Total Pageviews

Tuesday 28 July 2015

gurudaspur attacks punjab terror


छुप्या युद्धाचा नवा डाव पाकिस्तानवरील विजयाचे स्मरण देणारा 'कारगिल विजयदिन' भारतात साजरा व्हावा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुदासपूर जिल्ह्यात दीनानगर येथे दहशतवाद्यांनी १२ तास धुमाकूळ घालावा, हा निश्चितच योगायोग नाही. गेले काही दिवस 'बब्बर खालसा' ही दहशतवादी संघटना काही हालचाली करीत होती. मात्र, पोलिस ठाण्यावर कब्जा करणाऱ्या या दहशतवाद्यांनी ज्या रीतीने आत्मघाती हल्ला केला आणि अंत जवळ आल्यावर 'अल्ला हु अकबर' घोषणा दिली; त्यावरून हे दहशतवादी जिहाद पुकारलेल्या लष्कर-ए-तय्यबा किंवा जैश-ए-महंमदचे असणार, हे उघड आहे. गुरुदासपूर हा डावीकडे पाकिस्तानची सीमा तर डोक्यावर काश्मीरची देशांतर्गत सीमा असा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. सीमा ओलांडून काश्मीरमध्ये घुसणारे दहशतवादी इतर राज्यांमध्येही कसे घुसू शकतात, याचा इशारा या आत्मघाती हल्ल्याने नव्याने दिला आहे मुंबईवरील आत्मघाती हल्ल्यात जसे दहशतवाद्यांकडे अद्ययावत शस्त्रे, उत्तम तंत्रसुविधा आणि पोलिसांकडे मात्र कालबाह्य बंदुका असे चित्र दिसले, नेमके तसेच चित्र पंजाबात दिसले. सर्व राज्यांची पोलिसदले वेगाने सुसज्ज, प्रशिक्षित व चपळ करायला हवीत, हा धडा नव्याने मिळतो आहे. दहशतवाद्यांशी चालणारी ही लढाई यापुढेही अनेक वर्षे चालणार आहे आणि ती येत्या काही काळात अधिक रक्तरंजित होऊ शकते. 'इस्लामिक स्टेट' या पश्चिम आशियात शियांचे शिरकाण करणाऱ्या दहशतवादी संघटनेने आपल्या इरादापत्रावर काश्मीरचे नाव ठळक अक्षरात लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी, श्रीनगरमध्येही 'इस्लामिक स्टेट'चे झेंडे फडकले. काश्मीरचा कब्जा करण्याची इच्छा असणाऱ्या दहशती शक्तींमध्ये उद्या संघर्ष सुरू झाला तर त्यातून अनेक हल्ले सोसावे लागू शकतात. या पार्श्वभूमीवर, ११ सप्टेंबरच्या २००१च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने सुरक्षाव्यवस्थेत छोटीसुद्धा फट राहू नये, यासाठी आकाशपाताळ एक केले. भारतालाही त्याच वाटेवर ठोस पावले टाकावी लागणार आहेत. . एक राष्ट्र म्हणून भारतीय या प्रदीर्घ लढ्याची तयारी कशी करतात, यावरच या दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन अवलंबून आहे गुरुदासपूरचा हल्ला : का? दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ने अखेर डाव साधला. पंजाबमध्ये ठरवून हल्ला झाला. गुरुदासपूर येथील हल्ल्यात एक पोलीस अधीक्षक शहीद, पाच नागरिक आणि तीन दहशतवादी ठार झाले. या आकड्यांमधून उद्याच्या हल्ल्याची धमकी दडलेली आहे. एकाच ठिकाणी हल्ला न करता पुढचे हल्ले एकाच वेळी अनेक ठिकाणी होण्याची भीती आहे. असे दहशतवाद्यांकडून होणारे हल्ले हे केवळ व्यक्तीवरचे हल्ले नाहीत, ते देशाच्या स्वातंत्र्यावरचे हल्ले आहेत. या देशातली लोकशाहीची व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची भूमिका काही दहशतवादी संघटनांनी घेतलेली आहे आणि त्यातून लोकांना वेठीला धरून हे हल्ले पुन्हा सुरू झाले आहेत. दहशतवाद्यांचा हल्ला हा विषय राजकीय होऊ देता कामा नये. सरकार कोणाचे आहे, कोणत्या पक्षाचे आहे, ही बाब या ठिकाणी गौण आहे. भारताविरुद्ध आणि इथल्या लोकशाहीविरुद्ध पाकिस्तानात संघटीत झालेल्या दहशतवादी शक्ती ही व्यवस्था उद्ध्वस्त करू पाहत आहेत. त्यामुळे कौरव-पांडवांच्या भांडणाच्या वेळी दुस-याने हल्ला केल्यानंतर ‘आम्ही पाच नव्हे, एकशे पाच आहोत,’ ही भूमिका पांडवांनी घेतली. आज देशातल्या सत्तेत नसलेल्या पक्षांनाही ही भूमिका घ्यावी लागेल; पण देशातलीच काही अतिशहाणी मंडळी कुख्यात दहशतवाद्यांना फाशी देऊ नका, अशी मागणी करायला पुढे येतात. या अतिशहाण्या मंडळींना जागेवर आणण्याची गरज आहे. त्यांचा बुद्धिवाद आणि त्यांचा तर्कवाद याची या देशाला गरज नाही. देशाच्या सुरक्षेचा बुद्धिभेद करणा-या या अतिशहाण्या मंडळींचा हातभार या दहशतवाद्यांना मिळत आहे. ही फार गंभीर गोष्ट आहे. म्हणून या अतिशहाण्या बुद्धिवाद्यांना ‘गप्प बसा नाही तर लोक तुम्हाला गप्प बसवतील,’ हे स्पष्ट सांगण्याची वेळ आलेली आहे. पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्याचा संबंध याकूबच्या फाशीशी काही आहे का? तो निश्चितपणे असला पाहिजे.. फाशीची जाहिरात न करता सूर्य उगवण्यापूर्वी फाशीचा कार्यक्रम आटोपायला हवा होता; पण त्याचे मार्केटिंग केले गेले. गुरुदासपूरला झालेला दहशतवादी हल्ला हा याकूबच्या