या मुलांनाही शूरवीर बनवायचे आहे.’’ त्यांच्या सात वर्षांच्या सेवांगला जेव्हा विचारण्यात आले की, तू मोठा होऊन काय बनणार? तेव्हा तो ताडकन म्हणाला, ‘‘मला माझ्या बाबांप्रमाणेच लष्करात जायचे आहे आणि देशाची सेवा करायची आहे.’’ दादाच्या लहान मुलाच्या मनात लष्करात जाण्याची इच्छा एवढ्या लहान वयात यावी, हेच मुळात मनाला सुखावून गेले. राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल मनीष अगरवाल म्हणाले, ‘‘दादा हा काही साधासुधा जवान नव्हता. तो शत्रूवर एकदम आक्रमकपणे तुटून पडायचा तेव्हा तो कशाचाही विचार करीत नसे. आम्ही दादांच्या हौतात्म्याने एक असामान्य सैनिक गमावला आहे…’’ कोणत्याही वातावरणात आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणार्‍या या शूरवीर जवानांच्या भरवशावरच आपण मोकळा श्‍वास घेऊ शकतो. ज्या हंगपन दादाने अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करले तो भाग १२,५०० फुटांवर होता. आमचे जे शूरवीर १५ जवान हिमकड्याखाली दबून शहीद झाले, तो भागही एवढ्याच उंचीवर होता. या जवानांकडे केवळ आपल्या देशाच्या रक्षणाचीच जबाबदारी नव्हती, तर त्या परिसरात राहणार्‍या जनतेला आकस्मिक प्रसंगी मदत करण्याचीही होती. हिमवर्षावाचा त्यांनी आधी पूर्ण ताकदीने मुकाबलाही केला. पण, त्यांचे अखेरचे प्रयत्नही व्यर्थ ठरले आणि ते देशासाठी शहीद झाले. आज बर्फाळ प्रदेशातील उणे तापमानात काम करणारे जवान साधेसुधे नसतात. त्यांना अनेक खडतर चाचण्यांमधून जावे लागते आणि नंतरच त्यांची पोस्टिंग अशा बर्फाळ प्रदेशात होत असते. त्या १५ जवानांना गमावून केवळ संरक्षण दलाचेच नुकसान झाले नाही, तर या देशाचीही अपरिमित हानी झाली. परंतु, आपल्याच देशात लष्कराबद्दल काडीचीही सहानुभूती नसलेले नतद्रष्ट आणि त्यांची विधाने पाहिली की, तळपायाची आग मस्तकात जाते. असे लोक या देशात निपजले, हे या देशाचे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. आज आपला देश चोहोबाजूने शत्रूंनी वेढला गेला आहे. पाकिस्तानने अलीकडे आपल्या जवानांचे मोठे नुकसान केले आहे. पाकिस्तानचा मित्र चीनने तर मसूद अजहरची खुली पाठराखण करीत, आपण दहशतवाद्यांच्या बाजूने आहोत, हे जगाला दाखवून दिले आहे. संसदेवर हल्ला करणारा, विमानाचे अपहरण करून कंदहारला नेणारा, पठाणकोट लष्करी तळावर हल्ला करणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर हाच असल्याचे पुरावे भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत दिले. एकूण १५ पैकी १४ सदस्यांनी भारताच्या प्रस्तावाला मान्यता दिली. केवळ चीनने नकाराधिकार वापरून मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास विरोध केला आहे. आता पाकिस्तान चीनच्या भिकेखातर चीनची मर्जी सांभाळत आहे व चीन पाकिस्तानची! हा नवा धोका भारतासमोर असताना, आज सारा देश एकदिलाने देशाच्या व लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आ

No comments:

Post a Comment