Total Pageviews

Monday 7 May 2012

MUSLIMS WILL DECIDE THE NEXT PRESIDENT OF INDIA

हिंदुस्थानचा आगामी राष्ट्रपती मुसलमानच का?
डॉ. झाकिर हुसेन, फक्रुद्दीन अली अहमद आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनविण्यामुळे मुस्लिमांचा उद्धार झाला काय? त्यावर मुस्लिम नेते उत्तर देतात की, तो काळ वेगळा होता. आता तर मुसलमान इतका शक्तिशाली बनला आहे की, आगामी राष्ट्रपती कोण बनेल आणि २०१४ मध्ये सरकार कुणाचे बनेल हे तोच निश्‍चित करील. उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांना विजयी करून मुस्लिमांनी हे सिद्ध केले आहे की, आगामी काळात किंगमेकरची भूमिका मुसलमानच निभावेल. ‘हिंदुस्थानचा आगामी राष्ट्रपती कोण बनणार?’ याची संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे. सारेच आपापला अंदाज वर्तवीत आहेत आणि सटोडिये राष्ट्रपती निवडणुकीला २०१२ या वर्षाचे मोठे वरदान असल्याचे मानत आहेत. राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे; परंतु उत्तर प्रदेशात मुलायमसिंग विजयी झाले तेव्हापासून प्रत्येक राजकीय पक्ष मुलायमसिंगांप्रमाणे आपल्यालाही मुस्लिमांची मते कशी मिळतील याच चिंतेत आहे. त्यामुळे २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू असताना सर्वांच्या नजरा मुस्लिम मतांवर खिळल्या आहेत. मुसलमानांना एखादी मोठी भेट दिली तरच मुस्लिम मते मिळू शकतील. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उभा करून प्रत्येक राजकीय पक्ष आपली झोळी भरून घेऊ इच्छितो.
ही योगायोगाची बाब आहे की, सध्या उपराष्ट्रपतीपदी एक मुस्लिम माणूस आहे. जर असे नसते तरी व्होट बँक पक्की करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने या हुकमाच्या पत्त्याचा नक्कीच वापर केला असता आणि म्हटले असते की, हिंदुस्थानातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक वर्गालाच हे पद मिळायला हवे. कुणी जर विचारले की, डॉ. झाकिर हुसेन, फक्रुद्दीन अली अहमद आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनविण्यामुळे मुस्लिमांचा उद्धार झाला काय? तेव्हा मुस्लिम नेते उत्तर देतात की, तो काळ वेगळा होता. आता तर मुसलमान इतका शक्तिशाली बनला आहे की, आगामी राष्ट्रपती कोण बनेल आणि २०१४ मध्ये सरकार कुणाचे बनेल हे तोच निश्‍चित करील. उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांना विजयी करून मुस्लिमांनी हे सिद्ध केले आहे की, आगामी काळात किंगमेकरची भूमिका मुसलमानच निभावेल. हिंदुस्थानात मतदान करण्याचा सर्वात मोठा आधार जाती हा आहे. आपल्या तर्काचे विश्‍लेषण करताना मुस्लिम नेते म्हणतात की, हिंदुस्थानात मुसलमान सर्वात मोठा अल्पसंख्याकच नव्हे, तर सर्वात मोठी व्होट बँकदेखील आहे. हिंदुस्थानात राजपूत, ब्राह्मण, जाट, गुजर, अहिर या सर्व जातींची ताकद काय आहे? त्यांच्यापाशी किती टक्के मते आहेत? कुणाचे आठ, कुणाचे दहा, तर कुणाचे बारा टक्के! अनुसूचित जमातींची मतेही दहा-बारा टक्के आणि दलित बांधवांची मतेही जास्तीत जास्त १७ टक्क्यांच्या आसपास आहेत, परंतु मुसलमानांची व्होट बँक तर आता २३ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. हीदेखील गोष्ट लक्षणीय आहे की, इतर व्होट बँका अनेक पक्षांत विखुरतात आणि कालौघात पक्षोपक्षांमध्ये विभागल्या जातात. उत्तरेतील अनेक जातींचा आधार दक्षिणेत नाही आणि दक्षिणेेतील जाती आणि संप्रदाय उत्तरेत नाहीत. ज्या जनजाती पूर्व हिंदुस्थानात आहेत त्यांचे पश्‍चिम हिंदुस्थानातही अस्तित्व आहे काय? सर्वजण स्वतःला हिंदू म्हणवून घेतात काय?
मुसलमान तर हिंदुस्थानच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक राज्यात आढळतो. मुस्लिम व्होट बँक पोलादी भिंत बनून एकसंधपणे उभी राहते. त्यात फाटाफूट नाही. त्यामुळे जी देशाची सर्वात मोठी व्होट बँक आहे तीच फैसला करू शकते की, सरकार कुणाचे बनणार? भलेही मुसलमान आपले सरकार बनवू शकत नाही, परंतु त्याला वाटेल तेच सरकार बनू शकते.
दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक ‘नई दुनिया’ने आपल्या विश्‍लेषणात्मक बातमीचे ‘आखिर कौन बनेगा मुस्लिम राष्ट्रपती?’ हे शीर्षक दिले आहे. खुर्चीला मध्ये ठेवून त्याने आठ मुस्लिम नेत्यांचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. यामध्ये सर्वात वर एपीजे अब्दुल कलाम आणि हमीद अन्सारी आहेत. इतरांमध्ये फारुख अब्दुल्ला, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कुरैशी, सलमान खुर्शीद, जाफर शरीफ आणि राज्यसभेचे उपसभापती ए. रेहमान यांचाही समावेश आहे. नजमा हेपतुल्लादेखील यात आहेत. आता तर केवळ नावांची सुरुवात झालेली आहे. जेव्हा मुसलमान राष्ट्रपती बनवणे निश्‍चित होईल तेव्हा अनेक नावे पुढे येतील. विप्रोचे मालक उद्योगपती अजिज पे्रमजी यांचे नाव तर आलेच आहे. सध्या शाही इमाम बुखारी यांनाही नेता बनण्याचे स्वप्न पडते आहे. थोडक्यात, अट एकच की, तो पक्का मुसलमान वाटला पाहिजे. त्यामुळे बिचार्‍या हमीद अन्सारी यांनी त्वरित टोपी वापरून मौलानांचे म्हणणे मान्य केले आहे. नजमा हेपतुल्ला या तर मूळ कॉंग्रेसी आहेतच, परंतु राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी कठीण आहे. कारण एक तर त्या भाजप विचारसरणीशी संलग्न आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बुरखा वापरत नाहीत. कॉंग्रेसबरोबरच यावेळी मुस्लिम मते ही सर्वच पक्षांची कमजोरी आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील मौलानांचे हे स्वप्न साकार झाले तर त्यात आश्‍चर्य नाही. याबाबत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी सर्वाधिक सक्रिय आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रासाठी राष्ट्रपती कोण बनावा हा प्रश्‍न नाही, तर आपला पुत्र राहुल गांधी याला पंतप्रधान बनविण्यासाठी कोण मदत करू शकतो, हा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कॉंग्रेसजवळ ३० टक्के मते आहेत. यूपीएची मिळून ४० टक्के मते होतात. तरीदेखील मतांचे गणित अपूर्णच राहते. त्यामुळे राष्ट्रपतीबरोबरच राहुल यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग कठीणच आहे.
राहुल गांधी नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये यशस्वी ठरले असते, तर मनमोहन सिंगांना राष्ट्रपती बनवावे या विचारात सोनिया होत्या. सोनियांच्या म्हणण्यानुसार मनमोहन सिंगांच्या नावावर केवळ हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगातील बड्या नेत्यांनाही आनंद झाला असता आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोणत्याही अडथळ्याविना पार पडली असती. परंतु असे होऊ शकले नाही. त्यामुळे पंतप्रधानपदावरून मनमोहन सिंगांना हटविणे त्यांच्यासाठी जोखीम ठरेल. कॉंग्रेसमधील अंतर्गत सूत्रांचे असे म्हणणे आहे की, मनमोहन सिंगांना सर्वात मोठी भीती प्रणव मुखजीपासून आहे.
सोनिया गांधी प्रणव मुखर्जींच्या तुलनेत चिदंबरम् यांना अधिक प्रामाणिक मानतात. त्यामुळे सर्व पैलूंवर विचार करून त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे; परंतु प्रणव मुखर्जी तर पंतप्रधानपदासाठी दावेदार आहेत. मुखर्जींमुळे ममता बॅनर्जींना मते मिळणे सोपे आहे, असेही त्यांचे गणित आहे. कदाचित इतर पक्षही मुखर्जींच्या बाजूने मतदान करू शकतात; परंतु मुखर्जी त्यांचे म्हणणे अंतिमत: स्वीकारतील काय, हा त्यांच्यासमोर प्रश्‍न आहे. पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांचे असे म्हणणे आहे की, मुखर्जींच्या निवडीपेक्षा अधिक आवश्यक तर गैर कॉंग्रेसींची मिळणारी मते आहेत आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार केवळ आणि केवळ मुस्लिमच असेल. त्यामुळे राष्ट्रपती पदाची खुर्ची केवळ आणि केवळ मुस्लिमांच्या भोवती फिरते आहे

No comments:

Post a Comment