फाशीच्या निमित्ताने दहशत निर्माण करण्याचाच एक डाव आहे. ३० तारखेला त्याला फाशी देऊ नये, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. ती फाशी टळावी नाही तर आणखी हल्ले होतील, अशी धमकी दहशतवाद्यांनी दिलेली आहे. अनेक ठिकाणी बॉम्ब पेरलेले आहेत आणि देशभरात असा घातपात करण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मुंबई-पुणे अशा महाराष्ट्रातील शहरांमध्येही सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. गर्दीच्या ठिकाणी तपासनाके उभारण्यात आलेले आहेत. ही दक्षता घेण्याची गरज आहेच; पण पुण्यामध्ये या आधी अशी दक्षता घेतली असतानाही जर्मन बेकरीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. पोलीस जेवढी दक्षता घेतात, त्यातले कच्चे दुवे शोधून दहशतवादी टोळय़ा त्यावर मात करणारे डावपेच शोधतात. कितीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली तरी पंजाबात झालेला हल्ला दहशतवाद्यांनी लष्कराच्या वेशात येऊन केला. त्यामुळे दहशतवाद्यांच्या युक्त्या अधिक प्रभावी ठरत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या मागे पोलीस ठेवणे कोणत्याच सरकारला शक्य होणार नाही. त्यामुळे जेव्हा सगळा देश दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न दहशतवादी करतात तेव्हा केवळ पोलीस, केवळ लष्कर त्याचा प्रतिकार करू शकेल, अशा भ्रमात नागरिकांनी राहू नये. अनेक ठिकाणी असे दिसून आले आहे की, स्थानिक नागरिकही या दहशतवाद्यांना आतून सामील असतात. नक्षलवाद्यांना आसरा देणारे स्थानिक लोकच आहेत. नक्षलवाद्यांची आणि दहशतवाद्यांची तुलना करता येणार नाही; पण पंजाब जेव्हा भडकला होता तेव्हा दहशतवाद्यांना स्थानिक लोकच?साथ देत होते. पंजाबमधले जे तरुण या दहशतवाद्यांच्या टोळय़ांमध्ये सामील झाले, त्यांचे आयुष्य दोन-चार वर्षाचेच होते; पण डोकी भडकवून दिल्यानंतर विचार आणि विवेकाचा संदर्भ राहत नाही. त्यातूनच अतिरेकी तरुणांनीच पंजाब पेटवला. त्या काळातही पंजाबच्या जनतेने मोठे धर्य दाखवले. आज त्या गोष्टीला २५ वर्षे झाली. वर्षानुवर्षाची राष्ट्रपती राजवट संपून पंजाबमध्ये निवडणूक जाहीर झाली तेव्हा (१९९२) मतदानाच्या रांगेत उभे राहणा-या पहिल्या दहा मतदारांना ठार मारू, अशा धमक्या देणारी पोस्टर्स दहशतवाद्यांनी लावलेली होती. त्या सर्वावर मात करून पंजाबचे शूर मतदार रस्त्यावर उतरले आणि ४८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होऊन पंजाबमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार आले. बियंत सिंग मुख्यमंत्री झाले; पण पेटलेल्या दहशतवाद्यांनी मुख्यमंत्र्यांची हत्या केली. तरी पंजाबच्या शूर जनतेने या दहशतवाद्यांचा मुकाबला केला आहे.? गुरुदासपूरच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पंजाब पेटवण्याचे काम सुरू?आहे. देशाच्या मुख्य प्रश्नातून लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेने अतिशय काळजी घेऊन आपापल्या विभागात देशविरोधात अशा प्रकारची कोणती घटना घडणार नाही, यासाठी डोळय़ात तेल घालून सतर्क राहिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या धुस्सी बंध (रावी नदी) मार्गाने हे दहशतवादी आले आणि त्यांनी रेल्वे मार्गावर बॉम्ब पेरले आणि त्यानंतर ते दीनानगर येथे आले, असे पंजाबचे पोलीस महासंचालक सुमेधसिंग सैनी यांनी सांगितले. सदर दहशतवाद्यांच्या शरीराच्या निरीक्षणावरून ते मुस्लीम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत करण्यात आलेल्या चौकशीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होते. बामियाल गावातून ते भारतीय हद्दीत आले. पोलीस ठाण्यासह गुरुदासपूर सिव्हिल लाइन्सवरही हल्ला करण्याची त्यांची योजना होती, असे सूत्रांनी सांगितले. इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी वापर करीत असलेली जीपीएस यंत्रणा या दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्यानंतर सुरू केली. नदीचा प्रवाह जोराचा असल्याने हल्लेखोरांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी कालव्याचा वापर केला असावा आणि त्यानंतर जीपीएस यंत्रणा सुरू केली असावी, असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तळवंडी, परमानंद गाव आणि दीनानगर परिसर हा त्यांचा मार्ग असल्याचे दहशतवाद्यांकडे असलेल्या जीपीएस यंत्रणेद्वारे स्पष्ट झाले आहे. तर दुसऱ्या जीपीएस यंत्रणेद्वारे गुरुदासपूर सिव्हिल लाइन्स हा मार्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment