Total Pageviews

Saturday 4 July 2015

CATTLE SMUGGLING TO BANGLAESH

बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी रोखण्याचा आदेश ! कोलकाता - बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी रोखा, बांगलादेशवासियांना गोमांसाचा तुटवडा भासू द्या, म्हणजे ते गोमांस भक्षण करणे सोडून देतील, असा आशावाद केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना ते संबोधित करत होते. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, "सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी त्यांची गस्त वाढवल्याने बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी न्यून झाली आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये गोमांसाच्या मूल्यात ३० टक्के वाढ झाली आहे. सुरक्षा दलाने त्यांची गस्त अधिक कडक करून गोवंशाची तस्करी संपूर्णपणे थांबवल्यास बांगलादेशमधील गोमांसाच्या मूल्यात ७० ते ८० टक्के वाढ होईल आणि बांगलादेशचे नागरिक गोमांस भक्षण करणे सोडून देतील. बांगलादेशसमवेत आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आम्हाला ही मैत्री अजून वाढवायची आहे. बांगलादेश तस्करांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमणे होत आहेत. या आक्रमणांना सडेतोड उत्तर द्यावे. शासन कुठल्याही परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभे राहील. मी उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री असतांना पोलिसांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या. अशाच योजना मी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठी राबवणार आहे. एका अधिकृत सूत्रानुसार ख्रिस्ताब्द २०१४ मध्ये भारतातून बांगलादेशमध्ये १७ लाख गोवंशाची तस्करी झाली आहे." भारतातून गाईंच्या तस्करीचे रक्तरंजित वास्तव आपल्या देशात आगामी दोन महिन्यांनंतर पर्युषण पर्वाचा प्रारंभ होणार आहे. या कालावधीत किती पशुधनाच्या कत्तलीवर प्रतिबंध लावला जातो, हा खरा प्रश्न आहे. वर्षातील काही दिवस जसे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गांधी जयंती, महावीर जयंती, रामनवमी सारख्या राष्ट्रीय दिन आणि सणांच्या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याची सक्त ताकीद आहे. जगात भारत ही मांस निर्यातीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिका, सौदी अरेबिया, जपान, कोरिया आणि तायवान येेथे मांस आयात करणार्याअ कंपन्यांच्या मनात एकप्रकारची दहशत निर्माण झाली आहे. कारण, मोदींचा पशुधन कत्तलीला सक्त विरोध आहे. भारत गाय आणि म्हशीचे मांस निर्यात करण्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. जर भारतातून आयात बंद झाली तर मांसाची पूर्तता तसेच मांसावर विविध प्रक्रिया करून खाद्यपदार्थ बनविणार्याू कंपन्याच बंद कराव्या लागतील. परदेशी कंपन्यांच्या दृष्टीने मांस हा कच्चा माल आहे. त्यावर प्रक्रिया करून अनेक पदार्थ निर्माण होत असतात. तसेच भारतातही मोठ्या संख्येत मांसाहार करणारे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी दरवर्षी लाखो गाई आणि म्हशींची कत्तल केली जाते. एकतर भारतात मांसाहार करणार्यां च्या पोटात हे मांस जाते, अन्यथा या मांसाची निर्यात होऊन विदेशी मुद्रा मोठ्या प्रमाणात भारत येते. इस्लाम धर्मात पशुची