Total Pageviews

Tuesday, 23 May 2023

देपसांग,लडाख मध्ये मध्ये झाली चिनी घुसखोरी?23 MAY 23 चीन सीमा सुरक्षित क...

अरुणाचल प्रदेश मधील भारत चीन सीमा सुरक्षित करण्यामध्ये देशाला प्रचंड यश भाग एक

मी एक मे पासून- 11 मे पर्यंत अरुणाचल प्रदेशचा आणि अरुणाचल प्रदेशला लागलेल्या भारत चीन सीमेच्या दौरा केला.याच सिमेवर मी १८८५-१९८८ आणी १९९२-१९९५ मध्ये तैनात होतो. त्यानंतर अनेक वेळा मी या भागात सैनिकी दौरे केले होते. मात्र २०१६ नंतरचा हा पहिला दौरा होता.त्यामुळे जमिनीवरती परिस्थिती नेमकी कशी आहे, हे स्वतःला डोळ्याने स्वतःच्या डोळ्याने बघता आले.माझ्या लेखाच्या पुढच्या दोन भागांमध्ये मी अरुणाचल प्रदेश मध्ये झालेली प्रगती आणि यामुळे भारत चीन सीमा सुरक्षित करण्यामध्ये आपल्याला कसे यश मिळत आहे याचे विष्लेशन करीन.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड ,सिक्कीम आणि त्रिपुरा ही राज्ये भारतासाठी महत्त्वाची आहे,कारण चीन, म्यानमार, भूतान, नेपाळ, बांगलादेश अशा देशांच्या सीमा ज्या भागात जुळलेल्या आहेत,ज्यामुळे चीन सीमेवर चिनी आक्रमण, चिनी घुसखोरी म्यानमार च्या सीमेवर बेकायदेशीर व्यापार, शस्त्र आणि अफ़ु गांजा चरसची तस्करी आणि म्यानमारच्या नागरिकांची भारतामध्ये घुसखोरी आणि बांगलादेश सीमेवरती बांगलादेशी घुसखोरी ही नेहमीच सुरू असते. म्यानमारच्या सीमेवर घनताट जंगल असल्यामुळे त्या सीमेचे रक्षण करणे सोपे नाही. याशिवाय या सीमेवरती तारेचे कुंपण पण लावले गेलेले नाही कारण ते लावणे अत्यंत खर्चाचे पडेल. बांगलादेशी घुसखोरी जग जाहीर आहे आणि आज भारतामध्ये पाच ते सहा कोटी बँग्लादेशी घुसलेले असावेत,यामुळे तो ईशान्य भारत किती महत्त्वाचा असेल, याची कुणालाही सहज कल्पना यावी.

भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, अरुणाचल प्रदेशची लोकसंख्या १४ लाख आहे. राज्यात सुमारे 26 प्रमुख जमाती(tribes) आणि 100 उपजमाती(sub tribes) राहतात.

ईशान्य भारताची प्रगती केली तर चीन अरुणाचल प्रदेश वरती हल्ला करेल

सामरिक दृष्ट्या आणि संरक्षणाच्या बाबतीत एक असा दृष्टिकोन होता की जर ईशान्य भारताची प्रगती झाली तर चीन अरुणाचल प्रदेश वरती हल्ला करून, अरुणाचल प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करेल, कारण अरुणाचल प्रदेशला चीन साऊथ तिबेट म्हणजे चीनचा एक हिस्सा समजतो. चिनी सैन्याने जारी केलेल्या संरक्षणाच्या व्हाईट पेपर प्रमाणे पुढच्या काही वर्षात चीन पाच मोठ्या लढाया आपल्या शत्रूंशी लढणार आहे, ज्या मधली एक लढाई आहे साऊथ तिबेटची म्हणजे अरुणाचल प्रदेश वर आक्रमण करण्याची.

भारताच्या घाबरट व्रुत्तीचा  गैरफायदा अर्थातच चीनने घेतला. चीन ने तिबेट मध्ये अतिशय मोठे रस्ते, रेल्वे लाईन ,विमानतळे आणि हेली पोर्ट्स बांधले. पहिले असे मानले जायचे की जर चीनला भारतावरती आक्रमण करायचे असेल तर चीनला कमीत कमी दोन ते तीन वर्ष सैन्य पुढे आणण्याची तयारी करावी लागेल. मात्र आता तशी परिस्थिती नाही .सीमेपर्यंत बांधल्या गेलेल्या रस्त्यांमुळे चीन काही महिन्यातच सैन्याची जमवाजमह करून आक्रमण करू शकतो. हे साफ आहे की हे रस्ते केवळ भारतावरती येणाऱ्या काळात केव्हातरी आक्रमण करण्याकरताच आहेत.

