Total Pageviews

Sunday 17 July 2016

हिंदुस्थान विरोधाची कीड Saturday, July 16th, 2016 अभिजित दिलीप पानसे


बेधडक : हिंदुस्थान विरोधाची कीड Saturday, July 16th, 2016 अभिजित दिलीप पानसे मी बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्ससाठी, सोनमर्ग (कश्मीर) येथे एक महिना गेलो होतो. कोर्स आटोपल्यावर श्रीनगरहून पहलगामला गेलो. तेव्हा श्रीनगरच्या हॉटेलातील व्यक्तीने जाण्याचा मार्ग सांगताना म्हटलं होतं. ‘आपको श्रीनगर से इस्लामाबाद तक ट्रेन मिल जाएगी। इस्लामाबाद से सुमो पहलगाम के लिए मिलेगी।’ ‘इस्लामाबाद’ हा शब्द ऐकून मला धक्काच बसला! इस्लामाबाद म्हणजे पाकिस्तानला ट्रेन जाते इथून?’ क्षणभर हा विचार आला. मग आठवलं की कश्मीरमध्ये अनंतनागचं (इस्लामाबाद) करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण काय तर ‘अनंतनाग’ हे हिंदू नाव आहे. मी अनंतनागला पोहेाचलो तिथे प्रमुख बाजारातून जाताना एक दुकान दिसलं. पाटीवर लिहिलं होतं ‘इस्लामाबाद’ मी कोणाला दिसणार नाही असे पटकन दोन फोटो काढले. समोर एक दोन दुकानांत हिरवे चांद तारा असलेले पाकिस्तानच्या झेंड्याशी अगदी साधर्म्य असलेले झेंडे लावले होते. तिथलं वातावरण बघता तेथील फोटोज काढायची अवास्तवी हिंमत झाली नाही. हा सगळा प्रकार विषन्न करणारा होता. अनंतनाग, बारामुल्ला हे जिल्हे तर आतंकवाद्यांचे गड मानले जातात. याशिवाय आणखी एक धक्कादायक अनुभव मला आला. श्रीनगरला मी लाल चौकात दल झीलकडे जाणार्‍या रस्त्यावरील डावीकडील एका डेड एण्ड असलेल्या गल्लीतील ‘हेरिटेज’ नाव असलेल्या हॉटेलात राहिलो. गिर्यारोहण कोर्सनंतर बरेच दिवसांनी हॉटेलमध्ये आंघोळ करून फ्रेश झालो आणि टीव्ही लावला. एका लोकल टीव्ही चॅनलवर ‘पिकू’ ऊर्दू सबटायटल्समध्ये सुरू होता. इतर लोकल चॅनलवर असतात त्या प्रकारे खाली जाहिराती स्क्रोल होत होता. माझं लक्ष सहज जाहिरातीकडे गेलं आणि मी ताडकन उडालोच! आपल्याकडे लोकल हॉस्पिटल्स, कपड्यांची व इतर दुकाने, जागा विकण्याच्या जाहिराती असतात तशाच त्या होत्या, पण फरक हाच होता की, ‘… ऑर्थोेपेडीक हॉस्पिटल लाहोर’ ‘फ्लॅट स्किम्स रावळपिंडी’ अगदी पेशावर, लाहोर, इस्लामाबाद येथील कपड्यांच्या सेल्सच्या जाहिराती, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, दुकानांची नावे, मूळव्याधीच्या डॉक्टरचा दवाखाना, पत्ता वेळ, तर पाकिस्तानी शहरांतील रस्त्यांची नावे, चौक, पूल खासगी स्क्रोल होत होते. माझा डोळ्यांवर विश्‍वास होत नव्हता मी जे काही पाहत होतो त्यावर! किती खोलवर ही राष्ट्रद्रोहाची हिंदुस्थानविरोधाची कीड गेलेली आहे! डोळ्यांसमोर सतत या जाहिराती, दर शुक्रवारी होणारी दगडफेक, देशविरोधी भाषणे इ. सतत स्लो पॉइझनिंग