Total Pageviews

Tuesday, 12 July 2016

KASHMIR VIOLENCE-कश्मीर का पेटले?

कश्मीर का पेटले? Tuesday, July 12th, 2016 कश्मीरात जो भडका उडाला आहे त्याचे चटके देशाला बसत आहेत. इकडे अयोध्येत राममंदिर उभारणी करण्याची घोषणा झाली आहे. त्या आधी कश्मीरातील अमरनाथ यात्रा सुरळीत पार पाडावी म्हणजे झाले. जे चालले आहे ते भयंकर आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांना हे सर्व तत्काळ कळवायला हवे. कश्मीरातील सध्याची स्थिती राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक आहे. कश्मीर का पेटले? हिंदुस्थानचे कणखर, खंबीर व हिंमतबाज पंतप्रधान परदेश दौर्याावर आहेत व इकडे कश्मीर खोर्याकत हिंसेचा आणि फुटीरतेचा वणवा भडकला आहे. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी हा सुरक्षा दलाच्या चकमकीत मारला गेला तेव्हापासून तेथे भडकलेली हिंसा थंड होण्याचे नाव नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा मध्येच थांबवावी लागली आहे. या दरम्यान यात्रेकरूंच्या गाड्यांवर हल्ले झाले. हे चित्र राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगले नाही. पंतप्रधान मोदी हे आफ्रिकेच्या दौर्यायवरून परत येतील तेव्हा कश्मीरच्या भयंकर स्थितीवर त्यांना विचार करावा लागेल. हिंदुस्थानच्या भूमीवर अमरनाथ यात्रा गुंडाळावी लागते व देशभरातून तेथे पोहोचलेल्या हिंदू भक्तांवर जीवघेणे हल्ले होतात यापेक्षा दुर्दैव ते कोणते? बुरहान वानी हा अतिरेकी संघटनेचा म्होरक्या होता व हिंदुस्थानातून फुटून निघण्याच्या चळवळीचे नेतृत्व करीत होता. कश्मीर खोर्याणतील अनेक दहशतवादी कृत्यांत त्याचा हात होता. त्यामुळे सुरक्षा दलाच्या चकमकीत तो मारला गेला याबद्दल मातम करण्याचे कारण काय? पण वानीच्या मृत्यूनंतर हजारो कश्मिरी लोक रस्त्यांवर उतरले. त्यांनी पोलीस ठाण्यांना आगी लावल्या. लष्करी तळांवर हल्ले केले. सरकारी इमारतींना आगी लावून भस्मसात केल्या. त्यांच्या हल्ल्यांत लष्करी जवान, पोलीस मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. किमान पंधरा पोलीस अधिकारी या हिंसेत मारले गेले असून सात पोलीस अधिकारी बेपत्ता आहेत. हे चित्र धक्कादायक आहे. कश्मीर खोर्या तील कायदा, सुव्यवस्था बेचिराख झाल्याचेच हे निदर्शक आहे. अमरनाथ यात्रा बंद पडली असून यात्रेकरूंवरील हल्ले व लुटालूट सुरू आहे. जम्मू-कश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांचे आघाडी सरकार आहे. मुख्यमंत्री मेहबुबा यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसे देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही दिल्लीत शांततेचे आवाहन केले. राजनाथ सिंह यांनी कश्मीरच्या स्थितीवर सोनिया गांधी यांच्याशीदेखील चर्चा केली. मात्र कश्मीर खोर्याेत जे लोक रस्त्यावर उतरले आहेत ते माथेफिरू आहेत व हिंदुस्थानविरोधी नारे देत दंगा करीत आहेत. त्यांना पाकिस्तानची फूस असून वानी याच्या हत्येनंतर कश्मीर पेटवण्यामागे पाकचेच हात आहेत. तसे नसते तर वानीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानने नक्राश्रू ढाळले नसते. बुरहान वानी प्रकरण हे Extra judicial Killing म्हणजे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील हत्या आहे, असे चांदतारे पाकिस्तानने तोडले आहेत. ‘कश्मिरी लोकांवर हिंदुस्थान अन्याय करीत आहे व कश्मीरच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार तेथील लोकांना दिला पाहिजे’, असे म्हणत जनमत चाचणीची पुंगी पाकिस्तानने वाजवली आहे. या सगळ्याचा अर्थ असा की, कश्मीरचा प्रश्ने आधीपेक्षा जास्त चिघळला असून पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांच्याही हातात आता काही राहिलेले नाही. मेहबुबा मुफ्ती या वरून शांततेचे आवाहन करीत असल्या तरी बुरहान वानीच्या बाबतीत त्यांची नेमकी भूमिका काय? अफझल गुरूला कश्मीरचा स्वातंत्र्यसैनिक किंवा क्रांतिकारक मानण्याचा उद्दामपणा त्यांनी याआधी केला होता व हा त्यांचा पूर्वेतिहास पाहता कश्मीर खोर्यााची सूत्रे त्यांच्या हाती देऊन भाजपने चूक तर केली नाही ना, अशी भीती वाटते. कश्मीरात जो भडका उडाला आहे त्याचे चटके देशाला बसत आहेत. इकडे अयोध्येत राममंदिर उभारणी करण्याची घोषणा झाली आहे. त्या आधी कश्मीरातील अमरनाथ यात्रा सुरळीत पार पाडावी म्हणजे झाले. जे चालले आहे ते भयंकर आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांना हे सर्व तत्काळ कळवायला हवे. कश्मीरातील सध्याची स्थिती राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक आहे. हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला; न्यायालय पेटवले Tuesday, July 12th, 2016 मृतांची संख्या २३ श्रीनगर, दि. ११ (वृत्तसंस्था) – हिजबुल मुजाहिदीनचा ‘पोस्टरबॉय’ दहशतवादी बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर कश्मीर खोर्यावत उसळलेला आगडोंब चार दिवसांनंतरही कायम आहे. सोमवारी ठिकठिकाणी भडकलेल्या हिंसाचारात आणखी दोघेजण ठार झाले. आतापर्यंत मृतांची संख्या २३ वर गेली आहे. संतप्त जमावाने पुलवामा येथील हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला केला, तर सोपोरे येथील पोलीस ठाणे जाळले. अनंतनाग येथील जिल्हा न्यायालयाला आग लावली. संचारबंदी आणि मोठा बंदोबस्त असतानाही हिंसाचार सुरू असून कश्मीर खोर्या त प्रचंड तणाव आहे. या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका हजारो अमरनाथ यात्रेकरूंना बसला असून श्रीनगर येथून त्यांना एअरलिफ्ट केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानात बुरहानसाठी मातम सुरू असून ‘आगीत तेल ओतण्या’चे काम सुरू आहे. शुक्रवारी रात्री बुरहान वाणी या २२ वर्षीय दहशतवाद्याचा खात्मा झाल्यापासून कश्मीरात तणाव वाढतच आहे. सोमवारी पुलगाम जिल्ह्यात लष्करी जवान आणि पोलिसांवर हल्लेखोर जमावाने दगडफेक करीत जाळपोळ केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन तरुण ठार झाले. विमानतळावर दगडफेक, जाळपोळ हल्लेखोरांकडून सातत्याने लष्करी जवान, पोलिसांना टार्गेट केले जात आहे. पुलवामा येथील हवाई दलाच्या विमानतळावर तुफानी दगडफेक करीत हल्ला करण्यात आला. विमानतळाच्या परिसरातील गावताला आग लावली. हल्लेखोरांना रोखण्यासाठी जवानांनी आटोकाट प्रयत्न केला. दरम्यान, हल्लेखोरांकडून लष्करी आणि निमलष्करी दलाच्या ठाणे आणि तळांना टार्गेट केले जात आहे. तेथील सुरक्षाव्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे. दरम्यान, सोपोरे येथील पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली.कश्मीर खोर्याेतील हिंसाचार रोखण्यासाठी लष्करी आणि निमलष्करी जवानांच्या ६० बटालियन तैनात केल्या आहेत. एका बटालियनमध्ये एक हजार जवान आहेत. तसेच सोमवारी निमलष्करी दलाचे ८०० जवान कश्मीर खोर्याहत पाठविण्यात आले. त्याव्यतिरिक्त हजारो पोलीस तैनात आहेत. – अमरनाथ यात्रा अंशत: सुरू, मात्र हजारो यात्रेकरू अडकलेलेच कश्मीर खोर्याथतील सर्वच दळणवळण सेवा बंद आहे. विमान, रेल्वेसेवा, बस वाहतूक बंद आहे. मोबाईल, इंटरनेटही बंदच आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी कायम आहे. याचा सर्वाधिक फटका अमरनाथ यात्रेकरूंना बसला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील हजारो यात्रेकरू जम्मूत अडकून पडले आहेत. तसेच श्रीनगरातही मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू अडकले आहेत. यात्रेकरू श्रीनगरच्या टुरिस्ट कॅम्पमध्ये आहेत. श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद असल्यामुळे यात्रेकरूंना एअरलिफ्ट करून जम्मू किंवा दिल्लीत हलविण्याचा विचार सुरू आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी पहेलगाम आणि बालटल या बेस कॅम्प येथे अडकलेल्या यात्रेकरूंना अमरनाथ दर्शनासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली. तसेच येथून ४४९ यात्रेकरूंना हेलिकॉप्टरने दर्शनासाठी नेण्यात आले. सोमवारी २ हजार ७९९ यात्रेकरूंनी दर्शन घेतले. ठिकठिकाणी अडकून पडलेल्या २५ हजार यात्रेकरूंना बालटल येथील १६१२ वाहनांमधून तर पहेलगाम येथून १२९ वाहनांमधून जवाहर टनेलमार्गे सुरक्षित स्थळी ह लविण्यात आले. बुरहानला ‘शहीद’ म्हटले नाही : यात्रेकरूंना मारहाण नाशिक येथील यात्रेकरूंच्या गाड्यांवर दगडफेकीनंतर आता गुजरातमधील एका यात्रेकरूला बेदम मारहाण झाली आहे. बुरहानला ‘शहीद’ म्हटले नाही म्हणून एका यात्रेकरूला मारहाण करण्यात आली. गुजरातमधील ४५०० भाविक कश्मीरात अडकून पडले आहेत. या अडचणींचा फायदा घेऊन हॉटेलवाल्यांनी खोल्यांच्या आणि जेवणाच्या दरात मोठी वाढ करून लूट सुरू केली आहे. स्थानिकांकडूनही दमदाटी सुरू आहे. बुरहानला ‘शहीद’ म्हणा असे धमकावले जात असून भाविक जीव मुठीत धरून येथे राहत असल्याची माहिती गुजरातचे आमदार हिरा सोळंकी यांनी दिली. आमदार सोळंकीसुद्धा श्रीनगरात १२५ जणांसह सन शाइन हॉटेलमध्ये अडकले आहेत. परराज्यांतील गाड्यांना नंबर प्लेटवरून ओळखून टार्गेट केले जात आहे.

No comments:

Post a comment