Total Pageviews

Monday 17 July 2017

नरपशूंचा हल्ला vasudeo kulkarni


Thursday, July 13, 2017 AT 11:38 AM (IST) Tags: ag1 अमरनाथच्या पवित्र गुहेतल्या श्री शंकराचे दर्शन घेऊन अनंतनागहून जम्मूकडे जाणार्याह यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री नरपशू दहशतवाद्यांनी हल्ला चढवून 7 भाविकांचे केलेले हत्याकांड, म्हणजे माणूसकीचाही मुडदा पाडणारे भयानक कृत्य होय. गेली काही वर्षे अमरनाथच्या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे भीषण सावट असले, तरीही लष्कर, सीमा सुरक्षादल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे ही यात्रा शांततेत पार पडत होती. 1 ऑगस्ट 2000 या काळ्या दिवशी पेहलगामच्या अमरनाथ श्राईन बोर्डाच्या यात्रेकरूंच्या मुख्य तळावर दहशतवाद्यांनी अचानक चढवलेल्या हल्ल्यात 45 भाविकांचे मृत्यू झाले होते. त्या घटनेची जगभर निंदाही झाली होती. पण या घटनेनंतर मात्र अमरनाथ यात्रेवर भ्याड हल्ला चढवायचे धाडस सैतानी आणि विकृतीने पछाडलेल्या दहशतवाद्यांना झाले नव्हते. पण, सोमवारी रात्री मात्र त्यांना सुरक्षा व्यवस्थेतल्या चुकीमुळे भाविकांच्या बसवर हल्ला चढवायची संधी मिळाली. अमरनाथाचे दर्शन घेऊन वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन पुढे जम्मूला जायसाठी 56 यात्रेकरूंना घेऊन ही बस अनंतनागहून निघाली, ती सुरक्षा व्यवस्थेचा भंग करून. रात्री सात नंतर अनंतनाग- जम्मू महामार्गावरून वाहने चालवू नयेत, असा नियम अंमलात असतानाही, ही खाजगी बस रात्रीच्या वाहतूकबंदीचा नियम मोडून या महामार्गावरून जात होती. या मार्गावर येणा-जाणार्यान सर्व वाहनांना पोलीस आणि सुरक्षा दलांचे संरक्षण असल्याने, आतापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक सुरक्षित होती. पण, या एकाकी जाणार्याह बसला हेरून दहशतवाद्यांनी बाटेंगूच्या परिसरात तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना घडली, तेव्हा या रस्त्यावर सुरक्षा रक्षकांची गस्त नव्हती. दहशतवाद्यांनी अचानक चढवलेल्या हल्ल्यामुळे या गाडीचा चालक सलीम शेख गफूर याला मृत्यूच्या संकटाची जाणीव झाली. त्याने धैर्याने न डगमगता बस न थांबवता भरधाव वेगाने 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या लष्करी तळावर आणली. पण, दोन वेळा दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात बसच्या खिडक्यांजवळ बसलेले 7 यात्रेकरू ठार झाले आणि 19 जण जखमी झाले. आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसानेच 50 यात्रेकरूंचे प्राण वाचले अन्यथा अधिक प्राणहानी झाली असती. केंद्र आणि गुजरात सरकारने त्याला बक्षीस जाहीर करून त्याच्या धैर्याची प्रशंसा केली. हे योग्यच झाले. दहशतवाद्यांनी हल्ला चढवलेल्या बसची आणि बसमधील यात्रेकरूंची नोंद यात्रा सुरक्षा समितीकडे नव्हती, हा पोलिसांचा दावा खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. नोंदणी झालेली ही बस त्या रात्री लष्करी जवानांनी आणि परिसरातल्या जनतेने तातडीने मृत्यूच्या कराल संकटातून वाचलेल्या यात्रेकरूंना मदत करून माणुसकी जागवली. दहशतवाद्यांनी मात्र धार्मिक सामंजस्य आणि एकजुटीच्या काश्मिरियतच्या परंपरेची मात्र