Total Pageviews

Thursday, 19 September 2019

झेंड्यावरचा चंद्र आणि चंद्रावरील झेंडा...18-Sep-2019 -संतोष कुमार वर्मा -अनुवाद : महेश पुराणिक TARN BHARAT

पाकिस्तानात विज्ञानाची स्थिती अतिशय दयनीय आहेविज्ञानातील नवनवीन संशोधन आणि त्याच्या गुणवत्तेची स्थितीदेखील वाईटाहून वाईटच होताना दिसते.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणाऱ्या भारताच्या 'चांद्रयान-२' चा 'इस्रो'शी संपर्क तुटण्याची घटना खरेतर भारतीयांसाठीच नव्हे, तर विज्ञानात रस असलेल्या प्रत्येकासाठीच दुःखद होती. परंतुभारताला पाण्यात पाहणाऱ्या पाकिस्तानला त्यातून आनंद वाटला व त्या देशाच्या विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी तशा आशयाचे मतही व्यक्त केले. 'चांद्रयान-२'च्या नुकसानावरून भारत व 'इस्रो'बद्दल अभद्र भाषेचा वापर करत खालच्या शब्दांत टीका केली, ट्विट्स केली. तथापिहे पाकिस्तानच्या आतापर्यंतच्या वर्तणूक आणि स्वभावाला अनुसरूनच होते. कारण, पाकिस्तानला कधीही कोणी जबाबदार देश मानले नाही. तरीही त्याच्या केंद्रीय मंत्र्याकडून सामान्य शिष्टाराची, व्यवहाराची अपेक्षा केली जाऊ शकते. पण, या सगळ्याचा अभाव फवाद चौधरींच्या रुपाने दृष्टीपथात आला. उल्लेखनीय म्हणजेचौधरी यांच्या कृतीतून केवळ त्यांची वैयक्तिक नव्हेतर संपूर्ण देशाच्या मानसिकतेचे आणि सभ्यतेचेही दर्शन झाले व त्यातून अनेक प्रश्नही उभे राहिले.

अवकाश संशोधनात पाकिस्तानचे स्थान

फवाद चौधरी भावनातिरेकात इतके वाहवत गेले कीत्यांना आपण पाकिस्तानात राहत असल्याचे, आपल्या देशात वैज्ञानिक संशोधनाची, अवकाश संशोधनाची नेमकी काय स्थिती आहेहेही ते विसरले. दरम्यानपाकिस्तानचा अवकाश संशोधन कार्यक्रम भारताच्या आधी सुरू करण्यात आला होताअमेरिकेच्या मैत्रीने उत्साह संचारलेल्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांनी आपणही अवकाश संशोधनात पुढे पुढे जात राहू, असा विचार केला. जनरल अयुब खान यांच्या लष्करी राजवटीत याच उद्देशाने १९६१ साली मोठ्या धुमधडाक्याने 'स्पेस अ‍ॅण्ड अपर अ‍ॅटमॉस्फियरिक रिसर्च कमिशन' म्हणजेच 'सुपार्को'ची स्थापना करण्यात आले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, 'भारतीय अवकाश संशोधन संस्था' म्हणजे 'इस्रो'ची स्थापना त्यानंतर १९६९ साली करण्यात आली होती. परंतु, असे असूनही भारताने अवकाश संशोधन तथा त्यात वापरल्या जाणाऱ्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासात गेल्या ५० वर्षांत जी प्रगती केली, त्याच्या आसपासही 'सुपार्को' फिरकू शकली नाही. पाकिस्तानकडे अवकाश क्षेत्रात दाखवण्यासाठी केवळ उधारीवर घेतलेल्या अवकाश कार्यक्रमांची-उपक्रमांची जंत्री आहे. 'सुपार्को'ने १९६२ आणि १९७२ दरम्यान अमेरिकेने हवामानविषयक माहितीसाठी दिलेल्या 'रेहबर रॉकेट्स'चे प्रक्षेपण केले व त्यालाच आपले यशही मानले. पाकिस्तानच्या 'बॅलेस्टिक मिसाईल' कार्यक्रमाप्रमाणेच त्या देशाचा अवकाश संशोधन कार्यक्रमाची संपूर्ण भर परदेशातून गोळा केलेल्या कृत्रिम उपग्रह आणि त्यापैकी कित्येकांवर 'मेड इन पाकिस्तान'चे लेबल लावण्यावरच राहिला. पाकिस्तान ज्या दळणवळण उपग्रहाला स्वदेशनिर्मित असल्याची टिमकी वाजवतो, त्याच्या प्रक्षेपणालादेखील तब्बल ५० वर्षे लागली आणि विशेष म्हणजे ते झालेदेखील चीनच्या मदतीने! आज पाकिस्तान ज्या दळणवळण उपग्रहावर सर्वाधिक अवलंबून आहे, त्याचे नाव 'पाकसेट-१' असून चीननेच त्याची निर्मिती केली आहे. सोबतच ऑगस्ट २०११ मध्ये चीननेच त्याचे प्रक्षेपणही केले. पाकिस्तानी अवकाश कार्यक्रमाची सर्वात नवीन निर्मिती म्हणजे गेल्यावर्षी ९ जुलैला चीनने तयार व प्रक्षेपित केलेल्या दोन रिमोट सेन्सिंग उपग्रह हीच आहे.

