Total Pageviews

Tuesday 27 September 2011

INCREASING INSECURITY IN MUMBAI

चोरीचे दागिने विकत घेणारे सराफ राज्यकर्त्यांचे कोण लागतात?
मुंबई वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार मिस्त्री हे नेहमीप्रमाणे आपल्या अंधेरी (पश्‍चिम) चार बंगला येथील घरातून शुक्रवारी सकाळी वाजता आपल्या दोन मुलींसह बाहेर पडले. पत्नीचे अपघाती निधन झाल्याने नंदकुमार मिस्त्री आपल्या दोन मुलींसह तेथे राहतात. रोज सकाळी ड्युटीवर निघतात आणि सायंकाळी उशिरा घरी परततात. परंतु शुक्रवारी मात्र घरी परतल्यावर त्यांना धक्काच बसला. तळमजल्यावरील त्यांच्या घराचा दरवाजा फोडून कुणीतरी आत शिरले होते आणि बंद कपाटे फोडून त्यातील अविवाहित मुलींचे १५ तोळे सोने, ५० हजारांची रोकड मिस्त्री यांची दोन रिव्हॉल्व्हर (एक सर्व्हिस आणि दुसरे खासगी) पळवून नेली होती. मिस्त्रींसाठी हा जबरदस्त हादरा होता. मिस्त्रींच्या बंद घरावर कुणी तरी वॉच ठेवूनच हा धाडसी दरोडा घातला होता. विशेष म्हणजे चोरट्यांनी कपाटातील पासपोर्टही पळवूनही नेले होते. मिस्त्री यांच्या इमारतीमध्येच दुरुस्तीचे समोरील रस्त्यावर मोनोरेलचे काम सुरू आहे. त्या कामाच्या आवाजाचा फायदा घेऊन चोरट्यांनी संधी साधली असावी. त्यासाठी त्यांनी किमान आठवडाभर तरीरेकी’ केली असावी, असे सांगण्यात येते. तेव्हा आता बंद घरे सुरक्षित नाहीत हेच खरे. मग ती सामान्य माणसांची असोत की पोलिसांची असोत. चोरट्यांना काहीच फरक पडत नाही. उलट पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांच्या वसाहतीमध्ये अलीकडे घरफोड्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. म्हणजे आता आपले रक्षणकर्ते पोलीसही सुरक्षित नाहीत. ते जर सुरक्षित नसतील तर मग आपल्यासारखी सामान्य माणसं तरी कशी काय असतील?एक काळ असा होता की मुंबई पोलीस म्हणजे एक ढाण्या वाघ समजला जायचा. चोर, दरोडेखोर चळाचळा कापायचे, परंतु आता चोर, लफंग्यामध्ये दहा हत्तींचे बळ आले आहे. तेडायनासोर’सारखे सामान्यांचे लचके तोडत मुंबईभर फिरत आहेत, तर मुंबई पोलिसांची अवस्था आता शेळ्या-मेंढ्यांसारखी झाली आहे. चोर, दरोडेखोर जर चुकून पकडला गेला किंवा पब्लिकने धाडसाने पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले तर पोलीस त्याचे आदरातिथ्य करतात. आपल्या विरुद्ध वरिष्ठांकडे, मंत्र्यांकडे कोर्टात ऍलिगेशन करेल म्हणून त्यांच्या बरोबर गोडीगुलाबीने बोलतात. त्याला हवे नको ते खायला देतात. त्यामुळे तपास अधिकार्‍यांचा आज दराराच राहिलेला नाही. पोलिसांविरुद्ध खोट्या तक्रारी करण्याचा आरोपींचा कल वाढल्यामुळे पोलीस आज पूर्णपणे बॅक फुटला गेले आहेत. आरोपीला साधं बोट लावत नाहीत. पूर्वी पोलिसांचे थर्ड डिग्री एन्काऊंटर हे प्रमुख अस्त्र होते. परंतु एन्काऊंटरफेम अधिकार्‍यांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल होऊ लागले थर्ड डिग्रीमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ लागल्यामुळे मुंबई पोलिसांनी आपली ही दोन अस्त्रं म्यान केली आहेत. त्यामुळेच गुंड, दरोडेखोर आज सुसाट सुटले आहेत. पकडल्यानंतरही ते सर्व गुन्ह्यांची कबुली देत नाहीत. अर्धेअधिक गुन्हे लपवून ठेवतात. पूर्वी थर्ड डिग्री एन्काऊंटरच्या भीतीमुळे सर्व गुन्ह्यांची कबुली देऊन गुंड मोकळे व्हायचे, परंतु आता तपास अधिकार्‍यांना गुन्हे कबूल करून घेण्यासाठी टोकाचे प्रयत्न करावे लागतात. तरीही हुशार आरोपी ताकास तूर लागू देत नाहीत. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांची अखेरपर्यंत उकल होत नाही.मुंबई शहरात दरोडे घालणार्‍यांना आज धाडसाने पकडणे मुश्कील झाले आहे. पकडले गेल्यास त्यांना न्यायालयात एक-दोन महिन्यांत जामीन मिळतो. जामीन मिळाल्यावर ते अधिकाधिक गुन्हे करतात. न्यायालयाकडून पूर्वी झटपट जामीन मिळत होता. त्यामुळे मुंबईवर संघटित गुंड टोळ्यांनी ताबा मिळविला होता. मुंबई शहरातील फुटपाथवर खुलेआम रक्तपात घडवून आणणार्‍या गुंडांचा मुंबई पोलिसांनीजशास तसे’ उत्तर देऊन खात्मा केला. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पोलिसांनी आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर्स म्यान केली आहेत. त्याचा फायदा लुटारूंनी घेतला आहे. त्यामुळे आता एसीपी नंदकुमार मिस्त्री काय, उद्या पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, गृहमंत्र्यांच्या घरावरही दरोडे पडतील, अशी सध्या मुंबईची अवस्था झाली आहे. मुंबईत आज पाय ठेवायला जागा राहिलेली नाही. इतकी गर्दी झाली आहे की या गर्दीतून कोण कधी कुठे घुसेल आणि कुणावर हल्ला करील याचा नेम राहिलेला नाही. तेव्हा आपली सुरक्षा आता आपणच केली पाहिजे. बंद घरात कोणत्याही मौल्यवान वस्तू अथवा रोख रक्कम ठेवणे म्हणजे चोरांची भर करण्यासारखेच आहे. पोलीस चोरांना कधी कधी पकडतात, परंतु त्यांच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणार्‍यांना का नाही पकडत? पकडल्यावर त्यांच्यावर मोक्काची कारवाई का नाही करीत? चोरांकडून चोरीचे दागिने विकत घेणारे सराफ हे काय राज्यकर्त्यांचे जावई आहेत का? चोरीचे दागिने विकत घेणारेरिसिव्हर’च जर नसतील तर दागिन्यांची लूट होईलच कशी? तेव्हा या सार्‍या प्रकारात गौडबंगाल वाटते. राज्यकर्त्यांचेच सराफांशी साटेलोटे असावे, अशी सर्वसामान्यांना शंका वाटत आहे. सराफांना (रिसीव्हर) पोलीस पकडायला गेले की, ते पोलिसांच्या विरोधात मोर्चे काढतात आणि पोलीस नाहक त्रास देतात, असा आरोप त्यांच्या संघटना करतात. तेव्हा हा दबाव कुठपर्यंत चालणार आहे?- प्रभाकर पवार

No comments:

Post a Comment