कत्तल करण्याचे काही नियम आहेत. त्याचे पालन अनिवार्य आहे. पण, हे निष्पाप जीव मारले जाऊन जर विदेशी चलन मोठ्या प्रमाणात मिळत असेल, तर मग प्रतिबंध आणि नियमांची कोण पर्वा करतो? स्वातंत्र्यपूर्व काळात पशुंनाही अधिकार बहाल करण्यात आले होते ज्यांचे ब्रिटीश इंडियाच्या कायद्याच्या आधारे पालन केले जात होते. स्वातंत्र्यानंतर येथे अनिर्बंध सत्ता मिळाल्यानंतर मग येथे कायद्याची पर्वा करतोच कोण? चिंता करणारा वेडाच म्हटला जाईल. लेखकाने अतिशय परिश्रमाने यामागील तथ्यांचा शोध घेतला आहे. गुजराती पत्रकारितेने प्रारंभापासूनच गोहत्या आणि मांस निर्यातीला कडाडून विरोध दर्शविला आहे आणि त्यासाठी त्यांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. पण, आजकाल जी पत्रकारिता दिसत आहे, ती या मुद्यावर अतिशय उदासीन आहे. जर आपल्या पुढे अशा एका गाईचे चित्र सादर केले गेले, जिचे तोंड सुई-धाग्याने बंद केलेले असेल, तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकला गेला असेल तर ती ओरडू शकेल का? ती फक्त डोळ्यातून अश्रू तेवढे वाहू शकते. पण, या अश्रूंचे मोल कुणाला कळणार? भारताच्या सीमांना लागून सात देश आहेत. त्यात काही बौद्धधर्मीय आहेत तर बांगलादेश आणि पाकिस्तान हे मुस्लिम. हे दोन्ही देश मांसभक्षी आहेत. त्यामुळे गोवंशाची मोठी निर्यात या दोन देशांनाच होते. हा क्रम वर्षभर सुरूच असतो. मांस काढल्यानंतर उरलेल्या अवयवांच्याही तेथे विविध वस्तू तयार केल्या जातात. या कारणामुळेच विदेशातही भारतीय मासांची मागणी वाढतच आहे. प्रामुख्याने ईद सारख्या सणांच्या वेळी भारतातून लक्षावधी बकरे कसाईखान्यात जात असतात. सरकारकडे म्हणायला बंदी आहे, पण ती केवळ कागदापुरती. भारतातील ज्या मोठ्या नद्या पुढे बांगलादेश किंवा पाकिस्तानात जातात त्या किंवा सामुद्रिक मार्गाने हे बकरे बांगलादेश आणि पाकिस्तानात पोहाचत असतात. याची दोन कारणे आहेत. एकतर भारतात ज्या वस्तूंवर प्रतिबंध आहे, त्याची तस्करी करून तो माल या दोन देशांत जातो आणि साहजिकच त्याचे मूल्य अधिक मिळत असते. मग या दोन देशांतून मध्यपूर्वी आणि पश्चिोमेच्या काही देशांत तस्करी होते. तस्करीचा धंदा हा जोखमीचा असल्यामुळे त्याचे चढे भाव मिळणारच. तस्करी उघडकीस येऊ नये म्हणून गाय, म्हैस, बकरे यांचे तोंड शिवून बंद करण्यात येते. जेणेकरून त्यांची ओरड ऐकायला जायला नको. भारताच्या सीमावर्ती भागात राहणारे लोक अशा तस्करीचे मोठे वाहक असतात आणि ते हा माल संबंधित देशात पोहोचवण्यास मदत करीत असतात. पशुंची हत्या करणे हा अधर्म तर आहेच, पण त्यांना तडपातडपाकर मारणे हे पाप कितीतरी पटीने अधिक आहे. जगात या पशुंची काळजी घेऊन त्यांचा जीव वाचविणार्या संघटनाच नाहीत काय? त्यांना केवळ पैसा देऊन त्यांचीही तोंडे शिवली जातात की काय? सीमेवरील आमच्या जवानांनी अशा काही तस्करांना प्राणाची बाजी लावून पकडले, दोघांना ठार मारले आणि मोठ्या प्रमाणात पशुधन वाचविले असता, त्यांना प्रशस्तीपत्र देण्याऐवजी सरकारने चार जवानांनाच निलंबित करून टाकले. हा काळ संपुआचा. यात जे दोन तस्कर मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना एशियन ह्युमन कमिशन या संघटनेने पाच पाच लाख रुपये दिले! जवानांना दंड आणि तस्करांना मलिदा हा संपुआ सरकारच्या काळात न्याय होता. या घटनेने वाचकांना हे लक्षात आलेच असेल