संशोधन आणि विकासाची दुर्दशा

पाकिस्तानात विज्ञानाची स्थिती अतिशय दयनीय आहेविज्ञानातील नवनवीन संशोधन आणि त्याच्या गुणवत्तेची स्थितीदेखील वाईटाहून वाईटच होताना दिसते. विज्ञानविषय प्रतिष्ठित नियतकालिक असलेल्या 'नेचर'च्या अनुसार एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ दरम्यान विविध वैज्ञानिक विषयांवर पाकिस्तानच्या एकूण १८२ संशोधन प्रबंधांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशन झाले. भारताने प्रकाशित केलेल्या संशोधन प्रबंधांची संख्या मात्र याच काळात १ हजार, ४७२ इतकी होती. यावरूनच सध्या भारत जगात पंधराव्या क्रमांकावर आणि सिंगापूरइस्रायल व रशियाच्या पुढे असल्याचे आणि पाकिस्तान ४५व्या स्थानावर असल्याचे दिसतेमहत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानचा क्रमांक थायलंड, दक्षिण आफ्रिका, युक्रेन आणि अ‍ॅस्टोनियासारख्या देशांनंतर येतो. विज्ञानविषयक संशोधनाचा आणखी एक निकष किंवा मानक म्हणजे संबंधित देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंटसाठी केलेल्या अर्जांची संख्या होय. जागतिक बौद्धिक संपत्ती संघटना-'डब्ल्यूआयपीओ'च्या ताज्या आकडेवारीनुसार पाकिस्तानने पाकिस्तानच्या बाहेर (प्रामुख्याने अमेरिका व युरोप) पेटंट कार्यालयांमध्ये ५०५ पेटंट अर्ज दाखल केलेज्यातील १५९ अर्जांना मंजुरी दिली गेलीभारतीय नवसंशोधकांनी मात्र भारताबाहेरील कार्यालयात तब्बल ३१ हजार, ६२१ अर्ज केले. सोबतच पाकिस्तानच्या १५९ अर्जांच्या मंजुरीच्या तुलनेत भारताच्या १० हजार६७५ पेटंट अर्जांना मंजुरी देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे२०१७च्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले होते. कारणसुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात भारताने गेल्या ७० वर्षांत विज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती विशद केली होती.

अवकाश संशोधनातही लष्करी घुसखोरी!

