Total Pageviews

Sunday 11 March 2012

पोलीस डायरी तेलगीचा डागबनावट स्टॅम्प तयार करून त्याची देशभरात विक्री करणार्‍या अब्दुल करीम लाडसाब तेलगीला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. बनावट स्टॅम्प बाजारात आणून सार्‍या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणारा तेलगी नोव्हेंबर २००१ पासून जेलमध्ये आहे. त्याच्या बरोबरचे त्याचे सर्व साथीदार सजा भोगून जेलमधून बाहेर आले आहेत, परंतु तेलगीच्या वाट्याला मरेपर्यंत जन्मठेप आली आहे. त्याची आता सुटका नाही. एकट्या तेलगीने सारा देश हादरवला, पोलिसांची, शासकीय अधिकार्‍यांची झोप उडविली. तेलगीला सजा झाल्याने तो सुटला, परंतु तेलगीला पकडणार्‍या त्याच्या जुन्या केसेस बाहेर काढून त्याला आत टाकणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची मात्र अद्याप सुटका झालेली नाही. जामिनावर बाहेर आलेल्या, न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या अधिकार्‍यांविरुद्धचा खटला अजून संपलेला नाही. कधी संपेल हेही कुणाला माहीत नाही. पोलिसांविरुद्धच्या खटल्यात दोन हजार साक्षीदार आहेत. या सर्वांच्या साक्ष काढायच्या म्हणजे आणखी दोन दशके उलटतील. तरीही तेलगीचा हा खटला संपणार नाही असे बोलले जात आहे. परंतु ज्या पोलीस अधिकार्‍यांवर तेलगी घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे ते अधिकारी मात्र बेचैन आहेत. तेलगी घोटाळ्याशी काहीही संबंध नसणार्‍या अधिकार्‍यांना omission commission खाली नाहक गुंतविण्यात आले. तेलगीविरुद्ध मुंबईतील कुलाबा, कफ परेड मुंबई क्राइम ब्रँचच्या आर्थिक घोटाळा विभागात १९९५च्या सुमारास गुन्हे दाखल होते, परंतु त्याच्यांवर कारवाई मात्र कुणी केली नव्हती. कुलाबा पोलिसांनी तर आरोपी सापडत नाहीत असे कारण दाखवून तेलगीविरुद्धची केस क्वॉलिफाय करून टाकली होती. परंतु मुंबई गुन्हे शाखेचा चार्ज घेताच सहपोलीस आयुक्त श्रीधर संपत वगळ यांनी तेलगीविरुद्ध असलेल्या मुंबईतील सर्व जुन्या केसेसच्या फाईल पुन्हा ओपन केल्या आणि तपास करून कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तेलगीला चौकशीसाठी मुंबईत आणले. त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. त्याच सार्‍या केसेसमध्ये तेलगीला आता न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून याचे सारे श्रेय श्रीधर वगळ त्यांच्या सहकारी पोलिसांना जाते, परंतु दुर्दैवाने तेलगीला कर्नाटकातून मुंबईत आणणार्‍या त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करणार्‍या श्रीधर वगळ यांनाच एसआयटीच्या एस. एस. पुरी सुबोध जयस्वाल कंपनीने तेलगीला मदत केली या आरोपावरून जेलमध्ये टाकले. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त रणजीत शर्मा यांच्यावरही पुरी यांनी सूड उगविला. वरळीच्या सागर तरंग या इमारतीमध्ये राहणार्‍या शर्मा यांच्या मोठ्या मुलाला त्याच इमारतीमध्ये राहणार्‍या पुरींनी आपल्या मुलीसाठी मागणी घातली होती, परंतु मुलाला मुलगी पसंत नसल्याने शर्मांनी नकार दिला. त्याचा डुख ठेवून पुरींनी omission commission च्या नावाखाली शर्मांना जेलमध्ये टाकले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शर्मांची निर्दोष मुक्तता करून पुरी-जयस्वालना चपराक दिली. एस. एस. पुरी सुबोध जयस्वाल यांच्या एसआयटीने सूडबुद्धीने तपास करून सुमारे १४ पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांना जेलमध्ये टाकले. ज्यांनी तेलगीचे हजारो कोटी रुपयांचे स्टॅम्प पकडले, तेलगीविरुद्ध पुरावे गोळा केले त्याच अधिकार्‍यांना एसआयटीने जेलमध्ये डांबले. ज्या पोलीस अधिकार्‍यांनी तेलगीला मदत केली त्या अधिकार्‍यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे, परंतु ज्यांचा काही तेलगी घोटाळ्याशी संबंध नाही अशा अधिकार्‍यांवर एसआयटीने ठपका ठेवून त्यांची पोलीस कारकीर्द संपविली आहे. तेव्हा तपास अधिकार्‍यांना अमर्याद अधिकार दिले की ते कसे सुसाट सुटतात हे तेलगी घोटाळ्याचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्या तपासावरून दिसून येते. वगळ यांनी तेलगीविरुद्ध १९९५ साली गुन्हा दाखल असताना त्याला का अटक करण्यात आली नाही, त्याला कर्नाटकातून मुंबईत का आणले नाही अशी लेखी विचारणा तपास अधिकार्‍यांना केली होती. त्या अधिकार्‍यांना न्यायालयाने सजा ठोठावली आहे. परंतु तेलगीची बंद फाईल ओपन करणार्‍या वगळ यांना मात्र न्यायालयाने अद्याप निर्दोष सोडलेले नाही. एसआयटी किंवा सीबीआयने तेलगीकडून एक फुटकी कवडीही जप्त केली नाही, परंतु तेलगीचे करोडो रुपयांचे बनावट स्टॅम्प पकडणार्‍या रणजीत शर्मा यांना पकडण्यात पुरी जयस्वाल यांनी बहादुरी दाखविली याचे आश्‍चर्य वाटते. वगळ सध्या राज्य मानवी हक्क आयोग विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करीत आहेत. वगळ हे १९७६च्या बॅचचे थेट आयपीएस अधिकारी आहेत. डी. शिवानंदन, अजित पारसनीस, पी. व्ही. जोशी, पंकज गुप्ता के. सुब्रह्मण्यम हेही १९७६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या के. सुब्रमण्याम हे राज्य पोलीस दलाचे महासंचालक आहेत, तर शिवानंदन पारसनीस हे राज्याचे प्रमुख महासंचालकपद भूषवून अलीकडेच निवृत्त झाले आहेत. श्रीधर वगळ या बॅचमध्ये सर्वात तरुण अधिकारी. पुढच्या वर्षीच्या मार्च महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. तेलगी घोटाळ्याचा डाग जर त्यांना लागला नसता तर त्यांना मुंबईचे आयुक्तपद वा पोलीस महासंचालक पद नक्कीच मिळाले असते, परंतु तेलगी नावाचे दुर्दैव आड आले आणि त्यांना या सार्‍या संधी गमवाव्या लागल्या. वगळ हे एक पोलीस दलात हुशार अधिकारी म्हणून ओळखले जायचे, परंतु कुणाच्या वाट्याला कधी काय येईल हे सांगता येणार नाही. वगळ यांचे सर्व बॅचमेट पोलीस आयुक्त, महासंचालक पदापर्यंत पोहोचली. परंतु तेलगी घोटाळ्याच्या ठपक्यामुळे वगळ यांची पिछेहाट झाली

No comments:

Post a Comment