Total Pageviews

Tuesday 7 June 2016

कर्नल संतोष महाडिक यांची वीरपत्नीही निघाली सीमेवर!

कर्नल संतोष महाडिक यांची वीरपत्नीही निघाली सीमेवर! देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है सातारा, कर्नल संतोष महाडिक यांनी कश्मीरमध्ये दिलेल्या बलिदानानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची वीरपत्नी स्वाती महाडिक याही अखेर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर निघाल्या आहेत. मी माझ्या मुलांना लष्करात पाठवीन आणि मी देखील लष्करात भरती होऊन देशसेवा करीन असे त्यांनी पतीच्या बलिदानानंतर निर्धाराने सांगितले होते. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. कर्नल संतोष महाडिक यांनी कश्मीरमध्ये दिलेल्या बलिदानानंतर अवघ्या सहा महिन्यांतच त्यांची वीरपत्नी स्वाती महाडिक याही अखेर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर निघाल्या आहेत. मी माझ्या मुलांना लष्करात पाठवीन आणि मी देखील लष्करात भरती होऊन देशसेवा करीन असे त्यांनी पतीच्या बलिदानानंतर निर्धाराने सांगितले होते. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथील कर्नल संतोष महाडिक हे नोव्हेंबर २०१५ मध्ये कश्मीरमध्ये शहीद झाले. त्यावेळी देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या गावी येऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी शोकमग्न वीरपत्नी स्वाती यांनी आपले दु:ख काळजात दाबून देशाप्रतीच्या उत्कट भक्तीतून आपणही पतीच्या वाटेवरून जाऊन देशसेवा करू असे बाणेदारपणे सांगितले होते. ५१ आठवडे प्रशिक्षण घ्यावे लागणार! वीरपत्नी स्वाती यांनी लष्करात अधिकारी होण्यासाठी असलेल्या ‘एसएसबी’ परीक्षेसाठी त्यांनी खडतरपणे तयारी केली. या परीक्षेमधून त्यांची लष्करी सेवेच्या प्रशिक्षणाला जाण्यासाठी निवड झाली आहे. मात्र तत्पूर्वी त्यांना मेडिकल टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. हा टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर त्यांना चेन्नईला ५१ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. शहीद संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती देशरक्षणासाठी सैन्यात जाण्यास सज्ज Monday, June 06th, 2016 मेडिकल टेस्ट आणि प्रशिक्षण हा सोपस्कार पूर्ण केल्यानंतर वीरपत्नी स्वाती यांची लष्करात कोणत्या विभागात निवड होईल हे ठरेल. त्यासाठी ऑगस्ट २०१७ पर्यंत वाट पहावी लागेल,. आपल्या पतीने देशासाठी प्राण अर्पण केले असताना तशाही अवस्थेत मी माझ्या मुलांना लष्करात पाठवीन आणि मीदेखील लष्करात भरती होऊन देशसेवा करीन, असे निर्धाराने सांगणार्याा शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक यांनी आपले हे शब्द खरे करण्याच्या दिशेने पावले टाकली असून, त्याही देशरक्षणासाठी आता सज्ज होत आहेत. सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथील कर्नल संतोष महाडिक हे नोव्हेंबर २०१५ मध्ये कश्मीरमध्ये शहीद झाले. त्यावेळी देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या गावी येऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. त्यावेळी शोकमग्न वीरपत्नी स्वाती यांनी आपले दु:ख काळजात दाबून देशाप्रतीच्या उत्कट भक्तीतून आपणही पतीसारखी देशसेवा करू, असे बाणेदारपणे सांगितले होते. कर्नल महाडिक यांच्या बलिदानानंतर जग आपल्या उद्योगात गढून गेले; पण वीरपत्नी स्वाती यांनी आपला शब्द खरा करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. लष्करात अधिकारी होण्यासाठी असलेल्या ‘एसएसबी’ परीक्षेसाठी त्यांनी तयारी केली. या परीक्षेमधून त्यांची लष्करी सेवेच्या प्रशिक्षणाला जाण्यासाठी निवड झाली आहे. मात्र, तत्पूर्वी त्यांना मेडिकल टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. त्यांची मेडिकल टेस्ट बंगळुरू येथे होणार असून, हा टप्पा पार केल्यानंतर त्यांना चेन्नईला ५१ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. हे प्रशिक्षण ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. पतीला हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतरही अत्यंत हिमतीने अजोड देशभक्तीचा प्रत्यय देणार्याह वीरपत्नी स्वाती यांना सर्वजण सॅल्यूट करत आहेत. – शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर वीरपत्नी स्वाती यांनी 'लोकमत'ला सांगितलं होतं की, ' माझी दोन्ही मुलं तर मिलिटरीतच जातील, पण मीही देशसेवेसाठी सारं आयुष्य झोकून देईन !'