आपल्या सीमेचे रक्षण करण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे सुद्धा असणे गरजेचे आहे आणि याकरता महत्त्वाचे पैलू आहेत रस्ते ,वेगवेगळ्या नद्यांवरती पूल,रेल्वे लाईन्स.

मात्र डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधणे अनेक कारणांमुळे अतिशय वेळ खाऊ काम आहे .खूप पाऊस पडत असल्यामुळे रस्ते बांधायला वेळ कमी मिळतो. याशिवाय पुरेशा प्रमाणामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान या भागात वापरता येत नाही. मजुरांची कमी असते. रस्ते बांधण्याकरता लागणारी जमीन मिळवण्यामध्ये फार वेळ जातो. अनेक नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे रस्ता रस्ते बांधणे हे एक बिकट काम आहे. मी सियांग खोर्यामध्ये असतानाच रस्त्यावरती काम करणारे चार मजूर भूस्खलनामुळे,दरड कोसळ्यामुळे खालती दाबून मारले गेले.

अनेक भागांमध्ये देशातल्या मोठ्या रस्ते बांधणार्या कंपन्यांना काम करू देण्यात अडथळे निर्माण केले जातात. अत्याधुनिक अत्याधुनिक उपकरणाने सज्ज असलेल्या बाहेरच्या कंपन्याची रस्ते बांधण्याची क्षमता ही अरुणाचल प्रदेश मधील कंत्राटदारां पेक्षा कधीही अनेक पट जास्त असते. काम तिथल्या तंत्राटदारांना द्यावे अशी मागणी सतत केली जाते. त्यामुळे वेगाने रस्ते बांधणीचे काम करणे अत्यंत आव्हानात्मक असते.

रस्ते बांधणीमुळे प्रचंड पैसा इथल्या जनतेच्या खिशामध्ये गेलेला आहे आणि यामुळेच तिथली जनता अतिशय सुखवस्तू अशी दिसते. माझ्या पूर्ण प्रवासामध्ये असे समोर आले की अरुणाचल बहुतेक  कुटुंबाकडे एक चार चाकी गाडी( फोर व्हीलर) आणि दोन ते तीन टू व्हीलर असावेत. 

चांगल्या रस्त्यांमुळे विकास व पर्यटनाला मदत

या भागातील आदिवासी जनते करता प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स लागू नाही. अनेक ठिकाणी करचुकवण्याकरता वेगवेगळे उद्योगधंदे, दुकाने ही तिथल्या लोकल जनतेच्या नावावर उघडले जातात.मात्र सर्वात कठीण परिस्थितीमध्ये सीमेवरती तैनात असलेल्या भारतीय सैन्याला, जिथे अरुणाचल प्रदेशची जनता सुद्धा राहत नाही, तिथे इन्कम टॅक्स म्हणजे प्राप्तिकर कधीही माफ झाला नाही.

मात्र अतिशय चांगल्या रस्त्यांमुळे बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाम मधील शेतीमाल आता अरुणाचल प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश मधील अननस, संत्री यांना आसामच्या शहरांमध्ये चांगला भाव मिळत आहे. याचा फायदा अर्थातच आम जनतेला होत आहे. अरुणाचल प्रदेश मधील बहुतेक जनता आता दिब्रुगड आणि मोठ्या शहरांमध्ये आरोग्य समस्यांकरता जात आहे, जो प्रवास केवळ चार तासांमध्ये केला जाऊ शकतो.

अनेक परिवार आपल्या फोर व्हीलर चा वापर हा पर्यटना करता पर्यटन व्यवसाय करता करत आहे आणि हा व्यवसाय सियांग,सियोम,सुबान सिरी खोऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे. रस्ते अजून चांगले झाल्यात पर्यटन व्यवसाय हा ईतर लोहित सरली हुरी या खोऱ्यांमध्ये सुद्धा सुरू होऊ शकेल.

सरकार अरुणाचल प्रदेश मध्ये सीमावरती भागामध्ये व्हायब्रंट व्हिलेजेस म्हणजे मॉडेल व्हिलेजेस तयार करत आहे, ज्यामुळे त्या भागात असलेली आपली लोकसंख्या ही वाढेल आणि त्यामुळे ही जनता सीमा वरती भागात भारतीय सैन्याचे डोळे आणि कान म्हणून काम करतील. याचबरोबर सीमावरती भागात पर्यटन वाढले तर लोकांना तिथे रोजगार निर्मिती उपलब्ध होईल. होम स्टे हा प्रकार बऱ्यापैकी काम करत आहे, ज्यामुळे सीमावरती भागातल्या लोकांच्या प्राप्तीमध्ये भर पडत आहे.

   

No comments:

Post a Comment