आपल्या राक्षसी कृत्याने होळी केली. अमरनाथच्या यात्रेसाठी देशभरातून येणार्याक लाखो भाविकांची अनंतनाग आणि परिसरातले मुस्लीम लोकही श्रद्धेने सेवा, सहाय्य करतात. यात्रेकरूंच्या मदतीसाठी याच भागातील लोकांची पथकेही सेवाकार्यात गर्क असतात. या हल्ल्याने अमरनाथच्या यात्रेवरचे दहशतवादाचे सावट अधिक गंभीर झाले असले, तरी केंद्र आणि राज्य सरकारने मात्र या हल्ल्याची निंदा करीत अधिक सुरक्षा व्यवस्थेत ही यात्रा सुरू ठेवत, दहशतवाद्यांच्या नीच कृत्यांना, कट कारस्थानांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाविकांच्या या सामूहिक हत्याकांडाचा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह फुटीरतावादी हुर्रियत परिषदेच्या नेत्यांनीही निषेध करून, हा मानवतेवर हल्ला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानचेच कारस्थान काश्मीर खोर्याेतल्या लाखो लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेला पर्यटन व्यवसाय बंद पाडून लोकांची रोजीरोटी हिरावून घ्यायसाठी पाकिस्ताननेच दहशतवाद्यांना आणि त्यांच्या साथीदारांना, हिंसाचार पेटता ठेवायसाठी हजारो कोटी रुपयांचा पुरवठा केला. परिणामी काश्मीर खोर्याात सुरक्षा दलाच्या जवानांवर सुरू झालेले दगडफेकीचे सत्र थांबलेले नाही. अशांत परिस्थितीमुळे काश्मीर खोर्याातला पर्यटन व्यवसाय जवळजवळ ठप्प झाला. आता अमरनाथच्या यात्रेमुळे अनंतनाग आणि परिसरातल्या लोकांना मिळणारा व्यवसाय बंद पाडायसाठी ही यात्रा उधळून लावायची कटकारस्थाने पाकिस्तानातच शिजल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्नही झाले आहे. या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबाचा म्होरक्या इस्माईल यानेच आखली होती आणि त्याचा सुगावा भारतीय गुप्तचर यंत्रणांना लागलेला होता. त्यामुळेच असा दहशतवादी हल्ला यात्रेकरूंवर होण्याचा धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. आतापर्यंत यावर्षी यात्रा सुरू झाल्यापासून 40 हजार जवानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 1 लाख 10 हजार यात्रेकरू अमरनाथचे दर्शन घेऊन सुरक्षितपणे परतलेही होते. पण, या हल्ल्यामुळे यात्रा बंद पडेल, हा दहशतवाद्यांचा अंदाज मात्र सुरक्षा दलांनी आणि सरकारने, निर्भय यात्रेकरूंच्या निर्धाराने उधळला गेला. या हल्ल्यानंतर गेल्या 2 दिवसात 8 हजार यात्रेकरूंचे जथे अमरनाथच्या गुहेकडे कडक सुरक्षा व्यवस्थेत वाटचाल करीत आहेत. नाक्यावरच ही बस अडवली गेली असती, तर भाविकांचे हकनाक बळी गेले नसते. सुरक्षा यंत्रणेतली ही छोटीशी पण भयंकर चूक निरपराध भाविकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. वास्तविक या बसवरच्या हल्ल्याच्या आधी काही वेळापूर्वीच बाटेंगूच्या पोलिसांच्या छावणीवर आणि त्यानंतर खानबलच्या पोलीस नाक्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. पण, पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने हे दहशतवादी पळून गेले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी अनंतनाग- जम्मू मार्गावरची सुरक्षा यंत्रणा अधिक कडक केली असती, या मार्गावर रात्रीची गस्त असती, तर हे दहशतवादी पोलिसांच्या तावडीत सापडले असते आणि ही