की, सरकारही या तस्करीला रोखण्यासाठी चिंतीत नाही. सीमा सुरक्षा दलाचे कमांडर उत्तमकुमार बंसल यांनी आपल्या निवृत्तीपूर्वी सरकारला एक पत्र लिहून, सरकारने या तस्करीला कायदेशीर स्वरूप द्यावे जेणेकरून त्यांना आम्ही पकडणार नाही. त्यांना गोवंश निर्यात करण्याचे परवानेच देऊन टाकावेत. आज गोवंशाची धडाकून कत्तल केली जात आहे आणि त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या जवानांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. बांगलादेशने अशा घटना घडल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. हा गोभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. भारत सरकारच्या या निष्क्रिय धोरणामुळे ईदच्या आधी भारतातून बकरे, गाई, म्हशी मिळून ४० लाख पशुधन बांगलादेशला निर्यात केले जाते. बांगलादेशातील प्रमुख वर्तमानपत्रांतच या सगळ्या बातम्या छापून आल्या आहेत. यापेक्षा मोठा पुरावा आणखी कोणता हवा आहे? एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात म्हटले आहे की, भारतातून दरदिवशी ८१ हजार डॉलर मूल्याचे गोधन निर्यात केले जाते. भारत सरकारला हे सर्व माहीत आहे. पण, डॉलर मिळतात म्हणून सरकार गप्प आहे. बांगलादेशात कापली जाणारी प्रत्येक दुसरी गाय ही भारतीय असते. यामुळे त्यांना केवळ मांसच मिळत नाही तर केस, चामडे, हाडे, शिंग, खूर ही त्यांच्यासाठी नोटा छापणारी मशीनही आहे. हे काम करणारे सर्व बांगलादेशातील व्यापारी आज कोट्यधीश झाले आहेत. एका शास्त्रीय संशोधनानुसार गोधनापासून साडे चार हजार बायप्रॉडक्ट निर्माण केले जातात. गाय आणि म्हैस यांची आतडी लांब असल्यामुळे त्यांची पावडर बनवून त्याचा उपयोग आग विझविण्यासाठी केला जातो. ब्राझीलच्या जंगलात आग लागणे ही सामान्य बाब आहे. म्हणून भारतातही अशी पावडर तयार करून ती चढ्या भावाने विदेशात निर्यात केली जाते. बांगलादेशी तर खुलेआम म्हणतात की, भारतातील गोधन आमच्यासाठी नोटा छापण्याची मशीन आहे. आपणास घरबसल्या पैशाचा ओघ यावा असे वाटत असेल तर भारतीय गोधन विदेशात निर्यात करून रातोरात कोट्यधीश बनता येऊ शकते. हा देश घुसखोरीने पोखरला जात आहे, हे वास्तव आहे. ऐन पावसाळ्यात आसाम पेटलाहोता. इशान्येकडील राज्ये बांगलादेशींच्या घुसखोरीने अस्वस्थ आहेत.इकडे काश्मिरात पाकिस्तानने कायम अतिरेक्यांना घुसविले आहे.नुसते घुसविलेच नाही, तर रक्तपातही घडवून आणला आहे. पूर्वांचलात चीनने धडक मारली आहे. अरुणाचल प्रदेशावर दावा सांगण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे.या घुसखोरांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित झाल्याच आहेत,अंतर्गत सुरक्षेचा प्रश्नआही गंभीर झाला आहे. फाळणीच्या जखमा अजूनही या देशाला छळत आहेत.तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातून (आजचा बांगलादेश) घुसखोरी वाढल्यावर आपण पाकिस्तानशी युद्ध केले आणि बांगलादेशची निर्मिती झाली.आता बांगलादेश आपला आसाम हडपून बळकट होऊ पाहतो आहे. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.फाळणी ही धार्मिक आधारावर झाल्याने तसा प्रश्न. संपला होता.