.. अखेर त्यांनी त्यांचा तो शब्द खरा करुन दाखविलाय. ही वीरपत्नीही नुकतीच '21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झालीय. 'सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड' अर्थात SSB च्या अत्यंत अवघड अशा परीक्षेत स्वाती पास झाल्या असून आता त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईकडे रवाना झाल्या आहेत. 'ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी' इथं त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. ही परीक्षा पास होण्यासाठी स्वाती महाडिक यांना सर्वसामान्य सैनिकांप्रमाणेच सर्व किचकट प्रक्रिया पार पाडावी लागली, फक्त वयाच्या अटीतून थोडीशी सूट मिळाली. (शहीद कर्नल महाडिक यांना अखेरचा सलाम!) खडतर परिश्रमातून आर्मीची वर्दी स्वाती महाडिक या ’21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झाल्या मात्र त्यांना आर्मीचा ड्रेस केवळ सहानुभूतीतून नव्हे, तर एका सामान्य सैनिकाला जे जे करावं लागतं, त्या सर्व खडतर परिश्रमातूनचा मिळाला आहे. त्यांना केवळ सूट मिळाली ते वयाच्या अटीतून. स्वाती या अवघड अशी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अर्थात SSB ची परीक्षा पास झाल्या. त्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईत दाखल झाल्या आहेत. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथं त्यांचं प्रशिक्षण होईल. ( साताऱ्याचे कर्नल महाडिक सीमेवर शहीद) • जम्मू - काश्मीरमधील कुपवाडा परिसरात अतिरेक्यांशी लढताना 7 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचे सुपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण प्राप्त झालं होतं. पोगरवाडी इथं त्यांच्या पार्थिवासमोरच पत्नी स्वाती यांनी 'आपण स्वत: अन मुलं आर्मीतच जातील,' असा निर्धार केला होता. शहीद कर्नल महाडिक यांना अखेरचा सलाम! • First Published :20-November-2015 : 04:18:16 • सातारा : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक (घोरपडे) यांच्यावर गुरुवारी सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘संतोष महाडिक अमर रहे’च्या गगनभेदी गर्जना करीत हजारो नागरिकांनी या उरमोडीपुत्राच्या शौर्याला ‘सॅल्यूट’ केला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यावेळी उपस्थित होते. कर्नल संतोष शहीद झाल्याचे वृत्त समजल्यापासूनच सातारा शहर आणि परळी खोऱ्यातील लोक शोकसागरात बुडाले होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे पार्थिव साताऱ्यात आणण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी सजविलेल्या लष्करी वाहनातून ते त्यांच्या पोगरवाडी या गावात नेण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून या रस्त्यावर जागोजागी या शूर भूमिपुत्राचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या रस्त्यावर ठिकठिकाणी कर्नल संतोष यांना अभिवादन करणारे फलक लावले होते. कर्नल संतोष यांचे मूळचे आडनाव घोरपडे असून, मावशीकडे ते दत्तक गेले होते. पार्थिव पोगरवाडीत आणण्यापूर्वी आरे येथे नेण्यात आले. तेथे कर्नल संतोष यांना मानवंदना देण्यात आली. येथे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी संरक्षणमंत्री पर्रिकर सहकुटुंब उपस्थित होते. केंद्र सरकार कुटुंबीयांसोबत असल्याचे सांगून, त्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर अंत्ययात्रा अकरा वाजता पोगरवाडी गावात आणण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांनी हवेत फैरी झाडून सलामी दिली आणि त्याच वेळी कर्नल संतोष यांचा सहा वर्षांचा मुलगा स्वराज याने त्यांना अग्नी दिला. मराठा लाइट इन्फन्ट्रीचे जवान आणि विविध रेजिमेंटचे अधिकारी-जवान या ठिकाणी उपस्थित होते. तत्पूर्वी, खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे शाहू महाराज, महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सशस्त्र दलांच्या वतीने नौदलाचे महाराष्ट्र एरियाचे फ्लॅग आॅफिसर रिअर अॅतडमिरल मुरलीधर पवार, तसेच मराठा लाइट इन्फन्ट्री आणि पॅरा कमांडो