दुर्घटनाही घडली नसती. या आधीही अमरनाथ यात्रा बंद पाडायसाठी पाकिस्तानच्या चिथावणीने, या यात्रेत अडथळे आणायचे प्रयत्न झाले होते. अमरनाथ श्राईन बोर्डाला यात्रेच्या काळात सरकारी मालकीची जमिन वापरायसाठी द्यायच्या विरोधात काश्मीर खोर्यानतल्या फुटीरतावाद्यांनी उग्र आंदोलनही केले होते. तेव्हा जम्मूतल्या जनतेने श्रीनगर आणि काश्मीर खोर्याधची नाकेबंदी केल्याने, फुटीरतावाद्यांना माघार घ्यावी लागली होती. गेली शेकडो वर्षे शांततेने पार पडणारी अमरनाथची यात्रा हे काश्मीर खोर्या तल्या धार्मिक ऐक्याचे प्रतीक असल्याने धर्मांध दहशतवाद्यांनी या ऐक्याला सुरुंग लावून, या यात्रेच्या मार्गातल्या जनतेची उपासमार करायचा रचलेला हा कट होता. केंद्र सरकारने आता अधिक सावधपणे पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या या विकृत कारवाया मोडून काढायला हव्यात. अमरनाथ यात्रेवर झालेल्या ताज्या हल्ल्यातही पाकिस्तानचाच हात आहे. अबू इस्माईल हा पाकिस्तानी अतिरेकीच या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. या हल्ल्यातील पाकिस्तानी सहभागाचे पुरावेच समोर येत आहेत. त्यामुळेच हिंदुस्थानने युद्धबंदी मोडून पाचशेहून अधिक वेळा सीमेवर हल्ले केल्याचा कांगावा पाकडय़ांनी सुरू केला आहे. पाकडय़ांचे हे ‘सोंग’ आणि ‘ढोंग’ ओळखून हिंदुस्थानने अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे! पाकिस्तानचे नवे ढोंग पाकिस्तानसारखा ढोंगी देश आणि पाकडय़ांसारखे खोटारडे राज्यकर्ते जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. बरं, हे ढोंग आणि खोटेपणाचा बुरखा कित्येकदा टराटरा फाटला आणि जागतिक पातळीवर पाकिस्तानच्या अब्रूचे धिंडवडे निघाले तरी असत्याच्या वाटेवरील फरफट सोडायला हा देश तयार नाही. आताही पाकिस्तानने नवे ढोंग रचले आहे. हिंदुस्थानी सैन्याने मागील सात महिन्यांत ५४२ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ला आणि त्यातील पाकिस्तानचा सहभाग यावरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही थाप ठोकली हे उघड आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी हा फुसका बॉम्ब फोडला. वास्तविक पाकिस्तानी लष्कर, त्यांची आयएसआय ही गुप्तचर संस्था आणि एकूणच पाकिस्तानी सरकार हिंदुस्थानविरुद्ध सदैव कुरापती काढत असतात हे आंतरराष्ट्रीय सत्य आता जगाने स्वीकारले आहे. हिंदुस्थानातील घातपाती कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांमागे पाकडय़ांचेच सैतानी डोके असते हे प्रत्येक वेळी जगासमोरही आले. हिंदुस्थानने युद्धबंदी मोडून ५४२ वेळा सीमेवर हल्ले चढवले या बंडलबाजीवर खुद्द पाकिस्तानी जनतेचाही विश्वास बसणे कठीणच आहे. तरीही त्या देशाचे हिंदुस्थानविरुद्धच बांग ठोकणे सुरूच असते. पाकिस्तानी सैन्याने सीमेवर गोळीबार करायचा, तोफांचा भडीमार करायचा आणि हिंदुस्थानी सैन्याला एका दिशेला चकमकीत गुंतवून ठेवतानाच दुस-या बाजूने प्रशिक्षित केलेले अतिरेकी हिंदुस्थानी हद्दीत घुसवायचे हे पाकडय़ांचे जुनेच कारस्थान आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनी उत्तर दिले की, ‘‘शस्त्रसंधी मोडली हो’’ म्हणून गळा काढायचा हे पाकिस्तानचे ‘ढोंग’ आणि ‘सोंग’ आता जगाला चिरपरिचित झाले आहे. हिंदुस्थानने मागच्या सात महिन्यांत युद्धबंदी मोडून केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी सैनिकांसह १८ जणांचा मृत्यू झाला असा दावा पाकिस्तानी प्रवक्त्याने केला आहे. समजा, पाकिस्तानचा हा दावा क्षणभर मान्य केला तरी एक प्रश्न उरतोच! हिंदुस्थानी सैन्याने जर पाचशेहून अधिक वेळा युद्धबंदी मोडून पाकिस्तानी हद्दीत गोळीबार केला असेल तर फुटकळ अठराच पाकडे कसे काय मरण पावले? मृतांचा आकडाही मग शेकडय़ांतच असायला हवा होता. चार-चार युद्धांत हिंदुस्थानकडून पराभवाची धूळ चाखल्यानंतरही हिंदुस्थानी सैनिकांच्या नेमबाजीवर पाकडय़ांनी अशी शंका घ्यावी हे बरं नाही! याचा अर्थ स्पष्ट आहे युद्धबंदी पाकिस्तानकडूनच मोडली जाते. त्याला चोख प्रत्युत्तर तर मिळणारच. पाकिस्तानने आधी आगळीक करायची आणि हिंदुस्थानी जवानांनी गोळीबाराला गोळीबारानेच उत्तर दिले की, शस्त्र्ासंधी मोडल्याचा कांगावा करायचा हा पोरकटपणा आहे. हिंदुस्थानकडून होत असलेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त होत आहे अशी फुसकुलीही पाकिस्तानने सोडली आहे त्यावर विश्वास कोण ठेवणार? नाही म्हणायला हे रडके बाळ मांडीवर घेणाऱया चीनच्या नकटय़ा मामूंशिवाय पाकडय़ांचे हे नकली अश्रू पुसायला कोण पुढे येणार? वास्तविक हिंदुस्थानने ५४२ वेळा युद्धबंदी मोडली हेच सफेद झूठ आहे. उलट पाकिस्ताननेच गेल्या अडीच-तीन वर्षांत हजाराहून अधिक वेळा युद्धबंदी मोडून सीमेवरील चौक्या आणि हिंदुस्थानच्या सीमावर्ती गावांवर हल्ले चढवले. हिंदुस्थानी हद्दीत घुसून दोन जवानांची निर्घृण हत्या केली, त्या दोन्ही जवानांचे शीर धडावेगळे करून मृतदेहांची क्रूर विटंबना केली. पाकिस्तानने सीमेवर केलेले हल्ले आणि कश्मीर खोऱयात अतिरेक्यांमार्फत घडवलेले हल्ले यात हिंदुस्थानचे दोनशेहून अधिक जवान शहीद झाले. अमरनाथ यात्रेवर झालेल्या ताज्या हल्ल्यातही पाकिस्तानचाच हात आहे. अबू इस्माईल हा पाकिस्तानी अतिरेकीच या हत्याकांडाचा सूत्रधार आहे. या हल्ल्यातील पाकिस्तानी सहभागाचे पुरावेच समोर येत आहेत. त्यामुळेच हिंदुस्थानने युद्धबंदी मोडून पाचशेहून अधिक वेळा सीमेवर हल्ले केल्याचा कांगावा पाकडय़ांनी सुरू केला आहे. पाकडय़ांचे हे ‘सोंग’ आणि ‘ढोंग’ ओळखून हिंदुस्थानने अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा सूड घेण्याच्या तयारीला लागायला हवे! जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी इस्माइल याने या हल्ल्याचा कट रचल्याची माहितीही समोर आली आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती आधीच व्यक्त करण्यात आली होती. गुप्तचर विभागाने तशी माहिती सरकारला दिली होती. या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे आश्वासन जम्मू-काश्मीर सरकारने दिले होते. तरीही सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी किंवा टूर ऑपरेटर्सच्या चुकीमुळे मानवजातीला कलंक असलेल्या दहशतवाद्यांनी निरपराध अमरनाथ यात्रेकरूंवर भ्याड हल्ला केला आणि त्यात सात भाविक मृत्युमुखी पडले, ही अतिशय दु:खाची आणि तितकीच संतापजनक बाब आहे. काश्मीर खोरे कायम पेटते राहावे असेच पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना वाटते. त्याच हेतूने अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमध्ये आणखी भर घालणारा हा हल्ला आहे. कोटय़वधी भारतीयांची श्रद्धा आणि परंपरेवर झालेला हा हल्ला आहे. १५ वर्षापूर्वी अमरनाथ यात्रेकरूंवर असाच हल्ला झाला होता. त्यानंतर मधल्या काळात ही यात्रा सुरळीत पार पडली. दहशतवादाचा धोका असतानाही देशभरातून मोठय़ा संख्येत यात्रेकरू अमरनाथला दरवर्षी जातात आणि अतिशय श्रद्धेने ‘बम बम बोले, हर हर महादेव’चा गजर करत बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतात. अमरनाथ यात्रा हिंदू-मुस्लीम सहिष्णुतेचा ऐतिहासिक वारसा समजली जाते. १८५० मध्ये बुटा मलिक या मुस्लीम मेंढपाळाने अमरनाथ गुंफा शोधली होती. हे मलिक कुटुंब या गुंफेचे रखवालदार होते. नंतर दशनामी आखाडा व पुरोहित सभा मातन या दोन हिंदू संस्थांच्या पुजा-यांनी अमरनाथ गुंफेची जबाबदारी घेतली. त्यामुळे कित्येक दशके ही यात्रा हिंदू-मुस्लीम सद्भावनेचा आदर्श होती. पण २००० मध्ये नॅशनल कॉन्फरन्स सरकारने यात्रेकरूंना योग्य सुविधा मिळाव्यात म्हणून अमरनाथ गुंफा प्रार्थनास्थळावर प्रशासक आणून मलिक कुटुंब व हिंदू संस्थांची मक्तेदारी मोडली. तरीही देशाच्या विविध भागांतून हजारो पर्यटक या यात्रेला जात असताना त्यांच्या जेवणाची-निवासाची व प्रवासाची जबाबदारी स्थानिक मुस्लीम करत असतात. हिंदू-मुस्लीम धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेला तडा देण्याच्या उद्देशाने पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यातून धार्मिक तणाव वाढविण्याचा उद्देश स्पष्ट होतो. या हल्ल्याने अमरनाथ यात्रेकरू अजिबात विचलित झालेले नाहीत आणि घाबरलेही नाहीत, हे मानवतेच्या शत्रूंनी लक्षात घेतले पाहिजे. कारण हल्ल्याच्या दुस-याच दिवशी जम्मू बेस कॅम्पहून ३२७९ भाविकांचा जत्था पहलगाम आणि बालटालकडे रवाना झाला. परंतु नेहमीच घडणा-या अतिरेकी हल्ल्यांमुळे दिवसेंदिवस काश्मीरमधील पर्यटकांची संख्या कमी होत आहे. त्याचे परिणाम स्थानिक जनतेवर होत असून बेकार तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून अतिरेकी त्यांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अतिशय चिंताजनक बाब आहे. अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यापुढे झुकायला भारत हा षंढांचा देश निश्चितच नाही. कोणत्याही संकटांचा मुकाबला करण्यासाठी आपण सक्षम आहोत. पाकपुरस्कृत आतंकवाद आता ठेचून काढलाच पाहिजे. अमरनाथ यात्रा शांततेत झाली तर हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने नांदतील आणि काश्मीर खो-यात शांतता नांदेल, अशी भीती पाकिस्तानला वाटते. स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तानात कायम अस्थिरता, अशांतता आणि दिवाळखोरी आहे. चीन व अमेरिकेने फेकलेल्या तुकडय़ांवर त्यांची मस्ती आणि मुजोरी सुरू आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करून हिंदूंच्या मनात मुस्लीम बांधवांबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. ही बाब लक्षात घेत स्वत:च्या हितासाठी काश्मिरी बांधवांनी पाकिस्तानचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे.

No comments:

Post a Comment