ब्रेन वॉशिंग होत असताना भावी पिढी ही हिंदुस्थान विरोधक आणि पाकिस्तान समर्थक होतेच. पाकिस्तानचे झेंडे फडकावणं दहशतवाद्यांच्या जनाज्यात लाखोंनी सामील होणं, बंद पुकारणं, परिणामी सध्या अमरनाथ यात्रेवर आलेलं संकट हे सारं तर अंतिम परिणती, एण्ड रिझल्ट आहे. मी परत येत असताना रेल्वेत शेजारी एक मूळचा तेलंगन्याचा सैन्यातील रामबनला (जम्मू श्रीनगर हायवेवरील एक प्रमुख शहर) ३ वर्षे ड्युटी केलेला जवान होता. त्याने सांगितले की कश्मीरमध्ये कोणत्या हॉटेलवाल्याला सैनिकाने पाणी मागितले की त्याला संडासाकडे बोट दाखवून म्हणतात की जावो वहा से पी लो! आमच्या स्किइंग, कॅम्पवेळी सीआरपीएफची मुलं ‘अ‍ॅवलॉन्च रेस्क्यू’ टे्रनिंगसाठी आले होते. यांना कडक सूचना होती की डोकं सतत झाकून ठेवावे कारण त्याची ‘बारीक कटिंग’ दिसता कामा नये. आम्हालाही कडक सूचना होती की, कुठल्याही लोकल व्यक्तीशी, दुकानदाराशी राजकारणाबद्दल हिंदुस्थान-पाकिस्तानबद्दल एक अवाक्षरही बोलायचं नाही. आर्मी कपड्यांशी साधर्म्य असलेले जॅकेट किंवा लोअर्स घालायचे नाही. सोनमर्गला गिर्यारोहणाचा कोर्स केला आणि पहलगाम (आरू)ला स्किइंगचा! त्यामुळे सोनमर्ग आणि पहलगाम या भागातील लोकांच्या वरवरील वागण्यात फरक जाणवला. सोनमर्ग हे कश्मीर खोर्‍यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरील शहर आहे. तेथील लोक मोकळे बोलणारे वाटले तर पहलगाव (अनंतनाग) व भागातील लोकांच्या वागण्यात, डोक्यात हिंदुस्थानविरुद्धचा राग, संदिग्ध वागणं जाणवतं. ‘अमरनाथ’ हे अनंतनाग जिल्ह्यात येतं. तेव्हा मॅगीवर बंदी होती आणि तिथे सहज मॅगी मिळत होती. त्यावर दुकानदाराचं एक वाक्य होतं, ‘यह हिंदुस्थान थोडी है मॅगी पे बॅन होने के लिए!’ फेब्रुवारीमध्ये ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’ झाली होती. पहलगामला रोज ‘कश्मीर टाइम्स’ वर्तमानपत्रात आम्हाला पीसीएलचं न्यूज कवरेज वाचायला मिळायचं. ज्या प्रकारे (आपल्याकडे) आयपीएलचं होतं. दिल्लीहून जम्मूला बसने जाताना बारामुल्लाह जिल्ह्यात पहाडी भागात राहणार्‍या एका २५ वर्षांच्या मुलाशी चांगली ओळख झाली होती. तो सौदी अरबला नोकरीसाठी जाण्यासाठी शारीरिक चाचणी द्यायला पासपोर्ट कार्यालयात आला होता. काही वेळाने मी हळूहळू त्याच्याशी पाकिस्तान, आतंकवाद, हिंदुस्थान यावर बोलायला सुरुवात केलीच. तेव्हा त्याने सांगितले की, त्याचे सख्खे भाऊच दगडफेक करतात. त्यालाही जिहादी बनायला उद्युक्त करतात. नही तो जन्नत कैसे मिलेगी म्हणतात. यावरून हे लोक किती धर्मवेडे, विज्ञानापासून दूर असलेले आहेत हे जाणवतं. - See more at: http://www.saamana.com/utsav/bedhadak#sthash.igYSndvx.dpuf

No comments:

Post a Comment