Total Pageviews

Friday 21 April 2023

#सुदानमध्ये अडकलेले भारतीय, अमेरिका युरोप कॅनडा मध्ये गैर कानूनी जाणारे ...

काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या हुनसूर, शिवमोगा येथील सात आणि चन्नागिरी येथील पाच लोक सुदान देशात गेले. तिथे अल-फशेर शहरात भाड्याने घर घेऊन राहू लागले. हे सगळे हक्कीपिक्की समुदायाचे लोक. हे लोक जडीबुटी घेऊन सुदानमध्ये विकण्यासाठी गेले होते. मात्र, सध्या सुदानमधल्या भीषण परिस्थितीमुळे तेथील भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला.
यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट केले की, ”कर्नाटकातील हक्कीपिक्की समुदायाचे वनवासी सुदानमध्ये अडकले आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री त्यांना सुदानहून सुरक्षित परत आणा,” तर काँग्रेस प्रवक्ते सुरजेवाला म्हणतात की, ”सुदानमध्ये कर्नाटकचे ३१ लोक फसले आहेत. कन्नडविरोधी मोदी सरकारने लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याऐवजी त्या लोकांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले आहे.” यावर देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले की, ”तुमचे ट्विट पाहून मी स्तब्ध आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांचे जीवन दावणीला आहे. कृपया राजकारण करू नका.” सिद्धरामय्या काय किंवा सुरजेवाला काय, या दोघांची वक्तव्ये पाहून वाटते की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सुदानमधील भारतीयांना वार्यावर सोडून देऊन स्वतःला टीकेचे पात्र बनवतील का? स्वतःविरोधात जनमत निर्माण करतील का? त्यातही सुरजेवाला यांचे म्हणणे की, कन्नडिगांचे विरोधक मोदी सरकार! या त्यांच्या विधानातूनच कळते की, त्यांना आणि त्यांच्या पक्षाला सुदानमध्ये संकटात सापडलेल्या भारतीयांबद्दल प्रेम नाही, तर भारतात सत्तेत असलेल्या भाजपच्या मोदी सरकारबद्दल असुया मात्र आहे.
खरे तर, सुदानमधील भारतीयांना वाचवण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर हालचालीसुरू केल्या. यापूर्वीही कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना तसेच युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही देशात अडकलेल्या भारतीयांना भारतीय प्रशासनाने सुरक्षित मायदेशी आणलेहोते. त्यामुळे आताही सुदानमधल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी परत आणले जाईलच. नव्हे, तशी खात्री सुदानमधील आपल्या बांधवांना आपण द्यायला हवी
An increasing number of Indians are allegedly travelling
to Britain illegally on small boats and claiming asylum, partly
driven by a desire to bypass international student fees and pay
domestic fees, according to a story in the UK’s Times newspaper.
The newspaper alleges, quoting “Home Office officials”, that
Serbia’s visa-free travel rule for Indians “was providing a gateway
into Europe”. Until January 1, 2023, all Indian passport holders were
able to enter Serbia without a visa for up to 30 days. Now they do
have to apply for a visa.

No comments:

Post a Comment