Total Pageviews

Wednesday 30 March 2011

भ्रष्टाचारामुळे एशिया पॅसिफिक विभागात भारताचा चौथा क्रमांक

भ्रष्टाचारामुळे एशिया पॅसिफिक विभागात भारताचा चौथा क्रमांक फिलीपाइन्स आणि कंबोडिया यासारख्या भ्रष्टाचारी देशांमध्ये भारताचाही समावेश झाला आहे. भारतात वाढत चाललेल्या भ्रष्टाचारामुळे एशिया पॅसिफिक विभागीय चौथा क्रमांक लागला आहे. हाँगकाँगस्थित पोलिटिकल अँड इकॉनॉमिक रिस्क कन्सलटन्सी लिमिटेड (पीईआरसी) या संस्थेने केलेल्या सवेर्क्षणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. फिलिपाइन्स, इंडोनेशिया, कंबोडिया यासारख्या भ्रष्टाचारीत देशात भारताचाही क्रमांक लावला आहे. राष्ट्रीय नेत्यांपेक्षा नागरी आणि स्थानिक पातळीवरील राजकीय पुढाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अधिक आहे. स्थानिक प्रशासनातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर घोटाळ्यांमध्ये अडकलेले आहेत.
मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत. टेलिकॉम लायसन्स घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, आदर्श घोटाळा, राज्य सरकारच्या वित्तीय संस्थांकडून बेकायदा मालमत्ता कर्ज घोटाळा याकडे निदेर्श करून भारतात भ्रष्टाचारचे प्रमाण कसे वाढले आहे, त्याचा निदेर्शांक दिला आहे. सध्या या संदर्भात चौकशा, तपास आणि कोर्टबाजी सुरू असली तरी मुळात भ्रष्ट व्यवस्थेवरच येथील औद्योगिक क्षेत्र वाढले आहे. हीच यंत्रणा कायम आहे.
शिवाय विकीलिंक्सने ज्या प्रकारे संसदेत घोडेबाजार झाल्याचे प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारच्या घटनेने मीडियातून भारताची प्रतिमाही मलिन होत आहे, असेही या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment