Total Pageviews

Saturday 21 May 2011

INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 119

 
ठाण्यातच लाच घेणाऱ्या पोलिस निरीक्षकाला अटक
-
Saturday, May 21, 2011 AT 04:30 AM (IST)
Tags:

psi arrested, bribe, crime, aurangabad, marathwada औरंगाबाद - खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जामीन मिळेपर्यंत अटक करण्यासाठी 40 हजारांची लाच घेणाऱ्या वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कारभारी बहुरे यांना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी सव्वापाच वाजता अटक केली. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचखोर भू-कर मापक अँटी करप्शनच्या जाळ्यात औरंगाबाद - शेत जमीन मोजणीनंतर "' प्रत देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील भू-कर मापक विष्णू गजाबा तरटे (वय 49, रा. भक्‍तीनगर, पिसादेवी रोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
हर्सूल सावंगी येथील शेतकरी रामदास सर्जेराव जगदाळे यांची औरंगाबाद येथील गट क्र. 134 135 मधील जमिनीची मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर मोजणी नकाशाची "' प्रत आवश्‍यक असते. रामदास जगदाळे यांनी नकाशाची "' प्रत देण्याची मागणी भू-कर मापक विष्णू तरटे यांच्याकडे केली. वारंवार चकरा मारूनही तरटे नकाशाची प्रत देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले. मध्यस्थी माणसाकडून नकाशाच्या प्रतीबाबत विचारणा केली असता दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे शेतकरी जगदाळे यांनी विष्णू तरटे यांच्याशी बोलून दहा हजार रुपये देण्याचे मान्य केले.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली. ठरल्याप्रमाणे तरटे यांनी बुधवारी (ता.23) भक्‍तीनगर येथील आपल्या स्वत:च्या घरी जगदाळे यांना पैसे घेऊन बोलविले. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक बाबाराव मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. तसेच पोलिस कर्मचारी साध्या वेशात पंच म्हणून शेतकरी जगदाळे यांच्यासोबत देण्यात आला. सकाळी साडेनऊ वाजता पंचासमक्ष भू-कर मापक विष्णू तरटे यांनी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर काही वेळातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकून रोख रकमेसह विष्णू तरटे यांना ताब्यात घेतले.
औरंगाबादमध्ये महापालिका अभियंता निलंबित औरंगाबाद - शहरात वीस होर्डींग लावण्याची परवानगी असताना अनेक होर्डींग लावण्याची परवानगी देणारे महानगरपालिकेतील शाखा अभियंता के. पी. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.
दोन आठवड्यापूर्वी शहरात राजकीय पदाधिकाऱ्यांचे विविध कार्यक्रम झाले. त्यानिमित्ताने शहरात सुमारे दोनशे होर्डींग्ज लावण्यात आली होती. प्रत्यक्षात फक्त वीस होर्डींग्जलाच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेच्या कामात अनियमितता केल्याची, जबाबदारी गांभिर्याने पाळली नसल्याचा ठपका ठेवून, होर्डींग्ज गैरव्यवहार प्रकरणी के. पी. पवार यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली
वीजवितरण अभियंता लाचेच्या सापळ्यात अडकला औरंगाबाद - नवीन विद्युत कनेक्‍शन घेण्यासाठी सहा हजारांची लाचेची मागणी करणारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा गारखेडा येथील कनिष्ठ अभियंता चंद्रकांत दासराव कान्हेगावकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडला असून, त्या अभियंत्याविरुध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भानुदासनगर येथील रहिवासी रामलाल देवीदास चौधरी यांनी गारखेडा परिसरातील आदर्श कॉलनी येथे विजेचे नवीन कनेक्‍शन मिळावे यासाठी कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कान्हेगावकर यांच्याकडे कोटेशनची मागणी केली होती. यावर चंद्रकांत कान्हेगावकर यांनी या कामासाठी 2 फेब्रुवारीला सहा हजार रुपयांची मागणी केली आणि ही रक्‍कम गारखेडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आणून देण्याचे सांगितले.
यामुळे रामलाल चौधरी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कान्हेगावकर विरुध्द लाच घेण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

No comments:

Post a Comment