फोर्सच्या कर्नल आॅफ दि रेजिमेंटनी पुष्पचक्र वाहिले. माजी लष्करी अधिकारी आणि जवानांनीही यावेळी आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी) उपस्थित हेलावले अंत्ययात्रा पोगरवाडी गावात येण्यापूर्वीच घोरपडे आणि महाडिक कुटुंबातील महिलांना चबुतऱ्याजवळ आणण्यात आले. संतोष यांच्या आई कालिंदा घोरपडे आणि दत्तक आई बबई महाडिक यांच्यासह संतोष यांच्या पत्नी स्वाती, अकरा वर्षांची मुलगी कार्तिकी, बहीण विजया कदम, भावजय शोभा घोरपडे यांच्यासह महिलांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला घरे पाडणारा होता. वीरपत्नीचा निर्धार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर शहीद संतोषच्या वीरपत्नीने निर्धार केला की, ‘माझी दोन्ही मुलेही मोठेपणी लष्करातच दाखल होतील. देशाची सेवा करतील. गावात पेटली नाही चूल..! लहान मूल रडतेय म्हणून माउलीने घरातील शिळ्या भाकरीचा तुकडा हातावर ठेवला आणि म्हणाली, ‘बाळा अजून कुणीबी चूल न्हाय पेटवली. नगं रडूस, खा वायच. हे समदं झालं की मंग देते तुला च्या अन् कानावला!’ या वाक्यामुळे समजले पोगरवाडीत शहिदाला अभिवादन केल्याशिवाय चूल पेटलीच नाही. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातील में है’, असंच काहीसं देशप्रेम शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या संपूर्ण कुटुंबात ठासून भरल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कारण पतीच्या वीरमरणानंतर निर्धार केल्याप्रमाणे शहीद संतोष महाडिक यांची वीरपत्नीही ‘इंडियन आर्मी’त रुजू झाली आहे. खडतर परिश्रमातून आर्मीची वर्दी स्वाती महाडिक या ’21 पॅरा स्पेशल फोर्स’मध्ये दाखल झाल्या आहेत. स्वाती यांना आर्मीचा ड्रेस केवळ सहानुभूतीतून नव्हे, तर एका सामान्य सैनिकाला जे जे करावं लागतं, त्या सर्व खडतर परिश्रमातूनचा मिळाला आहे. त्यांना केवळ सूट मिळाली ते वयाच्या अटीतून. स्वाती या अवघड अशी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड अर्थात SSB ची परीक्षा पास झाल्या. त्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी चेन्नईत दाखल झाल्या आहेत. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई इथं त्यांचं प्रशिक्षण होईल. पतीच्या पार्थिवावर देशसेवाचा निर्धार जम्मू- काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. मात्र त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला होता. मुलं बोर्डिंगमध्ये, आई मिलिट्री ट्रेनिंगमध्ये स्वाती महाडिक या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांच्या मुलांचं शिक्षण सुरु आहे. त्यांचा एक मुलगा पाचगणीत तर मुलगी देहरादूनमध्ये शिक्षण घेत आहे. तर स्वत: स्वाती महाडिक देशसेवेच्या प्रेरणेने चेन्नईत मिलिट्री ट्रेनिंग घेत आहेत. ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वाती यांच्यासोबतचे सर्व उमेदवार हे किमान 10 वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. तशापद्धतीने त्यांना शरीररचना, व्यायाम, प्रशिक्षणासाठी तयारी करावी लागणार आहे. पुणे विद्यापीठातून पदवी स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना मिलिट्रीमध्ये दाखल होण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली. त्यांचा देशसेवेचा दृढ निश्चय आणि समाजाप्रती बांधिलकी पाहून, आम्हाला प्रभावित केलं, असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. वीरपत्नी लष्करात स्वाती यांच्या पूर्वी अनेक वीरपत्नी भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. 2012 मध्ये अरुणाचलप्रदेशात शहीद झालेले नाईक अमित शर्मा यांची पत्नीही 2014 मध्ये आर्मीत दाखल झाली आहे. पोगरवाडीचा सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांचं मूळ नाव संतोष मधुकर घोरपडे असं होतं. त्यांचा जन्म साताऱ्यातील पोगरवाडी इथं झाला. संतोष यांना त्यांच्या आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. त्यानंतर त्यांचं नाव संतोष महाडिक असं झालं. संतोष यांचे आजोबा पोगरवाडीपासून जवळच असलेल्या आरेदरे या गावात राहत होते. त्यामुळे संतोष महाडिक यांचं बालपण आरेदरे गावातच गेलं. त्यांनी 1994 मध्ये सातारा सैनिक स्कूलमधून विज्ञानशाखेतून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून पदवीचे शिक्षण 1997 मध्ये पूर्ण केलं. मग 1998 साली ते लष्करामध्ये अधिकारी म्हणून भरती झाले होते. सध्या ते लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्सच्या पॅराकमांडो पथकाचे कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. विशेष दलात आघाडीवर संतोष महाडिक हे सुरुवातीला लष्कराच्या विशेष दलात कार्यरत होते. त्यावेळी दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेत अतुलनीय शौर्य गाजविल्याबद्दल आणि पथकाचे उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चादत पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी अकरा वर्षांची असून ती सहावीत शिकत आहे तर मुलगा पाच वर्षाचा असून तो पहिलीत शिकत आहे. महाराष्ट्रालाच नव्हे तर अवघ्या देशाला अभिमानाचा हुंदका देऊन, पोगरवाडीचा वीर कर्नल संतोष महाडिक शहीद झाला आहे. जम्मू-काश्मिरच्या कुपवाडाच्या जंगलात, दहशतवाद्यांचा सामना करताना संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. जाँबाज संतोष धारातीर्थी पडल्याची बातमी कळताच, साताऱ्याच्या पोगरवाडीपासून ते जम्मू-काश्मिरच्या कुपवाडापर्यंत प्रत्येकजण हळहळतोय. उभ्या महाराष्ट्राला आपल्या घरचा माणूस गेल्याचं दु:ख आहे, तर त्याचवेळी देशरक्षणासाठी आमच्याच मातीतला वीर कामी आला याचा अभिमानही आहे. महाराष्ट्रात जे चित्र आहे, तसंच काहीसं पण अपवादात्मक असं चित्र दूरवर तिकडे कुपवाड्यातही दिसत आहे. अपवादात्मक यासाठी की, ज्या जम्मू काश्मिरमध्ये पाकिस्तानी झेंडे फडकवले जातात, तिथेच भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याच्या मृत्यूचं सेलिब्रेशनही केलं जातं. मात्र पोगरवाडीच्या या वीराने कुपवाड्याच्या नागरिकांनाही अश्रू ढाळायला लावले. महाराष्ट्राप्रमाणेच कुपवाड्यीतील नागरिकांचीही कर्नल संतोष महाडिकांच्या जाण्याने घरचा माणूस गमावल्याची भावना आहे. काश्मिरी तरुणांच्या फेसबुक वॉल शहीद संतोष महाडिक यांच्या श्रद्धांजलीच्या पोस्टने भरल्या आहेत. कुपवाड्याचा कर्नल पोगरवाडी या स्वत:च्या गावाच्या विकासासाठी झटणारे संतोष महाडिक, कर्मभूमी असलेल्या कुपवाडाच्या विकासासाठीही तितकेच आग्रही होते. निसर्गाने नटलेल्या कुपवाड्यात पर्यटनाचा विकास व्हावा, यासाठी स्वत: संतोष प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी कुपवाड्यातील काही तरूणांना जयपूरच्या चोखी धाणी आणि ऋषीकेशला स्वखर्चाने पाठवलं. तिथली गावं पाहून कुपवाड्यात पर्यटनाबाबत काही करता येईल का, यासाठी त्यांनी हा खटाटोप केला. इतकंच नाही तर संतोष यांनी दहशतवादाच्या मार्गावर असलेल्या जम्मूतील तरूणांना सल्ला देऊन, योग्य मार्ग दाखवला. इथले नागरिक संतोष यांच्याशी तितक्याच आपुलकीने बोलायचे. एका सैनिकापेक्षाही ते माणूस म्हणून इथल्या नागरिकांत लोकप्रिय होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील विचावंत, लेखक यांची व्याख्याने आयोजित करून, कुपवाड्यातील नागरिकांचं प्रबोधन करण्यासाठीही प्रयत्नशील होते. कुपवाडावर शोककळा एकीकडे संतोष हे कुपवाड्याच्या पर्यटन विकासासाठी झटत होते, त्याचवेळी ते शिक्षणासाठीही आग्रही होते. कुपवाड्यातील शिक्षकांना अॅडव्हान्स ट्रेनिंगसाठी त्यांनी पुण्याला पाठवलं. याशिवाय इथल्या तरुणांसाठी त्यांनी अनेकवेळा क्रिकेट, फुटबॉलचे सामनेही भरवले. कुपवाडाचं नैसर्गिक सौंदर्य जगासमोर यावं, यासाठी इथल्या तरूणांनी कुपवाड्याचे सुंदर फोटो फेसबुकवर टाकण्याचं आवाहनही संतोष यांनी केलं होतं. उत्तरेकडील राज्यांमध्ये कुपवाडा हा विकासाबाबतीत मागास आहे. मात्र याच जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्याचा वसा संतोष यांनी घेतला होता. मात्र त्यांचं हे स्वप्न कुपवाड्याच्या जंगलात मातीमोल झालं आहे. शेवटचं व्हॉट्सअप स्टेटस देशरक्षणासाठी वाहून घेतलेल्या संतोष महाडिक यांची कुटुंब आणि पत्नीबद्दलही तितकीच आपुलकी होती. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व्हॉट्सअॅपवर अपडेट केलेलं स्टेटस याची जाणीव करून देतं. संतोष यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस होतं, “12 वर्षांची साथ. या आनंदी सोबतीसाठी थँक यू डिअर” ( ‘12 years of blesful (blissful) togetherness. Thank you dear for being with me’.)

No comments:

Post a Comment