परंतु, स्वातंत्र्य मिळवूनही पाकिस्तानची वळवळ काही थांबली नव्हती. पाकने भारतीय भूभागावर आक्रमण करणे सुरूच ठेवले होते. पाकिस्तान स्वतंत्र तर झाला होता, पण स्वावलंबी होताना त्याला अडचणी येत होती. आजही पाकिस्तान स्वावलंबी झालेला नाही आणि भविष्यातही होण्याची चिन्हं नाहीत. पाकचे सुरुवातीपासूनचे धोरण हे भारतविरोधी राहिले आणि आता तर त्या देशातील राजकारणच भारतद्वेषावर जिवंत आहे. भारताबाबत जेवढा द्वेष पसरविता येईल तेवढा तो पसरवायचा आणि त्याआधारे भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी तरुणांची मानसिकता तयार करायची. भारतद्वेषाने पिसाळलेल्या तरुणांना काश्मीरमार्गे,प्रसंगी नेपाळच्या सीमेतून भारतात घुसविण्याचे षडयंत्र पाकने रचले आणि त्यात त्या देशाला यशही प्राप्त झाले. भारताच्या संसदेवर झालेला हल्ला, मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला हा पाकप्रायोजितच होता,हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. हे हल्ले करण्यासाठी पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करण्याचे तंत्र अवगत केले आहे. काश्मीरमधील स्थितीही पाकिस्ताननेच बिघडविली आहे. काश्मिरात आज ज्या फुटीरवादी शक्ती आहेत, त्या पाकिस्तानलाच साथ देत असल्याने पाकचे मनसुबे सफल होत आहेत. काश्मीरचा एक भाग आजही पाकच्या ताब्यात आहे. युद्धात पाकला पाणी पाजल्यानंतर तो भाग ताब्यात घेणे भारताला अशक्य नव्हते. पण, चुकीच्या आंतरराष्ट्रीय धोरणामुळे तत्कालीन भारत सरकारने देशाचे कायमस्वरूपी नुकसान करून ठेवले आहे. घुसखोरीची ही समस्या आजही भारताला अस्वस्थ करते आहे.त्याचवेळी कणखरपणा दाखवून या समस्येवर मात केली असती, तर आज जे परिणाम भोगावे लागत आहेत,ते भोगावे लागले नसते.परंतु, मुत्सद्देगिरीत भारत सरकार कुठेतरी कमी पडले आणि कायमस्वरूपी डोकेदुखी विकत घेऊन बसले.पाकिस्तानचे लक्ष्य केवळ जम्मू-काश्मीरच असते, तर एकवेळ समजून घेता आले असते. पण, पाकिस्तान सरकार,पाकिस्तानचे लष्कर आणि पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संस्था असे सगळेच कायम भारताविरोधी षडयंत्र रचत असतात. भारताची अंतर्गत शांतता भंग करण्याच्या हेतूने अतिरेक्यांना भारताच्या विविध भागांत घुसवून घातपाती कारवाया घडवून आणायच्या, रक्तपात करून दहशत माजवायची आणि अस्थिरता निर्माण करून परिस्थितीचा फायदा घेण्याचा कट यशस्वी करण्यात पाकला नेहमीच सफलता मिळाल्याचे आपण पाहिले आहे. घातपाती कारवाया करताना पाकने पाठविलेले घुसखोर स्थानिकांनाही आपल्या आमिषाला बळी पाडतात आणि त्यांच्याच मदतीने दहशतवादी कारवाया अशांतता माजवितात,ही खरी भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब होय. सीमेपलीकडून घुसखोरी झाली असती आणि घुसखोर सीमेलगतच्या राज्यातच फक्त शांततेने नांदले असते, तर प्रश्नू तेवढा गंभीर झाला नसता.पण, घुसखोरीमागचे कारस्थान फार मोठे असल्याने चिंताही जास्त आहे. काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे आणि ते तसेच कायम राहावे यासाठी भारत सरकारकडून अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत.भारतीय सैन्याच्या अनेक तुकड्या आज डोळ्यांत तेल घालून केवळ जम्मू-काश्मिरातच पहारा देत आहेत.शेकडो सैनिकांनी सीमा सुरक्षित ठेवताना आणि घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडताना प्राणांची आहुती दिली आहे. घुसखोरीची समस्या हाताळताना भारताला प्रचंड त्याग करावा लागला आहे.प्रचंड मोठी किंमत प्राणहानी आणि वित्तहानीच्या रूपात मोजावी लागली आहे.

No comments:

Post a Comment