पाकिस्तानातील विज्ञान क्षेत्राचा सत्यानाश करण्यात त्या देशातील धार्मिक कट्टरपंथीसत्तालोलुप राजकारणी आणि लष्कराचे महत्त्वाचे योगदान आहेधार्मिक रुढींनी वेढलेल्या पाकिस्तानला झिया उल हक यांच्या सत्ताकाळात तर आणखी एक झटका बसलातेव्हा सर सय्यद अहमद खान यांच्या उरल्यासुरल्या आधुनिकतावादाला सय्यद अला मौदीदीला इस्लामी कट्टरपंथीयांनी गिळंकृत केलेपाकिस्तानात चंद्रावर सर्वाधिक संशोधन करणाऱ्यांत मौलानांच्या नेतृत्वातील 'रुए हिलालकमिटीचाच समावेश होऊ शकतो व त्यांच्याकडे तसे संशोधनप्रबंधही असतीलजी ईदचा चंद्र कधी दिसेल याची माहिती देणारी व गणना करणारी अधिकृत संस्था आहेसंशोधनाच्या नावावर इस्लामाबादमध्ये डझनभर संस्थांसाठी इमारती उभारून सरकारने आपल्या कर्तव्याची इतिश्री केलीपण त्यातल्या संशोधनाची अवस्था आज अशी आहे कीया संस्थांना तत्काळ बंद केले तरी काडीचाही फरक पडणार नाहीपाकिस्तानी लष्कराचा ज्याप्रकारे त्या देशाच्या सरकारवर कब्जा राहिला तसेच विविध संशोधन संस्थांचे वाटोळे करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. 'सुपार्को'च्या शेवटच्या चार अध्यक्षांची नावे व त्यांच्या शैक्षणिक पात्रताच पाकिस्तानच्या अवकाश कार्यक्रमाची दशा स्पष्ट करतात : मेजर जनरल रजा हुसैन (२००१-२०१०, विज्ञानात बी.एस्सी), मेजर जनरल अहमद बिलाल हुसैन (२०१०-२०१६, विज्ञानात एम.एस्सी), मेजर जनरल कैसर अनीस खुर्रम (२०१६-२०१८, बी.एस्सी) आणि मेजर जनरल आमेर नदीम (२०१८-वर्तमान अध्यक्ष, बी.एस्सी). 'अवकाशविषयावर संशोधन करणाऱ्या एखाद्या संस्थेचा प्रमुख ज्याने संशोधन तर सोडूनच द्यासंबंधित विषयाचे प्राथमिक अध्ययनही केलेले नाहीती व्यक्ती संस्थेला कोणती प्रेरणा आणि मार्गदर्शन देऊ शकतेज्याच्याकडे उत्तम पदासाठी जुगाड करण्यात वा निवृत्तीची वाट पाहण्याव्यतिरिक्त वेळ नाही, रस नाही, ती व्यक्ती संशोधनाच्या क्षेत्रात काय दिवे लावू शकते?

अशा सर्व घडामोडींमध्ये पाकिस्तानच्या पहिल्या अवकाशवीराच्या रुपात ओळख निर्माण केलेल्या नामिरा सलीमने 'चांद्रयान-२' मोहिमेसाठी 'इस्रो'ला शुभेच्छा दिल्या आहे. नामिरा सलीम यांनी म्हटले की, 'चांद्रयान-२ही मोहीम वास्तवात दक्षिण आशियासाठी एक मोठी झेप आहेजी केवळ या प्रदेशालाच नव्हे तर संपूर्ण वैश्विक क्षेत्राच्या धडपडीतला गौरवशाली क्षण आहे. सोबतच नामिरा यांनी सांगितले की, “दक्षिण आशियातील अवकाश संशोधन प्रादेशिक विकासात महत्त्वाचे आहेमग त्याचे नेतृत्व कोणत्याही देशाकडे का असेना. अवकाश आपल्याला एकजूट करते, पृथ्वीवर आपल्याला विभाजित करणाऱ्या सर्वच राजकीय सीमा तिथे समाप्त होतात.नामिरा यांच्या या विधानातून असेही दिसते कीपाकिस्तानात एका बाजूला मागासलेले विचार बाळगणारा वर्ग आहेजो भारताच्या अपयशातून खूश झाला, मग स्वतःच्या घराची स्थिती कशीही असो. पणभारताच्या अपयशाने त्यांना सुखाचे दोन क्षण तरी लाभले हेही नसे थोडकेदुसऱ्या बाजूला पाकिस्तानातील एक मोठा वर्ग असाही आहेजो तार्किकदृष्ट्या विचार करतो आणि समजून घेतो आणि पाकिस्तानच्या अवनतीने चिंताग्रस्तही होतोपाकिस्तानातील हीच माणसे आपला देश विज्ञानाच्या क्षेत्रात नेमका कुठे उभा आहे, हे जाणून घेऊ इच्छितात. सोबतच भारत पाकिस्तानपेक्षा पुढे कसा निघून गेला, आज पाकिस्तानही चांद्रमोहिमेच्या गोष्टी करतो, पण ते सत्यात उतरू शकते का, याचाही विचार ते करतात. तसेच त्याबाबत त्यांच्या मनात संशयाचे धुकेदेखील आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या 'सुपार्को'चे अधिकृत संकेतस्थळ अवकाश संशोधनाच्या योजनांवर नेहमीसारखेच मौन आहे. आपल्या अपयशाला झाकण्यासाठी अशाप्रकारची खिल्ली उडवणे पाकिस्तानच्या भल्याचे, हिताचे कोणतेही काम करणारे नाही. पाकिस्तानात संशोधन आणि विकासाच्या गुणवत्ता व दर्जातील सुधारणा तोपर्यंत होऊ शकत नाहीजोपर्यंत तिथे विज्ञानाची उत्तम संस्कृती विकसित होणार नाही.No comments:

Post a Comment