Total Pageviews

Tuesday 1 August 2023

आयएस’च्या विळख्यातून बाहेर पडण्याकरता उपाय योजना PART 1

 


​ ‘आयएसची जागतिक विस्ताराची संकल्पना लक्षात घेतली, तर पूर्वीपासून दहशतवादाचा बळी ठरलेल्या भारताला याचा मोठा धोका आहे. त्या दृष्टीने ऊग्र वाद आणि दहशतवाद संपवण्याकरता नियमितपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.

घातपाती कारवायांमध्ये गुंतलेल्या दहशतवाद्यांना पुण्यासह राज्याच्या विविध भागांमधून झालेली अटक, हे इस्लामिक स्टेट (आयएस) या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा विळखा असल्याचे निदर्शक आहे. महाराष्ट्र आयसिस मोड्यूलया नावाने चर्चेत असलेल्या या गटातील पाच जणांना आतापर्यंत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई, पुणे आणि ठाण्यातून अटक केली आहे. यांपैकी काहींचा जयपूर स्फोटात हात होता.

राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्येही या संघटनेचे सदस्य असून, यामध्ये प्रत्यक्ष घातपाती कारवाया करणारे दहशतवादी, त्यांचे आश्रयदाते आणि त्यांच्यासाठी निधी गोळा करणाऱ्यांचे (टेरर फंडिंग) एक संघटित नेटवर्कआहे. पुण्यात अटक केलेला डॉक्टर हा आयएससाठी तरुणांची भरती करीत होता. पुण्यातील कोथरूडमध्ये मध्य प्रदेशातील दोघांना संशयावरून अटक झाल्यानंतर सुरू झालेल्या अटकसत्रात या बाबी समोर आल्या. त्यांच्याकडे काडतुसे, ड्रोन यांसह तरुणांची माथी भडकावणारे साहित्यही आढळून आले. काहींनी बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात स्फोटांची चाचणीही केली. वेगवेगळ्या पाच-सहा संघटनांच्या नावाखाली हे सर्व दहशतवादी कारवाया करीत असले, तरी या संघटना मूळ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (आयसिस) या जगातील सर्वांत संघटित आणि क्रूर दहशतवाद्यांचा भाग आहेत. काही काळापूर्वी देशात दहशतवादी कारवाया करणारी सिमीआणि नंतर इंडियन मुजाहिदिनसंपवल्यानंतर आता या संघटना नवीन नावे घेऊन पुन्हा पुनर्जन्म घेत आहेत.

महाराष्ट्र व पुण्यातील दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची आश्रयस्थाने उभी राहण्यापूर्वीच नष्ट करायला हवीत. काही काळापूर्वी दोन समाजगटांत तेढ उत्पन्न करून महाराष्ट्र पेटविण्याचा प्रयत्न झाला. अशा घटनांमधून माथी भडकलेल्या तरुणांवर नजर ठेवून त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न अशा संघटना करीत असतात. समाजविघातक घटकांना बळ मिळणार नाही, याचीही खबरदारी समाजातील जाणत्यांनी घेतली पाहिजे. तरच महाराष्ट्र सुरक्षित राहील.

पुणे दहशतवादी अन् स्लीपर सेलच्या हिटलिस्टवर? वर्षभरात १० दहशतवाद्यांना अटक,

नुकत्याच पकडलेल्या दोन दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात यंत्रणांना यश आले असले तरी घातपाताचा मोठा कट रचला जात आहे .

दहशतवादी कारवायांना खीळ बसल्याने गेल्या काही वर्षांत घातपातापासून सुरक्षित राहिलेल्या महाराष्ट्र व पुण्यात दहशतवादी आणि स्लीपर सेलपुन्हा सक्रिय झाल्याने शहराला दहशतवाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षभरात दहा दहशतवाद्यांना तपास यंत्रणांनी पुण्यातून अटक केली आहे.

दहशतवाद्यांची पाळेमुळे शहरातील विविध भागात खोलवर रुजल्याचे स्पष्ट आहे. दीड-दोन वर्षांपासून पुण्यात वास्तव्य असलेल्या दहशतवाद्यांबद्दल कोणत्याच यंत्रणेला कशी कल्पना नाही? दहा दिवसात चार दहशतवाद्यांना पुण्यातून अटक करण्यात आल्याने दहशतवाद्यांचा धोका अधोरेखित झाला आहे. अफाट शहरीकरण झालेल्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झालेला असताना दुसरीकडे थेट दहशतवादी कारवायाही उघड होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

No comments:

Post a Comment